राजेश प्रधान द घोस्ट हंटर भाग 1
सदर कथा केवळ मनोरंजन ह्या हेतूने लिहिली आहे. तसाच उद्देश ठेवून वाचावी. ही विनंती.
सकाळी सकाळी श्री. अय्यर फिरायला चालले होते. एक उच्चभ्रू बंगले असणारी निवांत कॉलनी आणि निसर्ग होता. अजून उजाडले नव्हते.
श्री. अय्यर रिटायर क्लास वन अधिकारी होते. फिरत चालले असताना अचानक लांब पाच सहा कुत्रे जमा झालेले दिसले.
ते काहीतरी खात होते. अय्यर जवळ गेले आणि कुत्र्याला हाकलले.
त्यानंतर जे काही पाहिले त्याबरोबर त्यांनी शंभर नंबर फिरवला. पंधरा मिनिटात पोलीस हजर झाले. तोवर बघ्यांची गर्दी जमली होतीच.
इन्स्पेक्टर म्हणाला,"फोन कोणी केला?"
अय्यर पुढे झाले आणि कानडी ढंगात म्हणाले,"मी केला. इथ कुत्र जमल होते."
इन्स्पेक्टरने मृतदेह पाहिला. साधारण पंचविशीच्या आत बाहेर असलेला तरुण होता. त्याच्या सताड उघड्या डोळ्यांत भीती स्पष्ट दिसत होती. अंगावर काहीही जखमा नव्हत्या. पोलिस पंचनामा करून निघून गेले.
कर्कश आवाजात किंचाळत असलेला फोन रोझीने उचलला आणि लगेच म्हणाली,"होल्ड,मी ट्रान्स्फर करते."
राजेशने फोन घेतला. फोन खाली ठेवला तोवर रोझी निघायला तयार होती.
तेवढ्यात राजेश म्हणाला,"रोझी,तो नवीन मुलगा आणि मुलगी येणार आहेत. त्यांना थेट लोकेशन पाठव आणि तिकडे बोलाव."
राजेशने सांगितलेल्या पत्त्याचे लोकेशन रोझीने शेअर केले आणि गाडी वेगाने आरे कॉलनीच्या दिशेने धावू लागली.
साधारण तासाभराने गाडी एका आलिशान बंगल्याबाहेर थांबली आणि राजेश व रोझी वेगाने उतरून आत आले. समोर एक मध्यमवयीन माणूस बसलेला होता.
तो समोर येऊन म्हणाला,"राजेश प्रधान?"
तो समोर येऊन म्हणाला,"राजेश प्रधान?"
राजेशने होकारार्थी मान हलवली. तसे त्या माणसाने खोलीकडे बोट केले.
आतून गुरकावल्याचे,अस्पष्ट,अगम्य भाषेत पुटपुटल्याचे आवाज येत होते.
राजेश म्हणाला,"रोझी घरात मोठे भांडे आहे का बघ. त्यामध्ये पाणी भरून आण."
तेवढ्यात ती दोन्ही मुले येऊन पोहोचली. राजेश त्या मुलाकडे पहात म्हणाला,"बॅगेतून दोरी काढ. माझ्या मागून आत ये."
तोवर रोझीने त्या मुलीला मदतीला बोलावले. आता खरा संघर्ष सुरू झाला. खोलीतून गुरगुरण्याचे आवाज वाढले होते. राजेशने रोझीला खुण केली. तिने पाण्याने भरलेले मोठे भांडे आणले.
राजेशने दरवाजा उघडला. आतून एक वेगळाच दर्प येत होता. आत मुग्धा विस्कटलेले केस,अंगावर नखाने ओरबडल्याच्या खुणा आणि संपूर्ण अंग निळे पडलेले. अशा अवस्थेत बसली होती .
तिच्या तोंडून आवाज आला,"चालता हो. मी हिला सोडणार नाही."
राजेश फक्त हसला. त्याने पवित्र जल बाहेर काढले आणि मोठ्या भांड्यातील पाण्यात टाकले. एवढ्यात मुग्धाने रोझी बरोबर असलेल्या मुलीवर झेप घेतली.
तिचा गळा पकडताच ती मुलगी घाबरून ओरडू लागली. राजेशने मुग्धाला दोरीने बांधले. रोझी आणि राजेशने तिला पाण्याच्या भांड्याजवळ नेले. राजेशने सर्व शक्ती एकवटून तिचे डोके पाण्यात दाबले. प्रचंड झटापट सुरू झाली.
रोझी,मुग्धा आणि तो नवीन मुलगा तिघांनी तिला पकडून ठेवले. ओरडल्याचे आणि किंकाळीचे आवाज येत होते. थोड्याच वेळात मुग्धा शांत झाली. खालच्या भांड्यातील पाणी काळे झाले होते.
राजेश म्हणाला,"रोझी,हे पाणी लगेच एका दुसऱ्या भांड्यात भरून लांब टाकायला सांग."
रोझीने मुलीच्या वडिलांना हाक मारली. त्यानंतर मुग्धा भानावर आली.
मुग्धाचे वडील प्रसिध्द उद्योगपती होते. मुग्धा भानावर आलेली पाहून राजेशने विचारले,"हे सगळे कधी आणि कसे झाले?"
शेखर पाटील म्हणाले,"ते मुग्धा सांगू शकेल. काल रात्री पार्टीवरून उशिरा घरी आलेली मुग्धा उठली नाही. नोकर उठवायला गेले. त्यातील एकावर तिने झेप घेतलेली."
राजेशने मुग्धाला बोलावले. तेवढ्यात त्याला बाहेरून सारिका येताना दिसली.
राजेश म्हणाला,"शेखर सर,ही प्रसिद्धी मिळवायची वेळ नाही. पत्रकारांना कशाला बोलावले."
सारिका आत येत म्हणाली,"मिस्टर राजेश,माझ्या बहिणीला पहायला तुमच्या परवानगीची गरज नाही. मीच काकांना तुमचा नंबर दिला होता."
राजेश,"सॉरी,मला माहित नव्हते."
शांत होऊन राजेशने तिला परवानगी दिली. मुग्धा बाहेर आली. घडलेल्या प्रकाराचा तिला अंदाज येत नव्हता.
राजेश काही बोलणार एवढ्यात सारिका म्हणाली,"मुग्धा कुठे गेली होतीस तू?"
"मॅडम ही तुमची लाईव्ह डिबेट नाही." राजेश चिडून म्हणाला.
" मुग्धा! काल रात्री काय घडले ते मला सांग. तुझ्यासोबत कोणी होते का?" राजेशने शांत स्वरात विचारले.
" विनय! विनय होता माझ्या सोबत." मुग्धा घाबरून फोन शोधू लागली."
काहीही उपयोग नाही मुग्धा. विनय इज नो मोअर. सकाळी तेच कव्हर करून आले आहे."
©®प्रशांत कुंजीर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा