Login

रक्त रंजीत 365 रात्री ( भाग 38 )

एक भयावह मालिका


" मनसुखलालने  घेण्याच्या आधी हा वाडा एका ब्राह्मणाचा होता." नागनाथ डोळे मिटून बोलायला लागला.", त्या ब्राह्मणाला एकुलता एक मुलगा होता.  त्याचं नाव त्रिलोकनाथ . हा मुलगा अतिशय हुशार होता. विविध शास्त्र संपन्न होता. दिसायलाही अतिशय सुरेख होता. तो वयात आल्यानंतर त्याचे एका मुलीशी लग्न ठरले. लग्न ठरल्यानंतर तो एकदा आपल्या गावचा ओढा ओलांडून आपल्या घरी येत होता. त्यावेळी आपल्या गावच्या ओढ्याला प्रचंड भरपूर पाणी असायचं. त्याचा वेग इतका असायचा त्याला पार  करणे खूप अवघड होतं. त्यात ते पावसाळ्याचे दिवस होते. रात्रीची वेळ होती. समोरच काही दिसत नव्हतं. त्यावेळी हा ब्राह्मणाचा मुलगा घोड्यावर बसून हा ओढा पार करून आपला घरी येत होता. पाण्याला एवढा   वेग होता की त्याचा घोडा ओढ्यातल्या एका दगडाला अडखळून खाली पडला. त्याबरोबर ब्राह्मणाचा मुलगा ओढ्यात पडला आणि पाण्याच्या ओघांबरोबर वाहून गेला. नंतर काही दिवसांनी त्याच प्रेत ओढ्याच्या खालच्या गावांना एका गावाला सापडले. त्या मुलाचं लग्न झालेलं नव्हतं. जेव्हा एखाद्या ब्राह्मण मुलाचं लग्न होत नाही. तेव्हा त्याला जाळत नाही त्याला पुरतात. त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्याच्या आधी त्याचं लग्न रुईच्या झाडाची लावलं जातं. असं शास्त्र आहे. त्यानुसार या ब्राह्मण मुलाचे लग्न रुईच्या झाडाची लावलं गेलं. त्याला या ठिकाणी पुरल गेलं. त्या ठिकाणी एक पिंपळाची फांदी लावली. आणि हाच तो पिंपळ आहे ज्याच्या खाली तो ब्राह्मणाचा मुलगा पूरलेला आहे. जेव्हा असा एखादा ब्राह्मणाचा मुलगा लग्न न करता पूरला जातो त्यावेळी त्याचा मुंजा होतो. आणि हा मुंजा पिंपळाच्या झाडाला झाडावरती राहात असतो. दुर्दैवाने या मुलाचं लग्न ठरवून न झाल्यामुळे हा अतृप्त आत्म्याच्या रूपात या पिंपळावरती वास करत आहे.  यानेच तुमच्या घराला पूत्र दोषाची बाधा आणली आहे. मी त्याच्या आत्म्याशी बोललो. तो अगोदर तयार नव्हता. मी त्याला खूप धमकावलं आणि दाटलं. त्याच्या मुक्तीची दार पूर्णपणे बंद करायच्या धमक्या दिल्या. तेव्हा कुठे  त्याने माझं बोलणं ऐकलं. शेवटी आत्मा असला तरी तो माणसाचाच आहे. तो म्हणाला माझी अंतिम इच्छा अपूर्ण राहिलेली आहे."

नागनाथ ने दीर्घ श्वास घेतला इकडे तिकडे पाहिलं आणि विचारलं ," हे बघा त्या मुंजाने मला जे काही सांगितलं. ते मी तुम्हाला सांगतो. यात माझा काहीही संबंध नाही. जर तुम्हाला ते ऐकायचं असेल तर ते ऐकल्यानंतर तुम्हाला ती गोष्ट पार पाडावीच लागेल. अन्यथा न ऐकलेली बरी त्यासाठी तुम्ही आधीच विचार करा तरच मी पुढे बोलतो."

अचानक नागनाथ असं बोलणं ऐकल्यानंतर सगळेजण एकमेकांकडे बघतच राहिले. कारणं नागनाथ काय म्हणाला हे नुसतं ऐकायचं नव्हतं. ते ऐकण म्हणजे एक प्रकारची आज्ञा होती. नसेल तर गोष्ट इथेच सोडण आवश्यक होती. गोष्ट तिथेच सोडून म्हणजे पुत्रप्राप्तीची आशा सोडून देणं होते. नाही नाही असं करून कसं चालेल आणि अशी कोणती गोष्ट असेल जी धनपाल राज करू शकणार नाही.

धनपालराजने विक्रमकडे आणि चिंधीकडे पाहिलं. दोघांनी गोष्ट ऐकण्यासाठी  संमतीदर्शक मान हलवली. नागनाथ बोलू लागला,

" हा ब्राह्मण मुलगा अतिशय कामपीपासू होता. त्याच्या मनात रात्रंदिवस मुलींचेच विचार घोळत असत. लग्न करण्यासाठी तो अतिशय आसुसलेला होता. दुर्दैवाने त्याचे लग्न होण्याच्या आधीच तो  मरण पावला. त्यानंतर त्याने या पिंपळाला पछाडले. आता तो म्हणतो जर मला सात मुलींचा मुलींच्या योनीतील रक्ताने अभिषेक घातला तरच मी या घरात पुत्र जन्म होऊ देईल.  त्या मुंजाला आतापर्यंत योनीतील रक्त न मिळाल्यामुळे त्याने चिंधीच्या  योनीला देखील कोरडे करून ठेवले आहे. या सगळ्या वरती एकच उपाय आहे की त्याला दर अमावस्येला सात मुलींच्या योनीतील रक्ताने अभिषेक घालणं. आणि मुख्य अट म्हणजे या मुली लग्न न झालेल्या असाव्या. आणि पहिल्या मुलीची पाळी आलेली असावी."

नागनाथ बोलणं संपलं सगळेजण जागीच थिजून गेले. नागनाथ जणू काही जागा झाल्यासारखा इकडे तिकडे बघायला लागला." नागनाथ त्याने सात मुलींचं  रक्त मागितलेल आहे. काय करायचं ?"धनपालने विचारलं. नागनाथ भडकला,

" काय करायचं म्हणजे ? मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की बोलण  ऐकणं म्हणजे त्याची आज्ञा ऐकणं आहे. हे तुम्ही ऐकण्याच्या आधी ठरवायला हवं होतं."

" अरे पण तो असं काही सांगेल अशी आम्ही कल्पना देखील केली नव्हती."

" तुमच्या कल्पनेनुसार वागायला तो काही तुमचा बांधील नाही. उलट तुम्ही आणि तुमचं संपूर्ण वाडा त्याच्या ताब्यात आहे. हे विसरू नका. आज त्याने तुमची पुत्र संततीसाठी अडचण निर्माण करून ठेवली आहे. उद्या तुम्हाला पूर्णपणे नेस्तनाबूत करायला देखील तो मागेपुढे पाहणार नाही. माझं काम होतं तुम्हाला सावध करणे. मी ते केलं. शेवटी काय करायचं किंवा नाही ते तुम्ही ठरवायचं. पण लक्षात ठेवा. ज्या ज्या लोकांनी ही मुंजाची आज्ञा ऐकलेली आहे. त्यांना तिचं पालन कोणत्याही परिस्थितीत करावंच लागेल." विक्रम कडे बघत नागनाथ म्हणाला," अन्यथा त्यांचा आहे तोही गर्भ नाहीसा होईल."

बराच वेळ ती घरी तसेच बसून होते चिंधीला तिचं बाळ होतं. विक्रमला त्याच्या बाळाची काळजी होती. म्हणून ते दोघं धनपालला म्हणाले," मालक आपण अभिषेक घालूया"

चार दिवसांवर अमावस्या होती.

( क्रमशः)
0

🎭 Series Post

View all