Login

रखमा भाग 3

स्त्री भ्रूणहत्या
*चॅंम्पियन्स ट्रॉफी २०२५*

*रखमा* भाग तिसरा....
मी अलगत रखमाच्या हातावर हात ठेवला, तशी ती घाबरली, ऊठुन जाऊ लागली, मी तिचा हात घट्ट धरला, माझ्या डोळ्यात तिला विश्वास जाणवला, मी हाताची पकड सैल कली तर तिने डोळ्यांनीच मला थांबायला सांगितले आणि दारात जाऊन माईंना सांगितले

" माई....धाकल्या मालकीण बाई सोबत आज म्या थांबतुया त्यासनी अजुन बी सुद आली न्हाय, रात्री अपरात्री जाग आली तर कोणी जवळ पायजेल की नाय"

खालून च माईंनी होकार ही दिला.. माझ्या स्पर्शाने तिला जाणवलेला विश्वास कामी आला. ती आत आली दार लावून घेतले आणि बाहेरच्या आवाजाचा अंदाज घेत मला शांत रहायला सांगितले, थोडा वेळानी बाहेर पांगापांग झाल्यावर आमच्या खोलीचा दिवा ही मालवला आणि माझ्या जवळ येऊन बसली, माझा हात हातात घेत स्फुंदत राहिली..

" धाकल्या मालकीण बाई तुम्ही इथून लवकरात लवकर निघून जा, तुम्ही जर पोर नाही दिला तर तुमच्या बी लेकीला जीती नाय ठेवणार हे दोघबी ... तुमचा लय जीव हाय ना धाकल्या मालकांवर.. माझा बी व्हता."

माझा हात अजुन घट्ट धरुन ती पुन्हा रडू लागली,

" आमच लगीन झालं तेव्हा पईला पोरच हवा व्हता मोठ्या मालकास्नी पण माझ्या पोटी पोरी झाली, माझं आनी पोरीच तोंड बी नाय बघीतल धाकल्या मालकांनी,जसं काय म्या गुन्हा केलाय..मला गुंगीचे दवा देउन बळी दिला म्हाया लेकीचा ह्या राक्षसांनी..."

"म्या रडले,ईनवणी केली, पाया पडले पण काय नाय ऐकलं, ओल्या बाळंतीनीला लाता बुक्क्यांनी मारलं ह्या नराधमांनी, माझं ना कोणी माय ना बाप कुठं जाणार... गपगुमान सोसत राहिले की पुढे समदं ठीक होईल...पण पाठोपाठ तीनदा पोरीच जन्मल्या तवा गावात जत्रा होती म्हणून लगेच नाही मारल्या ... वर्षाच्या होऊ दिल्या आणि परसातील बेड्यात मानेवर कुर्हाड फीरवली राक्षसांनी, दया माया काय बी नाय ह्या नराधमांना"

माझ्या अंगाचा थरकाप उडत होता, काय मा़ंडलं होत माझ्या समोर, मी पण अशीच मरणार का?मला दरदरून घाम सुटला.

मला धीर देत रखमा बोलली

" तुम्ही धावून जा. म्या तुम्हासनी हायवे पतरू पोचीवतो .. तुमच्या पोटामधी पोरी हाय..ते नाय जीती ठेवणार तीला.. तुम्ही जा पळून , निदान वाचवा या रखमीला तरी"

मी तिच्या कडे पहातच राहीले,

"जर पळून जाणं इतकं सोपं आहे तर तू का थांबलीस अजून पर्यंत, तू पण चल माझ्या सोबत, का रहाते या नरकात "

" धाकल्या बाई, म्या गेले तर माझ्या पोरींना शांती नाही मिळायची,त्या अशाच अधांतरी रहातील, त्यांच्या जिवांचा बदला घेतल्यानंतरच त्यास्नी शांती मिळलं "

"अगं आपण कायद्याचा आधार घेऊ, पोलीसांना सा़ंगू मिळेल काहीतरी मार्ग पण तू या नरकात नको थांबूस"

तीने माझे ऐकले नाही, साडीच्या पदराला बांधलेले पैसे माझ्या हातात दिले माझे कपडे घेतले आणि दबक्या पावलांनी वाड्या बाहेर आलो.. माझी नजर परसात गेली त्या तीघी हसत निरोप देत होत्या. मला चालवत नव्हते पण पोटातल्या पिल्लासाठी कुठून बळ आले माहीत नाही. हायवे पोहचून बसमधे बसवून भरल्या डोळ्यांनी निरोप दिला रखमी नी, कोण कुठली ती, स्वतः च्या मुली वाचवू शकली नाही पण माझ्या लेकीला वाचवण्याची तीची धडपड सुरू होती, भरल्या डोळ्यांनी मी ही तीला निरोप दिला, आणि निःश्वास सोडला की परमेश्वरा सांभाळ रखमाला....

नंतर एकदा पेपरात बातमी वाचली की पारखपाडृयातील एका जमीनदाराला त्याचा मुलांसोबत घरच्या सुनेने कुर्‍हाडीने वार करत संपवले.. अखेर ज्या कारणासाठी रखमा थांबली तो बदला तीने घेतला..

माझी रक्षा (रखमा) अर्थात माझी लेक आज ५ वर्षांची आहे, तीला हसताना, खेळताना पाहुन परिसरातल्या रखमाच्या मुली डोळ्यापुढे येतात...
रखमाने मला आणि माझ्या लेकीला दिलेलं हे जिवनदान आजन्म मला तिच्या ऋणात ठेवणारं आहे...

*शिल्पा परुळेकर पै*
0

🎭 Series Post

View all