Login

रान वेल भाग ३ अंतिम

A Story About A Girl Who Lived In Tribal Area
कथा-रान वेल भाग ३ (अंतिम)


माणिक, काय ग! आज पहाटे पहाटे माझ्याकडे आलीस! रात्रभर झोपली च नव्हती का? मी सुद्धा जागी होतो. साहेब, मी नाही राहू शकत आता तुमच्याशिवाय... कसंही करा, मला तुमच्या सोबतच ठेवा. माणिक ने तोडक्या मोडक्या मराठी भाषेत आणि खुणेनेच अविनाश विषयीं चं प्रेम व्यक्त केलं.

अविनाश स्तब्ध झाले. त्यांनी दोघांसाठी कॉफी चे ग्लास मागविले. दोघेही एकत्र बसून एक एक घोट कॉफी पित बसले. बर! तुझ्या घरच्यांना माहिती असेल ना, तुझं हे असं मला भेटणं... हो, तिने मान हलवली. व म्हटले की माया बाप अन् माय ले, सांगून आली की, मी तुमच्याजवळ जातो आहे. समद्या गावा ले माहित पडलं हाय. आता ते उद्या गाव पंचायत बोलविणार हाय. त्यात आपल्या दोघांना उभे करणार हाय.
असं होय का, बर! अविनाश ने विचार केला, ही मुलगी आपल्याला आवडते. म्हणूनच तर आपण रात्र रात्रभर हिचा च विचार करीत असतो. तिलाही मी आवडतो. मग का मागे फिरायचे! तसेही आपण आता एकटे राहू शकत नाही. हिच्या मुळेच तर आपल्या जीवना त आलेली मरगळ नष्ट होत चाललेली आहे. पुन्हा नव्या उमेदीने या मुलीशी संसार था टा य ला काय हरकत आहे...

अविनाश कुमार माणिकला म्हणाले, माणिक तू आता घरी जा.! गावपंचायतीसमोर पाहू पुढे... मी तुझी साथ सोडणार नाही; इतकं सांगतो. तिला खूप हर्ष झाला. तिचा कंठ दाटून आला. ती त्यांच्या मिठीत अलगद पुढे आली. त्यांनी सुद्धा तिला आपल्या बाहू पाशात अलगद सामावून घेतले. दोघेही कितीतरी वेळ त्याच अवस्थेत होते...


"तुझे माझ्यात असणे
माझे तुझ्यात असणे
यापेक्षा वेगळे
काय असेल जीवनगाणे"

माणिक लाडाने त्यांना म्हणाली, "मला माणिक नाही, माणकू म्हणा"." मले सर्व गाव माणकू च म्हणते" "बरं ,माणकू! जा आता घरी". "भेटू गाव पंचायतीत."
दिवस जसा वर वर सरकत होता, तशी माणकू ची छातीतील धडधड वाढत होती. कारण आज रात्री गावपंचायतीसमोर तिला उभे राहायचे होते. अविनाश कुमार आज क्वार्टर ला च थांबले. त्यांनी विचार केला, हिला येथे आणणे आणि सोबत ठेवणे बरोबर नाही. किती दिवस या अशा विश्रामगृहात राहणार!
त्यांनी शिपायाला हाक मारली. शिपाई तातडीने आत आला. त्याच्याही कानावर हे प्रकरण होतंच. त्याला त्यांचा मार्दवी , शांत स्वभाव आवडलेला होता .
"आपल्या या कॉर्टरच्या आसपासच्या परिसरात, एखादं छान कॉटेज मिळेल का?" "पैशाचा तू विचार करू नकोस." फक्त मला एक छानशी छोटी बंगली राहायला शोधून दे. शिपायाला परिसरातील घरांची माहिती होतीच. त्याने तात्काळ 'हो' म्हटले. आता त्यांनी दोन महिन्यांची सुट्टी आणखी वाढवून घेतली. तसा अर्ज आपल्या विभागाला पोस्टाने पाठविला.

ती रात्र पौर्णिमेची होती. पौर्णिमेच्या चंद्राच्या प्रकाशा त गाव पंचायत भरविण्याचा प्रघात होता. गाव पंचायत भरविण्यासाठी ची दवंडी आधीच दिल्या गेली होती. एक एक करून सर्व स्त्री पुरुष पारावर जमले. सर्वांना आजचा विषय माहीत होता. गावकरी आपापसात दोघांच्या प्रेम प्रकरणा बद्दलच बोलत होते.
अविनाश कुमार व माणिक लाही बोलाविण्यात आले. त्या दोघांनाही लोकांच्या समोर उभे केल्या गेले .

मानकू! "सांग बरं, यांच्यासोबत तू ले लगीन करायचं हाय का?" तुम्ही दोघेही रोज एकमेकांच्या सोबत असतात, हे सर्व गावांना पाहिलं आहे". मानकूला, हा प्रश्न दोन वेळा विचारण्यात आला. ती खाली पहात पायाच्या अंगठ्याने माती खरडी त होती. आता अविनाश कुमारला पंचायतीच्या म्होरक्या ने विचारले," सांगा साहेब, हिला तुम्ही ठेवणार का?
तसे त्यांनी उत्तर दिले, हो! "मला मानकू आवडते." मी तिला माझ्यासोबत नेणार". तसं माणिक ने वर पाहिलं. दोघांची नजरा नजर झाली. माणिकला खूप भरून आलं.
माणिक च्या पालकांनी तिला,अविनाश कुमार सोबत जाण्याची परवानगी दिली. आता दोघांनाही उघडपणे प्रेम संसार करण्याची मुभा होती.
शिपायाने सुद्धा एक छोटी बंगली शोधून ठेवली होतीच. दोघांनीही बंगलीत प्रवेश केला..
मानकू ला त्यांनी खुणेनेच जवळ येण्याचा इशारा केला. ती त्यांच्या पुढ्यात येऊन उभी राहिली. आता तिच्या ओठांना कापरे भरले. पायही थरथरू लागले... तिचा छातीला लपेटलेला साडीचा पदर सैल झाला. ती तशीच उभी होती. जणू झाडावरच्या कैऱ्या तशाच थरथरत होत्या. राखण्या ला राखणी चे भान राहिले नव्हते.
ते एकटक तिच्याकडे पहात राहिले. दोघांनाही एकमेकांची भाषा समजत नव्हती. पण डोळ्यांना डोळ्यांची भाषा समजली. काळ्या पाखराला गोऱ्या पाखरा चे मन समजले.

अशा पौर्णिमेच्या शांत शितल प्रकाशाच्या सुखासीन रात्री, आपल्याला मनापासून आवडलेला कृष्ण मधाचा प्याला साहेबांनी आपल्या ओठी लावला. त्या बंगली त ते दोघेही प्रेम सागरा त आकंठ बुडाले.
दोघेही बंगली च्या आवारात मनसोक्त फिरू लागले. ती तर बकुळीच्या झाडासारखी अंगो पांगी फुलू लागली. अविनाश कुमारने तिच्यासाठी तलम रेशमाच्या भडक रंगाच्या साड्या बोलाविल्या. त्या साड्या, तिच्या त्या राकट शरीरावर सुंदर दिसू लागल्या. तिचा तो छातीला लपेटले ला पदर त्यांना खूप आवडे...

तिने आता त्या बंगली च्या खिडक्यांना पडदे लावून घेतले. सोप्याला आवरण घातले. आपल्या सौंदर्य दृष्टीने तिने बंगली ची सजावट केली. दररोज ताजी फुले एका फुलदाणीत ठेवू लागली.
एके दिवशी तिने गावातल्याच शिंप्या ला बोलावून ब्लाऊज शिवायला दिले. परंतु अविनाश कुमारला ते आवडले नाही." तू तशीच सुंदर दिसते "असे खुणेनेच सांगून, त्या शिंप्या ला परत पाठवले. तिचा नाईलाज झाला. तिने सुद्धा त्यांना आवडते म्हणून, 'ब्लाऊज 'घालण्याची इच्छा सोडून दिली.
अशा अनेक रात्री आणि दिवस दोघेही एकमेकांच्या बाहू पाशात तासन् तास बसत. तिचा तो प्रसन्न चेहरा, आणि त्यांचा तो तिच्या पाठीवरचा आश्वासक हात, दोघेही मनसोक्त प्रेमाचा पेला रिचवत बसत. जणू तिला म्हणायचे असे की," जीवनात ही घडी अशीच राहू दे! प्रीती च्या फुला वरी वसंत नाचू दे!"

त्यांच्या सुट्या संपत आल्या. आता आपल्याला लष्कराच्या सेवेत हजर राहावे लागणार, या विचाराने आणि माणिक च्या काळजीने त्यांचं मन हूरहूराय ला लागलं. एक दिवस त्यांना लष्करात उपस्थित राहण्याचा सांगावा आला. त्यांनी विचार केला, तिला आपल्या सोबत न्यावे लागणार. परंतु बाहेरच्या जगात, हिचा असा पेहराव ठीक दिसणार नाही. त्यांनी स्वतःच्या मनाला मूरळ घातली. तिच्यासाठी छानसे ब्लाऊज शिवून घेतले. तिला सुद्धा खूप आनंद झाला. आता त्यांच्या आयुष्यात माधवी ची जागा माणिक ने घेतली. आता रानातली रान वेल त्यांच्या संसारात बहरणार होती.

समाप्त
|