Login

रक्त रंजीत 365 रात्री ( भाग 82 )

एक भयावह मालिका

दाभोळकरांनी ती बातमी ऐकली आणि त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. कसले निर्ढावलेले लोकं होते हे. नंतर त्यांच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. माणुसकीला काळीमा फासणारे हे लोकं राजरोस पणे फिरताहेत आणि आपण नुसते हातावर हात ठेवून बघत बसलो आहोत. नाही, आता काहीतरी ठोस पावलं उचलावीच लागतील. त्या शिवाय पर्याय नाही. आज अकरा खून या लोकांनी पचवलेत. याला जबाबदार कोण ? फक्त मी एकटा ? नाही, तर निमझरी मधले सगळे लोक जे अन्याय बघत गप्प बसले आहेत. थोडही सहकार्य करायला पूढे येत नाहीत. आता समोपचाराच आणि गोड बोलण्याच धोरण सोडून द्यावं लागणार.

मग त्यांना जणवल की आपण जेव्हढे आक्रमक होवू तेव्हढे ते लोक सावध होतील आणि त्यांचं गुन्ह्यांच क्षेत्रफळ वाढेल. जितके ते लांब जावून गुन्हा करतील तितकं त्यांना शोधण आपल्याला अवघड होवून बसेल. या पेक्षा आपण सावध राहून त्यांना थोड शिथील होवू द्यायचं आणि अचानक धाड टाकायची.

आता महिना भर आराम होता, असा विचार त्यांच्या मनात आला आणि त्यांना स्वतःच्या विचारांची खंत वाटली. एक महिना खून होणार नाही म्हणून आराम ? ज्यांची मुलगी गेलीं त्यांच्या आयुष्याचं काय? आणि हे सत्र थांबणार तरी कधी ? या गावात येवून आपल्याला आता चार महिने होतं आले. पण अजून आपण चाचपडत आहोत आणि आपल्या अस्तित्वाची दखल न घेता दर महिन्याला खून होतोच आहे. ते खूप अस्वस्थ झाले.

नेमकं त्याचं दिवशी त्यांना मुंबईहून गृहराज्यमंत्र्यांचा गुन्ह्याचा आढावा घेण्यासाठी ट्रंक कॉल आला. त्यांना तातडीने मुंबईला बोलावण्यात आले. आपल्या सहकाऱ्यांना योग्य त्या खबरदारीच्या सूचना देवून ते ताबडतोब मुंबईला आले. त्या बैठकीत त्यांनी आपण केलेला तपास कसा योग्य दिशेने सुरू आहे याची खात्री पटवली. अगदी लवकरच हे गुन्हेगार हाती लागतील असे मंत्र्यांना आश्वासन दिले.

त्या नंतर पत्रकार परिषद झाली. पत्रकारांनी त्यांना अडचणीत येतील असे अनेक प्रश्न विचारले. दुसऱ्या दिवशी सगळया महाराष्ट्रातल्या सर्व प्रमूख वर्तमान पत्रात निमझरीच्या खून सत्राची माहिती ठळक छापून आली. सगळी कडे लोकक्षोभ उसळला. मोर्चे,आंदोलन, सभा याला नुसता ऊत आला. त्यात अनेक अफवा पसरत असतं. विरोधी पक्षनेत्यांनी मुख्यमत्र्यांविरोधात राजीनाम्याची मागणी केली. कोणी सीआयडी खाते विकले गेल्याचेही आरोप केले.

या सगळ्या वातावरणामध्ये मन शांत ठेवून गुन्हेगाराला थोडा देखील संशयाचा फायदा न देता पुराव्यासकट जितक्या लवकर होईल तितक्या पकडण्याचं मुख्यमंत्र्यांनी दाभोळकरांना आदेश दिले.

चार महिन्यात आपल्या हाती एकही पुरावा लागू नये याची दाभोळकरांना खूप दुःख झाले होते आता मात्र त्यांनी कसेही करून गुन्हेगाराला पकडण्याचा निश्चय केला आणि मुख्यमंत्र्यांना आश्वासन देत देऊन ते आपल्या डिपार्टमेंटला सहज भेट द्यायला गेले थोडीशी चर्चा देखील झाली असती आणि वरिष्ठान करून थोडेफार मार्गदर्शनी मिळालं असतं आणि तेथे गेल्यावर खरोखरच त्यांनी या विषयाबद्दल सर्वांशी सांगोपांग चर्चा केली त्यांच्या वरिष्ठ सहकाऱ्यांनी त्यांना अनेक मौलिक सूचना दिल्या संध्याकाळी दाभोळकरांना ताबडतोब निमझरीला परत द्यायचे होते.

जाता जाता त्यांना अचानक आठवलं त्यांचा एक अगदी जवळचा लाडका सहकारी वसंत वाटेगावकर, त्याच्या लग्नाला तेंव्हा त्यांना जाता आलं नव्हतं. त्याला निदान आता तरी भेटून जाऊ .त्यांना वाटलं म्हणून, त्यांनी ऑफिसच्या लँडलाईन वरून त्याला फोन केला. त्यांचा आवाज ऐकल्यावर वर तो अतिशय आनंद झाला आणि म्हणाला,

" सर आजच दुपारचं जेवण आपण जर माझ्या घरी घेतलं, तर मला खूप आनंद होईल." तो इतका अजीजीने आग्रह करत होता की त्याच मनमोडाव असं त्यांना अजिबात वाटेना. ते दुपारी त्याच्यासोबत त्याच्या घरी गेले. त्याचे बायको नवऱ्याचे साहेब येणार म्हणून गोडधोड स्वयंपाक करत बसली होती . अर्थात ती त्यांना ओळखत नव्हती. पण आपल्या नवऱ्याचा एक चांगला ऑफिसर आपल्या घरी जेवायला येत आहे याचा तिला आनंद वाटत होता. जेवणाचा तिने अगदी चटण्या कोशिंबिरी पासून एकदम थाट केलेला होता. त्या दोघांना वाढून देऊन ती आत जावून बसली.

" सर, आजच परत जाणार का? झालं का काम? "वसंताने विचारलं.

" अरे कसलं होणारं. एकवेळ मुंबई परवडली पण खेड्यातले लोकं अजीबात सहकार्य करत नाहीत. त्यामुळे इतके दिवस तिथे राहून देखील माझं थोडं देखील काम झालं नाही. खरं म्हणजे या लोकांना वाऱ्यावर सोडून द्यायला पाहिजे. जेंव्हा या माणसांच्या घरात अशी घटना घडेल ना. तेंव्हा त्यांचे डोळे उघडतील." ते दोघं जे काही बोलत होते त्या गोष्टी तिच्या कानावर पडत होत्या. अचानक तिला वाटलं की हे लोक निमझरी मध्ये होणाऱ्या मुलींच्या हत्ये बद्दल बोलताहेत आणि ती तीरासारखी धावून बाहेर आली आणि म्हणाली,

" साहेब जर माझ्या नवऱ्याची हरकत नसेल तर मी एक खूप महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगते"

" कशाबद्दल बोलताय वहिनी तुम्ही ? " दाभोळकरांनी हसत विचारलं."

" ज्या बद्दल तुम्ही दोघं बोलतात त्याच बद्दल मी बोलते आहे. मी एकच महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगते. कदाचित ती तुम्हाला उपयोगाची ठरेल. फक्त त्यासाठी मला माझ्या नवऱ्याची संमती हवी कारण इतके दिवस मी ही गोष्ट त्याला सांगितले नव्हती"

तिचं बोलणं ऐकल्यावर वसंताने तिला बिंधास्त सांग म्हणून संमती दर्शक मान हलवली.

एकच वाक्य म्हणाली साहेब राघव माझा मावस भाऊ आहे आणि सलमानचा मृत्यू झाला होता तेव्हा राघव पेरगाव मेदिनी पुरलाच होता इतकेच नव्हे तर काही दिवसापूर्वी त्याचे आणि मुसाचे कडाक्याचे भांडण झाले होते आणि अजून गैरसमज होण्याच्या आधी मी ही गोष्ट आधीच सांगून टाकते की मुसा माझ्यामागे लाळ घोटत  फिरत असे. म्हणून राघवला त्याचा खूप राग आला होता आणि मला नक्की खात्री आहे त्याने मुसाचा बदला सलमाचा जीव घेऊन घेतला आहे."

केतकीच्या बोलण्याने दाभोळकर साहेबांचा हातातला घास हातातच राहिला. एकएकी नऊ पुन्हा पैकी एका खुनाची उकल केतकीच्या बोलण्यामुळे झाली होती. अगदी ध्यानीमनी नसताना . अचानक ही गोष्ट घडली होती. त्यांच्या निष्कर्षानुसार राघव हा खुनात सामील होता. आता नुसत्या तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा पुरावा जमा करणे खूप गरजेचं होतं.

"वहिनी तुम्ही खरं सांगताहात ? आणि जर गरज लागली तर तुम्ही ही गोष्ट कोर्टात सांगायला तयार व्हाल का ? "

"नाही सर कदाचित त्यामुळे माझ्या संसाराला तडा जाऊ शकतो. कारण कोर्टात वकील लोक माझा आणि उसाचा संबंध जोडायला कमी करणार नाही. परिणामी माझा आणि मुसाचा दोघांचा संसार उध्वस्त होऊ शकतो. म्हणून मी हा प्रश्न सर हे सर्वस्वी माझ्या नवऱ्याच्या संमतीवर सोडणार आहे. "

" केतकी इतके दिवस तुम्हाला ही गोष्ट का सांगितले नाहीस. तुझा माझ्यावर विश्वास नाही का ? हे बघ तुझा भूतकाळ काही असो, त्याच्याशी मला काही कर्तव्य नाही. परंतु सध्या मात्र तू जशी आहेस तशी मला प्रिय आहेस. जर तुला साक्ष द्यायची वेळ आली तर तो अगदी बिना संकोच साक्ष द्यायला जा आणि या खून्याला पकडण्यात मदत कर."

केतकीला आपल्या नवऱ्याचा खूप अभिमान वाटला त्याच्याविषयी अचानक खूप प्रेम दाटून आलं आणि इकडे दाभोळकरांना तर स्वर्ग दोन बोट राहिला त्यांनी खूप आनंदात जेवण केलं आणि केतकी त्यांच्या पाया पडली. त्यांनी तिच्या हातात पैसे घातले. वसंताला ते म्हणाले ,

" वसंता तुझ्या बायकोमुळे या केसच्या दिशेने माझं पहिलं पाऊल पडतंय जरी या केसची उकल झाली तर, मी तुला प्रमोशन देण्याची शिफारस करेल"

असं बोलून ते निमझरीच्या दिशेने जायला निघाले. आता डोक्यात फक्त त्यांना राघवला गेल्याबरोबर कस्टडीत घेणं हीच गोष्ट होती. आपसूक त्यांच्या ओठातून शीळ बाहेर पडत होती.

तिकडं धनपालच्या वाड्यावर सगळे पहारे नष्ट झालेले असल्याने आणि मुंबईचा साहेब मुंबईला गेलेला असल्यामुळे सगळेजण आनंदात दारू पीत बसले होते राघवला माहित नव्हतं की एक वादळ त्याच्या दिशेने तुफान वेगाने येत आहे. धनपाल आपल्या सोबत असल्यावर कोणीच आपल्याला काही करू शकत नाही या धुंदीमध्ये तो होता.

( क्रमशः)
0

🎭 Series Post

View all