Login

राजेश प्रधान द घोस्ट हंटर भाग 2

राजेशने विनयचा खुनी ओळखला होता. कोण असेल खुनी?



राजेश प्रधान द घोस्ट हंटर भाग 2
मागील भागात आपण पाहिले एका श्रीमंत युवकाचा अतिशय विचित्र पद्धतीने खून झाला. तर एका तरुणीला अमानवी शक्तींपासून सोडवायला राजेशला बोलावले. आता पाहूया पुढे.


सारिकाने सांगितलेली बातमी ऐकून मुग्धाच्या वडिलांनी लगेच टी. व्ही. लावला.

सगळीकडे विनय राजेदेसाई बद्दल बातमी होती."तर प्रेक्षकहो,आपण पाहिलेत अतिशय भयानक पद्धतीने विनय राजेदेसाईचा खून झाला आहे. शरीरात रक्ताचा एकही थेंब शिल्लक नाही. अंगावर कोणतीही जखम नाही. प्रसिद्ध उद्योगपती राजेदेसाई यांचा एकुलता एक वारस विनयचा खुनी कोण असेल?"


एवढ्यात शेखर साहेबांचा फोन वाजला,"बाहेर पत्रकार जमले होते. त्यांना मुग्धाशी बोलायचे आहे."


बंगल्याच्या गेटवरून फोन होता. राजेश म्हणाला,"मुग्धा,आता तू जेवढे खरे बोलशील तेवढे मला तुला मदत करता येईल."


"मी आणि विनय गेले पाच वर्षे रिलेशशिपमध्ये होतो. दोघांच्याही घरून परवानगी होती. आम्ही नेहमी पार्टीसाठी भेटत असू. काल जेव्हा विनयने पार्टीसाठी बोलावले तेव्हा नेहमीसाखीच मी आनंदात गेले. मध्यरात्रीपर्यंत पार्टी करून आम्ही पबच्या बाहेर पडलो." मुग्धा अचानक गप्प झाली.


रोझीला खुणवून राजेश पुढे म्हणाला,"तुझा फोन आम्हाला दे. तू आत जाऊन आराम कर."

सारिका अजूनही तिथेच होती. राजेश तिच्याकडे वळून म्हणाला,"तू मुलाखतीसाठी मागे लागली होतीस म्हणून."

"इट्स ओके. पण राजेश मला आणखी बरेच यात लपले आहे असे वाटते." सारिका अगदी हळूवार म्हणाली.

"सगळ्या कॅमेऱ्यांचे फुटेज मागवा. शेखर सर,मला नोकरांशी बोलायला मिळेल का?" राजेशने भराभर पुढे सूत्रे हातात घेतली.


तेवढ्यात कमिशनरचा फोन आला. शेखर अगतिक होते.

"घाबरु नका. मी एक डॉक्टरसुध्दा आहे." राजेश स्वतः कमिशनर बरोबर बोलला आणि बाहेर पडला.

बाहेर पडताना सतत कोणीतरी पाठलाग करत आहे असा भास होत होता.


गाडीत बसल्यावर मग सारिका म्हणाली,"राजेश,गेल्या दोन आठवड्यापासून मुग्धाला तिचा कोणीतरी पाठलाग करत आहे असा भास व्हायचा."

"सारिका,ह्या प्रकरणात अमानवी शक्ती आहे. फक्त त्या शक्तीचा स्त्रोत आणि उद्देश शोधायला हवा." राजेश गंभीर होत म्हणाला.

"सर,हा विवेक आणि ही ज्ञानदा आपल्याकडे असिस्टंट फेलोशिप साठी आलेत विद्यापीठाकडून."

रोझीने मध्येच माहिती पुरवली.

" विनयचा खून झाला त्या जागेबाबत माहिती मिळव रोझी." राजेशने सांगितले.

"सर,माहिती काढली आहे." एक नाजूक आवाज आला.

"ती जागा पबपासून खूप दूर,निर्जन कॉलनीच्या शेवटी आहे." तिने बोलणे संपवले.

ती मागे बसल्याने चेहरा दिसत नव्हता.

"राजेश,मी सगळी मदत करेल. पण मुग्धाला वाचव.

" सारिका हात जोडून बोलली. आता सगळे गप्प होते. राजेशने सगळ्यांना ऑफिसवर सोडले आणि सारिका सोबत हॉस्पिटलला निघाला.

"सारिका,मृतदेह परत एकदा पाहायला हवा. काहीतरी मिसिंग आहे."राजेश बोलत होता.

"पण तिथे प्रवेश कठीण आहे." सरिकाने हसून उत्तर दिले आणि आपल्याला बरोबर का घेतले याचे उत्तर मिळून ती मोठ्याने हसली.

हॉस्पिटलबाहेर कडक बंदोबस्त होता.

"राजेश हे घे." सरिकाने पर्समधून विग काढून त्याला दिला.

अशा बातम्या काढणे सारिकाची खासियत होती. तिने आत प्रवेश मिळवला.

एक क्षण थबकून राजेशकडे पाहिले."हे हातात धारण करून आत चल."

राजेशने तिला एक रुद्राक्ष दिला. विनयचा नग्न आणि सुकलेला देह पाहून भिती वाटत होती. अक्षरशः रक्त शोषून घेतले होते. राजेश बारकाईने पाहत होता.

त्याने ओठांच्या आत हात लावला."मला वाटले तेच आहे."

राजेश खूप गंभीर झाला. त्याने सारिकाला इशारा केला आणि दोघे वेगाने बाहेर पडले.


राजेशने सारिकाला तिच्या ऑफिसला सोडले आणि तो परत आला. रोझीने सगळी फुटेज मागवली होती. गेल्या पंधरा दिवसातील सगळे फुटेज त्याने काळजीपूर्वक पाहिले.

"येस, दॅट्स इट!" राजेश हसला.

"म्हणजे तुम्हाला समजले तर?" रोझीने हसून प्रश्न केला.

राजेशने फक्त कागदावर काही लिहिले आणि तिच्याकडे सरकवले.

काय समजले असेल राजेशला? विनयला कोणी मारले असेल?
पाहूया अंतिम भागात.
©® प्रशांत कुंजीर

🎭 Series Post

View all