Login

राजनंदिनी - लव्ह इन एअर (भाग 6)

दोन वेगवेगळ्या परिस्थितीत जगणारे, एकमेकांशी काही संबंध नसणारे हे दोघे जेव्हा एकमेकांसमोर येतील तेव्हा काय होईल?
मागील भागात..

राजवीरला नुकतंच कळलं की जेनी तिथेच राहते. वरुणचं एडमिशनचं काम झालं आहे. नंदिनी इव्हेन्टसाठी थोडी उशिरानेच निघाली आहे. वाटेत तिने जोसेफला त्याच्या मुलीला भेटण्याची इच्छा असल्याचं सांगितलं.

आता पुढे..

        वेगाने तिची कार इव्हेन्टच्या ठिकाणी पोहोचली. मागून तिच्या बॉडीगार्ड्सची एक कार आधीच येऊन थांबली होती. जोसेफने खाली उतरत लगेचच तिच्यासाठी दार उघडला. तिथे जमलेल्या मीडियाचे सगळे कॅमेरे तिच्याकडे वळलेले होते. तिने बाहेर पाऊल टाकायच्या आतच फ्लॅशचं झोत पडू लागले होते. तिने जोसेफकडे हसून पाहिलं. त्याला समजलं की तिला काय दाखवायचं आहे. ती उशिरा गेली तरी सर्वजण तिच्यासाठीच ताटकळत उभे होते. जोसेफने हात पुढे केला होता. जेणेकरून तिने त्याच्या हाताला धरून सावकाश कारमधून उतरावं.

"आय एम नॉट अ प्रिन्सेस जोसेफ! डोन्ट ट्रीट मी लाईक दॅट!"

तिचा रुड स्वर कानावर पडताच त्याने हात मागे घेतला. स्वतःहून ती कारमधून खाली उतरली. तसं तिच्या बॉडीगार्ड्सनी तिला चारही बाजूने घेरलं. ती दिमाखात पण धीम्या गतीने चालत होती. मीडियाचा आवाज, त्यांचे प्रश्न तिला सगळं ऐकू येत होतं. बट हू केअर्स? ती तर अजिबात पर्वा करत नव्हती. तिची नजर फक्त एंट्रन्सवर खिळलेली होती. तिने बॉडीगार्ड्स समवेत आत प्रवेश केला. तोवर जोसेफ पुढे निघून गेला होता. ती चार पावलं पुढे यायच्या आतच तो पुन्हा तिच्यापर्यंत येऊन पोहोचला.

"बॉस, तुम्हाला फर्स्ट रोमधली सीट अरेंज केली आहे त्यांनी. फक्त बाजूला.."

"बाजूला?"

तिची नजर जोसेफवर रोखली गेली होती.

"तुमच्या बरोबर बाजूची सीट मिस्टर लिओ जोन्स यांची आहे."

"ओह.. फ्लोरा जेम्स!"

नंदिनीच्या चेहऱ्यावर हसू उमटलेलं त्याला दिसलं.

"इट्स फाईन जोसेफ. माझ्या लेव्हलला कधीच पोहचू शकणार नाहीत अशा लोकांच्या बाजूला बसायला मला शरम नाही वाटत. उलट त्यांनाही त्यांची जागा समजते. आज जर शो माझा झाला तर पुढच्या वेळेला फ्रंट रोमध्ये सीट अरेंज करण्याचा विचारही करणार नाहीत ते."

ती हसतच पुढे गेली. जोसेफला तिचा स्वभाव माहित होता. ती रुड होती. पण त्याहून जास्त विलक्षण धूर्त व्यक्ती होती. एवढ्या लहान वयात एवढं साम्राज्य निर्माण करायला धूर्तपणा असावाच लागतो. ती आपल्या सीटवर येऊन बसली. तसा फक्त जोसेफ आणि तिचा एक बॉडीगार्ड सोडून बाकीचे दूरच उभे राहिले. तिथली व्यवस्था इतकी रॉयल होती की रॉयल थ्रोन म्हणाव्यात अशा खुर्च्या त्यांना बसण्यासाठी ठेवलेल्या होत्या. पण त्यामुळे त्यांच्यामधील अंतरही कमी झालेलं होतं. आपल्या बाजूला मिस. नंदिनी अहुजा बसलेली आहे हे पाहून लिओ स्वतःशीच हसला. लिओ एक तिशीच्या आसपास असणारा तरुण होता. मनातून नंदिनीवर फिदा असणाऱ्यांपैकी एक.. पण प्रत्यक्षात नंदिनीचा कट्टर प्रतिस्पर्धक. लिओचा 'फ्लोरा जेम्स' नावाचा ज्वेलरी ब्रँड होता. जो कायम 'पर्ल' सोबत स्पर्धा करू पाहायचा. पण अजूनतरी त्यांना यश आलेलं नव्हतं. नंदिनीचे सर्व देशात असणारे कॉन्टॅक्ट्स, तिची काम करण्याची पद्धत, पर्लच्या स्टाफमध्ये असणारी शिस्त ह्या सगळ्याच गोष्टी  तिला एक हायली सक्सेसफूल बिजनेसवूमन बनवत होत्या.

"हॅलो मिस. नंदिनी!"

त्याने सुरुवात केल्यावर नंदिनीने आपली नजर त्याच्याकडे वळवली.

"हॅलो मिस्टर जोन्स!"

तिने त्याचं नाव घेतलं नाही हे त्याला लक्षात आलं.

"तुम्ही आजकाल आमच्यावर नाराज दिसत आहात. आठवड्याभरापूर्वी आमच्या कंपनीचा इव्हेन्ट होता. तिथे तुम्ही आला नाहीत. काही खास कारण?"

लिओच्या स्वरात नाराजीही दिसत होती आणि नंदिनी का आली नाही याचं कारणही अपेक्षित होतं.

"मी आले नाही असं तुम्ही म्हणू शकत नाही मिस्टर जोन्स. माझा मॅनेजर तिथे उपस्थित होता. थोडक्यात मी माझा प्रतिनिधी पाठवला होता. त्याने सगळा इव्हेन्ट अटेंड केला. इन्विटेशन पर्लला मिळालं होतं. पर्सनली नंदिनी अहुजाला नाही. आता पर्सनली मी यावं अशी तर तुमची इच्छा नव्हती ना?"

लिओची तशीच इच्छा नव्हती. पण तो स्वतःहुन कसा म्हणणार की तू यावंसं अशीच माझी इच्छा होती.. त्यामुळे तो काहीच बोलला नाही. त्याच्याकडे उत्तर नाही हे समजताच नंदिनी स्वतःच म्हणाली.

"माझं शेड्युल बीजी असतं मिस्टर जोन्स. आज या इव्हेन्टला यायलाही उशीरच झाला मला. तरी हा महत्वाचा इव्हेन्ट असल्यामुळे मी आले. माझ्या आसपासही नसणाऱ्या काही ब्रँडच्या छोट्यामोठ्या इव्हेन्टसाठी मी जात राहिले असते आणि माझा टाइम वेस्ट करत राहिले असते तर आज 'पर्ल' आणि 'क्लासिक' एवढे नामांकित ब्रँड नसते."

तिने मोजक्या शब्दांत, अपशब्द न वापरता त्याचा अपमान केला होता. तो त्यालाही जाणवला. त्यांचं बोलणं होत होतं तोवर समोर वेटर ड्रिंक्स घेऊन आला. लिओने त्यातलं एक ड्रिंक उचललं. नंदिनीने नकार दिला. तसा तो वेटर घाबरला.

"मॅम, अलेक्स सरांना माहित आहे की तुम्हांला वाईन आवडते. म्हणून तुमच्यासाठी मला खास घेऊन यायला सांगितली होती. तुम्ही नकार दिला तर माझा जॉब जाईल."

नंदिनी हसली. तिने त्या क्रेटमधली टीश्यू उचलला आणि जोसेफकडे पाहिलं. जोसेफने लगेच आपलं पेन पुढे केलं. तिने त्या टीश्यूवर लिहिलं.

'मिस्टर अलेक्स,
     थँक यु सो मच की तुम्ही माझी चॉईस लक्षात ठेवली. पण मी आज तुम्ही स्पेशली पाठवलेलं ड्रिंक स्वीकारू शकत नाही. माझी हेल्थ कंडिशन सध्या ठीक नसल्यामुळे मी अल्कोहोल आणि इतर ड्रिंक्सपासून दूरच आहे. मे बी नेक्स्ट टाइम आय विल एक्ससेप्ट धिज.

- नंदिनी अहुजा'


तिने तो टीश्यू त्या ट्रेमध्ये ठेवला.

"हे मिस्टर अलेक्सपर्यंत पोहोचव. तुझा जॉब नाही जाणार."

नंदिनीने हसून वेटरकडे पाहिलं.

"थँक यु मॅम!"

तो तिला ग्रीट करून निघून गेला. लिओ हे सगळं पाहत होता.

"मिस्टर अलेक्ससोबत तुमची ओळख कशी काय?"

त्याने आश्चर्याने नंदिनीला विचारलं.

"तो माझा क्लासमेट होता."

नंदिनीची हसरी नजर लिओकडे वळली. त्याला मेल्याहून मेल्यासारखं झालं होतं. हा इव्हेन्ट अलेक्सने अरेंज केला होता. त्याची बहीण ऑलिव्हर एका प्रसिद्ध बिजनेसमनसोबत लग्न करणार होती. तिच्या लग्नासाठी अलेक्सला सगळ्यात एक्सपेन्सिव्ह आणि ब्रँडेड ज्वेलरी खरेदी करायची होती. नंदिनी आणि अलेक्सची आधीच एवढी जवळची ओळख असेल तर या इव्हेन्टचा रिजल्ट डिक्लेअर असल्यासारखाच होता. म्हणूनच नंदिनी येईपर्यंत इव्हेन्ट थांबवून ठेवण्यात आलेला होता हे लिओला समजलं. तो फ्रंट सीटवर बसला तर होता. पण आता..

     त्याची रागीट नजर नंदिनीकडे वळली. नंदिनीला जाणवलं की काय चाललंय हे समजण्याइतका लिओ हुशार आहे.

"हे सगळं आधीच फिक्स केल्यासारखं आहे मिस. नंदिनी अहुजा!"

त्याच्या शब्दांत राग जाणवत होता.

"नाही मिस्टर जोन्स. सस्केसची स्वतःची लँग्वेज असते. माझा स्ट्रगल तिथपर्यंतच होता जोवर मी एकदा सक्सेसफूल बिजनेसवूमन म्हणून डिक्लेअर होत नाही. एकदा मी चॅम्पियन झाले आणि आता ती पोजिशनच्या माझ्या नावावर रजिस्टर झाली आहे. आय एम द ओन्ली वन टू विन!"

तिच्या चेहऱ्यावरचे विजयी भाव लिओला अस्वस्थ करून गेले होते. डेव्हिल.. या शब्दाचं मूर्तिमंत रूप तो आता त्याच्यासमोर पाहत होता. त्याला वाटत होतं की आता इथून उठून जावं. पण असं करणं म्हणजे अलेक्सचा अपमान करण्यासारखं होतं. अलेक्स खूप मोठा बिजनेसमन होता. त्याच्या नावे कुठला ज्वेलरी ब्रँड नसला तरी सगळं लंडन शहर त्याला नावाजत होतं. त्याच्याशी वैर घेण्याचं धाडस एक छोटासा ब्रँड असणारा लिओ जोन्स करणार नव्हता. नंदिनीची नजर स्टेजवर खिळली होती. अलेक्स आणि तिची नजरानजर लिओच्या नजरेतून सुटली नव्हती. तो फक्त हताशपणे बसून होता.