पाटील - " सगळे तयार रहा. तिथे खूप जण असू शकतात. तयार रहा. "
सगळे तयार होऊन पुढे जाऊ लागले. तिथे खूप झाडे झुडपे होते. सगळे सावधपणे आत शिरले. इतक्यात चारी बाजूने एक प्रकारचं कसलातरी बॉम्ब त्यांच्याजवळ येऊ पडली. सगळे सावध झाले.
काहिक्षण सगळे स्तब्ध होऊन त्याला बघू लागले. इतक्यात त्यातून धूर निघू लागल. त्यांना काही कळतच नव्हत की काय चालू आहे. धूर सगळीकडे पसरू लागली होती. आलेल्यांपैकी काही जण बेशुध्द होऊन पडत होते. जान्हवी ही थोड्यावेळात खाली पडली. तिला खाली पडताना पाहताच संतोष तिला उचलण्याच्या प्रयत्नात खाली बसला. तिला हलवून उठवण्याचा प्रयत्न करू लागला. पण काही क्षणात तो ही बेशुध्द झाला. पाटील आणि चव्हाण ही त्यांच्या तंद्रीत नव्हते. ते सुद्धा बेशुध्द होऊन खाली पडले.
थोड्यावेळाने जान्हवीचे डोळे उघडू लागले. ती शुध्दीवर आली. आजूबाजूला बघितल्यावर पाटील , चव्हाण , संतोष आणि बाकी सगळे हवालदार यांचे हात मागील बाजूस बांधून ठेवले होते. तिचे सुद्धा हात मागील बाजूस बांधलेले होते. जान्हवीच्या जवळ संतोष खाली पडला होता. त्याला बघून जान्हवी हाक मारू लागली.
जान्हवी -" संतोष.. संतोष..."
तीच आवाज ऐकताच संतोष डोळे उघडला. शुध्दीवर आल्यानंतर त्याला एक क्षण काही कळालच नाही की तो कुठे आहे? आणि काय चाललय? जान्हवीकडे बघताच तो उठण्याचा प्रयत्न केला.
संतोष -" जान्हवी... "
एवढं म्हणत तो हातातली रस्सी काढण्याचा निष्फळ प्रयत्न करू लागला. पाटील , चव्हाण आणि बाकीचे हवालदार खालीच बेशुध्द झालेले होते.
काहीकाळ तसेच गेल्यावर त्यांनाही शुद्ध येऊ लागलं. तंद्रीत आल्यावर ते पुढे बघतात तर तेच मोठीशी मशीन म्हणजेच बॉम्ब चालू अवस्थेत त्यांना दिसली. त्यात एक स्क्रीन त्यांना दिसू लागली. ज्यात वेळ उलटी जात होती. अजुन १० मिनट त्यात दाखवत होत. पाटील आणि बाकीचे त्यांचे हात सोडवण्याचा प्रयत्न करू लागले. त्यांना काही यश मिळण्याचा संकेत दिसत नव्हती.
इतक्यात कुठून तरी आवाज आला.
गुरुजी -" क्या इन्स्पेक्टर ?.. फस गये ना आके?"
अस आवाज येताच काही जण तोंडावर मास्क घातलेले , त्यांच्या जवळ आले आणि त्यांच्या डोक्यावर बंदूक ठेवले. पुढून दोघे मास्क घालून पुढे आले.
गुरुजी हसतच त्याच्या तोंडावरच मास्क काढला आणि बाजूच्या इस्माईलकडे दिला. इस्माईल ही त्याच्या तोंडावरचा मास्क काढला आणि त्याच्याही तोंडावर वैरी स्मितहास्य होती.
गुरुजी - " इन्स्पेक्टर... फिर से मिलके मुझे बहुत खुशी हुई.."
पाटील रागात त्याच्याकडे बघत होता. त्याची गन पुढे असलेल्या टेबलावर त्याला दिसत होती. त्याच्या मनात ती गन कसं तरी घ्यावं यासाठी प्लॅन करू लागला होता.
पाटील -" अबे... तू तो डरपोक निकला."
गुरुजी -" मे ओर डरपोक ??"
एवढं म्हणत तो हसू लागला.
गुरुजी -" कैसे?"
पाटील -" तेरे पास इतने आदमी है , फिर भी तूने मेरा हात बांधा हुवा है."
गुरुजी ते ऐकताच शांत झाला.
पाटील -" क्यू बे?.. अब बोलती बंद हुइ तेरी?"
गुरुजी -" इन्स्पेक्टर ... तू मेरा कुछ नहीं बिघाड सकता है."
पाटीलचा प्लॅन होता की त्याच्याकडून कसातरी त्याचा हात खोलवून घ्यावे आणि ती पुढील गन घेऊन ते बॉम्ब उध्वस्त करावे.
पाटील एवढ्यात हसू लागला.
पाटील -" ऐसे तू मानता है , लेकीन जाणता नहीं है. इसिलिये तुने मुझे बांध के रखा है. हिम्मत है तो मुझे खोल के दिखा."
हे ऐकून गुरुजींचा अहंकारेला इजा झाली. त्याला राग येऊ लागला होता . त्याला बघून इस्माईल पुढे येऊन म्हणाला.
इस्माईल - " नहीं गुरुजी... तुझे वो भडका रहा है. मत खोल."
गुरुजी रागात येऊन म्हणाला.
गुरुजी -" चिंता मत कर इस्माईल ... सिर्फ ९ मिनट और बस.. फिर बॉम्ब ब्लास्ट होगा. "
एवढं म्हणत तो पुढे आला आणि मोठ्यांनी म्हणाला.
गुरुजी -" खोलो इसे.. देखते है कितना दम है . और हा , कोई भी हमारे बीच नही आयेगा."
त्यातला एक पाटीलचा हात सोडवला. पाटील उभा राहिला. उभा होताच तो गुरुजीवर धावत गेला. जाताच त्याच्यावर मुक्केचे पाऊस पाडू लागला. त्यातले काही त्याला लागत होते , तर काही तो चुकवत होता. वेळ मिळताच तो ही पाटीलला मारू लागला. कधी दोघांच्या पोटात मुक्के पडायचे , तर कधी तोंडावर लाथ पडायची. गुरुजीही खूप ताकदीने त्याला मारत होता. बाकीचे त्या दोघांचे मारामारी बघत होते. कधी गुरुजी खाली पडत होता , तर कधी पाटील खाली पडत होता. पण दोघांपैकी कोणीच हार मानत नव्हता. वेळ ही खूप कमी राहिलेली होती.
पाटील वेळ बघताच पुढील टेबलाजवळ गेला. गुरुजीच्या पोटात तो लाथ घालून दूर केला आणि टेबलावरील त्याची गन घेतला आणि गुरुजींच्या दिशेनी तो दाखवला.
गुरुजी ते बघताच थांबला. त्याच्याकडे बाकीचे लोक ही बघू लागले.
पाटील -" चल... "
एवढं म्हणत तो गुरुजी च्या डोक्यावर गन ठेवला आणि पुढे सरकू लागला.
हे बघतच इस्माईल त्याची गन काढला आणि पाटीलच्या पायावर गोळी मारला. गोळी लागतच तो खाली पडला. पडताच वेदनेने तो ओरडू लागला.
गुरुजी -" एक बार तो मुझे लगा की मे हार गया. लेकीन नहीं मे अभी जितुंगा... "
एवढं बोलत तो हसत बॉम्बकडे जाऊ लागला. आत फक्त ३० सेकंद बाकी होते . खाली पडलेला पाटील ही हसत म्हणाला.
पाटील - " तू कभी जीत नहीं सकता साले. तुझे अभी पता नहीं है. तुझे बाद मे समझ आयेगा."
हे वाक्य गुरुजींचं लक्ष वेधून घेतलं. एवढच नाही तर संतोषचाही लक्ष वेधून घेतलं. तो विचार करू लागला.
संतोष -" काही तरी गडबड आहे. "
ते ऐकताच तिच्या जवळची जान्हवी म्हणाली.
जान्हवी -" काय?"
संतोष -" कसलातरी गडबड आहे?"
जान्हवी -" कसली गडबड?"
संतोष -" हे बघ जेंव्हा अर्जुनला गोळी लागली. तेंव्हा बाहेर असलेली अंबुलेन्स लगेच आत आली. म्हणजे अगोदरच अंबुलेन्स बाहेर होती. कसे काय?"
जान्हवीला ही हे पटलं.
संतोष - " आणि हा.. त्याच्या छातीवरून रक्त बाहेर येत होती. पण गोळी ज्यातून बाहेर येते तिथून रक्त स्त्राव होत असते. "
जान्हवी -" होय.. म्हणजे काय?"
गुरुजी पुन्हा म्हणू लागला.
गुरुजी -" अभी क्या फरक पडता है. ३० सेकंद मे पुरा महाराष्ट्र चपेट मे आयेगा. "
१० सेकंद उरले. ९.... ८... ७.... ६...
एवढ्यात लाईट गेली आणि बॉम्ब बंद पडली. हे बघून गूरूजीला आश्चर्य वाटलं. तो त्या बॉम्बकडे नीट तपासू लागला. गुरुजी गडबडीत म्हणाला.
गुरुजी -" इस्माईल... इसको क्या हूवा?"
इस्माईल ही बॉम्बला तपासला.
इस्माईल -" पता नहीं गुरुजी."
गुरुजी -" बाकी के बॉम्ब के बारे मे क्या न्यूज हे?"
इस्माईल बाकीच्या लोकेशनकडे बघितला. तो निराशेने म्हणाला.
इस्माईल -" वो भी नहीं फटे गुरुजी..."
गुरुजी रागात येऊन म्हणाला.
गुरुजी -" क्या हुवा ईसे?"
इतक्यात भुकण्याचा आवाज घुमु लागला. पूर्ण त्या मोठ्याश्या पडीक घरात सगळीकडे घुमू लागला. बाहेरून दोन आकृती आत येताना दिसू लागली. जसे आत येत होते तसे ती आकृती स्पष्ट होत होती. पुढे येताच लक्षात आल की हे दुसर तिसरं कोणी नसुन हे तर राजा आणि अर्जुन होते. त्यांना बघताच जान्हवीच्या तोंडून निघालं.
जान्हवी -" अर्जुन ... तू जिवंत आहेस.."
संतोष -" मला वाटलच ...."
अर्जुन त्यांना बघून फक्त स्माइल केला . पुढे येताच तो पाटीलला उचला आणि गुरुजीकडे बघून म्हणाला.
अर्जुन -" क्या गुरुजी मुझे देखके खुशी नहीं हुईं क्या?"
गुरुजी चकित झाला होता , पण तो काही तोंडावर दाखवत नव्हता.
गुरुजी -" तू जिंदा है... लेकीन कैसे?"
अर्जुन हसत म्हणाला.
अर्जुन -" तुझे क्या लगता है? ये सब तेरे प्लॅन से चल रहा था . नहीं.. ये सब मेरे प्लॅन से चल रहा था और ये प्लॅन पहिलेही बना था. कमिशनर ऑफिस मे."
कमिशनर ऑफिस
संतोष आणि जान्हवी बाहेर होते. संतोषला वाईट वाटू लागलं होत. आतमध्ये अर्जुन , चव्हाण , पाटील आणि कमिशनर होते
अर्जुन -" साहेब... माझा प्लॅन असा आहे की पहिला मला मरावं लागेल ."
पाटील - " हे काय म्हणत आहेस?"
अर्जुन -" म्हणजे नकली मरन ओ. त्यांना वाटेल की मी मेलो , पण नाही नंतर माझी एन्ट्री सगळी चेंज होईल."
कमिशनर -" त्यासाठी तर तुला त्यांच्या पुढे जाऊन मरावं लागेल "
अर्जुन -" ते माझ्यावर आणि संतोषदाकडे सोडा. तुम्ही फक्त एक अंबुलेन्सची व्यवस्था करा आणि हा तो हातात आला तरी तो एकदा हातून सुटेल."
पाटील -" हे कसं काय सांगू शकतोस तू?"
अर्जुन -" जो कॉलिंग डिटेल डिलीट करू शकतो . तो काहीही करू शकतो. त्यामुळे जरा सांभाळून ."
जेंव्हा त्यांना बॉम्बची लोकेशन मिळाली. तर पहिला अर्जुन पोलिस हेड ऑफिसला गेला होता. तिथे तो बुलेट प्रुफ जॅकेट घातला आणि त्याच्या सॉस ची पाकीट ठेवला आणि वरून पांढर शर्ट घातला.
त्याला जेंव्हा गोळी लागली. तेंव्हा त्यातून सॉस निघालं आणि गुरुजीला वाटलं की तो मेला.
*****
संतोष -" वा.... अर्जुन... मानलं तुला भावा.पण बॉम्ब कसं बंद झालं
अर्जुन -" हा... तुला आठवत नाही का?...ऋचा मॅडम म्हणाली होती की हे बॉम्ब फक्त मेन लाईटनी चालतो . मग आम्ही या ठिकाणची लाईट घालवली. म्हणजे बॉम्ब बंद झाला. ऋचा मॅडम यासाठीच बॉम्ब अस बनवलेले होत. "
हे ऐकून संतोष गुरुजीला म्हणाला.
संतोष -" तेरा तो खेळ खलास गुरुजी.."
गुरुजी अहंकारमध्ये म्हणाला.
गुरुजी -" लेकीन खलास करेगा कोन?. ये लडका , या ये कुत्ता..."
अर्जुन एक स्माइल देत म्हणाला.
अर्जुन -" वो लोग जिनसे तुम जेसे लोग डरते है."
एवढ्यात इस्माईलच्या डोक्यावर गोळी लागते आणि तो क्षणात खाली पडतो. बाकीच्या त्यांच्या लोकांवर ही गोळी चालते आणि ते ही मरतात. अर्जुनच्या मागून मोठी बंदुके घेऊन आर्मीचे लोक पुढे येत होते. पुढे येताच क्षणात त्यांचे लोक मेले.
अर्जुन उरलेल्या लोकांची हात सोडवला . आर्मीच्या लोकांचे हे मिशन तर डाव्या हाथेचा मळ होता. अर्जुन त्यांनाच सगळी माहिती देऊन बोलवला होता. जान्हवी सुटताच बॉम्ब कडे गेली आणि तो व्हायरस काढून घेतली आणि आर्मी कडे बाकीचं बॉम्ब सोपवली. आर्मी गुरुजीला घेऊन बाहेर जाऊ लागले . जाताना तो अर्जुनला पाहिला आणि म्हणाला.
गुरुजी -" तुझे मे बाहेर आके देख लुंगा."
अर्जुन -" चल झुटा..."
हे ऐकताच त्याला घेऊन ते सगळे पुढे गेले.
अर्जुनाच्या मनात असा समाधान वाटत होत. शेवटी तो तिच्या राधाच्या खूनेचा बदला घेतला होता.
पुढच्या दिवशी हे न्यूज सगळ्या पेपरमध्ये आल. हे बघून ऋचाला ही बर वाटलं. अर्जुन आता फक्त अर्जुन नाही तर राजार्जुन झालेला होता.
**********************************
समाप्त
ऋषिकेश मठपती
हा भाग तुम्हाला आवडला असेल ही अपेक्षा करतो. हि कथा कशी वाटली नक्की कमेंट करून कळवा .
मी पहिल्यांदाच कुठल्यातरी स्पर्धेत भाग घेतल. स्पर्धेचा निकाल काहीही असो. मला ही कथा लिहायला मज्जा आली . अपेक्षा करतो तुम्हालाही वाचायला आवडला असेल...
ही पूर्ण कथा कशी वाटली नक्की कमेंट करून कळवा.. वाट पाहीन सगळ्यांच्या कमेंटची... धन्यवाद ????????????????
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा