अर्जुन त्या फोटोकडे निरखून पाहत होता. ही महिला कोण आहे??... तो माणूस कोण होता ज्याचा खून एक गोळी लागून झाली होती??... त्यात राधाचं काय चूक होती म्हणून त्याच सुद्धा खून झाला होता?? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ' प्रलय आनेवाला है ' हे काय आहे??? अशे कित्येक प्रश्न अर्जुनच्या डोक्यात चालली होती... तो आतापर्यंत झालेले सगळ्या घटनेचा पुनर्विचार करू लागला .
अर्जुन मात्र एकदम शांत बसला होता . त्याला बघून न राहवून संतोष त्याला विचारला
संतोष -" एवढं काय विचार करत आहेस , अर्जुन ??"
अर्जुन -" मी विचार करत आहे की नेमक काय होत आहे ???"
संतोष -" म्हणजे काय??"
अर्जुन -" पहिला राधा , राहुल आणि त्यांचे मैत्रीण पॅरिसला फिरायला गेले.. तिथे कोणीतरी त्यांचा पाठलाग करत होता .. त्याचा मागे हे गेल्यावर तो गायब झाला.. बरोबर??"
संतोष -" बरोबर.."
अर्जुन -" मग ते भीतीपोटी ट्रिप कॅन्सल करून परत भारतात येतात... मग माझी आणि राधाची भेट झाली.. नंतर आम्ही खूप क्लोझ झालो... मग अचानक राधाचं मृत शरीर रस्त्यावर मिळालं.."
अर्जुन एकटक बघत म्हणाला.
संतोष -" पुढे???"
अर्जुन -" मग... आम्ही कॉलेजमध्ये चौकशी केली तर कळाल की राहुल गायब झाला होता.. मग ट्रेस करून आपण त्याला शोधलो तर तो आपल्याला मृत अवस्थामध्ये सापडला . ते पण त्याची बॉडी लटकवून ठेवले होते आणि त्यामागे भिंतीवर लिहिलेलं होत ... काय होत ते??"
संतोष -" प्रलय आणेवाला है.."
अर्जुन -" मग आपण त्याला लास्ट कॉल ज्याचा आला त्याला ट्रेस केला तर तो सापडला खर आणि आपण त्याला पाठलाग केला तर कुणाला तर त्याच्याबद्दल कळाल .. त्याचा कॉल आला ते पण त्याच्या हत्येनंतर आणि तो म्हणाला की पाठलाग करू नकोस... मला तर वाटतं तो आपल्याला बघत होता.. "
संतोष -" कसं सांगू शकतोस तू?"
अर्जुन -" सिंपल फॅक्ट आहे... त्याला मर्डरबद्दल माहिती असावा.. तो साक्ष होता... त्यामुळे त्याचा मर्डर झाला.."
संतोष -" कशावरून सांगू शकतोस तू??"
अर्जुन -" मी जेंव्हा अगरवालच्या बंगल्यात गेलो होतो. तिथे मला सी. सी. टी . वी कॅमेरा होता आणि रस्त्यावर सुद्धा कॅमेरा असतो.. मला वाटतं तिथूनच तो मला सांगत होता की पिछा करू नकोस ... अस होऊ शकत का की रस्त्यावरचा कॅमेरा हॅक करून बघता येईल??"
संतोष -" हो होऊ शकत की पण त्याला खूप एक्स्पर्ट हॅकर लागतो.."
अर्जुन -" ह्मम ... म्हणजे या मर्डर मध्ये खूप मोठे लोक आहेत.. टेलिकॉम वरून कॉल रेकॉर्डस गायब असणं, सी. सी. टी. वी हॅक करून धमकी देणं... आणि हा हे "प्रलय आणेवाला है" .. याचा अर्थ काय असावा??"
संतोष -" मोठे लोक यात आहेत म्हणल्यावर काहीतरी मोठ होत आहे.."
अर्जुन -" मला पण हेच वाटत आहे... आणि अजुन एक त्या मेमरी कार्डमधील फोटोमध्ये ती महिला कोण आहे हे माहिती करावं लागेल.."
संतोष -" मला तर वाटतं हे एकच व्यक्ती सांगू शकते..."
अर्जुन -" कोण??"
संतोष -" राधा अगरवालचे बाबा रमेश अगरवाल.."
अर्जुन -" त्यांना आता भेटायचं कसं??"
संतोष -" म्हणजे?"
अर्जुन -" त्यांना तर पोलिस इन्स्पेक्टरसुद्धा चौकशी करत नाही , तर ते आपण काय चीज आहे??"
संतोष -" मग आता??"
अर्जुन -" एकच काम करू शकतो आपण??"
संतोष -" काय??"
अर्जुन -" पाटील साहेबांकडे जाऊयात.."
संतोष -" ते करतील परत केस स्टडी ?"
अर्जुन -" ट्राय करू की.."
दोघेही आता सकाळ होण्याची वाट पाहत होते. सकाळ होताच ते इन्स्पेक्टर पाटीलकडे जाणार होते..
सकाळचा सूर्य बऱ्यापैकी वर आलेला होता. संतोष , अर्जुन आणि राजा ( कुत्रा ) पोलिस स्टेशनला हजर झाले. थोड्यावेळाने पाटील साहेबांची गाडी स्टेशनला आली. स्टेशनच्या समोर या तिघांना बघून पाटील आत गेले. चव्हाण तर ये तिघांना बघून म्हणाला
चव्हाण -" काय अर्जुन...परत आलास... अरे साहेब ही केस सोडली आहे..."
अर्जुन -" चव्हाण साहेब ... एकदा तुम्ही एका रस्त्यावर पडला तर तिथून परत नाही जात का??... जाता ना... तसच आम्ही परत याच रस्त्यावरून जाणार आहे... आम्हाला पाटील साहेबांना भेटू द्या.."
चव्हाण -" थांबा .... विचारून येतो..????????????????"
चव्हाण केबिनमध्ये जाऊन थोड्यावेळाने तो परत बाहेर येतो.
चव्हाण -" तुम्हाला साहेब बोलवत आहेत..????????"
पाटील साहेब टेबलावरील फाईल स्टडी करत होते. बाजूला चहाचा कप होता. वर न बघताच ते म्हणाले.
अर्जुन -" साहेब... मला काहीतरी बोलायचं आहे.."
पाटील -" हा बोल.."
अर्जुन -" साहेब .. राधाचं मर्डर.."
त्याचा वाक्य पूर्ण होण्यापूर्वीच पाटील म्हणाले.
पाटील -" अर्जुन ... ती केस माझ्याकडे नाहीये.. त्यामुळे मला काही माहिती नाही."
अर्जुन -" साहेब ... एकदा माझं एका तर ही डायरी बघा ना .. मी हे डायरी राधाच्या रूममधून चोरलो होतो.. यात लिहिलं आहे की पॅरिसमध्ये यांना कोणीतरी पाठलाग करत होते... आणि या मेमरी कार्डमध्ये त्यांचा फोटो सापडला आणि त्या फोटोत तोच माणूस होता ज्याचा पाठलाग करताना त्याची हत्या झाली होती... आणि त्याच्या फोन वरून कॉल आला तो म्हणाला की ' प्रलय आणेवाला है '.... त्यात काही तर आहे साहेब.."
पाटील ती डायरी थोडक्यात वाचतो.
पाटील -" मग?"
अर्जुन -" जेंव्हा आम्ही राधाच्या रूममधून मेमरी कार्ड चोरून घेतलो होतो . त्याला पासवर्ड होता.."
पाटील -" एक मिनिट तू कधी मेमरी कार्ड घेतला होता?"
अर्जुन -" जेंव्हा तुमचा आणि अगरवाल यांच्यासोबत वाद चालू होता तेंव्हा..."
पाटील -" ओह... मग ??"
अर्जुन -" त्या मेमरी कार्डमधला प्रत्येक डॉक्युमेंटला पासवर्ड होता. संतोष सांगितला की बहुतेक लोक पासवर्ड मोबाईलमध्ये सेव करून ठेवतात..'
पाटील -" मग मोबाईल कुठून मिळाला??"
पाटील टेबलावर मोबाईल बघून आपली शंका विचारलं.
अर्जुन -" रात्री मी राधाच्या घरी मोबाईल घ्यायला गेलो. तिथून मोबाईल घेतलो आणि पासवर्ड घालून डॉक्युमेंट्स ओपन केेल तर त्यात फक्त फॅमिली फोटोज् होते. राधा , तिचे बाबा आणि एक महिला होती आणि ती महिला डॉक्टरच्या वेशात होती. ती कोण आहे , ती काय करत आहे आणि ती कुठे आहे?? असे प्रश्न उद्भवला आहे साहेब.."
पाटील - " ओह... "
अर्जुन -" अजुन एक साहेब .."
पाटील -" काय??"
अर्जुन -" जेंव्हा मी राधाच्या घरी गेलो होतो, तिथे सी. सी. टी. वी कॅमेरा बघितल आणि मग मला आठवल की आपण जेंव्हा त्या माणसाची पाठलाग करत होतो . तर त्याच्या मृत्यूनंतर कॉल आला आणि तो अस बोलत होता जणू तो आपल्याला बघत होता. तो रस्त्यावरच्या सी. सी. टी. वी कॅमेरामधून बघत असावा. म्हणजे साहेब कॉल रेकॉर्डमध्ये छेडछाड आणि कॅमेरामधून आपल्यावर लक्ष ठेवणे. यावरून एवढच कळत की खूप मोठे लोक यामध्ये सामील आहेत."
पाटील - " अर्जुन ... माझ्या सीनिअरकडून मला ऑर्डर्स आहेत की या केसमध्ये लक्ष न घालण्याचा.."
अर्जुन - " साहेब ... जर मी तुमच्या मदतीशिवाय एवढं सगळं माहिती करून घेऊ शकतो , तर तुम्ही सोबत असाल तर काय नाही करू शकणार मी.."
संतोष -" सर... मला तर वाटतं आहे की खूप मोठं काहीतरी होणार आहे. जर मोठे लोक यामध्ये सामील असतील तर तुमचे सीनिअरसुद्धा यात असू शकतात."
थोडा वेळ शांततेत गेला. पाटील शेवटी विचार करत म्हणाला.
पाटील -" अर्जुन हे बघ मी तुला ऑफिसियली मदत करू शकत नाही... "
अर्जुन -" पण साहेब.."
मधेच पाटील हात करून म्हणाला
पाटील -" हा पण... अन्ऑफिसियली तुला मी मदत करू शकतो.. "
अर्जुनला थोडा का होईना उमेद दिसू लागली होती.
अर्जुन -" साहेब.. मग चालू करायचं??"
पाटील -" मग अर्जुन... पुढं काय करायचं??"
अर्जुन -" साहेब पहिल्यांदा आपल्याला या फोटोमध्ये जी महिला राधा सोबत आहे ती कोण आहे हे जाणून घ्यायचं आहे.."
पाटील -" मग हे फक्त एकच माणूस सांगू शकतो... "
संतोष -" कोण?"
अर्जुन -" रमेश अगरवाल..."
संतोष -" पण तो तर डायरेक्ट कमिशनरकडे जातो.."
अर्जुन -" आपल्या पोरीसाठी कोणी काहीही करू शकतो संतोष दा..."
पाटीलनी जीप काढण्याचा आदेश काढला. चव्हाण, अर्जुन , पाटील, राजा आणि संतोष सगळे अगरवाल फार्महाऊसला निघाले.
फार्महाऊस अजूनसुद्धा शांत होती . जीप फार्महाऊस बाहेर येऊन थांबली. सगळे काही फार्महाऊसमध्ये जाण्यासाठी जरासा घाबरत होते पण एकमात्र अर्जुन असा होता की न घाबरता तो आता जाऊ लागला. तो आत जाताना बघताच पाटील , चव्हाण आणि संतोष सगळे त्याच्यामागून जाऊ लागले.
आत जाताच अर्जुनाची नजर रमेश आगरवालला शोधत होती. समोरच्या मोठ्या अश्या सोफ्यावर रमेश बसलेला होता. तो काहीसा उदास दिसत होता.
अर्जुन -" रमेश अगरवाल... "
रमेश समोर बघताच अर्जुन दरवाजात उभा होता. त्याला बघताच रमेशचा पारा चढला.
रमेश -" तुझी हिम्मत कशी झाली इथे येण्याची ???????? ... थांब आताच पोलिसांना फोन करतो."
तो फोनकडे वळत असतानाच अर्जुन म्हणाला.
अर्जुन -" काही गरज नाही ... पोलीसच माझ्यासोबत आली आहे."
अर्जुनाच्या मागे इन्स्पेक्टर पाटील आणि हवालदार चव्हाण येताच रमेशचा पारा अजुन वर चढला.
रमेश -" इन्स्पेक्टर आताच्या आता बाहेर जावा नाहीतर तुमच्या कमिशनरलाच फोन जाईल...????????????.."
अर्जुन - " साहेब .. आम्हाला फक्त काही प्रश्न विचारायचा आहे. "
रमेश फोनवर नंबर डायल करत असताना अर्जुन म्हणाला.
अर्जुन -" राधा पॅरिसला का गेली ???"
रमेश हा प्रश्न ऐकताच फोन कट केला आणि शांतपणे सोफ्यावर डोक्याला हात लावून बसला. तेंव्हाच पाटील आणि सगळे अर्जुनकडे बघू लागले. कारण हे काय तरी नवीनच लिंक होता.
अर्जुन -" सांगा साहेब .. राधा पॅरिसला का गेली??"
रमेश -" ट्रिपसाठी..."
अर्जुन -" खोटं आहे हे.. खर काय ते सांगा... "
जरा जोर लावताच रमेश रडु लागला. अर्जुन त्याच्याजवळ जात म्हणाला.
अर्जुन -" सांगा साहेब ... तिच्या मर्डरचा कारण पॅरिसपासूनच आलेला आहे..."
त्याच्यापुढे अर्जुन आतापर्यंतचा मिळालेला लिंक सांगू लागला. राधाच्या डायरी पासून ते तिच्यापासून मिळालेल्या मेमरी कार्ड पर्यंत आणि त्या कार्डमध्ये मिळालेल्या फोटोसुधा त्याला दाखवला.
अर्जुन -" सांगा साहेब ... राधा पॅरिसला का गेली आणि ही महिला कोण आहे???"
सगळे काही स्तब्ध होऊन दोघांकडे बघत होते. रमेश मोठा श्वास सोडत म्हणाला.
रमेश -" या फोटीमधली जी महिला आहे .. ती माझी बायको आहे... तीच नाव ऋचा अगरवाल.. ती एक जेनेटिक सायंटिस्ट होती. आमच्या लग्नाचा ४ वर्षानंतर राधा झाली. आम्ही दोघेही खूप खुश होतो.... राधा ५ वर्षाची असताना आम्ही सगळे पॅरिसला गेलो होतो.... हॉटेलमध्ये आम्ही राहत असताना एकदमच रात्री मला जाग आली. बघतो तर ऋचा कुठे दिसत नव्हती . खूप शोधून बघितल पण काही उपयोग झाला नाही.. तिथल्या पोलिस स्टेशनमध्ये कंप्लेंटसुद्धा केलो . पण काहीच पत्ता नाही सापडला.... मी आणि राधा तर मानूनच बसलो ती आम्हाला सोडून गेली.????????????... त्यानंतर जेंव्हा राधा याच संडेला परत आली . तेंव्हा मला एक कॉल आला त्यात ऋचाचा आवाज आला. ती म्हणाली ,' मी जिथे आहे तिथे जिवंत आहे . तुमची आठवण येत आहे. ???? ' ती खूप रडत होती. त्यानंतर परत एक कॉल आला त्यात एक माणसाचा आवाज आला की ,' ऋचा पॅरिसमध्ये आमच्या ताब्यात आहे . तुम्ही जर पोलिसांना इन्फर्म केलात तर राधासुद्धा गेली म्हणून समझा.' मग मी सुद्धा विचारलं ,' का तिला कीडनेप केलास?' तिथून एकच आवाज आला ,' प्रलय आनेवाला है. ' त्यामुळे राधा पॅरिसला गेली होती. म्हणून मी पोलिसांना काही सांगत नव्हतो."
अर्जुन -" म्हणजे सगळे काही तुमच्या फॅमिली सोबतच चालू झालाय... पण हे ' प्रलय आनेवाला है ' याचा अर्थ काय आहे??"
इकडे अर्जुन काही तर्क लावत होता. तेवढ्यात पाटीलचा फोन वाजला.
पाटील -" हॅलो.... काय??? ????????????... ओके आम्ही येतो.. "
अर्जुन पाटीलकडे बघत म्हणाला.
अर्जुन -" साहेब ... काय झालं??"
पाटील -" एक बॉडी सापडला आहे... "
अर्जुन -" कुणाचा ??"
पाटील -" राधा आणि राहुलची फ्रेंड स्नेहा पवार हीच... "
अर्जुन -" काय???"
पाटील -" हो.. आणि तिचा खून पण राहुल सारखाच झाला आहे... एक मेसेज सुद्धा लिहिलेला सापडला आहे... "
संतोष -" काय??"
तेवढ्यात अर्जुन म्हणाला.
अर्जुन -" प्रलय आनेवाला है .."
********************************
क्रमशः
ऋषिकेश मठपती
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा