दाभोळकर गाडी घेवून धनपालच्या वाड्याकडे जायला निघाले. चिंधीला अटक करण्यासाठी त्यांनी एक लेडी कॉन्स्टेबलला सोबत घेतलं होतं. ते निघून गेले. तेंव्हा चौकीवर सुंदरी आणि सुरेखा , राघव, विक्रम आणि जाधव साहेब होते. सुरेखा विशेष आनंदीत झालेली होती. कारण सुंदरी कडून गुन्हा कबूल करवून एकप्रकारे तिने जाधव साहेबांशी लावलेली पैज जिंकली होती.
" साहेब, आता मला चहा पाजायला हवा तुम्ही. कारणं मी पैज जिंकली आहे." ती हसत म्हणाली.
" सुरेखा मॅडम, खरं म्हणजे तुम्ही ही पैज जिंकायलाचं हवी होती, असं मला मनापासून वाटतं होतं. कारणं या अट्टल गुन्हेगार बाई कडून गुन्हा कबूल करवून घेण्या साठी तुमच्या सारख्याच कणखर ऑफीसरची गरज होती आणि ते काम तुम्हीच करू शकला असता. आणि पैजेच्या चहाची काय गोष्ट बोलता मॅडम, मी तुम्हाला एक भविष्यवाणी सांगतो. या प्रकरणाच्या चौकशीमधे तुम्ही जो मोलाचा वाटा उचलला आहे त्याची खबर दाभोळकर साहेब नक्की गृहराज्य मंत्रालया पर्यंत पोहचवतील बघा आणि मग तुमची बढती आणि शौर्य पदक फिक्स. " त्यांच्या बोलण्यातून सुरेखा बद्दल एव्हढ कौतुक झळकत होतं की क्षणभर सुरेखाला वाटलं झरकन पूढे होवून त्यांचा आशीर्वाद घ्यावा. अगदी नोकरीला लागल्या पासून जाधव साहेब तिला सतत प्रोत्साहन देत. योग्य मार्गदर्शन करीत. तिच्या बद्दल त्यांना अगदी सुरूवाती पासून खूप आदर, अभिमान आणि प्रेम वाटतं असे. तिचा नवरा सैन्यात होता. त्याची नेहमी सीमेवर ड्यूटी लागलेली असे. वर्ष सहा महिन्यातून तो कधीतरी घरी येई. ईकडे ती आपल्या सहा वर्षाच्या मुलाला घेऊन सासू सासऱ्यांसोबत राहात होती. नवरा सोबत नाही किंवा मुलगा लहान आहे या गोष्टीचं ती कधीच भांडवल करतं नसे की कधी ड्यूटी मध्ये सवलत घेत नसे. त्या मुळे तिच्या गुणांच नेहमी कौतुक व्हावं असं त्यांना वाटे. ती अतिशय शूर होती. तिच्या बद्दल येणाऱ्या विचारांना त्यांनी चहा मागवून थांबवले. दोघांनी चहा घेतला.
लवकरच त्या दोघांची ड्यूटी संपणार होती. ते सुरेखाला म्हणाले,
लवकरच त्या दोघांची ड्यूटी संपणार होती. ते सुरेखाला म्हणाले,
" मॅडम, आता तुम्ही थोडावेळ स्टेशन सांभाळा. कालपासून आणलेल्या पाहुण्याला मी तुमच्या धावपळीत अजून भेटलो देखील नाही. बघू जरा काय म्हणतो तो. एक पाहुणा तर शुध्दीवरचं नाही. दुसऱ्या बद्दल खात्री लायक बातमी आहे. "
असं म्हणतं ईतका वेळ शिवशिवणारे हात मोकळे करण्यासाठी जाधव साहेबांनी राघवच्या कोठडीत प्रवेश केला. एक क्रूर जनावरा सारखा राघव कोठडीत पडलेला होता. त्याला बोलत करायची कसरत जाधव साहेबांना करायची होती. त्यांच्या पद्धती ईतक्या भयानक होत्या की त्यांच्या नुसत्या नावानेच भले भले गुन्हेगार गार पडून जात. गुन्हेगारांबद्दल त्यांच्या मनात कधीचं दया निर्माण होतं नसे. एक दणकट वेताचा रूळ आणि एक खिळे उपटण्या साठी वापरतात तशी पकड घेऊन त्यांनी कोठडीत प्रवेश केला.
राघव आज पर्यंत स्वतःला कधीच कोणाला न घाबरणारा समजत असे. वेळप्रसंगी तो ईतका क्रूर होवून जात असे की परिणामाची तमा न बाळगता समोरच्यावर हल्ला करत असे. समोरच्या व्यक्तीला मारहाण करतांना कधी कधी त्याच्या मारहाणीत वेडसर पणाची झाक दिसत असे. समोरच्याला तडका फडकी मारण्यापेक्षा तडफड करत यातना भोगायला लावण त्याला आवडत असे. धनपाल सारखा आसामी त्याच्या पाठीशी असल्यामुळें त्याच्या क्रौर्याला सीमाच राहिलेली नव्हती. पण आज किती तरी दिवस झाले. तो आत मध्ये होता. धनपाल आपल्याला सोडवायला येईल ही त्याची समजूत खोटी ठरली होती. तरी त्याचं नशीब आत्ता पर्यंत चांगलचं म्हणावं लागेल की अजून त्याचा जाधव साहेबांशी संबंध आला नव्हता. पण आज त्याची पुण्याई संपलेली होती कारण जाधव साहेबांनी त्याच्या कोठडीत प्रवेश केला होता.
सकाळ झालेली होती तरी त्याच्या कोठडीत बराच काळोख होता. आणि तो निवांत पडलेला होता. रात्री ईथ काय नाट्य घडलेलं होतं त्याला काहीचं माहीत नव्हतं. पण सुंदरी मूळे सुरेखाला रात्रभर जो त्रास झाला होता. त्याचं उट्ट काढायला जाधव साहेब उतावीळ झालेले होते.
आत आल्या आल्या त्यांनी आपल्या कडक पोलिसी बुटाची दणकट लाथ राघवच्या पेकाट्यात घातली. तो एकदम दचकला, आणि," कोण आहे रे" असं त्याने म्हटल्या बरोबर जाधव साहेबांनी त्याच्या पायाच्या नडगीवर हातातल्या वेताच्या काठीने ईतक्या जोरात प्रहार केला की तो कळवळलाचं. त्याने वर बघताच त्यांच्या पोलादा सारख्या मुठीने त्यांनी त्याच्या जबड्यावर असा जोरात प्रहार केला की आपल्या जबड्याची काही हाडं कडकडा मोडल्याचा भास त्याला झाला.
" हा, नालायक माणसा, हात पूढे कर."खुर्चीवर बसून त्यांनी आज्ञा दिली. कसलाच अंदाज न आल्यामुळे त्याने सहज हात पूढे केला. पुढील काही क्षणात त्याला कसलाच अंदाज आला नाही. अंगठ्याचे नख जाधव साहेबांनी हातातल्या पकडीने उपटून काढले. तो ठणाणा बोंबलला.
" दुसरा हात, पूढे कर" त्यांनी कर्कश्य आवाजात आज्ञा दिली.
" नाही साहेब, मी काहीचं केलेलं नाही."
जाधव साहेब काहीचं बोलले नाही. त्यांनी सहज त्याचा दुसरा हात हातात घेतला आणि दुसरं नख उपटून काढलं. पुन्हा तो ठणाणा बोंबलला. मग अगदी न बोलता त्यांनी त्याच्या डाव्या आणि उजव्या पायाच्या अंगठ्याची नखं निर्विकार पणं उपटली. वेदनेने राघवचा चेहरा पिळवटला. तो आक्रोश करून रडू लागला. मग जाधव साहेबांनी आपल्या बुटाने त्याचा पायाचा अंगठा रगडला.
" याला वेदना म्हणतात हलकटा. बोल मुसाच्या पोरीला मारले की नाही तू? अजून कोणा कोणाला ठार केले आहेस ? थांब जो पर्यंत तू बोलणार नाही तो पर्यंत मी एक एक करून तूझी सगळी नखं उपटून टाकतो आणि मग तूझी बोटं तिखटात बुडवतो, मग तू बरोबर बोलायला सुरूवात करशील. " बोलता बोलता परत त्यांनी त्याच्या हाताचे एक नखं उपटले.
" दुष्ट माणसा, तुला कदाचित माहित नसेल. पणं तुझा एक साथीदार विक्रम हा देखील बाजूच्या कोठडीत आहे आणि ती चेटकीण सुंदरी ही देखील माझ्या ताब्यात आहे. पिरगावच्या मुलीचं काय झालं ? मला सगळ माहिती आहे. फक्तं तू किती खरं बोलतो आहे ते मला पहायचं आहे. त्याचे केस हातात धरून भिंतीवर त्याचं डोकं आदळत जाधव साहेब म्हणाले,
" थांब, दुष्टा, फक्त थोडा वेळ वाट बघ. मग बघ इथ कोण कोण पकडून आणलं जातंय ते. तुमच्या पैकी एक जण देखील वाचणार नाही. " बोलता बोलता परत त्यांनी त्याच्या एका बोटाचे नखं उपटलं. त्याच्या हाता पायाच्या बोटांमधून रक्ताची धार लागली. पुन्हा त्या हातावर ते रुळाने फटके मारत होते. तो बोलायला जितकी टाळाटाळ करत होता. तितका त्यांचा राग अनावर होतं होता. शेवटी त्यांनी त्याच्या हाताच्या बोटांना बुटाने रगडायला सुरूवात केली तेंव्हा असह्य होऊन राघव ओरडला," सांगतो मी सगळ तुम्हाला साहेब"
आणि तो बोलायला लागला. त्याच्या बोलण्याने त्या चौकीच्या भिंती देखील शहारल्या. सुन्न होऊन जाधव साहेब त्या नर राक्षसाची कृष्ण कृत्य ऐकत होते.
( क्रमशः)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा