ते दोघे बाहेर येऊन बसले. आतमध्ये प्लॅन बनत होती आणि हे दोघं बाहेर बसले होते. आतून काहीही खबर या दोघांना नव्हती. जान्हवी तशी खाली मान घालून आपलं अंग एकवटून बसली होती . संतोष त्याच्या प्रेमाची पोळी भाजू पाहात होता. तिच्या अजुन जवळ सरकत म्हणाला.
संतोष -" तुला इतकं सगळं कसं माहिती ?"
जान्हवी खाली घातलेली मान न वर करता फक्त नजर वर करून म्हणाली.
जान्हवी -" म्हणजे?"
संतोष -" म्हणजे ते डी. एन . ए च वैगरे ??"
जान्हवी - " मी ऋचा मॅडम सोबत त्यांच्याच लॅबमध्ये कामाला होते. म्हणून तर इन्स्पेक्टर मला या केसमध्ये मदत करायला बोलावले. "
संतोष -" अच्छा .... मग तू ती लॅब का सोडलीस ?"
जान्हवी आत ताट बसत म्हणाली.
जान्हवी -" ऋचा मॅडम जेंव्हा बेपत्ता झाली होती . तेंव्हाच मला त्या लॅबमध्ये नकोस वाटत होत . त्यामुळे मी सोडले."
संतोष ह्मम म्हणत मोठा दीर्घश्वास सोडला.
संतोष -" घरी कोण कोण आहे ?"
ती त्याच्याकडे न बघताच म्हणाली .
जान्हवी - " आई बाबा आणि मी.."
ती लहान आवाजात म्हणाली. त्या गोड आणि लाजर्या आवाजाने संतोषच्या मनात स्पंदने उडत होते. न राहवून तो त्याच्या मनातलं प्रश्न विचारला.
संतोष -" तुला कोणी बॉयफ्रेंड आहे का?"
हे प्रश्न ऐकताच ती अचानक संतोष कडे पाहिली आणि नजर परत फिरवत . तिच्या बॉब कट केलेल्या केसांना कानामागे घेत आणि चष्मा नाकावर सावरत हळू आवाजात म्हणाली.
जान्हवी - " नाही..."
संतोषला नवलच वाटलं.
संतोष -" का?"
जान्हवी -" का म्हणजे??.. कोण माझ्या प्रेमात पडेल ??"
संतोष तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला.
संतोष - " मी पडलोय..."
काहीक्षण त्या दोघांची नजर एकमेकांना भिडली. ती पूर्ण क्षण थांबावे अस संतोषला वाटू लागलं. जान्हवी ही त्याच्या डोळ्यात हरवली होती. दोघात आता प्रेमाचे स्पोट घडत होते.
तेवढ्यात दार उघडल्याचा आवाज आला. त्या आवाजाने दोघेही दचकले. ऑफिसमधून अर्जुन आणि राजा बाहेर आले. अर्जुनला बाहेर येताना पाहताच दोघेही जागेवरून उभे राहिले. अर्जुन दोघांकडे न बघताच पुढे जात होता. त्याला पुढं जाताना बघत संतोष आणि जान्हवी त्याच्या बरोबर आले.
संतोष -" अरे .. काय झालं आत अर्जुन? "
अर्जुन तसाच पुढे जात होता.
जान्हवी -" आत काय झालं?"
अर्जुन मध्येच थांबला आणि दोघांकडे बघत म्हणाला.
अर्जुन -" यापुढे पोलिस त्यांच्या परीने काम करतील . आपण आपल्या पद्धतीने काम करूयात."
दोघांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह दिसत होत.
संतोष -" पण का?"
अर्जुन -" आपण त्यांच्या परीने काम करून शकत नाही. ते खूप विचार करतात . वरच्या लोकांना त्यांना उत्तर द्यावं लागतं. "
दोघेही आता शांत उभे होते.
अर्जुन -" दा आणि दी... तुम्ही आहात ना सोबत?"
दोघेही डोकं हलवून होकार दर्शवले.
अर्जुन -" चला मग."
तिघेही आता स्टेशनच्या बाहेर आलेले होते.
जान्हवी -" आता कुठ जायचं ?"
अर्जुन -" संतोष दाच्या घरी...."
संतोष आश्चर्याने त्याला बघू लागला.
संतोष -" माझ्या घरी?"
अर्जुन -" हो... काही प्रोब्लेम आहे?"
संतोष - " नाही... "
जान्हवी -" ओके..."
अस म्हणत ती तिचे केस पुन्हा एकदा कानामागे घेतली.
तिघेही आणि राजा रिक्षामधून संतोषच्या घरी पोहचले.
अर्जुन -" संतोष दा.. आम्हाला भूक लागलीय "
संतोष -" मग??"
अर्जुन -" काहीतरी कर ना खायला .."
संतोष -" मला काही येत नाही बनवायला आणि तसंही अपल्याला ही केस लवकरात लवकर सोडवायच आहे ना?"
अर्जुन -" पाहिला खाऊयात ना."
तेवढ्यात जान्हवी पुढे येत म्हणाली.
जान्हवी -" ओके... मी बनवते.. किचन कुठ आहे?"
संतोष बोट दाखवत किचन असलेली रूम दाखवली. जान्हवी किचन मध्ये गेली. ती जशी आत जात होती , तशी संतोष ची नजर तिच्यामागे जात होती.
राजा दारातच बसलेला होता. अर्जुन त्याच्यावरून हात फिरवत त्याच्याजवळ च बसला होता.
थोड्यावेळात जान्हवी तीन डिश घेऊन आली. राजाला ब्रेड खायला देऊन तिघेही आता खायला बसले. सगळे काही शांतपणे चालेल होत.
खाऊन झाल्यावर संतोष म्हणाला.
संतोष -" आता या केसकडे लक्ष द्यायचं काय? का एक झोप काढायचा आहे ?"
संतोष आता चिडलेला होता.
अर्जुन -" संतोष दा ... तुला स्टेशनचा नंबर माहिती आहे का?"
संतोष -" का?"
अर्जुन -" माहिती आहे का सांग?"
संतोष -" हो..."
अर्जुन -" त्याच कॉलिंग डिटेल काढू शकतोस का?"
संतोष -" कशाला?"
अर्जुन -" विसरलास का?.. त्याचा कॉल त्याच नंबर वर आलेला होता. त्याच लोकेशन काढण्यासाठी .."
संतोष -" तू विसरलास ते कॉलिंग डिटेल डिलीट करू शकतात ."
अर्जुन -" तूच कंपनीचे सर्व्हर हॅक करून राहुलचा कॉलिंग डिटेल काढला होतास."
संतोष -" अरे ते खूप अवघड आहे ."
अर्जुन -" अरे तू करू शकतोस हे मला माहिती आहे. हीच एक पर्याय आहे आपल्याकडे त्याच लोकेशन काढण्यासाठी ..."
संतोष थोडा वेळ विचार करून म्हणाला.
संतोष -" बर... मी प्रयत्न करतो. "
संतोष लगेच त्याच्या पी. सी वर कामाला लागला. जान्हवी आणि अर्जुन दोघेही त्यालाच बघत होते. संतोष कित्येक बटन दाबात होता . कित्येक सर्वर्सचे प्रोग्राम स्क्रीनवर दिसत होते. तो खूप प्रयत्न करू लागला .
खूप सारे प्रयत्न करून शेवटी तो दीर्घ श्वास घेतला.
संतोष -" शेवटी झालच...."
जान्हवी आणि अर्जुन त्या पी . सी च्या स्क्रीनवर बघू लागले.
अर्जुन -" ही लोकेशन कुठ आहे ?"
जान्हवी -" ही लोकेशन पुणेच्या बाहेर असलेल्या जंगलात आहे. "
संतोष -" तुला कसं माहिती ??"
जान्हवी -" मी पुणेमध्ये रहात होते. "
अर्जुन -" आपल्याला तिकडे जावं लागेल ."
संतोष -" त्यासाठी आपल्याकडे गाडी हवी ."
अर्जुन -" त्याच्या अगोदर आपल्याला म्हणजे तुला एक काम करावं लागेल ."
संतोष -" कोणत?"
अर्जुन -" तुझ्याकडे ती मशीन आहे का ज्यांनी त्यांचं लोकेशन आपल्याला कळेल ?"
संतोष -" म्हणजे जी.पी. एस ?"
अर्जुन -" हा... तेच मशीन."
संतोष -" नाही.. पण मी बनवू शकतो ."
अर्जुन -" मग बनव आणि हा ... तीन बनव ."
संतोष -" का?"
अर्जुन -" तुला नंतर कळेल . "
संतोष -" ठीक आहे ."
जान्हवी -" मी एक काम करते . माझ्या मित्राकडे एक फोर व्हिलर गाडी आहे . त्याच्याकडून मागून घेते . जायला सोप होईल. "
अर्जुन -" ते चांगलं होईल."
जान्हवी तीच फोन पर्से मधून मोबाईल काढून फोन लावू लागली.
अर्जुन -" संतोष दा .तुझा मोबाईल दे ."
संतोष -" का?"
अर्जुन -" तू दे बघू पहिला. किती प्रश्न विचारतोस?"
संतोष ना इलाजने त्याला मोबाईल दिला आणि जी. पी. एस बनवण्यात व्यस्त झाला.
अर्जुन मोबाईल घेऊन बाहेर गेला. फोन वर कुणाशी तरी बोलला आणि परत आला.
जान्हवी सुद्धा परत आली. तेवढ्यात संतोष त्याच काम करून मोकळं झाला होता.
जान्हवी - " गाडी खाली आली आहे. मी चावी घेऊन येते. तो पर्यंत तुम्ही तयार व्हा."
अर्जुन आणि संतोष फक्त मान हलवून होकारार्थी दर्शवली. जान्हवी खाली गेली आणि काही वेळात परत आली.
जान्हवी -" झाली का तयारी ?"
संतोष -" हो."
अर्जुन -" नाही .. "
संतोष -" अजुन काय राहिलाय?"
अर्जुन -" राजा... तू रेडी आहेस?"
राजा भुंकुन त्याचा सुद्धा होकारार्थी दर्शवला.
अर्जुन -" आता मिशन कंप्लीट करायचं आहे."
चौघेही खाली आहे. संतोष गाडी चालू केला आणि त्या लोकेशनच्या दिशेनी जाऊ लागले.
**********************************
क्रमशः
ऋषिकेश मठपती
पुढील भाग लवकरच येईल... हा भाग कसा वाटला नक्की कळवा... धन्यवाद ????????????
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा