मागील भागात..
राजला चाईल्ड केअर इन्स्टिट्युटमध्ये जॉब मिळाला. तो तिथल्या जेनी नावाच्या मुलीसोबत बोलत होता. जेनीवर खास लक्ष ठेवण्यासाठी त्याला सांगण्यात आलं आहे. जेनीने त्या व्यक्तीला डॅडा अशी हाक मारली.
आता पुढे..
जेनीची हाक पाहून पटकन तिथून निसटायच्या विचारात असलेला तो व्यक्ती तिच्याजवळ आला. त्याने तिच्यासमोर बसून हात पसरले. तशी ती पटकन त्याच्या कुशीत शिरली.
"डॅडा, फायनली यु आर हिअर! आय मिस्ड यु!"
तिचा स्वर किंचित रडवेला वाटत होता.
"आय मिस्ड यु तू माय प्रिन्सेस. डोन्ट क्राय! प्रिन्सेस कधी रडत नाही माहित आहे ना? डेव्हिल फार ट्राय करते की प्रिन्सेसने रडावं. तरी प्रिन्सेस खूप स्ट्रॉंग असते. हो ना?"
"येस डॅडा!"
जेनीने आपल्या गालावर ओघळलेले अश्रू स्वतःच्या डोळ्यांनी पुसले. प्रिन्सेस ह्या शब्दाचा तिच्यावर फार प्रभाव होता.
"डॅडा, मला आज नवीन फ्रेंड भेटला. तो बघ तिथे उभा आहे. त्याचं नाव राज आहे. हि इज अ रिअली गुड परसन! त्यानेही मला प्रिन्सेस म्हटलं."
जेनी खुशीतच सांगत होती. ते ऐकून त्या व्यक्तीला समाधान वाटलं.
"मलाही तसंच वाटतंय प्रिन्सेस. तो एक चांगला व्यक्ती आहे. आता डॅड काही दिवस बिजनेसच्या कामासाठी बाहेर जातो तेव्हा राज तुझ्यासोबत असेल. तुला काही टेन्शन नाही, राईट?"
"येस डॅडा! पण मी तुला फार मिस करेन."
जेनी नेहमी त्याच्यापासून दूर जाताना फार रडायची. पण आज तिचा मूड चांगला वाटत होता.
"डॅडा, तू माझ्यासाठी काहीच आणलं नाही का?"
जेनीने अचानक विचारलं. तोही नेमका विसरला होता. आता तिला काय उत्तर द्यावं हा विचार तो करत होता. त्याने इकडेततिकडे पाहायला सुरुवात केली. राज हे सगळं संभाषण ऐकत होता. आपण मधे बोलावं की नाही हा विचार करता करता त्याने बोलायचं ठरवलं.
"प्रिन्सेस, डॅडाने तुझ्यासाठी गिफ्ट तर आणलं आहे. पण ते सरप्राईझ आहे. सो ते तुला आता नाही मिळणार. आज रात्री तू घरी जाशील तेव्हा तुला ते मिळेल."
राज पटकन म्हणाला.
"घरी? पण मी कधीच घरी जात नाही. इथे माझी बेडरूम आहे. मी तिथेच राहते. उप्स! मी तुला दाखवलीच नाही ना? कमॉन इकडे ये. मी तुला दाखवते."
जेनी तिच्या डॅडाचा हात सोडून राज जवळ आली. ज्या केबिनमधुन तो व्यक्तीज बाहेर आला होता ती केबिन म्हणजे एक बेडरूम होती. राज गोंधळून हे सगळं पाहत होता. इतर पॅरेंट्स मुलांना दिवसभर कुठेतरी ठेवायला हवं म्हणून इथे ठेवून जात होते. पण हे जेनीचं तर घरच झालेलं होतं. ती कायम इथेच असायची. राजला फार वाईट वाटलं. एवढीशी ती चिमुरडी.. काय झालं होतं एवढं जे तो व्यक्ती तिला घरीही नेत नव्हता. तिची बेडरूम बघून ते बाहेर आले. तोवर तो निघून गेलेला होता.
"कम हिअर राज. आपण खेळूया."
जेनी त्याचा हात सोडत धावतच पुढे गेली. तोही तिच्या मागोमाग सुन्नपणे चालत होता. एवढ्यात त्याला वरुणचा कॉल आला. त्याने थोडंसं बाजूला जात लगेच रिसिव्ह केला.
"हॅलो!"
"हा बोल वरुण."
"दादा, मी कॉलेजच्या कॅम्पसमध्ये पोहोचलो आहे. एडमिशन प्रोसेसही कम्प्लिट केली आहे. तू येऊ शकतोस का मला भेटायला?"
"सॉरी वरुण. पॉसिबल नाही रे. मला नुकताच जॉब मिळाला आहे आणि आजपासूनच जॉईन करायचं आहे. त्यामुळे नाही भेटता येणार. मला वेळ मिळेल तसं मी तुला भेटायला येईन."
"ठीक आहे दादा. टेन्शन घेऊ नकोस. तुला वेळ असेल तेव्हा मला इन्फॉर्म कर."
"हो. काळजी घे वरुण."
"तुही काळजी घे."
त्याने कॉल कट केला. त्याच्या कानावर आवाज पडला.
"राज, कम हिअर. काय करत आहेस?"
छोट्या जेनीचा तो आवाज ऐकून मोबाईल सायलेंट करून तो धावत तिच्या दिशेने गेला.
**************
जोसेफ तिच्या बंगल्याच्या बाहेर शांतपणे उभा होता. त्यांना एके ठिकाणी जायचं होतं. त्यासाठी तो तर वेळेवर आला होता. मात्र ती अजूनही बाहेर आलेली नव्हती. तसं स्वतःच्या कंपनीचं काम असलं तर ती फार टाइम पर्टीक्युलर होती. पण दुसऱ्या कुठल्या ठिकाणी जायचं असेल तर तिचं वागणं सेलिब्रिटीसारखं असायचं. तिला वाटेल तेव्हाच ती निघणार. हे माहित असलेला जोसेफ बाहेर तिचा ड्रायव्हर असलेल्या मार्कसोबत बोलत उभा होता.
"काही बोलल्या का तुला की कधीपर्यंत येतील?"
"नाही. मी बाहेर आलो तेव्हा त्या शॉवर घ्यायला गेल्या होत्या."
"कधी निघायचं अशाने. फारही उशीर करून चालणार नाही."
जोसेफ काळजीत होता.
"कोणाला उशीर होतोय जोसेफ?"
तिचा कठोर आवाज त्याच्या कानावर पडला. तसा तो पटकन मागे वळला. तिने काळ्या रंगाचा रॅप अराउंड स्टाईलचा ड्रेस घातलेला होता. नेकलेस, एअरिंग्ज, अंगठी अशी पर्लतर्फे खास डिजाईन केलेली ज्वेलरी तिने घातलेली होती. हातात काळ्या रंगाचीच पर्स आणि मोबाईल होता. तिने काळ्या रंगाचे सिल्व्हर कोटेड पेन्सिल हिल्स घातलेले होते. केस छान सेट करून मोकळे सोडलेले होते. ओठाला असणारी डार्क रेड लिपस्टिक तिच्या चेहऱ्यावर फार उठून दिसत होती. असा कातिल लूक करून ती एवढ्या मोठ्या इव्हेंटला जाणार आहे म्हणजे तिथल्या लोकांची काय हालत होणार आहे हे जोसेफला समजत होतं. त्यात एखादं चांगलं ओकेजन असलं की लोक मुद्दाम लाईट आणि कॅचिंग आऊटफिट निवडायचे. पण ती मात्र ब्लॅक, रेड, डार्क ब्लु, डार्क ग्रीन असे डार्क रंग मुद्दाम निवडायची. तिला ते शोभूनही दिसायचे आणि तिच्या एटीट्यूडला ते हायलाईट करायचे.
"तुम्हांलाच उशीर होतो आहे बॉस. आतापर्यंत तर इव्हेन्ट सुरु झाला असेल."
जोसेफने सांगितलं.
"तू काळजी करू नकोस. मी जात नाही तोवर इव्हेन्ट सुरु करणं त्यांना परवडणार नाही. मी ज्याक्षणी हॉलमध्ये पाऊल ठेवेन, इव्हेन्ट तेव्हाच सुरु होणार."
तिच्या चेहऱ्यावरचा तो अभिमान उगाच नाही आहे तर तिच्याकडे खरंच तेवढी पॉवर आहे हे माहित असलेल्या जोसेफने नुसता मानेनेच होकार दिला आणि पुढे होऊन तिच्यासाठी कारचं दार उघडलं. मार्कही लगेचच ड्रायव्हिंग सीटवर बसला होता. जोसेफ मार्कच्या शेजारी पॅसेंजर सीटवर बसला.
"तू सकाळी दिसला नाहीस. कुठे होतास?"
नंदिनीने अचानक विचारलं. तसा जोसेफ आधी दचकला. पण तिला सगळंच तर माहित आहे असं आठवून त्याने सांगितलं,
"चाईल्ड केअर इन्स्टिट्युटमध्ये गेलो होतो. जेनीला भेटून आलो. तिथे एक नवीन स्टाफ रिक्र्यूट केला आहे. राजवीर अरोरा असं नाव आहे त्याचं. जेनी त्याच्यासोबत कन्फर्टेबल वाटली. तो माणूस बोलायलाही चांगला आहे. अजून एक मुलगी आहे जिला रिक्र्यूट केलं आहे. ती आज किंवा उद्या जॉईन करेल."
नंदिनीने मानेनेच समजलं असा इशारा केला.
"मी आजपर्यंत कधी जेनीला भेटले नाही आहे. तू तिला कधी घेऊन आला नाहीस. शक्य झालं तर कधीतरी भेटूया तिला."
नंदिनीने बोलायचं म्हणून म्हटलं. तिला लहान मुलांची आवड नव्हती. त्यात जोसेफच्या मुलीशी तिचा काहीही संबंध नव्हता. ती हे मनापासून म्हणालेली नसावी असं जोसेफला वाटून गेलं. पण तो काय करणार? तो स्वतः स्वतःच्या मुलीला जास्त भेटत नव्हता. तर तिने भेटावं अशी अपेक्षा करण्याचा त्याला अधिकारच नव्हता.
"शुअर बॉस. कधीतरी नक्की."
जोसेफ शांतपणे रस्त्याकडे पाहत होता. तिची नजरही रस्त्यावरच खिळलेली होती. हा इव्हेन्ट तिच्या मुठीत होता हे तिला माहित होतं.
**************
क्रमशः
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा