अर्जुन - ' का ?... का मी काहीही करू शकत नाही... म्हणजे राधाला न्याय नाही मिळणार... नाही अर्जुन तू हार मानून कसं चालेल.... तू महाभारतातल्या त्या अर्जुना सारखा आहेस.... हार न मानणारा... '
तेवढ्यात त्याला डायरीची आठवण आली... तो डायरी काढून वाचू लागला.
१५ जुन २०१९ -
आज खूप खूष आहे ... कारणच तस आहे.. मी , राहुल , अंजली आणि सुप्रिया युरोप टुरला जाणार आहोत... खूप मज्जा येणार आहे... आय एम वेरी एक्सायटेड..????????????
२० जुन २०१९ -
आज सकाळीच विमान इटलीच्या एअरपोर्टवर पोहचलं... खूपच मस्त आहे इटली आपल्या देशासारखा तर नाहीये... पण इथे खूप नीटनेटके आहे... आम्ही आज खूप थकलो आहे... ट्रॅव्हलमधेच खूप वैतागलो आम्ही... सो गूड नाईट... उद्या आम्ही फिरायला जाणार.. बट आय मिस अर्जुन अँड राजा..????????... गूड नाईट..
२२ जुन २०१९ -
इथलं सकाळ खूपच मस्त होती. सकाळी उठताच बाल्कनीमध्ये उभी राहून कॉफी पिन मला खूप आवडलं... सगळे खूपच थकले होते कालच्या प्रवासाने त्यामुळे सगळे उशिरापर्यंत झोपलो होते. सकाळी मूड फ्रेश झालेला होता... सगळे तयार झाले तसे आम्ही इटलीचे पदार्थाची चव बघायला हॉटेलच्या खाली आलो.... इटलीचे पदार्थ खूपच चवीष्ट असतात . पण भारतासारख्या मासालाची चव मात्र नव्हती. नाष्टा झाल्यावर आम्ही सगळे ' लीनिंग टॉवर ऑफ पिसा ' इथे पोहचलो ... खूप लोक तिथे आलेले होते. कोणी त्या टॉवरसोबत फोटो काढत होते तर कोणी तिथल्या वातावरणाचे आनंद लुटत होता... तुम्हाला माहितीच की टॉवर सोबत फोटो म्हणजे त्या टॉवरच्या वर हाथ ठेवल्यासारखे फोटो काढणे... आम्ही सुद्धा फोटो काढण्यात बिझी झालो.... पण आज काही विचित्रच घडल.. जेंव्हा सुप्रिया माझं फोटो काढत होती.. तेंव्हा ती सारखं माझ्या मागे बघत होती.. मी त्याला इशारेनेच काय झालं अस विचारल तर ती काही नाही अस म्हणत डोकं हलवली... खरच खूप खुशीत होते मी पण सुप्रिया एकदम गप्पच झाली होती... जेंव्हा आम्ही लंच करत होतो , तेंव्हा सुप्रिया म्हणाली की , ' राधा , मी आज बघितल की तुझ कोणीतरी पाठलाग करत होत .' मी म्हणाले ,' काही काय बोलतेस सुप्रिया...' सुप्रिया म्हणाली ,' खरच..' तसे परत शॉपिंग करायला गेलो होतो... सुप्रिया अचानक ओरडली ,' हे बघ राधा .. तो बघ .' तिच्या आवाजाने तो पळत जाऊ लागला.. तस राहुल त्याच्या पाठलाग करू लागला.. आणि आम्ही सुद्धा पळू लागलो. तो माणूस भारत मधलाच वाटत होता.. तो इटलीच्या त्या गल्ली बोळातून गायब झाला... मी खूप घाबरले होते ... कोण होता तो ??... तो कशाला पाठलाग करत होता.... इट्स नॉट गूड नाईट फॉर मी.. **
( तेवढ्यात अर्जुनला राधाच्या कॅमेरा मधला तो फोटो आठवला... त्याला आता लिंक लागत होत.. तो परत डायरी वाचू लागला ..) **
२३ जुन २०१९ -
परत तीच सकाळ झाली होती... आमच्या सोबत काल जे काही झालं ते तर मनात होतच .. पण ते विसरून आम्हाला पुढचा विचार करायचा होता... आमचं सगळं काही आटपून आम्ही ' ट्रेवी फाऊंटन ' ला निघालो... हे फाऊंटन १८ व्या शतकातल अगदी भव्य अस फाऊंटन होत... आम्ही तिथे गेलो तर तिथलं दृश्य बघूनच दंग झालो... पण सुप्रियाची नजर मात्र इकडे तिकडे बघत होती.. आम्ही फोटो काढण्यात मग्न होतो , तेवढ्यात सुप्रिया ओरडली , ' राहुल , हा बघ तो कालचा माणूस जो आपला पाठलाग करत होता.' एवढच ऐकुन पुढचं मागच विचार न करता राहुल त्याचा पाठलाग करू लागला.. त्याच ओरडणं बघून तिथले पोलिस पण त्याचे पाठलाग करू लागले... पण एका बोळात राहुल आणि एक पोलिस ऑफिसर त्याच्या पाठलाग करत होते.. तेवढ्यात तो माणूस मागे वळून त्याच्याकडे असलेल्या गण नी शूट केला.. ऑफिसर खाली कोसळला... राहुल तिथेच थांबला .. आम्ही नंतर तिथे पोहचलो.. सगळे ऑफिसर तिथे पोहचले.. खूप काही झालं.. आम्हाला पुढचं सगळ प्लॅन कॅन्सल करावी लागली... पप्पांना कॉल लावून आम्ही इथून निघालो... आम्ही इंडियाची परतीचा प्रवास सुरू केला... त्यांची खूप काही ओळख होती .. त्यामुळे आम्ही वाचलो.. गूड नाईट...????????????.. *****
अर्जुन पुढचं पाने चाळला तर पूर्ण कोरा होता.. म्हणजे राधा इंडियाला आल्यावर सगळं काही झालाय.. पण तेवढं तर कळाल की तीच कोणीतरी पाठलाग करत होता... अर्जुनला मात्र गरज होती एक साथी ची , जे त्याला यात मदत करतील.. त्याला खूप काही शोधून काढायचं होत... तेवढ्यात त्याला संतोषची आठवण आली.. तो खूप काही मदत करू शकतं होता.. तो उत्तम हॅकर सुद्धा होता आणि खूप काही जाणून होता. अर्जुनकडे असलेली मेमरी कार्ड सुद्धा त्याच्याकडूनच बघावं लागणार होती.. अर्जुन काहीही विचार न करता संतोषच्या घरी पोहचला.. तो त्याच्या रूममध्ये बिझी होता.. जेंव्हा त्याला कळाल की अर्जुन आलेला आहे , त्याला कळाल की तो कशासाठी आलेला आहे...
अर्जुन आणि राजा ( ????????) दोघेही तिथे आलेले होते.. संतोष त्याला आत घेत म्हणाला
संतोष -" अर्जुन .. इथे कसं काय???"
अर्जुन -" तुला माहिती आहे संतोष की मी इथे का आलोय ते..."
संतोषच्या रूममध्ये खूप काही सामान इकडे तिकडे पडलेले होते. अर्जुन बसत म्हणाला.
अर्जुन - " संतोष ... तुला पण माहिती आहे की राधाचं मर्डर झालाय ते..."
संतोष -" हो माहिती आहे .. पण..."
अर्जुन -" पण??" संतोष -" पण आपण काय करू शकतो??.. पोलिससुद्धा हाथ वर केलेले आहेत . आपण तरी काय करणार??..????????"
अर्जुन -" अस बसू पण शकत नाही ना.."
संतोष -" मग काय कर म्हणतोस??"
अर्जुन -" जेवढं काही लिंक मिळेल ते ऐकत्र करूयात आणि पोलिसांना देऊयात.. आता या डायरीच बघ ना.. हे वाचल्यावर मला कळाल की राधाचं कोणतरी इटलीहून पाठलाग करत होता ..."
संतोष -" तू कुठून घेतलास ही डायरी ?"
अर्जुन -" जेंव्हा पाटीलसाहेब बाहेर जात होते .. तेंव्हा सगळ्यांचं नजर चुकवून मी डायरी लपवलं.. "
संतोष -" तू डायरी लपवून आणलास??"
अर्जुन -" आणि हे मेमरी कार्ड सुद्धा..????"
संतोष -" अर्जुन ... हे चुकीचं आहे..."
