Login

रक्त रंजीत 365 रात्री ( भाग अंतिम )

एक भयावह मालिका

जेंव्हा ही केस कोर्टात दाखल करण्यात आली. त्या वेळी निमझरीचं काय अख्खा महाराष्ट्र हादरून गेला. सतत वर्षभर माणुसकीला काळीमा फासणार , भूतो न भविष्यती अस भीषण हत्याकांड आपल्या आसपास वावरणारे सभ्य माणसं घडवून आणत असतील अशी शंका स्वप्नात देखील कोणाला आलेली नव्हती. सगळं वर्ष मृत्युच्या सावलीत जगायला लावणारी ही सगळीच माणसं सगळयांच्या परिचयाची होती.

वर्तमानपत्रांचे रकानेच्या रकाने भरून वाहात होते. सगळ्याच पुरोगामी चळवळीत पूढे असणाऱ्या महाराष्ट्राची मान या गावात निव्वळ अंधश्रध्देने पूर्ण देशात खाली गेली होती. स्त्री पुरुष समानतेच्या गप्पा मारणाऱ्या सर्वच सनातनी लोकांच्या माना खाली गेल्या होत्या.

रीतसर खटला सुरू झाला. बरीच वर्ष तारखांवर तारखा पडत राहील्या. दोन्ही पक्षांकडून अनेक युक्तीवाद केले गेले. कितीतरी वर्ष खटला सुरू होता.

अखेर स्थानीक पोलीसांनी केलेल्या अक्ष्यम्य दिरंगाई बद्दल न्यायालयाने ताशेरे ओढले. काही परिस्थीतीजन्य पुरावे, तर काही प्रत्यक्षदर्शी साक्षी पुरावे ग्राह्य धरले गेले. शिवाय राघवने माफीचा साक्षीदार म्हणून दिलेली साक्ष देखील कायदेशीर रित्या ग्राह्य धरली गेली आणि राघव सोडून सर्व आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.

अशा प्रकारे एक वर्षभर महाराष्ट्राला दहशतीत ठेवणाऱ्या , आणि माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या भयानक खून खटल्याचा शेवट झाला. आजही या खून खटल्याची आठवण झाली तरी अंगावर काटा उभा राहतो.

( रसिकहो, एका सत्य घटनेवर आधारीत ही एक काल्पनिक कथा आहे. कथेत जरी सर्व आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली असं दाखवलं गेलेलं आहे. तरी प्रत्यक्षात नागनाथ, धनपाल आणि चिंधी या सर्व आरोपींना, त्यांचा कोणत्याही खुनात प्रत्यक्ष सहभाग आढळून न आल्यामूळे, त्यांना आजीवन कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. आणि आठ दहा वर्षापूर्वीच चिंधी हिचा नैसर्गीक मृत्यु झाला. )

( समाप्त )
0

🎭 Series Post

View all