भाग ५७
आर्या आणि बलदेव जंगलात खोलवर जात होते. त्यांच्या मागे काहीच नव्हते , फक्त काळोख, भूतकाळाच्या आठवणी आणि राजवीरचा विचार. आर्याचे डोळे सतत पाण्याने भरून येत होते. तिच्या मनात एकच विचार घोंघावत होता—राजवीर त्यांच्यासाठी कायमचा हरवला का?
बलदेव तिच्या बाजूला चालत होता, पण तोही अंतर्मुख झाला होता. त्याला समजत नव्हते की राजवीरला खरंच वाचवता येईल का ? तो आता पूर्णतः रक्तपिंडाच्या प्रभावाखाली गेला होता. ज्याच्या हातात रक्तपिंड आहे, त्याचा स्वतःवरचा ताबा सुटतो. त्याने ते स्वतः पाहिले होते.—राजवीर आता आपल्याच माणसांवर हल्ला करत होता. त्याने बलदेव वर देखील हल्ला केला होता तो बिचारा कसाबसा त्याच्या तावडीतून वाचला होता.
"आपण पुन्हा जाऊन त्याला शोधूया, बलदेव! कदाचित तो अजूनही आपल्याला ओळखेल,"आर्याने भरल्या आवाजाने विनवणी केली. ती अडखळत चालत होती, तिच्या चेहऱ्यावर दुःख आणि निराशा स्पष्ट दिसत होती.
बलदेवने नकारार्थी मान हलवली.
"नाही आर्या, तो आपल्याला मारेल. तुला माहीत आहे ना, त्याने आधीच माझा जीव घ्यायचा प्रयत्न केला होता, आता आपण जास्त धोका नाही घेउ शकत."
"नाही आर्या, तो आपल्याला मारेल. तुला माहीत आहे ना, त्याने आधीच माझा जीव घ्यायचा प्रयत्न केला होता, आता आपण जास्त धोका नाही घेउ शकत."
"पण बलदेव, तो आपला राजवीर आहे! तो असा असू शकतच नाही, तुला हे माहीत नाही का!" आर्याने त्याच्या समोर उभी राहत पुन्हा आग्रह धरला.
"तो आता तसाच उरलेला नाही, आर्या!" बलदेवचा आवाज कठोर झाला. "तू स्वतःच पाहिलेस की त्याच्या डोळ्यातली ती भयानक भूक... ती रक्ताची भूक! आणि तो जर खरोखरच वाचू इच्छित असता, तर तो आपल्या मागे आला असता, नाही का?"
आर्या काही बोलू शकली नाही. बलदेवचे म्हणणे बरोबर होते. जर राजवीर अजूनही तिला आणि बाळाला वाचवू इच्छित असता, तर तो नक्कीच त्यांच्या मागे मागे जंगलात आला असता. पण त्याने तसे केले नव्हते.
"याचा अर्थ..." आर्याने डोळे मिटले आणि खोल श्वास घेतला.
"राजवीर स्वतःहून सहस्त्रपाण्याच्या गडावर गेला आहे."
"राजवीर स्वतःहून सहस्त्रपाण्याच्या गडावर गेला आहे."
बलदेव गप्प राहिला. त्याला हे आधीच वाटत होतं. रक्तपिंडाच्या प्रभावामुळे, राजवीर आता सहस्त्रपाण्याच्या ताब्यात गेला असणार. आणि सगळ्यात भयानक गोष्ट म्हणजे—तोच रक्तपिंड जीवावर उदार होऊन ज्याला मारण्यासाठी शोधला होता आणि तोच रक्तपिंड घेऊन सहस्त्रपाण्यासमोर गेला होता!
"हे सगळं उलटं झालं आहे..." बलदेव स्वतःशी पुटपुटला. "आपण सहस्त्रपाण्याला मारण्यासाठी आलो होतो, आणि आता आपला साथीदारच रक्तपिंड घेऊन त्याच्याच दारात जाऊन बसला आहे!"
आर्या पुन्हा रडू लागली. "मग आपण पुन्हा गडावर जाऊया! मला खात्री आहे की त्याला अजूनही वाचवता येईल!"
बलदेवने तिच्या खांद्यावर हलकेच धरले आणि शांत पण ठाम आवाजात म्हणाला,
"तू समजून घे आर्या... आता तसे करणे शक्य नाही. जर आपण पुन्हा गडावर गेलो, तर तिथे फक्त मृत्यू आपली वाट पाहत असेल. राजवीर आता आपल्यासाठी नाही. त्यानेच आपणहून रक्तपिंड स्वीकारला आहे. जर त्याने ते नाकारले असते, तर त्याचा प्रभाव एवढा वाढला नसता."
"तू समजून घे आर्या... आता तसे करणे शक्य नाही. जर आपण पुन्हा गडावर गेलो, तर तिथे फक्त मृत्यू आपली वाट पाहत असेल. राजवीर आता आपल्यासाठी नाही. त्यानेच आपणहून रक्तपिंड स्वीकारला आहे. जर त्याने ते नाकारले असते, तर त्याचा प्रभाव एवढा वाढला नसता."
आर्या एक क्षण स्तब्ध झाली. "म्हणजे... जर आपण त्याला आता भेटलो, तर तो आपल्याशी लढेल?"
बलदेवने डोळे झाकले. "होय. आणि जर तो माझ्या विरुद्ध लढला, तर तुला माहीत आहे का काय होईल?"
आर्याने क्षणभर डोळे मिटले. तिला उत्तर माहित होते. जर बलदेव आणि राजवीर आमनेसामने आले, तर त्यांचा एकमेकांशी मृत्यूपर्यंत संघर्ष होईल. आणि बलदेव जिंकला तर तिचा नवरा मरून जाईल. जर बलदेव हरला, तर राजवीर तिला देखील मारून टाकेल,
कारण त्याच्यासाठी आता आर्या ही फक्त एक बायको, त्याच्या होणाऱ्या बाळाची आई म्हणून राहिली नव्हती. तो तिला स्वतःच्या भावना जपणारी एक व्यक्ती म्हणून पाहत नव्हता. त्याच्यासाठी ती फक्त रक्तपिंडाच्या मार्गात असलेली एक अडचण होती.
"मग आपण आता काय करायचे?"आर्या थरथरत बोलली.
"आपण गुपचूप कुठल्या तरी गावात जाऊन राहिले पाहिजे, जेथे आपल्याला कोणीही ओळखू शकणार नाही,
"बलदेव ठाम स्वरात म्हणाला. "आधी आपण सुरक्षित ठिकाणी पोहोचूया. जर राजवीरला वाचवायचे असेल, तर आपल्याला त्याच्याशी युद्ध न करता दुसरा मार्ग शोधावा लागेल."
"बलदेव ठाम स्वरात म्हणाला. "आधी आपण सुरक्षित ठिकाणी पोहोचूया. जर राजवीरला वाचवायचे असेल, तर आपल्याला त्याच्याशी युद्ध न करता दुसरा मार्ग शोधावा लागेल."
आर्याने मान हलवली, पण तिच्या मनात अजूनही एक आशेची पाल चुकचुकत होती. कदाचित, कदाचित अजूनही काहीतरी शक्य होते.
पण त्या रात्रीच्या अंधारात एक गोष्ट स्पष्ट होती—राजवीर आता त्यांचा नव्हता.
दुसरीकडे राजवीरने गडभर भटकंती सुरू केली होती.त्याला एक अशी जागा हवी होती जिथे तो रक्तपिंड लपवू शकेल, पण त्या जागेचा कुणालाही संशयही येता कामा नये.सहस्त्रपाणी अत्यंत सावध आणि चतुर होता. गडाचा प्रत्येक कोपरा त्याच्या नजरेखाली होता.
राजवीरने सर्वप्रथम गडाच्या जुन्या तळघरात पाहिले. तिथे काळोख होता, दगडी भिंती ओलसर होत्या. पण सहस्त्रपाण्याच्या सैनिकांनी प्रत्येक ठिकाणी पहारा ठेवला होता. तळघर ही योग्य जागा नव्हती.
त्याने गडाच्या कोपरकोपऱ्यात, बंदिस्त खोलींमध्ये शोध घेतला. काही ठिकाणी जुनी शस्त्रागारे होती, काही ठिकाणी भुयारांचे दरवाजे. पण प्रत्येक ठिकाणी पहारेकरी किंवा सहस्त्रपाण्याची सावली फिरत होती.
"जर मी हे रक्तपिंड नीट लपवू शकलो नाही, तर माझा संपूर्ण बेत फसणार!" राजवीर स्वतःशीच पुटपुटला.
"मी जर सहस्त्रपाण्याला ते सहज मिळू दिले, तर मी त्याला ते स्वतःहून देतोय असेच होईल!"
"मी जर सहस्त्रपाण्याला ते सहज मिळू दिले, तर मी त्याला ते स्वतःहून देतोय असेच होईल!"
त्याने विचार केला—सहस्त्रपाणी सर्वत्र लक्ष ठेवतो, पण कुठे ठेवत नाही, हे पाहिले पाहिजे, जेथे तो कधीच विचार करणार नाही, अशी जागा हवी.
सिंहासन!
राजवीरच्या मनात कल्पना चमकून गेली. सहस्त्रपाणी नेहमीच आपल्या सिंहासनावर बसतो, पण तो स्वतः कधीही तिथे तपास करणार नाही. कारण तो इतका शक्तिशाली आहे की कुणीही तिथे काही करू शकेल, असं त्याला वाटतच नाही!
पण सिंहासनाजवळ पहारा कडक होता. तेथे सैनिकांची सतत ये-जा चालू असते. कुणीही तिथे लपवून काहीही ठेवू शकणार नाही.
राजवीरने डाव आखला.
त्याने गडाच्या एका पहारेकऱ्याला निरखले. तो थोडा बेफिकीर वाटत होता. राजवीरने सावकाश त्याच्याजवळ जाऊन त्याच्याशी बोलायला सुरुवात केली.
"सहस्त्रपाणी किती महान आहे, नाही का?"राजवीरने नम्रतेने विचारले.
सैनिकाने मान हलवली. "होय, ते अमर आहेत. शक्तिशाली आहेत."
राजवीर हसला.
"पण मी ऐकलंय की त्याच्या सिंहासनाच्या समोर एक एक गुप्त कोठी आहे. त्याला कधी सापडली की नाही ?"
"पण मी ऐकलंय की त्याच्या सिंहासनाच्या समोर एक एक गुप्त कोठी आहे. त्याला कधी सापडली की नाही ?"
सैनिक चक्रावला. "गुप्त कोठी?"
"हो, मी जुन्या ग्रंथात वाचले होते की त्या सिंहासना समोरच एक जागा आहे. पण कदाचित ती फक्त एक अफवा असेल..."
सैनिकाच्या मनात शंका आली. "मला तर असे काही माहिती नाही..."
"सहस्त्रपाणी स्वतःला महान समजतो, पण त्याला त्याच्या लोकांना देखील हे ठाऊक नाही का?" राजवीरने हसत विचारलं.
"काय माहित, त्या कोठीत काय असेल!"
सैनिक संभ्रमात पडला. त्याने सिंहासनाजवळच्या पहारेकऱ्यांना ही गोष्ट सांगितली.
ती सगळी माणसे सिंहासनाच्या समोर कुठे दरवाजा सापडतो का ते पाहू लागली.यदाकदाचित काही सापडले तर सहस्त्रपाणी मिळवून देणाऱ्या सैनिकाला काहीतरी मोठे बक्षीस देईल.
हाच विचार सगळ्यांनी केला आणि ते समोर कुठे काही दिसते का सापडते का? याचा विचार करू लागले. स्वतःचे हात भिंतींना लावून एखादी गुप्त कळ मिळते का ज्याने कोठीचा दरवाजा अचानक उघडेल आणि आत जे पण ठेवले आहे ते आपल्याला सापडेल.
सगळे गुप्त कोठी शोधण्यात व्यस्त आहेत हे पाहून आणि त्याच संधीचा फायदा घेत, राजवीरने एका वेगळ्या दिशेने जाऊन, रक्तपिंड सिंहासनाच्या मागच्या कपारीत अलगद लपवला!
कोणीही त्या ठिकाणी लक्ष देणार नव्हते. कोणाला देखील कळणार नव्हते, की ज्यासाठी सहस्त्रपाणी एवढा घाबरून आहे आणि माझ्या कडून मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे ते त्याच्याच सिंहासनाखाली ठेवले आहे. तो कधीही खाली वाकून आपल्या सिंहासनाखाली बघेल, असे कधीच शक्य होणार नव्हते.
राजवीरचा डाव यशस्वी झाला होता. रक्तपिंड त्याच्या कडून गेले होते, ते सुरक्षित होते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे —सहस्त्रपाणी अजूनही विचार करत होता की राजवीर त्याच्या ताब्यात आहे, पण सत्य वेगळंच होतं.
क्रमशः
सदर कथेचे लिखाण सुरू आहे, पुढील भाग नियमितपणे इरा फेसबुक पेज वर येतील, त्यामुळे पेजला फॉलो करून ठेवा.
सदर कथेचे लिखाण सुरू आहे, पुढील भाग नियमितपणे इरा फेसबुक पेज वर येतील, त्यामुळे पेजला फॉलो करून ठेवा.
ता क: ही कथा पुस्तक काल्पनिक आहे. यातील नावे, पात्रे, स्थळे आणि घटना या लेखकाच्या कल्पनेचा अविष्कार आहेत किंवा काल्पनिक पद्धतीने ती योजली आहेत. कोणाही जिवंत वा मृत व्यक्तीशी, घटना प्रसंगाशी किंवा ठिकाणांशी त्यांचे साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
सर्व हक्क राखीव आहेत, लेखकाच्या स्पष्ट लेखी परवानगीशिवाय या प्रकाशनाचा कोणताही भाग कोणत्याही स्वरूपात किंवा कोणत्याही प्रकारे पुनरुत्पादित किंवा कॉपी केला जाऊ शकत नाही किंवा कोणत्याही डिस्क, टेप, मीडिया किंवा इतर माहिती स्टोरेज डिव्हाइसवर हस्तांतरित किंवा पुनरुत्पादित केला जाऊ शकत नाही. पुस्तक परीक्षणातील संक्षिप्त अवतरण वगळता.
copyright: ©®
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा