रान वेल भाग २
अविनाश कुमार आज प्रसन्न दिसत होते. त्यांना येथील अल्हाददायक वातावरण आवडले होते. कालच्या प्रमाणे आज सुद्धा गरमागरम कॉफीचा आस्वाद त्यांनी घेतला. सुटा बुटात तयार झाले .कपड्यांवर थोडा परफ्युम मारला. मस्तपैकी फेरफटका मारायला बाहेर पडले .रस्त्याने चालताना त्यांचा रुबाब पाहण्यासारखा होता. एक एक पाऊल ऐटीत टाकत पुढे पुढे जात होते. आजूबाजूच्या दऱ्या तील ओसंडून वाहणारे सौंदर्य ते तल्लीन होऊ न्याहाळत होते. ते सौंदर्य, लावण्याचे, उत्तम रसिक होते. म्हणूनच माधवीच्या आठवणीत ते अजूनही रमून जात...
आज चालताना त्यांना एक खेडे लागले. जेमतेम शंभर घरांची वस्ती. वस्तीतील अगदी छोटी छोटी घरे, तेथील गुरे बांधायचे छोटे छोटे गोठे, पुरुष व स्त्रिया आपापल्या कामात गर्क. थोड्याच अंतरावर त्यांची छोटी छोटी शेते होती. शेतात राखण करण्याकरिता बांधलेल्या उंच मचाणी, ते रमतगमत गावातून प्रत्येक गोष्ट न्याहाळत पुढे जात होते .गावातील पुरुष, स्त्रिया त्यांना निरखून पाहू लागले. हा कोण नवीन? म्हणून सर्वांच्या चेहऱ्यावर आश्चर्य होते. तेथील लहान लहान मुले सुद्धा त्यांच्याकडे पाहत होती. असा सुदृढ देहयष्टी असलेला 35 ते 40 वयातला, सुटाबुटातला व्यक्ती पाहून स्त्रिया सुद्धा आकर्षणाने त्यांच्यासमोर आल्यात.
परंतु त्यांचं लक्ष सगळीकडचं सौंदर्य न्याहाळण्या त होतं.
परंतु त्यांचं लक्ष सगळीकडचं सौंदर्य न्याहाळण्या त होतं.
लष्करात असल्यामुळे ते कवायती त चालल्या सारखे चालत. त्यांचा रुबाब, त्यांचा देखणा चेहरा, त्यांचं पुरुषी लावण्यपाहून एखादी स्त्री थबकणार च,हे निर्विवाद सत्य होते.
असेच चालत असताना, ते थेट एका शेताच्या बांधावर पोहोचले. तेथे काही आठ नऊ तरुणी ओळीने शेतात काम करीत होत्या. पाऊस असल्यामुळे शेतात पेरणीचा हंगाम सुरु होता.सर्व तरुणी हसत खिदळत भराभर कामे उरकित असताना दिसल्या. ते बांधावर च थबकले. एका ओळीत काम करणाऱ्या स्त्रिया त्यांनी पाहिल्या. तेथेच थोडावेळ खाली बसत त्या स्त्रियांचं निरीक्षण करू लागले. आपल्याला कुणीतरी पाहत आहे, हे त्या मुलींच्या गावीही नव्हते. त्या मजेत मनमोकळेपणाने काम करीत होत्या.

आदिवासी समाजात स्त्रिया चोळी न घालता, नुसता पदर छातीला लपेटून, गुडघ्यापर्यंत साडी नेसतात. त्यांचा तो पेहराव, पायात मोठे मोठे तोडे, हातात चांदीचे जाडसर कडे, हे सर्व अप्रतिम सौंदर्य अविनाश कुमार डोळ्यात साठवून घेत होते.
काम संपले. तशा सर्व स्त्रिया पाणी पिण्यासाठी बांधावर आल्या. आणि पाहतात तर काय! एक पुरुष आपल्यालाच न्याहळत आहे... सर्व स्त्रिया मागे झाल्या. त्यातील एक तरुणी, चिखलाने माखलेले राकट हात, पायात मोठे तोडे, पदर छातीला लपेटले ल्या... अशा अवस्थेत त्यांच्यासमोर आली .
प्रश्नार्थक नजरेने त्यांना पाहत असताना, तिचे चिखलाने माखलेले हात तसेच छातीवर गेले. हात धुण्यासाठी ती बांधावरच्या छोट्या ओढ्या तल्या पाण्यात वाकली.
हे राकट सौंदर्य, ते बेभान होऊन पाहतच राहिले. या तरुणीशी संवाद साधायला मिळणार, म्हणून ते तिच्याजवळ गेले. इतर सर्वजणी लगबगीने आप्आपल्या घरी पोहोचल्या.

"ऐ पोरी! नाव काय तुझे?" "आणि शेतात काय करीत आहात?" तिचे नाव 'माणिक' होते. तिला त्यांची भाषा कळली नाही. त्यांनी खुणेनेच सर्व माहिती तिच्याकडून जाणून घेतली. अशा रुबाबदार माणसाशी बोलायला मिळाल्यामुळे, ती सुद्धा खुणेनेच सर्व माहिती सांगत होती. ते दोघे असेच चालत चालत गावात आले.
छोट्या गावात ही बातमी लवकरच पसरली. सगळी मंडळी माणिकच्या भोवती गोळा झाली. सूर्यास्ताची वेळ... तिला अनेक प्रश्न विचारून गावकऱ्यांनी भंडावून सोडले.
पण तिला हा अविनाश कुमार आवडला होता. त्याची अदबीने बोलण्याची लकब तिला खूप भारी वाटली. रात्रभर ती त्याच्याच विचारात होती. अविनाश कुमारला सुद्धा तिच्या त्या राकट सौंदर्याची भुरळ पडली. तिचा धीटपणा, चालण्या वागण्यातला तिचा अवखळपणा त्याला खूप आवडला. तो रसिक होताच... रात्रभर तो तिचाच विचार करीत होता.

"होते नजरा नजर
तुझी पापणी लाजेत
श्वास कोंडतो उरात
रात रंगते मनात!"
दुसऱ्या दिवशी पहाटेच त्यांचे पाय आपसूकच तिच्या वाटेकडे वळले. माणिक सुद्धा सकाळी एकटीच शेताकडे निघाली. दोघांची पुन्हा नजरा नजर झाली. दोघेही शेताच्या वाटेने चालू लागले. माणिक तारुण्यात होती. मुसमुसत्या तरुणपणा मुळे तिचा काळेपणा गोऱ्या हूनही गोमटा दिसत होता. रानाच्या वाऱ्यावर वाढलेलं तीचं शरीर, ज्वानीने नुसतं भरभरून ओसंडत होतं.
आज तीनं भडक लाल रंगाची साडी, त्याला वीतभर पिवळी किनार... तीने पदर छातीला करकचून बांधून घेतला होता. दोघेही खाणाखुणा चीच भाषा वापरीत निघाले.

आता माणिक चे अविनाश कुमार वर मनोमन प्रेम जडले. तिने कसे तरी तोडक्या मोडक्या भाषेत त्यांची माहिती जाणून घेतली. त्यांनी सुद्धा आपला भूतकाळ तिला सांगितला. तिचं त्यांच्याशी लाघवी बोलणं... आणि विशेष म्हणजे, गोड गळ्याचे, माधवी शी असलेले साधर्म्य त्यांना खूपच भावले.शेतातल्या शांत वातावरणात तिने आपल्या कोरकू भाषेत गायला सुरुवात केली. त्यांना शब्द जरी समजत नव्हते, तरी त्यांना प्रेमाचा भाव समजला होता. ते सुद्धा तन्मयतेने तिचं ते गोड गळ्याचंगाणं ऐकू लागले. तिची ती आवाजातली गेयता त्यांना खूपच आवडली.
तिने आज सकाळी त्यांच्यासाठी न्याहारी करून आणलेली होती. दोघांनी मिळून ती खाल्ली. आता असे रोजच एकमेकांशी भेटण्याची ओढ दोघांनाही लागली.
दोघांचेही प्रेम पूर्णत्वास जाते किंवा नाही हे पाहूया पुढच्या भागात
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा