वेळ: रात्रीचे साडे दहा
स्थळ: निमझरी गावातील पोलिस स्टेशन वरील पोलीस कोठडी
स्थळ: निमझरी गावातील पोलिस स्टेशन वरील पोलीस कोठडी
निमझरी गावात पूर्ण स्मशान शांतता पसरलेली होती. ग्रामपचायतींने लावलेल्या रस्त्यावरच्या खांबांवरच्या दिव्यांचा प्रकाश एक मर्यादे पर्यंत पडून पुन्हा काळोखाची हद्द सुरु होत असे. ईतर गावातला काळोख आणि निमझरी गावातला काळोख यात जमीन अस्मानाचा फरक होता. निमझरीतल्या काळोखात माणूसकी शून्य मृत्यु नग्न पावलांनी थैमान घालत असे. दिसेल त्याचा घास गिळत असे. कितीतरी निष्पाप जीवांच्या किंकाळ्या या अंधाराने ऐकून गिळून टाकलेल्या होत्या. पण निमझरी गावं मात्र त्या मृत्यूने व्यथित होण्या ऐवजी डोळे मिटून घरात गप्प बसून रहात होतं. पण त्यांना हे माहीत नव्हतं की गप्प बसण्याने अन्याय कधीचं दूर होतं नाही किंवा अन्याय करणाऱ्याला दया येत नाही. उलट तो अजून निर्दय होत जातो. निमझरी अजून गाढ झोपलेलीच होती. पण मारेकरी जागे होते आणि मारेकऱ्यांना आयुष्याची अद्दल घडवण्यासाठी त्यांच्यापेक्षा बहाद्दर सीआयडी जवान जागे होते. त्यांचे हे उपकार निमझरी आपल्या उभ्या आयुष्यात परत फेडू शकेल की नाही याबद्दल शंकाच होती. आताच बघा ना
राघव ग्लानी मधे कोठडीत जमीनीवर पडलेला होता. त्याच्याच बाजूच्या चार कोठड्या सोडून एका कोठडीत सुंदरी बंद होती. दाभोळकर आपल्या ठरवलेल्या मोहिमेवर निघून गेले. इकडे जाधव साहेब त्यांची लेडी असिस्टंट कॉन्स्टेबल सुरेखा, हेच दोघं पोलीस चौकीवर ड्युटीला होते.
सुरेखा बद्दल निमझरीला माहीत नव्हतं, परंतु तिच्या सहकाऱ्या मध्ये मार्शल आर्ट शिकलेली आणि कोणत्याही प्रसंगी जीवाची परवा न करता स्वतःला झोकून देणारी, वेळ प्रसंगी कर्तव्यासाठी अत्यंत कठोर होणारी अशी ती लेडी कॉन्स्टेबल होती. तिच्या ताब्यात असतांना, मी मी म्हणणाऱ्या गुन्हेगारांना देखील घाम फुटत असे. वेळप्रसंगी तिने कितीतरी जमावाला धाडसाने तोंड दिलेलं होतं आणि काबूत आणलं होतं. तिच्या कार्यक्षमतेबद्दल कोणालाच शंका नसायची.
आतापर्यंत राघव आणि शिंदे यांचे नशीब चांगलं या साठी होतं की त्यांना पकडल्यावर जाधव साहेब आणि सुरेखा यांच्या ताब्यात दिलं गेलं नव्हतं. पण आज मात्र दोघांचे नशीब फिरलेलं होतं. त्या दोघांनाही हे माहीत नव्हतं आजपर्यंत त्यांनी जेवढा मार खाल्ला होता तो या दोघांच्या हातून आजच्या रात्री मध्ये खाल्लेल्या मारा पुढे काहीच नव्हता. त्या दोघांच्या पापाचे घडे जणू आज पूर्ण भरले होते.
जाधव साहेब आपल्या टेबलवर जाऊन बसले. थोड्याच वेळात सुरेखा ड्युटी वर आली. जाधव साहेबांनी सुरेखाला म्हटलं,
" सुरेखा आज तुझी आणि माझी कसोटी आहे. आपल्या ताब्यात जे दोन अट्टल गुन्हेगार आहेत, त्यांना अशी काही थर्ड डिग्री ट्रीटमेंट द्यायची आहे की त्यांनी त्यांचा गुन्हा कबूल करायलाच हवा."
" सर तुम्ही त्याची काळजी करू नका. अजून माझ्यापुढे टिकाव धरेल असा गुन्हेगार जन्माला यायचा आहे."सुरेखा आत्मविश्वासपूर्वक म्हणाली. जाधवांना हा तिचा आत्मविश्वास खूप आवडायचा. हे हसत म्हणाले,
" आपण आपसातच पैज लावूया. कोण पहिल्यांदा आपल्या गुन्हेगाराला गुन्हा कबूल करायला लावतो ते. जर तूझ्या गुन्हेगाराने पहिल्यांदा गुन्हा कबूल केला तर मी तुला चहा पाजेल आणि जर माझ्या गुन्हेगाराने पहिल्यांदा गुन्हा केला तर मात्र तू स्वतः माझ्यासाठी उद्या जेवणाचा डबा घेऊन यायचा" जाधव साहेब हसत म्हणाले त्याबरोबर सुरेखा देखील हसतच आपल्या हातात रूळ खेळवत निघाली.
ती तिच्या टेबलवर गेली . तिने सुंदरीची फाईल वाचायला घेतली. जसं जसं ती वाचत होती. तसं तसे तिच्या डोळ्यात अंगार फुलू लागले. आपल्या अगदी हाताच्या अंतरावर माणसाच्या रूपात एक जनावर बसलेलं आहे याची तिला जाणीव झाली. तिचे हात सळसळू लागले. कोणत्याही गुन्हेगाराला भेटताना तिला कधी हत्यारांची गरज पडत नसे. ईतका तिचा स्वतःवर विश्वास होता. त्या मुळे दोन्ही हात चोळत तिने सुंदरीच्या कोठडी कडे गेली.
कोठडीला भलं मोठं कुलूप लावलेलं होत. कोठडीत एक फिकट पिवळ्या रंगाचा बल्ब जळत होता. कोपऱ्यात एक पाण्याचा माठ भरलेला होता. कोपऱ्यात सुंदरी जमीनीवर पडलेली होती. एक कुबट वास तिथं पसरलेला होता. सुरेखाने कुलूप उघडल आणि दरवाजा लोटला. करकर आवाज करत दरवाजा उघडला गेला.
सुंदरीला ती आल्याचं कळलं होतं. पणं तिने तिची दखलच घेतली नाही. ती तशीच पडून राहीली. सुरेखाने बुटानेच तिला लाथ मारून जागं करण्याचा प्रयत्न केला. पण सुंदरी तशीच पडून राहीली. सुरेखा गुढग्यावर खाली बसली आणि तिला मानगुटीला पकडून उठवण्याचा प्रयत्न करू लागली. एक क्षणभर दोघींचं तोंड एकमेकिंसमोर आल. त्या बरोबर सुंदरी सुरेखाच्या तोंडावर पचकन थुंकली.
एका क्षणात सुरेखाने आपल्या ब्लॅकबेल्टचे सगळ शिक्षण आठवून त्या सगळ्या डावपेचांचा सुंदरीवर असा काही वर्षाव केला की सुंदरीला सगळ ब्रम्हांड आठवलं. सगळया अंगातून वेदनांचा कल्लोळ उसळला. आपल्याला दिसेनासे झाले आहे. आणि शरीराचा भाग न भाग कापला गेला आहे अशा वेदना तिला होतं होत्या. सुरेखा थांबण्याच नावं घेत नव्हती. एक तडाखा तिच्या तोंडावर असा बसला की तोंडातून दोन दात निखळून बाहेर पडले आणि रक्ताची गुळणी बाहेर पडली. आपल्या जबड्याची दोन चार हाड तुटल्यासारखी सुंदरीला वाटली.
शेवटी सुंदरीची सहनशीलता संपली. अडखळत्या आवाजात ती हात जोडून,
" मॅडम मला माफ करा हो, खरचं मी काहीही केलेलं नाही. मी निर्दोष आहे." असं म्हणायला लागली. ईतका मार खाल्ला तरी ती खोटं बोलते आहे असं पाहून सुरेखाने एक असा डाव टाकला की सुंदरीने एक मर्मभेदी किंकाळी फोडली आणि ती पोटावर हात ठेवून खाली बसली.
" अजूनही तू खरं सांगत नाही आहेस. बोल तूच त्या मुलीवर हल्ला केला होता ना? मग तूझी वाघनख तिच्या हातात कशी मिळाली? मुकाट्याने खर सांग. नाही तर आज तू माझ्या हातून जिवंत राहणार नाही. तुला माहिती नाही. बाजूच्या कोठडीत राघवला पकडलेल आहे आणि त्याने सगळ्या गोष्टी जाधव साहेबांना सांगितलेल्या आहेत."
पोलिसांच्या अशा प्रकारे फसवण्याच्या गोष्टी सुंदरीला अगोदरच माहिती होत्या. त्या मुळे कितीही मार खाल्ला तरी गुन्हा कबूल न करणं योग्य होतं. आता पोलीस निव्वळ संशया वरुन अटक करुन तिला मारहाण करत होते. म्हणून ती काहीही न बोलता गप्प राहीली. पण सुरेखा तिला असं गप्प थोडीच बसू देणार होती. तिने सुंदरीला जमीनीवर पालथं पाडलं आणि तिचे दोन्ही हात मागच्या बाजूने वाकवले. आता मात्र आपण जगत नाही याची खात्री सुंदरीला झाली.
" सांगते मॅडम सांगते, मला पाणी द्या अगोदर प्यायला"
आणि सुरेखाची तिच्याकडे पाठ वळताच सुंदरी अंधारात तिरा सारखी नाहीशी झाली. हे सगळं एव्हढ्या वेगात घडलं की क्षणभर सुरेखाला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसला नाही. क्षणात तिने स्वतःला सावरलं आणि तिही सुंदरीच्या मागे धावत सुटली.
दोघी वाऱ्याच्या वेगाने धावत होत्या. बघता बघता सुंदरी अंधारात विरघळून गेली. अत्यंत हताश होऊन सुरेखा चौकीवर परत आली.
( क्रमशः)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा