Login

रक्त रंजीत 365 रात्री ( भाग 92 )

एक भयावह मालिका

" कसली आनंदाची बातमी सुरेखा ? " दाभोळकरांनी कुतूहलाने विचारलं.

" सर, अगोदर जाधव साहेबांना चहा बोलवायला सांगा" सुरेखा आनंदात म्हणाली.

" अग बाई, घड्याळात बघ किती वाजले आहेत ते. तुझा चहा कुठे जाणार नाही. प्रॉमिस म्हणजे प्रॉमिस. आता बातमी सांग अगोदर"

" साहेब त्या हडळीने अखेर गुन्हा कबूल केला. ती बाई, बाई नावाच्या जातीला कलंक आहे साहेब. तिने केलेले गुन्हे ऐकले तर मेंदू फुटून निघायचा. विचार करवत नाही साहेब, तिने विक्रमच्या बायकोचा आणि त्याच्या बाळाचा वाघनखं वापरून खून केला आहे. त्या पोरीला देखील ती तशीच मारणार होती. "

नुसत्या कल्पनेनेच दाभोळकर सुन्न झाले. कसली क्रूर बाई होती ही. पण लगेच त्यांच्यातला तपास अधिकारी जागा झाला. ते म्हणाले,

" बरं सुरेखा, तिने कबूल केलं. आपण खूष झालो. पण कायदा पुरावा मागतो ना. मग तिने विमलला मारलं तेंव्हा तिथं कोण होतं. विमलचं प्रेत कुठं आहे. ? आता पुरावा जमा करायचं आपल महत्वाचं काम आहे. तू आज तिच्या कडून स्टेटमेंट लिहून अंगठा घे. कारण ही बेरकी बाई पोलीसांनी मारहाण करून जबरदस्तीने गुन्हा कबूल करायला सांगितला असही कोर्टात बोलायला कमी करायची नाही. " दाभोळकर अनुभवाचे बोल सांगत होते. त्यांच्या हाताखाली काम करणे हीचं एक मोठी काम शिकण्याची संधी असायची.

जेंव्हा सूरेखाला समजलं की विमलला आणि बाळाला वाड्यातच पुरलेले आहे. त्या वेळी तिच्या पायाखालची जमीनच सरकली. म्हणजे या सगळया हत्याकांडाची पाळमूळ वाड्यातच दडलेली होती. आता मात्र दाभोळकरांनी जास्त वेळ न घालवता जे जे त्यांना संशयित वाटतं होते त्या सगळ्यांना ताबडतोब ताब्यात घ्यायचं ठरवलं.

अजून चार संशयीत बाहेर मोकळे होते. एक होता धनपाल, दूसरी होती चिंधी, तिसरा होता पक्या आणि चवथा होता नागनाथ. आता उद्याच्या उद्या या चारही जणांना ताब्यात घेऊन. पुरावे जमा करुन लवकरात लवकर केस दाखल करुन महाराष्ट्राला काळीमा फासणाऱ्या या प्रकरणावर पडदा टाकायचं त्यांनी ठरवलं.

त्या आधी त्यांच्या हातात जे तीन आरोपी होते. त्यांचा समाचार त्यांनी जरा व्यवस्थीत घ्यायचा ठरवला. सगळ्यांत आधी सुंदरीला घेऊन यायला सुरेखाला सांगितलं. दाभोळकर, जाधव साहेब आणि सुरेखा यांच्या समोरं सुंदरीला आणलं गेलं.

तिचे केस हातात घट्ट धरून सुरेखा तिला घेवून आली.
दाभोळकरांच्या टीम मधल्या एक दोन निष्णात माणसांना रात्रीचं बोलावण्यात आलं. आता जवळ जवळ मध्यरात्र उलटुन गेलेली होती.

सगळ्यांसमोर सुंदरीने आपल्या गुन्ह्यांची कबुली दिली. विमलला तिने बाथरूम मध्ये आपल्या जवळच्या वाघ नखांनी फाडून बाळा सकट ठार केले होते. विमलला वाड्यातच सिमेंटच्या कट्ट्याखली पुरले होते. या सगळया भानगडीत तिला भाग घ्यायची काहीचं गरज नव्हती. पण जन्मजात गुन्हेगारी प्रवृत्ती, धनपाल जवळ असलेली बेलगाम सत्ता, त्याचा मिळणारा पाठिंबा आणि पैसा या मूळे तिला आपले महत्व दाखवण्याची संधी सोडायची नव्हती. कदाचित त्या मुळे आपल्याला आपल्या बहिणी सारखे कायमचे वाड्यावर राहायला मिळेल असं तिला वाटलं होतं. कुठेतरी तिच्या मनामध्ये चिंधीच्या भाग्याचा हेवा वाटत होता. विमलला मारण्याची कल्पना पक्याची होती. तर तिला वाड्यावर आणण्याचे काम राघवने बिनबोभाट कोणालाही संशय न येता केले होते.

सुंदरीचा नीट जबाब लिहून घेतला गेला. या नंतर वाड्यावर जावून त्या कट्याला तोडावे लागणारं होते. तो वाडा धनपालची खाजगी मालमत्ता होती. त्या साठी धनपाल, आणि चिंधी यांना ताब्यात घेण गरजेचं होतं. आज कसंही करून सगळे आरोपी ताब्यात घ्यायचे होते. त्यांच्या संरक्षणासठी विशेष हत्यारी पोलीस दलाची आवश्यकता होती. त्यांनी रातोरात एक पत्र जिल्हाधिकाऱ्याला लिहून तशी तजवीज करायला सांगीतली.

दाभोळकर यांनी अगोदर नागनाथला ताब्यात घ्यायचं ठरवलं. ते त्याला घेवून येईपर्यंत जाधव साहेबांना राघवचा थोडा समाचार घ्यायला सांगितला.

ते स्मशानाला वळसा घालुन नागनाथच्या झोपडीकडे आले. त्यांच्या सोबत दोन मजबूत जवान पोलीस होते. आता आकाशात हळुहळू प्रकाश पसरू लागला होता. नागनाथ जागा झालेला होता. फार मोठा सिद्ध पुरुष असल्यासारखा तो एका व्याघ्र चर्मावर डोळे मिटून बसलेला होता. त्याच्या त्या बाह्य रूपाला पाहून कोणीही साधा भोळा माणूस सहज फसला असता.

दाभोळकरांनी त्याच्या झोपडीचा दरवाजा लाथ मारून तोडला. तो एकदम दचकला. त्याने डोळे उघडले. समोर पोलीस दिसताच त्याची बोबडी वळली. त्याला बघताच दाभोळकरांचा संताप अनावर झाला. हाच तो क्रूर माणूस होता. ज्याने धनपाल आणि चिंधीच्या डोक्यात नाही नाही त्या गोष्टी भरवून निष्पाप जीवांच्या क्रूर हत्या करवून घेतल्या होत्या. त्यांच्या कडून भरपुर पैसा उकळला होता. त्याच्या हातात दाभोळकरांनी बेड्या ठोकल्या. त्याला बघताच त्यांना वाटलं की क्षणभर कायदा आपल्या हातात घ्यावा आणि त्याची चामडी सोलून काढावी. तरी त्यांनी त्याला आपला मजबूत प्रसाद दिलाच.

त्यांच्या सोबत आलेल्या पोलीसांना त्यांनी त्याच्या झोपडीची झडती घ्यायला सांगीतली. आणि त्यांचे डोळे पांढरे झाले. जमिनीत पुरून ठेवलेल्या मडक्यात त्यांना भरपूर सोने नाणे, दागदागिने, पैसे सापडले. दारूच्या बाटल्या, हाड, कवट्या, काळ्या बाहुल्या अशा चित्रं विचित्र गोष्टीही सापडल्या. सगळ्यांचा पंचनामा करून त्याची वरात पोलीस स्टेशनवर आणली गेली. नागनाथची मग्रुरी एका क्षणात संपून गेली.

सकाळचे आठ वाजत आले होते आणि दाभोळकरांना सगळे आरोपी आजचं ताब्यात घ्यायची ईच्छा होती.

( क्रमशः)
0

🎭 Series Post

View all