Login

रक्त रंजीत 365 रात्री ( भाग 88 )

एक भयावह मालिका

सुरेखाच्या पुर्ण विरुध्द जाधव साहेबांचे विचार होते. गुन्हेगारांना स्पर्श करणं त्यांना किळसवाण वाटे. ते त्यांना सरळ करण्यासाठी सरळ हत्यारांचा वापर करीत. त्यात त्यांना किंचितही वावग वाटतं नसे की दयामाया येत नसे. त्यांना सूरेखाच्या कोठडीतून किंकाळ्या ऐकू येत होत्या. त्यांना तिच्या कर्तुत्वावर खूप विश्वास होता. या वेळी तिनेच जिंकावे म्हणून ते त्यांच्या खोलीत चुपचाप बसून त्या आरोळ्या ऐकत होते. ही केस तिने ओपन करण्यात जर पुढाकार घेतला असता आणि जर का त्यात ती यशस्वी झाली असती तर तिच्या बढती साठी तिची शिफारस करायची या बद्दल त्यांनी निश्चित विचार केला होता.

राघव मात्र खाली मान घालून त्या किंकाळ्या ऐकत होता. त्याला माहिती होतं की जर सुंदरीने तोंड उघडलं तर त्याला जगातली कोणतीच ताकद वाचवू शकणार नव्हती. सुंदरीने तोंड उघडू नये म्हणून तो मनोमन देवाची प्रार्थना करत होता.

अचानक किंकाळ्या थांबल्या. सुंदरी लॉकअप मधून बाहेर पळाल्याचा, त्या पाठोपाठ कर्कश्य शिट्टी वाजल्याचा आणि त्या पाठोपाठ सुरेखा देखील सुंदरीच्या पाठीमागे पळाल्याचा बुटांचा आवाज झाला. पोलीस कस्टडीतून आरोपी पळून जाणं, गंभीर गोष्ट होती. पण त्यांना सुरेखावर पूर्ण विश्वास होता. शिवाय रात्रीच्या ड्यूटीवर आज ते दोघेच होते. जर ते तिच्या मदतीला गेले असते तर ईकडे राघव देखील हातातून निसटून जायची शक्यता होती. आणि चौकी बीना पोलीस ठेवण शक्यच नव्हतं. या गोंधळात राघवचा एकच फायदा झाला तो म्हणजे त्याचा आजचा मार उद्यावर ढकलला गेला.

सुरुवातीला कूठे जायचे हे सुंदरीने ठरवलेच नव्हते. फक्त वाट फुटेल तिकडे धावून या दुष्ट पोलीस बाईच्या हातून जीव वाचवायचा हाच तिचा हेतू होता. ती अंधारात तिरासारखी धावत होती. पळता पळता ती गावाबाहेर आली. सुरेखा बरीच लांब राहीलेली होती. थोडावेळ निवांतपणाने श्वास घ्यावा असं तिला वाटलं आणि ती चूपचाप कानोसा घेत उभी राहीली.तिच्याच श्वासांचा आवाज तिला येत होता. ती प्रचंड थकलेली होती. अंगही खूप दुखत होते. ती शांतपण कोणाच्या नजरेस न पडावी अशी झाडाच्या मागे उभी होती. मनातल्या मनात सुरेखाला शिव्या देत होती.

बराच वेळ शांततेत गेला. आपण आता पोलीसांना सापडणार नाही या बद्दल सुंदरीला खात्री वाटू लागली. ती पाठलाग करणारी कॉन्स्टेबल नक्कीच रस्ता चुकली असणार. मला पाणी पाजणारं होती का, मीच तिला चांगल पाणी पाजल. नाहीतरी ती हलकटच होती. आता आपण चिंधीच्या सोबतही राहायचं नाही.जिकडे वाट फुटेल तिकडे जायचं अस ती मनात ठरवत होती. तेव्हढ्यात अचानक दूरवरून कुत्री भूंकल्याचा आवाज ऐकू आला. थोड्याच वेळात ती जंगली कुत्र्यांच्या कळपाने वेढली गेली. ते अतीशय क्रूर कुत्रे होते.

काल ज्या धनगर मुलीला ती मारणार होती. ज्या मुलीच्या कुत्र्याने तिला वाचवल होतं. त्या कुत्र्याला सुंदारीचा बरोबर सुगावा लागला होता आणि तो दात विचकुन तिच्या अंगावर धावून जात होता. त्याच्या सोबत त्याचे सहकारी देखील होते. त्या कुत्र्यांच्या कळपाने जो भयानक गोंगाट चालवला होता आणि ज्या त्वेषाने ते तिच्या अंगावर धावून येत होते. तिचे जमेल तसे लचके तोडत होते. त्या मुळे ती पार गांगरून गेली. आता तर आपले वाचणे अवघड आहे ही गोष्ट तिला समजून चुकली. कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज एव्हढा मोठा होता की गावाच्या निरव शांततेत तो पार या टोकापासून त्या टोकापर्यंत ऐकू जात होता. अर्थात ज्या निमझरीने आपले कान,डोळे, तोंड काहीही झालं तरी उघडायचे नाही असच ठरवल होत तिच्या कानापर्यंत हा आवाज ऐकू जाणं कठीण होतं. 

हाच आवाज तिकडे सुरेखाने आणि त्याचं वेळी नागनाथच्या खोलीवर लक्ष ठेवून बसलेल्या दाभोळकर साहेबांनी ऐकला. काहीतरी गडबड असल्या खेरीज ही कुत्री सहजा सहजी भुंकणार नाहीत याची त्यांना खात्री होती.

नागनाथ त्याच्या खोलीत नव्हता. पण त्याने गाव सोडलेले नव्हते. म्हणून त्यांनी आपल्या इतर सहकाऱ्यांना तिथं लक्ष ठेवायला सांगितलं. चुकून नागनाथ आलाच तर त्याला सरळ उचलून आणायला सांगितले आणि आपण गाडी घेवून कुत्री भुंकत होती तिकडे आले.

त्यांची गाडी आणि सुरेखा तिथं पोचायला एकच वेळ झाली. कुत्र्यांना सिक्स्थ सेन्स असतो की काय माहीत नाही. पण ते आल्याबरोबर सगळी कुत्री शांत झाली. सुंदरीला हालायची देखील ताकद नव्हती. सुरेखाने तिला जो त्रास झाला त्याचा सगळा राग सुंदरीवर काढला.

दाभोळकरांनी तिला ताब्यात घेतलं आणि सुरेखा सह ते चौकीवर आले.

( क्रमशः)
0

🎭 Series Post

View all