Login

रक्त रंजीत 365 रात्री ( भाग 83 )

एक भयावह मालिका

रात्री तीनच्या सुमारास दाभोळकरांची गाडी निमझरीला पोहोचली. त्यांनी ड्रायव्हरला गाडी डाकबांगल्यावर न घेवून जाता धनपालच्या वाड्यावर न्यायला सांगीतली. सगळी निमझरी गाढ झोपेत होती. रस्ते सामसूम होते. कर्कश्य आवाज करत त्यांची गाडी गावात शिरली आणि धनपालराजच्या वाड्यासमोर येवून थांबली. आपला पहीला संशयीत आरोपी ताब्यात घेण्यासाठी ते ईतके अधीर झालेले होते की केंव्हा एकदा वाड्याचे दार उघडते आणि राघवला ताब्यात घेतो असं त्यांना झालेलं होतं.

खाली उतरताच त्यांनी इकडे तिकडे पाहिल. सगळीकडे निरव शांतता पसरलेली होती. तो सळसळणारा पिंपळ तेवढा हलत होता. आज कुणास ठाऊक त्याची पाने जास्तच सळसळत होती. असं त्यांना वाटलं. धनपालचा वाडा, त्या वाड्याचा दरवाजा, त्याच्या त्या वाड्याच्या पायऱ्या, पायऱ्यां भोवती काढलेली रांगोळी, हे सगळं आठवताच त्यांच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. तो मजबूत दरवाजा आतून बंद होता. राघव कुठे होता हे त्यांना माहीत नव्हत. नेमका कोणत्या वाड्याचा दरवाजा ठोकावा, हे त्यांना समजेना.

बर रात्री ईश्वरीच्या वाड्याचा दरवाजा ठोकावा तर तिथे कोणी बाई माणूस नव्हता. वाड्यातल्या दोघी बायका घाबरून गेल्या असत्या. सकाळी यावं आणि समजा चाहूल लागून रात्रीतून तो निघून गेला, तर काय करायचे ? राघवच्या बाबतीत दाभोळकर कोणतीही रीस्क घ्यायला तयार नव्हते. त्याला कोणतीही संधी द्यायला तयार नव्हते. त्यांना धीर धरवत नव्हता. शेवटी त्यांनी निर्णय घेतला. अगोदर हलक्या आवाजात ईश्वरीचा दरवाजा ठोकावा. राघवते आत असला तर ठीकच. त्याला तिथंच पकडावा.

नाहीतर काय होईल की धनपालच्या वाडा आपण उघडायला भाग पाडलं आणि जर राघव वाड्यात असला. तर धनपाल त्याला एवढ्या मोठ्या अजस्त्र वाड्यात लपवून ठेवण्याची देखील शक्यता टाळता येत नव्हती. काय करावे त्यांना सूचेना.

राघवला आजच्या आज ताब्यात घ्यावं असं त्यांना वाटत होतं. शेवटी धनपालचा वाडा ओलांडून ते ईश्वरीच्या वाड्या समोर आले. ईश्वरीचा वाडा आतून बंद होता. अगदी हलक्या आवाजात त्यांनी दरवाजाची कडी वाजवली. आत मध्ये त्यांचा आवाज पोहोचत होता की नाही कुणास ठाऊक ? शेवटी थोड्या जोरात त्यांनी दरवाजा ठोठावला आणि आतून कोणीतरी उठल्याचा आवाज झाला. नक्कीच त्या ईश्वरी वहिनी नव्हत्या. कारण पुरुषी आवाजामध्ये कोणीतरी आतून ओरडलं, " कोण आहे ? " त्याबरोबर ते हलक्या आवाजात ते म्हणाले, " मी आहे " बोलणारा राघव होता. हे त्यांनी लगेच ओळखलं आणि पुन्हा थोडा जोरात दरवाजा ठेठावला.

"छोटे दार उघडा ना, प्लीज. मला जरा धनपाल शेठ चा अर्जंट निरोप द्यायचा आहे ." ते दबक्या आवाजात म्हणाले. दाभोळकरांनी धनपाल राजच नाव घेतल्यावर आतून राघवने हळूच दरवाजा उघडला. तो अंगावर बनियन आणि पायजमा घालून दरवाज्यात उभा होता. त्याला बघताच दाभोळकरांनी आपलं सावज दिसताच चित्ता जसा आपल्या शिकारीवर तुटून पडतो, तशी राघवच्या अंगावर झेप घेतली. क्षणभर राघवला काय झाले तेच कळले नाही. तोही काही लेचापेचा नव्हता. परंतु अचानक झालेल्या हल्ल्यामुळे तो जमिनीवर उताणा पडला. त्याबरोबर दाभोळकरांनी त्याच्या छातीवर बसून आपल्या वज्रा सारख्या मूठीने त्याच्या तोंडावर पोटामध्ये फटाफट वार केले. त्याच्या मानगूटीला धरून त्यांनी त्याला वाड्याबाहेर खेचत आणले आणि आपल्या पोलिसी ताकदीची त्याला झलक दाखवली. त्याचे मनगट घट्ट पकडून त्यांनी त्याला आपल्या गाडीत बसवले. पुन्हा त्याच्या कानाखाली इतक्या जोरात तडाखा मारला की त्याच्या डोळ्यासमोर काजवे चमकले. आपल्याला हे कोण मारत आहे हे देखील त्याला कळत नव्हतं .

त्याचे हातपाय घट्ट बांधून त्यांनी त्याला आपल्या गाडीतल्या एका सहकाऱ्याच्या ताब्यात दिलं आणि सुसाट वेगाने गाडी डाक बंगल्यावर आणली. त्या ठिकाणी त्यांनी त्याला कुत्र्यासारखा खेचत आपल्या रूममध्ये आणलं. आणि आपल्या सहकाऱ्यांना आपल्याला हवा असलेला खूनी माणूस हाच आहे असे सांगितले. त्याने केलेल्या नीच कर्माची आठवण करून देत त्याला मुक्त तूडवण्याची त्यांना परवानगी दिली.

भर मध्यरात्री निमझरीला कशाचीही जाणीव होवू न देता त्यांचे सहकारी त्याने केलेल्या खुनांची आठवण करून करून त्याला मनसोक्त लाथा बुक्क्यांनी तुडवत होते. त्याच्या तोंडातून रक्त गळत हात जोडून तो त्यांना म्हणत होता,

" साहेब, माफ करा. मी काहीही केलेले नाही." तो नुसता असं बोलला की दाभोळकर आपल्या जवळच्या  वेताच्या काडीने त्याला फोडून काढत होते.

रात्री आपला नवरा कुठे गेला. याची राघवच्या बायकोला काहीच जाणीव नव्हती. आपला नवरा असा रात्री, अपरात्री बाहेर जात असतो. कधी कधी तर पूर्ण रात्र बाहेर असतो. त्यामुळे ती त्याच्या जाण्या येण्याची जास्त दखल घेत नसे.

जेव्हा निमझरी शांतपणे झोपली होती त्यावेळी डाक बंगल्यावर राघव हाड तुटेपर्यंत मार खात होता. इतके दिवस दुसऱ्याला मारणं, इजा करणं अशा गोष्टी करताना, त्या जीवाला किती वेदना होत असतील याबद्दल त्याला अजिबात जाणीव नव्हती. आज मात्र त्याला वेदनांचा परिचय होतं होता. ओठ फाटलेले होते. नाकातून तोंडातून रक्त गळत होते. पॉलिसी खाक्या काय असतो हे त्याला माहित पडलं. आणि जेव्हा आपण मुंबई सीआयडीच्या ताब्यात आहोत त्याला कळलं, तेव्हा आपला शेवट जवळ आला आहे, आपला खेळ संपला आहे. याची त्याला जाणीव झाली.  त्याने स्वतःला दाभोळकरांच्या पायावर लोटून दिलं. आणि म्हणाला,

" साहेब मला माफ करा. मी या सर्व गोष्टी धनपाल राजच्या सांगण्यावरून करत होतो." तो असं बोलल्यावर वर पुन्हा दाभोळकरांचा मजबूत पंजा त्याच्या तोंडावर येऊन आदळला. त्याच्या डोक्याला झालेल्या जखमेतील रक्त त्याच्या डोळ्यात मिसळत होतो, पण दाभोळकरांना मात्र त्याची अजिबात दया येत नव्हती. हा एक क्रूर कर्म होता. माणसाच्या जातीला लागलेला एक कलंक होता. हे ते जाणून होते म्हणून सकाळ व्हायच्या आत त्याच्यावरती जेवढा हात साफ करून घेता येईल तेवढा ते करून घेत होते. त्याने केलेली नीच कर्म आठवण करून करून ते त्याला  कठोरपणे मारहाण करत होते. निमझरीतल्या या पाशवी जनावरातील एक जनावर आज पहिल्यांदा सीआयडीला मिळाले होते. आता यामध्ये कोण कोण सामील होते या गोष्टीच्या मुळापर्यंत जाण्यासाठी दाभोळकर आसुसलेले होते आणि बघता बघता पहाट झाली.

( क्रमशः)
0

🎭 Series Post

View all