भाग ४
माधवी तिच्या प्रशस्त अशा केबिन मध्ये समोर ठेवलेल्या लॅपटॉपवर कुठल्यातरी मेडिकल केसेस हॅण्डल करत होती. तिचं लक्ष पूर्णपणे त्या लॅपटॉप मद्ये होत अन् अचानक तिच्या केबिनचा दरवाजा उघडून ती आत येते.
"तू इथे काय करतेस? अन् तू.. तू जिवंत आहेस?" ती काहीश्या घाबऱ्या आणि रागीट स्वरात तिला विचारते.
"एक्सक्युज मी, आपण कोण?" माधवी स्वतःवर नियंत्रण ठेवत विचारते.
"तू मला नाही ओळखत, म्हणजे कुणालाच नाही ओळखत?" ती आता थोडी आनंदी दिसत होती.
"हे बघा, तूम्ही काय बोलत आहात मला समजत नाही. तुम्हाला काही मेडिकल हेल्प हवी आहे का?" माधवी निर्विकार चेहऱ्याने विचारते.
"न.. नाही. सॉरी मी तुम्हाला डिस्टर्ब केला" खुशितच ती माघारी वळते.
"थॅन्क्स गॉड. बहुतेक त्या ॲक्सिडेंट मद्ये तिची मेमरी लॉस झाली असावी, नाहीतर मला पाहिल्यावरच माझ्यावर ओरडली असती." तिने आनंदानेच सुस्कारा सोडला अन् समोर असणाऱ्या आलिशान कार मद्ये बसून निघून गेली.
"थॅन्क्स गॉड. बहुतेक त्या ॲक्सिडेंट मद्ये तिची मेमरी लॉस झाली असावी, नाहीतर मला पाहिल्यावरच माझ्यावर ओरडली असती." तिने आनंदानेच सुस्कारा सोडला अन् समोर असणाऱ्या आलिशान कार मद्ये बसून निघून गेली.
इकडे माधवीच्या अश्रूंचा बांध केव्हाच फुटला होता. "कसं विसरेल तिला तिच्यामुळेच तर माझं आयुष्य बरबाद झालं होतं, तिच्यामुळेच तर माझ्या प्रेमाने देखील माझ्यावर अविश्वास दाखवला होता. कसं विसरू तुला किर्ती.. " अन् क्षणभर तिचं रडणं थांबल.. " तिच्या गळ्यात तर मंगळसूत्र आहे म्हणजे तिने लग्न केलंय? पण कोणाशी? की शंतनु?"... तिला मनातच धडकी भरली पण पुन्हा विचार आला की, तुझा नि त्याचा काय संबंध? तुला काय फरक पडणार आहे? ती मनालाच समजावत होती खरी पण तस जरी असलं तरी ती आजही त्याच्यावर खूप प्रेम करत होती. असा एकही क्षण न्हवता की त्याची आठवण आली नाही. शेवटी त्या आठवणींच्या आधारे तर जगत होती ती...
फ्लॅशबॅक...
"आई, आमचा फायनल निर्णय झाला आहे. शंतनु सरोगसी साठी तयार आहेत" माधवी तिच्या सासूंना म्हणजे अनिताला सांगत होती. पण त्या मात्र मान्य करायला तयारच न्हवत्या. त्यांना नातवंड हवं होत अन् तेही नैसर्गिकरित्या माधवीच्या पोटात वाढलेलं. पण आता हे शक्य नाही हे त्या जाणून होत्या.
"आई, तूम्ही तयार आहात ना?" माधवी आशेने विचारते.
"मधू... तूम्ही दोघेही सुशिक्षित आहात. त्यामुळे तुम्हा दोघांचा निर्णय योग्यच असेल पण हे सरोगसी वगेरे... ते मला पटत नाही. स्वतःचा वंश दुसऱ्याच्या पोटात वाढवणे म्हणजे..." अनिता थोड्याशा नाराजीच्या स्वरात बोलत होती.
"आई, आधी सरोगसी म्हणजे काय ते तर जाणून घ्या. बाळ आम्हा दोघांचच असेल पण पोट मात्र दुसऱ्याच असेल."माधवी त्यांना समजावून सांगत होती.
" ते कसं शक्य आहे?" अनिता
"म्हणजे माझं आणि शंतनुच एग फर्टीलायझ करून त्याच दुसऱ्या महिलेच्या गर्भात प्रत्यारोपण केलं जातं अन् नऊ महिन्यानंतर ते बाळ आपल्याला दिलं जातं." माधवी.
"पण आपणं दुसऱ्या डॉक्टर कडे जाऊ, कदाचित ते काही मार्ग सांगतील." अनिता उत्साहित होऊन म्हणाली.
"आई जगातील कुठल्याही डॉक्टरांकडे गेलं तरी तेच सांगणार आहेत. अन् तसही डॉ. जोशी आपल्या फॅमिली डॉक्टर आहेत. इतकी वर्षे झाली तुमचा त्यांच्यावर अन् त्यांच्या ट्रीटमेंट वर विश्वास आहे मग त्या कशा काय चुकतील?" माधवी बोलत होती खरं पण यात काहीतरी भयंकर गफलत आहे याची तिला जराही कल्पना न्हवती.
"बरं ठीक आहे. जर बाळ तुम्हा दोघांचच असेल तर सरोगसी साठी हरकत नाही" शेवटी आई देखिल तयार झाली. अन् माधवीने आनंदाने तिला मिठी मारली.
भलेही ती स्वतःच्या बाळाला नऊ महिने पोटात वाढवू शकत नव्हती, एका गरोदर स्त्रीच्या फीलिंग्जचा अनुभव ती घेवू शकणार नव्हती पण ती तिचं मातृत्व कधीचं वाया जाऊ देणार नव्हती. दुसऱ्याच्या पोटात वाढलेल का असेना पण ते बाळ तिच्या प्रेमाची निशाणी ठरणार होत अन् त्याला ती भरभरून प्रेम देणार होती. शेवटी सरोगसी करायचं ठरलचं पण प्रश्न हा होता की गर्भ ठेवण्यासाठी योग्य स्त्री कुठून शोधायची?
"हे काय ऐकतेय मी? तूम्ही दोघे सरोगसी करणार आहात? तुमची हिंमतच कशी झाली, हा निर्णय माझ्या परस्पर घ्यायची? आजकाल माझ्या मतांना किंमतच नाही. आणि ही महाशय घरात आल्यापासून तर नाहीच नाही. काय चाललंय काय? शंतनु, आम्ही तुम्हाला बोलतोय" सुनंदा बाईंचा करारी आवाज ऐकून सगळेच गप्प होते. मान खाली घालून सगळेच ऐकून घेत होते. पण माधवी अन् शंतनु मात्र शांत होते.
"आजीसाहेब, तुम्हाला देशमुख घराण्याचा वंश पुढे चालवायचा नाही का? तस असेल तर आताच सांगा म्हणजे आम्ही मुलं व्हावं की नाही यावर विचार करु." शंतनु शांतच पण तितक्याच करारी आवाजात बोलला.
"शंतनु तूम्ही या घराण्याचे एकुलते एक वारसदार आहात अन् तुमचं मुल म्हणजे देशमुख घराण्याचा वारसदार कुणा गैर बाईच्या पोटी जन्माला येणं, हे आम्हाला कदापि मान्य नाही. मग हवं तर तूम्ही दुसरं लग्न केलं तरी हरकत नाही" सुनंदा बाई गरजल्या अन् सगळ्यांनीच त्यांच्याकडे अविश्र्वासाने पाहिलं.
"आजीसाहेब, या घराण्याचा वंशज नाही वाढला तरी चालेल पण मी दुसर लग्न कधीचं करणार नाही." शंतनुने एक रागीट कटाक्ष सगळ्यांवर टाकला अन् तिथून निघून गेला. सुनंदा बाई मात्र थोड्या वरमल्या कारण शंतनु देशमुखचा राग काय असतो हे त्यांनाच न्हवे सगळ्यांनाच माहित होत.
"आजीसाहेब, आधीच शंतनु खूप स्ट्रेसमध्ये आहेत प्लीज असं काही बोलू नका. त्यांचा राग तुम्हाला माहीतच आहे. अन् राहिली गोष्ट दुसऱ्या लग्नाची तर त्यांची इच्छा नसताना किंवा माझी परवानगी नसताना तूम्ही जबरदस्ती काही करण्याच्या प्रयत्न केला तर मी तुमच्यावर केस सुध्दा करु शकते." माधवीने अतिशय थंड आवाजात उत्तर दिलं अन् आता मात्र सुनंदाबाईंच्या तोंडच पाणीच पळाल. पण त्यांनी चेहऱ्यावर मात्र तस दिसू दिलं नाही. त्यांनी मनातच दात ओठ खाल्ले. घरात त्यांना चढ्या आवाजात बोलण्याची कुणाची हिम्मत होत नव्हती पण माधवी मात्र त्यांना नेहमीचं त्यांना प्रतिप्रश्न करायची, त्यांचं वाक्य खोडून आपल मत मांडायची अन् हेच तर सुनंदा बाईंना रूचायच नाही.
"बरं ठिक आहे... माझा पण होकार आहे सरोगसीला पण माझी एक अट आहे " सूनंदा बाई.
"कुठली अट? " माधवीने जरा भीत भीतच विचारलं कारण तिला सुनंदा बाई म्हणजे आपली आजसासू कशी आहे ते चांगल माहित होत.
" हे तुम्ही सरोगसी करताय तर करा पण जी कोणी बाई असेल ती मीचं निवडणार" सुनंदा बाई रुक्ष आवाजात म्हणाल्या.
" पण आजीसाहेब यात आधी आम्हा दोघांच मत लक्षात घ्यायला हवं कारण बाळ आम्हाला हवं आहे, आम्ही त्याचे आई बाबा आहोत त्यामुळं सरोगसी साठी बाई आम्ही शोधू" माधवी.
"म्हणजे आम्ही त्या बाळाचे काहीच नाही आहोत असं म्हणायचं आहे का तुला? होणारा मुलगा आमचा परतुंड आहे अन् तो चांगल्याच बाईच्या पोटी वाढायला हवा. कोण चांगल कोण वाईट आम्हाला लगेच कळत. उगाच पांढरे झाले नाहीत केस. तुम्हाला काय कळणार कोण बाई कशी, कोण कशी. म्हणुनच आम्ही सांगतोय ते आमच्यावर सोडुन द्या." सुनंदा बाई थोड खोचकपणे बोलल्या अन् त्याच वेळी त्यांच्या डोक्यात काही भलतच शिजत होत.
होणारा मुलगा आमचा परतूंड... हे ऐकून माधवीला हसूच आलं पण तिने ओठातच दाबल. म्हणजे या बाईच आधीच फिक्स आहे मुलगा होणार म्हणून. तिने मनातच कपाळावर हात मारून घेतला. पण तिने मनात पक्क ठरवलं होत की सरोगेट मदर ती स्वतः शोधणार पण झालं होत भलतचं सरोगेट मदर म्हणून किर्तीच नावं देण्यात आल होत अन् तेही तीच्या नकळत....
क्रमशः......
( कोण आहे किर्ती?... का तयार झाली सरोगसीसाठी?... तीचा आणि देशमुख घराण्याचा काय संबंध? आणि खास शंतनुशी?... अश्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं... जाणून घेण्यासाठी वाचत रहा)