मागील भागात..
अलेक्सने पर्लची निवड केली. अलेक्सची क्लासिककडून खास डिजाईन करून मागितलेल्या ब्रायडल वेअरची विनंती तिने नाकारली. राजवीर सोबत हेल्पर म्हणून मायरा आली आहे.
आता पुढे..
सकाळी म्हटल्याप्रमाणे जोसेफ तिच्या बंगल्याच्या बाहेर हजर होता. तीही आज वेळेत आलेली पाहून त्याला कमाल वाटली. तिने जेनीसाठी तो डिजाईनर ड्रेस घेतला होता. जोसेफने इतर मुलांसाठीही काही गिफ्ट्स घेतली होती. फक्त जेनीला काहीतरी द्यायचं आणि ते बघत बसणार हे त्याला आवडलं नसतं. तिच्या डोक्यातही आलं नसतं हे! त्यांची कार वेगाने चाईल्ड केअर इन्स्टिट्युटच्या दिशेने जात होती. लवकरच ते तिथे पोहोचले. जोसेफ आणि ती असे दोघेच जण आत आले. मायरा तिथे मुलांसोबत काहीतरी बोलत बसली होती. राजवीर आणि जेनी मात्र कुठे दिसत नव्हते.
"मिस. मायरा!"
त्या आवाजासरशी तिने वर पाहिलं.
"येस सर? तुम्हांला कोण हवं आहे?"
तिने नम्रपणे विचारलं. ह्या व्यक्तीला तिने आल्यापासून पहिल्यांदाच पाहिलं होतं. हे इथल्या मुलांच्या पालकांपैकी तर वाटत नव्हते तिला.
"मी जोसेफ."
"ओह.. ओह माय गॉड! वेलकम सर! वेलकम मॅम! मी काय मदत करू तुमची?"
"जेनी आणि मिस्टर राजवीर कुठे आहेत?"
जोसेफने विचारलं.
"ते मागच्या मैदानावर खेळत आहेत. मी त्यांना लगेच बोलवून आणते सर."
मायरा जाणार तोच एका कठोर स्वरामुळे तिची पावलं तिथेच थबकली.
"असुदे. आम्ही जाऊ तिथे. तुला जायची गरज नाही."
नंदिनीने त्या दिशेने चालायला सुरुवात केलेली पाहून जोसेफही तिच्या मागोमाग चालू लागला होता. तिच्या सोबत आलेल्या लोकांनी ते गिफ्ट्स तिथे आणून ठेवले. ते दोघे मागच्या मैदानावर आले. तिथे राजवीर आणि जेनी दोघेच होते. जेनीच्या डोळ्यांना पट्टी बांधलेली होती आणि ती राजवीरला शोधत होती. हा खेळ मूळचा इथला नव्हता. त्यामुळे ते काय खेळत आहेत नक्की ते ह्या दोघांनाही समजलं नाही. मात्र खेळताना जेनी खळाळून हसत होती. अचानक राजवीरचं लक्ष दुरवर उभ्या असणाऱ्या त्या दोघांकडे गेलं. तसा तो चटकन जेनीजवळ गेला आणि तिच्या डोळ्यांवरील पट्टी काढली.
"व्हॉट इज धिज? असं मधेच का थांबवला खेळ?"
जेनीने रागानेच विचारलं.
"आपण भरपूर वेळ खेळलो प्रिन्सेस. लूक, तुला भेटायला कोणीतरी आलं आहे वाटतं. जायचं का आपण त्यांच्याकडे?"
राजवीरने त्या दोघांकडे इशारा करताच जेनीनेही तिकडे पाहिलं.
"ओह! डॅडा!"
ती वेगाने तिकडे धावली. तिच्या मागोमाग राजवीरही धावत होता. जेनी थेट जोसेफच्या कुशीत शिरली. त्यानेही तिला उचलून घेतलं.
"आय मिस्ड यु डॅडा!"
जेनी त्याला घट्ट बिलगून म्हणाली.
"मिस यु टू प्रि.. अं.. बेबी! मस्त वाटलं ना खेळून?"
"येस डॅडा! राज इज सो गुड! त्याला किती गेम्स माहित आहेत. त्याने हा गेम काल सगळ्यांना शिकवला. तुला माहित आहे, काल सगळे माझ्यासोबत खेळले. नाहीतर ते मला खेळायला घ्यायचे नाहीत. पण राजनेच सांगितलं की सगळ्यांना घेऊन खेळणार असाल तरच खेळायचं. अँड इट वॉज अमेझिंग! मला त्या गेममध्ये एक्सपर्ट व्हायचं आहे. म्हणून मी आज परत खेळत होते."
जेनीला खुश पाहून जोसेफच्या मग्रूर चेहऱ्यावर गोड हसू उमटलेलं होतं. नंदिनी हे सगळं पाहत होती. तिला काही खास भावना जाणवत नव्हत्या. पण जोसेफ खुश आहे यात तिचा आनंद होता.
"जेनी, सी तुला भेटायला कोण आलं आहे. माय बॉस!"
तो हसून म्हणाला. जेनीची रिएक्शन मात्र पूर्णतः वेगळी होती. ती रागाने नंदिनीकडे पाहत होती.
"सो हिच्यामुळे तू माझ्यासोबत राहत नाही ना? मिस तुमचा प्रॉब्लेम काय आहे? तुम्ही माझ्या डॅडाला का ठेवुन घेता तुमच्याकडे? माझी मम्मा नाही आहे आणि तुम्ही तर माझ्या डॅडाला पण माझ्यापासून दूर ठेवायला बघत आहात. दॅट्स नॉट फेअर!"
जेनीचं असं बोलणं जोसेफला अपेक्षित नव्हतं. त्याने पटकन जेनीला राजवीरच्या हातात सोपवलं आणि तो नंदिनीकडे वळला. तिच्या चेहऱ्यावरच्या आठ्या स्पष्ट दिसत होत्या.
"सॉरी बॉस. तिला असं नव्हतं म्हणायचं. ती लहान आहे. प्लिज समजून घ्या."
जोसेफ पटकन बोलला. नंदिनीचा चेहरा मात्र आकसला गेला होता. ती राजवीरने उचलून घेतलेल्या जेनीजवळ आली. आपल्या हातातली पिशवी तिने जेनीच्या हातात दिली.
"यु नो व्हॉट, मी अशीच आहे. मी डेव्हील आहे. डेव्हील! मला सर्वांना त्रास द्यायला आवडतो. तू माझ्याशी असं बोलशील तर त्याचा त्रास मला नाही, तुझ्या डॅडाला होईल. सो कीप क्वाईट!"
ती मागे वळणार तोवर जेनीने उत्सुकतेने तो ड्रेस बाहेर काढला होता. प्रिन्सेस ड्रेस पाहून ती फार खुश झाली होती.
"सी राज, इट्स अ प्रिन्सेस ड्रेस!"
ती हसून म्हणाली. नुकतीच मागे वळत असलेली नंदिनी तिचा ती स्वर ऐकून तिच्याजवळ आली. तिला परत आलेलं पाहुन जेनी घाबरूनच तिच्याकडे पाहू लागली.
"हा ड्रेस स्वतः मी डिजाईन केला होता तुझ्यासाठी. बट यु डोन्ट डिजर्व्ह इट प्रिन्सेस गर्ल!"
तिने जेनीच्या हातातून तो ड्रेस काढून घेतला आणि आपल्या हाताने तो फाडून टाकला. जेनी तर रडायलाच लागली. तिला तो ड्रेस आवडला होता.
"व्हॉट इज धिज बिहेवीअर मॅम? तुम्ही मुलांसोबत असं नाही वागू शकत. प्लिज!"
एवढा वेळ शांत उभा असलेला राज पटकन रिएक्ट झाला.
"शट अप! तू नाही शिकवायचं मला की मी कसं वागायचं. ही चाईल्ड केअर इन्स्टिट्युट माझ्याच पैशांतून उभी आहे. माझ्याशी क्रॉसिंग तुला महागात पडेल. जोसेफ, पुन्हा मी इथे येणार नाही आहे. मेक शुअर की पुन्हा तुझी मुलगी माझ्यासमोर येणार नाही."
नंदिनी रागातच बाहेर निघून गेली. जेनी मोठ्याने रडत होती. जोसेफने तिच्याकडे पाहिलं.
"मिस्टर राजवीर, प्लिज तिला शांत करा."
एवढंच कसंबसं बोलून तो नंदिनीच्या मागोमाग धावला.
राजवीरला समजलं की तो असहाय आहे. त्याचं सगळंच कुटुंब तिच्यावर चालत होतं आणि राजवीरची स्वतःची तरी काय वेगळी अवस्था होती? ती इथली मालकीण होती. म्हणजे त्याचंही आयुष्य तिच्या मर्जीवरच चालणार होतं. तिने रागात काढून टाकलं तर त्याला तरी काय भविष्य होतं? तो जेनीला शांत करत आत घेऊन आला.
"काय झालं? ती का रडत होती?"
मायराने विचारलं.
"काही नाही. सोड."
राजवीरने विषय टाळला.
"कोण होते ते लोक?"
तिला कुतूहल होतंच.
"ते जेनीचे डॅड आणि ज्यांनी आपल्याला जॉब दिला ते मिस्टर जोसेफ होते. त्यांच्यासोबत असलेल्या त्या मॅडम त्यांच्या बॉस आहेत आणि या चाईल्ड केअर इन्स्टिट्युटच्या ओनर."
राजवीरने असं सांगताच अचानक मायराने आपला मोबाईल बाहेर काढला आणि काहीतरी सर्च केलं.
"राज, हे बघ. मला तरी वाटलेलंच की मी हिला कुठेतरी पाहिलं आहे. करोडपती आहे ती.. मोस्ट सस्केसफूल बिजनेसवूमन, मिस. नंदिनी अहुजा!"
त्याने त्या फोटोवर आणि त्या माहितीवर फक्त एक नजर टाकली. त्याच्या मनाने घेतलं होतं की हिच्यापासून शक्य तितकं दूर राहिलेलं ठीक. ती किती शीघ्रकोपी होती हे ड्रेस फाडण्याच्या प्रसंगावरून त्याच्या लक्षात आलं होतं.
"जरा जेनीकडेही लक्ष दे मायरा. मी पाणी पिऊन येतो."
तो फिल्टरच्या दिशेने चालत गेला. पण तो मनोमन फार उद्विग्न झालेला होता.
**************
क्रमश:
क्रमश:
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा