एक एक धागा जुळत चालला होता. केशवच्या कॅमेऱ्यातला रोल खराब करणारा राघव आणि त्याला प्रोटेक्ट करणारा धनपाल दोघांनाही दाभोळकरांनी केशवने त्यांना ओळखलं असल्याचं सांगितलं. या व्यतिरीक्त मूसाची मुलगी मारली गेली होती त्या वेळेस राघव मेदिनीपूरला हजर असल्याचा देखील भक्कम पुरावा दाभोळकरां जवळ होता. विक्रमला तर प्रत्यक्ष हत्या करतांना बघितलेला साक्षीदार दाभोळकरांना मिळालेला होता. धनगर मुलीच्या हातात मिळालेली वाघ नखं सूंदरीचा सहभाग दाखवत होती.
या सगळ्या प्रकारात या गोष्टीला कारणीभूत ठरलेला नागनाथ, ज्याच्याशी डायरेक्ट मुंजा बोलत होता, त्याची अवस्था तर रयाला गेलेली होती त्याच्या डोळे खोल गेलेले होते तो काय बोलत होता यायचं त्यालाच त्याचं भान नव्हतं पोलिसांची एक दोन रट्टे पडताचं तो सुता सारखा सरळ झाला. बोलण्याच्या ऐवजी तोंड बंद ठेवण तो जास्त पसंत करत असे. त्याच्या घरात सापडलेली अगणित संपत्ती हा देखील एक मोठा प्रॉब्लेम झाला होता. हे पैसा आणि सोनं त्याच्याजवळ कोठून आलं होतं या गोष्टीचं त्याला काही स्पष्टीकरण देता येत नव्हत. इतरांचे जीव घ्यायला सहजपणे सांगणारा नागनाथ इतका कोलमडून पडेल अशी कोणालाच कल्पना नव्हती. अशा माणसाच्या नादी लागून आपण खूप मोठे संकट आपल्यावर ओढवून घेतले आहे. याची जाणीव धनपालला आणि चिंधीला झाली.
परशा कडून जेव्हा दाभोळकरांना कळलं की धनपालच्या मुलीचा खून विक्रमने केलेला आहे. तेव्हा त्यांना आश्चर्य वाटलं की अशा गोष्टीला धनपालने कशी काय संमती दिली, परंतु जेव्हा ते याबाबतीत विक्रमशी बोलले. तेंव्हा विक्रमने त्यांना सांगितलं, की याबाबतीत तो चिंधीशी बोलला होता आणि चिंधीने त्या बाबतीत धनपालला सांभाळून घेईल अशी हमी घेतली होती.
जेव्हा ही गोष्ट दाभोळकरांनी धनपालला सांगितली. त्यावेळी तो जागच्या जागी कोसळलाच. दुसऱ्यांच्या मुली मारण्याचं दुःख काय असतं हे त्याला या क्षणाला कळलं. कोठडीच्या गजांवर तो डोकं आपटून घेऊ लागला. जर तो मोकळा असता तर त्याने चिंधीला आणि विक्रमला ठार केलं असतं.
या सगळ्या गोष्टींमध्ये दाभोळकरांनी एक मोठा विचार केला, की याबाबतीत जरी केस मजबूत करायची असेल तर या सर्व आरोपींमध्ये आपल्याला एक आरोपी माफीचा साक्षीदार करावा लागेल. आणि असा एक माणूस त्यांना सापडला तो म्हणजे राघव. राघवचा बहुतेक सगळ्या खुनांमध्ये सक्रिय सहभाग होता. त्यांनी राघवच्या कोठडीत प्रवेश करून त्याला सगळी हकीकत सांगितली. जर तो माफीचा साक्षीदार झाला तर त्याला सरकारकडून जन्मठेपेची शिक्षा मिळवून देण्यास ते तयार होते. अन्यथा बाकीच्या आरोपीं सोबत त्यालाही फाशीची शिक्षा दिली गेली असती. त्यांच्या बोलण्यावर जर त्याचा विश्वास नसेल तर तो वकिलाचा सल्ला घेऊ शकत होता. जर त्याला जिवंत राहायचे असेल तर त्याच्यासाठी एकच मार्ग मोकळा होता तो म्हणजे माफीचा साक्षीदार होणे. एक प्रकारे त्याने आतापर्यंत जे काही गुन्हे केले होते त्यात गुन्ह्यांचे परिमार्जन करण्याचा हा एक मार्ग होता. बऱ्याच प्रकारे बोलून बोलून दाभोळकरांनी त्याचे ब्रेनवॉश केले. अखेर बऱ्याच विनंतीनंतर राघव माफीचा साक्षीदार बनायला तयार झाला.
दाभोळकरांचा मार्ग बऱ्याच प्रमाणात मोकळा झाला. सर्वात अगोदर दुसऱ्या दिवशी दाभोळकरांनी पिरगावला जी मुलगी नाहीशी झाली होती आणि विमल यांची मृतदेह कुठे ठेवले पुरले होते याच्याबद्दल त्यांच्याशी चौकशी केली असता, त्याने त्या जागा दाखवण्याचे कबूल केले.
दुसऱ्या दिवशी त्याला घेऊन दाभोळकर धनपालच्या वाड्यात आले. सिमेंटच्या बांधलेल्या दोन कट्ट्यांकडे बोट दाखवून राघव म्हणाला,
" साहेब ह्या एका कट्ट्यामध्ये पिरगावची मीरा पूरलेली आहे, तर दुसऱ्या ओट्याखाली विमल आणि तिचं बाळ पुरलेल आहे." राघव च्या तोंडून हे नुसतं बोलणं सहजपणे ऐकल्यावर देखील दाभोळकरांच्या अंगावर काटा आला. त्यांनी आतापर्यंत अनेक क्रूर गुन्हेगार पाहिले होते. पण इतके निष्ठूर गुन्हेगार ते पहिल्यांदाच पाहत होते.
शेवटी गावातले काही प्रतिष्ठित मंडळी बोलावून, त्यांनी तो बांधलेला होता ओटा तोडायला सुरुवात केली. त्या ओट्यावर पडणारा एक एक घाव जणू त्यांच्या काळजावर बसत होता. सगळे निमझरी त्या दिवशी स्तब्ध झालेली होती. धनपालच्या वाड्याभोवती खूप गर्दी जमा झालेली होती. दाभोळकरांनी सगळ्यांना घरी जाण्यास सांगितले आणि त्यांना शांततेत काम करून द्यायला सांगितलं. फक्त पंच लोक त्यांच्यासमोर सोबत थांबणार होते.
कामगार लोकांनी तो ओटा फोडायला सुरुवात केली. हळूहळू मातीचा ढिगारा बाजूला जमा व्हायला लागला. आणि जे पाहायला मिळू नये अशी सगळ्यांची इच्छा होती ते अखेर नजरेस पडलेच. सुरुवातीला धड नसलेली मान हातात आली. ती मान मातीने पूर्ण माखलेली होती. डोळ्यात नाकात सगळे माती भरलेली होती. एक भयानक वास त्या ठिकाणी पसरलेला होता. त्या मातीमध्ये कीडे वळवळत होते. त्याच्या जवळ ऐका दहा-बारा वर्षाच्या मुलीचे धड सापडले. ते धड देखील पूर्ण कुजलेले होते. तोंडावरती रुमाल धरून ते प्रेत बाहेर काढले गेले. फॉरेन्सिकच्या लोकांनी त्या हाडांचा डीनए टेस्ट करण्यासाठी घेतला. त्या प्रेताचे अनेक बाजूने फोटो काढले गेले. पिरगावच्या मिराची मिसिंग केस ज्या पोलीस स्टेशनला दाखल केली गेलेली होती. त्या स्टेशनला ते फोटो पाठवले गेले. आणि तिच्या आई-वडिलांना बोलवले गेले. राघव माफीचा साक्षीदार असल्यामुळे त्याने कशाप्रकारे मिराची मान धडापासून वेगळी केली हे सविस्तरपणे सांगितले.
नंतर दुसरा कट्टा फोडायला घेतला. तिथे देखील बरीच माती उकरल्यानंतर आत मध्ये विमलचे आणि त्यासोबत तिच्या बाळाचे प्रेत सापडले. त्याचाही पंचनामा केला गेला. जा राघवला विमल आपला दीर मानत होती. त्याच्यावर विश्वास ठेवून ती वाड्यावर ती आली होती. त्या विमलचा राघवने अशा प्रकारे विश्वासघात केला होता. ज्या जीवाने या जगात अजून प्रवेश देखील केलेला नव्हता अशा जिवाला जीवानीशी ठार केले होते. या कामात त्याला चिंधी आणि सुंदरा यांनी मदत केली होती.
अपघातात हात तुटलेल्या मुलीला आणि शेतात मेंढ्या पाळणाऱ्या मुलीला पक्याने कसे क्रूरपणें ठार करून बळी दिले होते या गोष्टी देखील दाभोळकरांना समजल्या.
अशाप्रकारे एक एक खुनाबद्दल सविस्तर माहिती राघव कडून मिळायला लागली. आणि केस मजबूत होऊ लागली. बघता बघता दोन महिने झाले. गावात एकही खून झाला नव्हता. एक दिवस ही केस कोर्टात दाखल झाली.
( क्रमशः)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा