चॅम्पियन ट्रॉफी 2025
जलद लेखन
जलद लेखन
कथा : रमा काकू
भाग : 1
रमा काकू आणि त्यांचे पती सागर हे गावात राहत होते. गावात शेतीवाडी होती; म्हणून ते त्यांचा मुलगा विजय याच्याकडे पुण्याला जाऊन राहत नव्हते.
विजयचे इंजीनियरिंग झालेले होते. विजय कंपनीमध्ये मोठ्या पदावर होता. पगारही भरपूर मिळत होता, मात्र रमा काकू आणि त्यांचे पती सागर यांनी कधीही विजयकडून त्याच्या पगाराचे पैसे घेतलेले नव्हते. उलट त्याला किती पैसे हवे? म्हणून विजयला विचारत असत.
विजय लाडा कौतुकात मोठा झालेला. सोबतचं आपल्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. एक वर्षा अगोदरच विजयचे लग्न माधवी नावाच्या मुलीबरोबर धुमधडाक्यात झाले होते. माधवी ही देखणी व हुशार मुलगी होती. माधवीने घरी येताचं सर्वांची मने जिंकली.
रमा काकूकडे माधवी आणि विजय लग्नानंतर काही दिवस राहिले. त्यानंतर पुण्याला कायमचे स्थायिक झाले. अधून मधून गावाला येणे जाणे सुरू होते.
आता हळूहळू माधवीच्या स्वभावात बदल होत गेला. माधवी सासरी जायला कंटाळा करायची.
"तुम्हीच तुमच्या आई-वडिलांची भेट घेऊन या." असं विजयला म्हणायची.
"तुम्हीच तुमच्या आई-वडिलांची भेट घेऊन या." असं विजयला म्हणायची.
विजय हा माधवीवर खूप प्रेम करायचा; त्यामुळे तो तिला कधीही जबरदस्ती करत नव्हता की तिला त्रास देत नव्हता आणि तिच्याबरोबर वादही घालत नव्हता.
"तुला जसे पटते तसे कर. मी माझ्या आई वडिलांची भेट घेऊन येतो."
असं म्हणून माधवीला तिच्या आई-वडिलांकडे सोडून तो स्वतःच्या आई-वडिलांची भेट घेऊन यायचा.
असं म्हणून माधवीला तिच्या आई-वडिलांकडे सोडून तो स्वतःच्या आई-वडिलांची भेट घेऊन यायचा.
मात्र इकडे माधवीला तिची आई सासू विषयी भडकवत होती.
"सासु कधीही आई बनू शकत नाही."
असे माधवीची आई तिला सांगत असे. माधवीच्या मनामध्ये सासूबद्दल राग निर्माण झाला आणि माधवीने सासरला जाणेच बंद केले.
"सासु कधीही आई बनू शकत नाही."
असे माधवीची आई तिला सांगत असे. माधवीच्या मनामध्ये सासूबद्दल राग निर्माण झाला आणि माधवीने सासरला जाणेच बंद केले.
रमा काकू मात्र नियमित माधवी विषयी विजयला विचारत असे.
"माधवी कशी आहे? तिची तब्येत चांगली आहे ना! आणि ती का बर तुझ्याबरोबर येत नाही?"
आईच्या प्रश्नावर विजय मात्र एकच म्हणायचा,"ती तिच्या आईकडे आहे. ती तिच्या आईची भेट घेते आणि मी माझ्या आईची!" असं म्हणून आईला शांत करत होता.

त्यानंतर मात्र रमाकाकू काहीही बोलत नव्हत्या. मात्र रमा काकू नेहमी विजयला सांगत होत्या.
"दोघांनीही एकमेकांची काळजी घ्यावी. पोट भरून जेवण करावं. कसलंही टेन्शन घेऊ नये." असं सतत आपल्या मुलाला सांगत होत्या.
"दोघांनीही एकमेकांची काळजी घ्यावी. पोट भरून जेवण करावं. कसलंही टेन्शन घेऊ नये." असं सतत आपल्या मुलाला सांगत होत्या.
पुढील भाग अवश्य वाचा
क्रमशः
क्रमशः
चैताली वरघट
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा