“ राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त भाषण”
सुर्याप्रमाणे तेजस्वी दिसणारे व्यासपीठ, आणि व्यसपीठावरील अध्यक्ष गुरुजन वर्ग,परीक्षक आणि माझ्या विद्यार्थी मित्र आणि मित्रिणींनो तुम्हाला सर्वांना माझा नमस्कार! आज मी जे सांगणार आहे ते तुम्ही शांत मनाने ऐकून घ्यावे हि नम्र विनंती.
“महाराष्ट्राच्या मातीमध्ये रोवलेली पहार काढून,
ज्या माऊलीने गुलामगिरीच्या छाताडावर प्रहार केला.
त्या राष्ट्रमाता,विश्वमाता, राजमाता,
माँसाहेब, जिजाऊ यांना मानाचा मुजरा!!!”
आज दिनांक १२ जानेवारी आजचा हा दिवस स्वरायज्याचे स्वप्न साकार करणाऱ्या स्वाभिमानी जाधवांची कन्या तर भोसल्यांची सून राजमाता जिजाऊंची जयंती. स्वराज्यसंस्थापक छत्रपती शिवाजीराजे आणि प्रतापशाली संभाजीराजे या दोन छत्रपतींना घडविणाऱ्या मातेचा जन्म दिवस.
जिजाऊंचा जन्म तारखेप्रमाणे १२ जानेवारी १५९८ रोजी महाराष्ट्रातील विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड जवळ देऊळगाव येथे झाला. तर तिथीनुसार पौष पौर्णिमेला जिजाउंचा जन्म झाला. त्या मराठा सरदार लखुजीराजे जाधव यांच्या कन्या होत्या. त्यांच्या आईचे नाव म्हाळसाबाई उर्फ गिरीजाबाई जाधव होते.जिजाऊंना दत्ताजी,रघुजी, अचलोजी आणि महादोजी असे चार भाऊ होते.लखुजी जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते व ते सिंदखेडा गावचे राजा सुद्धा होते.सिंदखेडमध्येच त्यांनी राजकारण आणि युद्धकलेत प्रभुत्व मिळविले होते.
जिजाऊंचा विवाह डिसेंबर१६०५ मध्ये दौलताबाद येथील मोलाची भोसले यांचे पुत्र शहाजीराजे झाला.असे म्हणतात की जिजाऊंच्या लग्नाची जुळवाजुळव त्या ६ वर्षाच्या असतानाच निश्चित झाली होती. त्त्या त्याच्याशी एक छोटीशी घटनाही जोडलेली आहे.इतिहासात असे लिहिले आहे की, तो होळीचा दिवस होता. लखुजी जाधव यांच्या घरी सण साजरा केला जात होता. त्यावेळी मालोजीराजे हे त्यांच्या ७-८ वर्षांच्या मुलासह होळीच्या महोत्सवात सहभागी झाले होते.नृत्य पाहत असताना अचानक लखुजी जाधवांना जिजाबाई आणि मालोजीराजेंचा मुलगा शहाजी एकत्र दिसले.त्यावेळी लखोजी जाधव यांच्या तोंडून ‘वा काय जोडी आहे’असे शब्द निघाले.हे ऐकून लगेचच मालोजीराजे भोसले म्हणाले की मग जुळवाजुळव निश्चित करावी.अशाप्रकारे जिजाबाई आणि शहाजीराजे यांचा विवाह झाला होता.
त्यावेळी मालोजीराजे हे सुलतानचे सेनापती होते आणि लखुजी जाधव हे राजा होते.असे असतानाही त्यांनी आपली मुलगी जिजाऊ म्हणजेच जिजाबाई हिचा विवाह मालोजीराजे यांचा मुलगा शहाजीराजे यांच्याशी केला.जिजाऊ आणि शहाजीराजे यांच्या विवाहानंतर शहाजीराजे विजापूरच्या दरबारात मुसद्दी सरदार होते.विजापूरच्या बादशहाने शहाजींच्या मदतीने अनेक युद्धे जिंकली. या आनंदात विजापूरच्या बादशहाने त्यांना अनेक जहागिरी भेट दिल्या होत्या.जहागीर असलेल्या ठिकाणांमध्ये शिवनेरी किल्ल्याचाही त्या भेटींमध्ये समावेश होता.तेथेच शिवनेरी किल्ल्यावर जिजाऊ आणि त्यांची मुले वास्तव्य होते.
नंतरच्या काळात भोसले आणि जिजाऊंचे माहेर असलेल्या जाधव घराण्यात वैमनस्य निर्माण झाले. यात शहाजी राजे यांचे भाऊ शरफोजी भोसले यांनी जिजाऊंच्या भावाला ठार केले. मुलाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी जिजाबाई यांचे वडील लखोजी जाधव यांनी शहाजीराजांचे भाऊ शरफोजी भोसले यांना ठार केले. यानंतर शहाजी राजे लखुजी जाधवांवर चालून गेले.या प्रसंगानंतर जिजाऊंनी आपल्या पतीशी एकनिष्ठ राहत माहेरशी सर्व संबंध तोडले. त्यांनी धैर्याने आपल्या कर्तव्याचे पालन केले. जिजाऊ आणि शहाजीराजे यांना ऐकूण ८ अपत्ये झाली.यात ६ मुली आणि २ मुले होते.शिवाजी महाराज हे त्यातील लहान मूल होते.मोठ्या मुलाला सांभाळण्याची जबाबदारी शहाजीराजांनी घेतली तर शिवाजी महाराजांना सांभाळण्याचे कार्य जिजाऊ यांच्यावर सोपविले.
“मुजरा माझा माता जिजाऊंना,
जिने घडविला शिवबांना,
साक्षात होती ती भवानी,
जिच्या पोटी जन्म घेतला शिवबांनी.”
१६३०साली शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजींचा जन्म झाला. त्यानंतर आपल्या आयुष्यातील सर्व दुःख आणि संकटांना विसरून जिजाऊंनी शिवाजी महाराजांना चांगले संस्कार आणि चांगले शिक्षण देण्यास सुरुवात केली.आई ही जगातील सर्वात महान योद्धा आहे.आई म्हणजेच आपुलकी,त्याग,सहनशीलता,प्रेरणा,जिद्द,संयम,सामर्थ्य यांचा संगम आहे.आणि या सर्व गुणांचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे स्वराज्यजननी जिजाबाई शहाजीराजे भोसले म्हणजेच राजमाता जिजाऊ.जिजाऊंनी शिवबांना लहानपणापासूनच रामायण आणि महाभारतातील शौर्य कथा सांगितल्या.जिजाऊ अतिशय सात्विक आणि धार्मिक स्वभावाच्या स्त्री होत्या.शिवाजी महाराज१४ वर्षांचे असताना शहाजीराजे यांनी त्यांच्या हाती पुण्याची कमान सोपवली. तसेच त्यांच्या मदतीला जिजाऊंना देखील पाठविले.त्याकाळात निजामशहा,आदिलशहा आणि मुघलांद्वारे होत असलेल्या सततच्या स्वाऱ्यामुळे पुण्याची अवस्था वाईट होती.पुढे दादोजी कोंडदेव यांनी शिवाजी महाराजांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली.त्यांनीमहाराष्ट्रातील जनतेवर आणि विशेष करून स्त्रीयांवर मुघलांकडून होणारा अन्याय पहिला आणि तो त्यांना सहन होत नव्हता.राजमाता जिजाऊंनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून छत्रपती शिवाजी महाराजांना घडविले.जिजाऊंनी शिवरायांच्या मनात स्वराज्याची कल्पना जागवली. मुघलांच्या अन्यायाचा पर्दाफाश करण्यासाठी स्वतःचे सरकार स्थापन करण्याचे महत्त्व त्यांना कळले.स्वराज्य निर्माण करण्यासाठी त्यांनी शिवरायांच्या मनात नितांत श्रद्धा निर्माण केली.
शहाजीराजे आणि त्यांचे मोठे पुत्र संभाजी यांना अफजलखान याने युद्धात ठार केले.जिजाऊंना त्या गोष्टीचे खूप मोठे दुःख झाले आणि त्यांनी त्यांच्या पतीसोबत सती जाण्याचा प्रयत्न केला.परंतु शिवाजी महाराजांनी त्यांना रोखून घेतले.जिजाऊ या पहिल्या अशा महिला होत्या ज्यांनी दक्षिण भारतात हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी खूप मोलाचे योगदान दिले. आणि त्यांच्या या योगदानामुळेच शिवाजी महाराजांनी कमी सैन्यात लाखो मुघलांचा पराभव करून हिंदवी स्वराज्य स्थापन केले.
जिजाऊंनी शिवाजी राजांना राजकारण करण्याचे, समान न्याय देण्याचे आणि अन्याय करणाऱ्यांना कठोर शिक्षा करण्याचे धैर्य दिले होते. सर्व स्त्रियांचा आदर आणि सन्मान करावा तसेच पर स्त्री ही मातेसमान मानावी अशी बहुमोलची शिकवण जिजाऊंनी शिवाजीराजांना दिली. शस्त्रास्त्र प्रशिक्षणावर जिजाऊंची करडी नजर होती.तसेच त्यांना युद्धकला देखील शिकवली.जिजाऊंनी केलेल्या या संस्कारांच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी हजारो वर्षांची गुलामगिरी मोडून काढली. आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली.
शिवरायांच्या ८ विवाहांमगील मुख्य उद्देश हा विखुरलेल्या मराठी समाजाला एकत्र आणण्याचा होता.शिवाजी महाराजांना मुघल बादशाहाने आग्रा येथे कैद केले तेव्हा स्वराज्याची सत्ता जिजाऊ मातेच्या हाती होती.हिंदवी स्वराज्याच्या मार्गात येणाऱ्या प्रत्येक शत्रूशी जिजाऊंनी निर्भय आणि धाडसी पध्दतीने मुकाबला करण्याचे धैर्य शिवरायांना जिजाऊंकडून मिळाले.प्रत्येक पराक्रमी व्यक्तीने कैदेत असलेल्यांना स्वातंत्र्य द्यावे अशी शिकवण राजमाता जिजाऊंनी शिवरायांना दिली.
शहाजीराजे यांची कैद आणि सुटका, अफजलखानाचे संकट, आग्र्याहून सुटका,वेळोवेळी झालेली राजकीय उलथापालथ अशा अनेक प्रसंगी जिजाऊंचे मार्गदर्शन शिवाजी महाराजांना मिळाले.छत्रपती शिवाजी महाराज मोठमोठ्या मोहिमांवर असताना जिजाऊंनी स्वतः राज्याच्या कारभारावर बारीक लक्ष ठेवले होते. असे म्हणतात की, मुलांना वडिलांकडून कर्तव्य आणि आईकडून सद्गुण,प्रेम मिळते,पण जिजाऊ याला अपवाद आहेत. शहाजी राजेंच्या अनुपस्थितीत त्यांनी दोन्ही भूमिका यशस्वीपणे पार पाडल्या.तसेच जिजाऊंनी छत्रपती संभाजीराजांवर देखील शिवरायांसारखेच संस्कार केले.संभाजीराजांच्या जडणघडणीत जिजाऊंचा खूप मोठा आणि महत्त्वाचा वाटा आहे.
जिजाऊंनी केलेल्या या संस्कारांच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी हजारो वर्षांची गुलामगिरी मोडून काढत हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. जिजाऊंनी आपल्या मुलाला सिंहासनावर बसेपर्यंत लढा दिला.गरीब रयतेच्या सुखासाठी स्वतंत्र स्वराज्य स्थापन व्हावे ही जिजाऊंची इच्छा होती. त्यांनी स्वराज्याचे स्वप्न बघितले आणि फक्त बघितले नाहीच तर ते सत्यात देखील उतरविले.त्या म्हणजे आपल्या माँसाहेब जिजाऊ.६ जून १६७४ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा रायगडावर राज्याभिषेक झाल्यानंतर बारा दिवसांनी दिनांक १७ जून १६७४ रोजी जिजाऊंनी स्वतंत्र मराठा स्वराज्यात अखेरचा श्वास घेतला.भारतीय पुरणांमध्ये आदिशक्तीचा उल्लेख हा केलेला दिसतो.पण आदिशक्तीचे प्रत्येक्ष दर्शन सर्व जगाला राजमाता जिजाऊ यांच्या रूपाने घडले.राजमाता जिजाऊंबद्दल जेव्हढे बोलावे तेव्हढे कमीच आहे.माँसाहेब जिजाऊंना माझे शतशःनमन.
शेवटी जाता जाता एवढंच बोलेल…
“जिजाऊ तुम्ही नसता तर,नसते झाले शिवराय नि शंभू छावा,
जिजाऊ तुम्ही नसता तर, मिळाला नसता स्वराज्य ठेवा,
जिजाऊ तुम्ही नसता तर,नसते लढले मावळे,
जिजाऊ तुम्ही नसता तर,नसते दिसले विजयाचे सोहळे!”
जय महाराष्ट्र!जय शिवराय!!
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा