Login

रणफंदीची जात आमुची ! पार्ट 12

.
संध्याकाळचा प्रहर होता. दिलेरखान आपल्या पांढऱ्या अश्वावर बसून काळदरी गावानजीक होता. सोबत दाऊद कुरेशी आणि रसूल बेग उपस्थित होते.

" हुजूर , इथे का आणले आहे ?" दाऊदने विचारले.

" समोरचा तो पहाड बघ. " दिलेरखान म्हणाला.

" जी. " रसूल म्हणाला.

काळदरी हे पुरंदरजवळ असलेले एक छोटेसे गाव होते. तिथला एक लहानसा डोंगर दिलेरने हेरला होता. घटोत्कचने गुडघा वर करावा तसा तो डोंगर. त्याच्यासमोर पुरंदरचा दख्खन दरवाजा होता.

" या डोंगरावर तोफखाना चढवा. त्या तोफांच्या माऱ्याने हा दख्खन दरवाजा तुटला पाहिजे. किती दिवस मारा सहन करेल मुरारबाजीचा हा पुरंदर ? एकदा हा दरवाजा तुटला तर आपले सैन्य आत घुसेल आणि हा पुरंदरावर चांदतारा फडकेल. " दिलेरखान म्हणाला.

" वाह हुजूर. क्या दिमाग पाया है. आपल्या तारीफसाठी शब्दच नाहीत माझ्याकडे. " रसूल म्हणाला.

" उद्यापासून काम सुरू करू. " दाऊद म्हणाला.

" आजपासून. आतापासूनच.

खुशीया अर्श पे होगे
 चर्चे फरश पे होंगे
 एक कर्ज अदा होंगा
 एक फर्ज अदा होंगा
सितारो में भि चमक होंगी
चांद भि चमकता होंगा
कितनी खुशी होंगी जीस वक्त
 दख्खन दरवाजा तबाह हो जाएगा. "

दिलेर आपल्या क्रूर नजरा पुरंदरावर रोखून गाऊ लागला.

***

रात्रीचा प्रहर होता. मुरारबाजी चिंतेत होते.

" काय झाले ? मुखावर चिंता दिसत आहे ?" येसू म्हणाली.

" येसू , गडावर अन्नधान्याची कमतरता आहे. सैन्य रसदीवर चालते. रसदीवर लढते. " मुरारबाजी म्हणाले.

" आपले मावळे स्वातंत्र्याच्या प्रेरणेने लढतात. " येसू म्हणाली.

" ते खरे आहे. पण रसद संपल्यावर अडचण निर्माण होईल. त्या राक्षसी दिलेराने वज्रगडावरही तोफांचा मारा सुरू केला आहे. गडावर बायका-लेकरे आहेत. हीच चिंता आम्हाला सतावत आहे. " मुरारबाजी म्हणाले.

" रायगडावर खलिता धाडला का ?" येसू म्हणाली.

" होय. पण इतक्या कडक वेढ्यात रसद पोहोचेल असे वाटत नाही. " मुरारबाजी म्हणाले.

" चिंता करू नका. आम्ही बायका उद्यापासून एकच वेळ जेवण करणार. हवेतर उपाशी राहू. पण गडावरच्या सैन्याला उपाशी राहू देणार नाही. " येसू म्हणाली.

" वाह येसू. आता शोभलीस किल्लेदाराची बायको. "
मुरारबाजी म्हणाले.

क्रमश...

🎭 Series Post

View all