दाभोळकर आपल्या सोबत एक लेडी कॉन्स्टेबल घेऊन स्पेशल गाडीने धनपालच्या वाड्यासमोर आले. सकाळची वेळ होती. आजकाल राघव, विक्रम आणि सुंदरी असे त्याचे जवळचे लोकं सीआयडीच्या ताब्यात असल्याने त्याला थोडी काळजी करत मोठं मोठी संकट त्याने पार केली होती, ईतकी त्याची वर पर्यंत ओळख होती. शिवाय पैशाने विकत घेता येणार नाही अशी व्यक्ती त्याला भेटली नव्हती. त्या मुळे जमलं तर पैशाने या साहेबाला विकत घेता आले तर तो बघणार होता. कारण या साहेबाला वाड्याचा संशय येणं चांगली गोष्ट नव्हती. त्याला लवकरात लवकर वाड्यावर जेवायला बोलवायला हवे होते. आणि त्याच्या ताब्यातल्या आपल्या तीन लोकांची सुटका करून घेणं देखील खूप आवश्यक होतं. आणि ही गोष्ट आजचं करायला हवी असा विचार, तो मीराला ज्या सिमेंटच्या ओट्याखाली पुरलेलं होतं त्या ओट्यावर बसून करत होता. त्या ओट्यावर बसून दात घासण, चहा पिणं वगैरे गोष्टी तो करायचा.
त्या दिवशीही तो असाच बसलेला होता. घरात चिंधी आणि पक्या असे तिघच जण होते. बाकीचे दारूच्या दुकानात काम करणारे नोकर हळुहळू कामावर येत होते. कोणी झाडलोट करत होते. तर कोणी गावातला विहिरीवरून पाणी आणून टाकत होते. वाड्या समोरच्या रस्त्यावरून लोकांची ये जा सुरू होती.
अचानक पोलिसांची गाडी वाड्या समोरं येऊन थांबली आणि गाडीतून दणकट देहयष्टीचे दाभोळकर आपल्या सहकाऱ्यां सोबत खाली उतरले. त्यांना बघताच धनपाल हात जोडून पूढे आला. पक्या मात्र आत नाहीसा झाला.
" या, या साहेब. कसं काय आज गरीबा घरी येणं केलंत. ? चिंधे साहेबांसाठी चहा टाक. का बोकड कापू साहेब दुपारच्या जेवणासाठी ?"
त्याचं हे निर्लज्ज पणाचं बोलणं ऐकून दाभोळकरांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. बोकड कापण माणसं कापण्या ईतकं सोपं वाटतं होतं या दुष्ट माणसाला.
" धनपालराज तुला कदाचित माहित नसेल की राघव आणि विक्रम माझ्या ताब्यात आहेत. त्यांनी तू केलेली सगळी कृष्ण कृत्य मला सांगितलेली आहेत. तुझे दिवस भरले आता. मी तुला अटक करायला आलो आहे. "
" साहेब, तुम्ही या हलकट माणसांवर काय विश्वास ठेवता. फक्त मला एक मिनिट वेळ द्या. मी तुम्हाला एक पुरावा देतो. मग तुम्हाला माहीत पडेल की राघव किती बदमाश माणूस आहे ते " असं म्हणत धनपालराज आतल्या खोलीत गेला. एक कागदांच गाठोड सोडून त्याने बरीच शोधाशोध करून एक कागद शोधला आणि दाभोळकरांच्या हातात दिला.
दाभोळकरांनी तो कागद बारकाईने निरखून वाचला. आणि त्यांच्याकडे कुत्सीत नजरेने बघणाऱ्या धनपालच्या कानाखाली त्यांनी एव्हढ्या जोरात वाजवली की क्षणभर काय झालं तेचं धनपालला समजलं नाही. त्याच्या डोळ्यासमोर दिवसा उजेडी अंधार पसरला आणि त्या अंधारात काजवे देखील चमकून गेले.
" मूर्ख माणसा, तू मला काय बावळट समजतो आहे की काय. असं कोणी खून केलेल्याची कबूली लिहून देतो की काय ? आणि सही केलेल्याची शाई आणि वर मजकूर लिहिलेल्याची शाई पूर्ण वेगळी आहे. राघव सारखा काम करणारा माणूस असं लिहून देवूच शकत नाही. माझ्या जवळ तर पूर्ण पुरावा आहे की राघवला हा खून करायला तूच भाग पाडलं होतं. ईतकच नव्हे तर हा कागद दाखवून तू त्याला ब्लॅकमेल करत होता. तुझा खेळ संपलेला आहे धनपाल. मी कालच नागनाथला देखील अटक केलेलं आहे. आता फक्त तूम्ही तिघंचं बाकी आहात. चला गाडीत बसायला व्हा तयार."
आपला खेळ आता संपला आहे आणि लवकरच सगळं पितळ उघडकीस येणारं आहे असं पाहून धनपाल म्हणाला,
" साहेब , ऐका ना.. या सगळ्या अफवा आहेत हो. तुम्ही स्वतःचं बघता आहात ना. गेल्या दोन महिन्यांपासून एक तरी खून झाला आहे का ? मला तर वाटतंय की तस काहीचं नसावं. "
धनपालचे निगरगट्टपणाचे बोलणे ऐकून दाभोळकरांचे हात सळसळ करत होते. क्षणभर त्यांना असं वाटलं कायदा हातात घेऊन त्याला तुडवून काढावे. त्यांच्या डोळ्यांत अंगार पेटला. चवताळून ते आपल्या सहकाऱ्यांना म्हणाले,
" घ्यारे याला आत, आणि तो जो कोणी पक्या नावाचा गुंड आहे त्यालाही उचला. " सोबत आणलेल्या लेडी कॉन्स्टेबलला ते म्हणाले,
" मॅडम , तुम्ही त्या बाईला ताब्यात घ्या आणि गाडीत बसवा. कोणी थोडासा जरी विरोध केला तरी मागचा पुढचा विचार न करता थर्ड डिग्रीचा वापर करा.
कोण एक माणूस आपल्या घरात शिरून आपल्या नवऱ्याला मारहाण करतो, वरतून सगळ्यांना अटक करण्याची धमकी देखील देतो, हे पाहून चिंधी एकदम चवताळून दाभोळकरांच्या अंगावर शिवीगाळ करून धावून गेली. तिकडे पक्या देखील मग्रूरीत बसून राहिला. दोघेही भावंडं निर्ढावलेले होते. त्यात धनपाल सारख्या माणसाचा सपोर्ट आहे म्हटल्यावर त्यांना कोणाचीच भीती वाटत नसे.
लेडी कॉन्स्टेबलने चिंधीला पकडून गाडीकडे नेले. तिने खूप थयथयाट करून तिच्या हाताला हिसके द्यायला सुरूवात केली. तेंव्हा तिच्या पायावर जोरदार तडाखे देतं त्या लेडी कॉन्स्टेबलने तिला आत लोटलं. पाठोपाठ दुसऱ्या कॉन्स्टेबलने धनपालला आणि पक्याला गाडीत कोंबले आणि गाडी सुसाट चौकीवर आली.
तो पर्यन्त गावात धनपाल आणि चिंधीला पोलीस पकडून घेऊन गेल्याची खबर घरोघर पोहोचली होती. चोरटेपणाने दारूचा व्यवसाय करत असल्याने धनपालला पोलीसांनी पकडले असावे अस लोकांना वाटलं होतं.
हळु हळू वेगवेगळ्या अफवा गावात पसरू लागल्या.
बघता बघता न कळतं दाभोळकरांच्या हाती या गुन्ह्यातले बहूतेक सगळे आरोपी हाती लागले होते. आता खरी कसोटी होती पुराव्यांची.
बघता बघता न कळतं दाभोळकरांच्या हाती या गुन्ह्यातले बहूतेक सगळे आरोपी हाती लागले होते. आता खरी कसोटी होती पुराव्यांची.
( क्रमशः)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा