Login

रमा काकू भाग 2

रमा काकू भाग 2
चॅम्पियन ट्रॉफी 2025
जलद कथा

कथा : रमा काकू

भाग : 2

एकदा अचानक विजयचा रमाकाकूला कॉल आला.
"अग आई, माधवीची तब्येत खूप खराब आहे. तुझं येणं होत असेल तर काही दिवसासाठी तू पुण्याला ये. तुला बस स्टॅन्डवर मी घ्यायला येतो."
रमाकाकू खूप घाबरल्या. काय झाले असेल माधवीला? रमाकाकूने तयारी केली व दुपारी दोन वाजता त्या पुण्याला पोहोचल्या.

विजय रमा काकूला घेण्यासाठी बऱ्याच वेळापासून बस स्टॅन्डवर वाट बघत थांबला होता. रमा काकूंनी विजयला विचारले. "माधवीची तब्येत इतकी खराब कशामुळे झाली? तू तिची काळजी घेत नाही का?" हा प्रश्न केला.


"माधवीला भेटायला तिची आई आली आहे की नाही? बऱ्याच दिवसापासून तिच्या आईची आणि माझी भेटही झालेली नाही. अधून मधून मी माधवीच्या आईशी बोलत असते. माधवी विषयी विचारत असते. आणि सोबत तुझ्याबद्दलही विचारत असते."

यावर विजय म्हणाला,"माधवीने तिच्या आईला कॉल केला होता. मात्र तिच्या आईचे येणे होणार नाही असं माधवी म्हणाली; म्हणून तर मी तुला पुण्यात येऊन जा म्हणत होतो आई."

रमा काकू मुलाच्या शब्दावर थोड्या विचारात पडल्या. मात्र विजयचं बोलणं सतत सुरू होतं. बाबाची तब्बेत कशी आहे आई? तुला येतांना त्रास तर झाला नाही ना?

घरी आल्यावर माधवी बेडवर झोपलेली होती. तिची तब्येत जास्तच खराब आहे असं दिसत होतं. रमाकाकूंनी माधवीच्या डोक्यावरून हात फिरवला. तिच्या तब्येतीची विचारणा केली.

माधवीला सासूबाईंना बघितल्यावर आनंद झालेला नव्हता. माधवीचा चेहरा उतरलेला होता. रमाकाकूलाही कळत होतं. मात्र सासू असल्यामुळे ती काहीही न म्हणता स्वयंपाक घरात गेली. संपूर्ण घर बघितलं. हात पाय धुवून छान चहा बनवला.

माधवीला स्वतःच्या हाताने चहा बिस्कीट खाऊ घातले. स्वतःच्या सुनेची किती काळजी घेत आहे आई हे बघून विजय रमा काकूची थट्टा करायला लागला.

"अगं आई मलाही भरवं की चहा बिस्किट! की फक्त आपल्या सुनेचीच काळजी घेतेय."

यावर रमा काकू हसल्या.
"ये बाळा तुलाही बिस्कीट भरवते." असं म्हणताच माधवीच्या चेहऱ्यावर हसू आलं. माधवी हसताना खूपच छान दिसत होती.

माधवीची स्माईल बघून विजयलाही बरं वाटलं. रोजच अधून-मधून विजय आणि रमा काकूची गंमत करत तर कधी थट्टा मस्करी सुरू राहायची. यामुळे घरात अगदी प्रसन्न हसत खेळत वातावरण राहत होत.

काही दिवसातच माधवीची तब्बेत चांगली झाली.


पुढील भाग अवश्य वाचा
क्रमशः

चैताली वरघट
0

🎭 Series Post

View all