अर्जुन -" आणि राधाचं मर्डर सुद्धा चुकीचं आहे... प्लीज हेल्प कर ना.. "
संतोष शेवटी वैतागून तयार झाला.. अर्जुन घेवून आलेला मेमरी कार्ड तो कार्ड रीडर मध्ये घालून पीसी ला कनेक्ट केला...त्या मेमरी कार्ड मध्ये खूप सारे फोल्डर होते... संतोष त्यातली ट्रिप हे फोल्डर ओपन केला. त्यात युरोप ट्रीपचे सगळे फोटोज् होते. अर्जुन त्या सगळ्या फोटोज् ना निरखून बघू लागला.
अर्जुन -" संतोष ... हे बघ इटलीच्या प्रत्येक फोटोमध्ये तो माणूस दिसत आहे. ज्याचा खून आपल्या समोर झाला होता.."
संतोष -" हो... तो कोण असेल??"
अर्जुन -" तेच तर आपल्याला शोधायचं आहे...पण मला हे कळत नाही ."
संतोष -" काय???"
अर्जुन -" जेंव्हा तो माणसाला गोळी लागली आणि त्याच्याकडे असलेल्या फोन वर कॉल आला . ते कॉल एक अज्ञात व्यक्तीचा होता आणि त्याला माहिती होत की आपण त्याचा पाठलाग करत होतो.. कसं??"
संतोष -" त्याचे माणस सगळीकडे असतील..."
अर्जुन -" नाही संतोष ... त्या माणसाचा पाठलाग करत होतो . हे फक्त आपल्यालाच माहिती होत.."
संतोष - " मग??" अर्जुन -" एक आपल्यातला कोणीतरी त्यांना इन्फॉर्मेशन देत होता.. नाहीतर त्यांना कुठून तरी हे न्यूज गेलं असणार..."
संतोष पीसीच्या स्क्रीनवर बघून म्हणाला
. संतोष -" अर्जुन ... यात एक डॅड म्हणून फोल्डर आहे.."
संतोष ती फोल्डर ओपन करतो , तर त्या फोल्डरमध्ये कित्येक डॉक्युमेंट्स होते. प्रत्येक डॉक्युमेंट ओपन करण्यासाठी एक पासवर्ड लागत होत.
संतोष - " डॉक्युमेंट ओपन होत नाहीये ... पासवर्ड मागत आहे."
अर्जुन - " मग आता??" संतोष - " पासवर्ड पाहिजे."
अर्जुन -" कुठून मिळेल??"
संतोष -" कुठून मिळेल म्हणजे????"
अर्जुन -" मला माहिती नाही काय पासवर्ड आहे ते??"
संतोष -" डायरीमध्ये काही नाही का??"
अर्जुन -" मला तर काही नाही सापडल.."
संतोष थोडा विचार करत होता. तेवढ्यात अर्जुन म्हणाला..
अर्जुन -" तू हॅकर आहेस ना... हॅक कर ना.."
संतोष -" तेवढं सोपं नाही आहे ते.. जर काही गडबड झाल तर डॉक्युमेंट क्रॅश होऊ शकत.."
अर्जुन -" म्हणजे पासवर्ड पाहिजेच तर??"
संतोष -" हो... मला वाटतं तिच्या मोबाईलमध्ये पासवर्ड सापडेल.."
अर्जुन -" कशावरून सांगतोस??"
संतोष -" खूप जण असेच करतात."
अर्जुन -" पण मोबाईल तर तिच्या घरी असेल ... आपल्याला आणावं लागेल.."
संतोष -" हो..."
अर्जुन -" आज रात्रीच आणतो.."
संतोष -" कसं आणशील?"
अर्जुन -" ते काम माझ्य वर सोड..."
एवढं बोलून अर्जुन राजा सहित तिथून निघाला.
रात्रीची वेळ होती. अर्जुन आणि राजा अगरवालच्या बंगला बाहेर उभे होते. वॉचमन झोपेत होता.
अर्जुन -" राजा ... तू इथेच थांब.."
राजा त्याच्या हातात आपला पंजा ठेवून होकार दिला. अर्जुन बंगलेच्या भिंतीवरून आत गेला. आतील गार्डन खूप मोठी होती. अर्जुनला राधाचं रूम कुठे होता याचा थोडाफार अंदाज होताच... तो तिथे गेला .. रूम तर वरच्या फ्लोअर वर होता. त्याला वर जायचं होत.. त्याला सुदैवाने तिथे एक शिडी सापडली . तो राधाच्या रूम बाहेर शिडी लावून चढू लागला. तो रूमच्या आत जाताच आतील लाईट लावला. तर त्याला कळाल की राधा गेल्यापासून रूमची स्वच्छता झालेली नव्हती. एक क्षण सुद्धा वाया न घालवता मोबाईल शोधू लागला. खूप ठिकाणी शोधू लागला. अखेर त्याला मोबाईल तिच्याच बेडच्या लोड खाली होती. तो मोबाईल घेवून खाली जाणार तेवढ्यात त्याच्या हाथून रूम मध्ये असलेल्या पॉट खाली पडला. सगळीकडे शांत असल्याने त्या पॉटच्या आवाज आला आणि वॉचमन जागा झाला . आतील लाईट सुद्धा लागली होती. म्हणजे आतील लोक सुद्धा जागी झालेले होते. अर्जुन वेळ न घालवता शिडीनी खाली उतरला. खाली उतरताच त्याला एक सी. सी. टी. वी कॅमेरा दिसली. त्याला बघून अर्जुनला काहीतरी खटकल . तो तिथेच न थांबता तिथली भिंत सुद्धा ओलांडला. राजा तर बाहेरचं उभा होता.
अर्जुन -" राजा चल... "
तेवढं म्हणातच राजा आणि अर्जुन पळू लागले. ते दोघं थेट संतोषच्या रूम मध्ये पोहचले.
संतोष -" अरे .. तुम्ही आलात??"
अर्जुन थोडा थकलेला होता. त्याला मोबाईल देत म्हणाला.
अर्जुन -" घे आणि ओपन कर.."
संतोष तीच मोबाईल घेऊन शोधू लागला. तिच्या ड्राईव्ह मध्ये बघू लागला.
संतोष -" येस आय गॉट इट..."
अर्जुन -" सापडला???."
संतोष -" होय..."
अर्जुन -" काय आहे पासवर्ड ??"
संतोष -" पासवर्ड आहे... राजार्जुन "
अर्जुन ते पासवर्ड ऐकताच त्याला कळून चुकल की राधानी राजा आणि त्याच नाव म्हणून पासवर्ड ठेवली होती. संतोष पासवर्ड टाकून डॉक्युमेंट्स ओपन केला तर त्या डॉक्युमेंट्समध्ये अगरवालच्या फॅक्टरीचे फोटो होते आणि त्याच्या संदर्भातली डॉक्युमेंट होते. त्यानंतर एका बिल्डिंगची सुद्धा फोटो होती.
अर्जुन -" हे काय आहे??"
संतोष त्या फोटोला झूम करतो . तर त्याला दिसतो " अगरवाल केमिस्ट रिसर्च लॅब "
संतोष -". हे एक रिसर्च लॅब आहे..."
तो पुढचा फोटो बघतो तर त्यात राधा , त्याचे वडील आणि एक महिला होती जी एका डॉक्टरच्या वेशात होती. ती एक फॅमिली फोटो वाटत होती.
अर्जुन -" ही कोण???"
संतोष -" माहिती नाही... पण एक फॅमिली फोटो वाटतोय."
अर्जुन - " पण ही तर डॉक्टर वाटत आहे."
संतोष -" होय.."
अर्जुन त्या फोटोकडे निरखून पाहत होता. ही महिला कोण आहे??... तो माणूस कोण होता ज्याचा खून एक गोळी लागून झाली होती??... त्यात राधाचं काय चूक होती म्हणून त्याच सुद्धा खून झाला होता?? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ' प्रलय आनेवाला है ' हे काय आहे??? अशे कित्येक प्रश्न अर्जुन च्या डोक्यात चालली होती...
********************************
क्रमशः
ऋषिकेश मठपती
पुढचा भाग लवकरच... जर या भागातील काहीच लिंक लागत नसेल तर प्लीज पहीलाचे भाग वाचा म्हणजे तुम्हाला लिंक लागेल... आवडल्यास नक्की कमेंट करा... धन्यवाद ????????????
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा