Login

रक्तदान : महादान भाग १

रक्तदानाचे महत्त्व
रक्तदान : महादान

भाग १

गावात सकाळी सकाळी जय जय महाराष्ट्र माझा ......... हे गाणं लावूंन एक गाडी फिरत होती . ती एका चौकात थांबली आणि
" ऐका हो ऐका
गावकऱ्यांनो ऐका

रक्तदान हेच श्रेष्ठ दान

म्हणून आपल्या गावात प्रजासत्ताक दिनानिमित्त्य रक्तदान शिबीर ठेवण्यात आले आहे . तरी आपल्या गावातील जास्तीच जास्त लोकांनी या मध्ये भाग घेऊन मोठ्या प्रमाणात रक्तदान करावे . हि विनंती . "

गावात लगेच चर्चा चालू झाली . रस्त्याने दोघी जणी पाण्याचे हांडे घेऊन चालत होत्या . एक बाई म्हणाली , " रक्तदान करा म्हणे , काय करायचे रक्तदान करून . आपल्याला काय उपयोग त्याचा ? "

तर दुसरी म्हणाली , " हो ना खरंच आपल्याला काय उपयोग ? " आधीच दिवसभर कष्ट करून रक्त आटतंय . अजून हे..... "

तर गावात असलेल्या मोठ्या पारावर काही वयस्कर लोकं नेहमीप्रमाणे गावातील गोष्टींवर चर्चा करायला बसले होते .

त्यातील एक म्हातारा म्हणाला , " आपल्या वेळी असलं काही नव्हते . रक्तदान म्हणे, आपण काय काय दान करायचो. हि नवीन पिढी काय करेल . "

" हो ना . पण मला हे कळत नाही एवढे रक्त घेऊन हे तरी करणार काय? ."

" मी ना ऐकलं होते कि काहीतरी नवीन पिढी गाड्या जोरात चालवून धडपडतात त्यावेळी जर रक्त हवं असेल तेव्हा हेच वापरतात म्हणे . "

" पण मी काय म्हणतो आपल्या सारख्या वयस्कर लोकांना याच काय उपयोग. आपण जाऊन तर बघू काय असते ते ? "

" हो चालेल अजून दोन दिवस आहे . . आपण जाऊन तर बघूया . "

या आणि अश्या अनेक उलट्या सुलट्या चर्चा गावात चालू होत्या. ज्यांनी हा कार्यक्रम राबविला होता . त्या तील काही मुले आणि मुली रस्त्याने फिरत असताना ह्या चर्चा ऐकत होते .

ते फिरत असले तरी शिबिराचे पत्रक वाटायचे काम करत होते . त्यांना शंका यायला लागली ह्या शिबिरात कोणी रक्तदान करेल का नाही ?

असेच फिरत फिरत ते एका कॉलेज पाशी पत्रक वाटायला आले . त्यांना आशा होती की हि मुलेतरी रक्तदान करतील. म्हणून ते उत्साहात आले . त्यांनी हि पत्रक वाटून मुलांना नक्की यायला सांगितले .

ते पुढे गेले नाहीतर एक मुलगा म्हणाला , " कशाला कारायचे रक्तदान . आपण मस्त खायचे प्यायचे . लाईफ एन्जॉय करायची. "

" तुम्हाला माहितीय का ?"

सगळे एकदम म्हणाले, " काय ?"

" मी एकदा पुण्याला गेलो होता ना तेव्हा तिथे एका चौकात खूप मोठा मांडव टाकला होता . तिथेच कॉट टाकून आपल्या वयाची मुले मुली रक्तदान करत होती . "

" काय आपल्या वयाची ? "

" हो ना . मला हे काही तरी वेगळे वाटले . म्हणून मी दिवसभर तिथले निरीक्षण करत होतो . दिवसभर बघितले सगळ्या वयोगटातील लोक रक्तदान करत होते. "

" पण एवढं रक्त घेऊन काय करत असतील ?" दचसरा मुलगा म्हणाला

"हो ना.? काय करत असतील नाहीतर वाईट वापर करत असतील का ? " मुलगी म्हणाली

" मग काय आपण बातम्या ऐकतच की . आपल्या ला जी सुई टोचतात त्याने आपल्याला काही झाले तर ? नको रे बाबा मी नाही जाणार तिकडे ."

" जाऊदे नकोच जायला ?"

तो मगाशी पुण्याची माहिती सांगत होता तो मुलगा म्हणजे समीर म्हणाला , " नको जायला काय ? काय ग काही काय विचार करते ? उलट आपण सगळयांनी रक्तदान केले पाहिजे . आणि .... "

" आणि काय करायचं ?"

तेवढ्यात बेल वाजली म्हणून सगळे वर्गात गेले. पण संमीर वर्गात होता पण त्याचे शिकवण्याकडे लक्षच नव्हते . त्याच्या मनात वेगळेच विचार चालू होते .

परत एकदा त्याला गाण्याचा आवाज ऐकू आला

" जय जय महाराष्ट्र माझा

गर्जा महाराष्ट्र माझा "

ऐक हो ऐका

२६ जानेवरी रोजी सकाळी ९ ते ५ या वेळेत आपल्या गावाच्या राम मंदिराच्या सभागृहामध्ये रक्तदान शिबीर होणार आहे . तर जास्तीच जास्त लोकांनी येऊन रक्तदान करावे . "


जय जय महाराष्ट्र माझा ..... "

या मुलांना राम मंदिरात आणायचे असेल तर मलाच काहीतरी करावे लागेल. आता कॉलेज सुटल्यावर करतोच काहीतरी.

त्याच लक्ष तर लागत नव्हते पण बाहेर पण जाता येत नव्हते . म्हणून तो मनातल्या मनात काय करता येईल याचा विचार करू लागला . तो मनाशीच म्हणाला, " आपण ते जे शिबीर घ्यायला आलेत त्यांना जाऊन भेटूया म्हणजे ते काहीतरी सांगतील किंवा त्यांच्या मदतीने मुलांच्या विचारात बद्दल करता येईल का ते बघता येईल . हे असाच करतो . कॉलेज झाल्यावर त्यांना लगेच जाऊन भेटतो . "

या विचारात मराठीचा तास कधी संपला कळलाच नाही. तो लगेच बाहेर येऊन मित्रमैत्रिणींना जातो घरी सांगून गेला पण "

शिबारचे कार्यकर्ते तिथेच हे मुलांचे बोलणे ऐकत चहा घेत होते. एकंदरीत चर्चेवरून त्यांना लक्षात आले की इथल्या लोकांना समजून सांगण्याची गरज आहे.

त्यातलाच सागर आणि समीक्षा एकदम म्हणाले, " आता आपण काय करायचे ?"

स्वप्नील म्हणाला, " आपण आपल्या शिबाराच्या ठिकाणी जाऊया आणि वरिष्ठांना सगळं सांगूया चला. "

" हो चला ."

बघुया पुढच्या भागात समीर आणि शिबिराचे आयोजक काय करताय ते ?

क्रमशः

©®सौ. चित्रा अ. महाराव
अष्टपैलू लेखन स्पर्धा
२०२५

🎭 Series Post

View all