Login

रंग बदलत्या नात्यांचे भाग ५

गेली दोन दिवस झाले कीर्तीच कशातच लक्ष नव्हत
भाग ५

गेली दोन दिवस झाले कीर्तीच कशातच लक्ष नव्हत. राहून राहून तिला माधवीचा चेहरा समोर दिसत होता. उगाच इकडून तिकडे अन् तिकडून इकडे अस्वस्थपणे येरझाऱ्या घालत होती. तिला मनातच वाटत होतं की माधवी मुंबईला आली आहे हे शंतनुला कळूच नये. काही वर्षांपूर्वी तिनेच तर खूप मो्ठं कट कारस्थान केलं होतं त्या दोघांना दूर करण्यासाठी. खरंतर तिची पोलीस पोस्ट मद्ये डॉक्टर म्हणून नियुक्ती झालेल्याची बातमी तिने पाहिली होती तेव्हाच तिने घरातला तो पेपर फाडून टाकला होता कुणी बघायच्या आतच. अन् रोजचा पेपरही तसाच पडून असायचा. कुणीच वाचायचं नाही कारण तितका वेळ कुणालाच नव्हता. जो तो आपल्या कामात व्यस्त. पण आज सकाळ सकाळीच किर्ती चहा घेत सोफ्यावर बसली होती तर समोरच टेबलावर तो पेपर ठळक हेडलाईन मद्ये पडला होता. अन् तो पाहून एक क्षणी तिच्या काळजाचा ठोकाच चुकला.

            ती अविश्र्वासाने पेपर हातात घेवून बघत होती कारण आजपर्यंत तिला, तिलाच नव्हे तर घरातल्या सगळ्यांनाच वाटत होत की माधवी त्या ॲक्सीडेंटमद्ये कधीचं गेली आहे... अन् म्हणुनच एकदा खात्री करण्यासाठी किर्ती माधवीच्या ऑफिस मध्ये गेली होती. तर तिला पाहून क्षणभर ती तिथेच गोठली होती कारण जिवंत माधवी तिच्यासमोर होती पण पुन्हा जेव्हा माधवीने तिला ओलखलच नाही तेव्हा मात्र तिला वाटल की त्या ॲक्सीडेंटच्या आघातात  माधवीची मेमरी लॉस झाली असावी. अन् मनातूनच ती खूप आनंदी झाली होती. कारण ती शंतनुलाही ओळखत नसावी असा तिचा समज झाला होता. पण तो तिचा समज नाही तर गैरसमज होता. कारण माधवी आजही आहे अशीच होती तिला सगळ माहित होत पण ती मुद्दामहून विसरल्याच नाटक करत होती.
***
     
            
        "हे माझं पिल्लू, कस चालू आहे स्कूल, स्टडी? आणि तुझे नवीन फ्रेंड्स कसे आहेत?" हातातला कॉफीचा कप टेबलवर ठेवून माधवी सोफ्यावर बसते. समोरच मनू स्टडी मद्ये बिझी होती ती येताच सगळ बंद करून पळतच तिच्या जवळ गेली.

       "आय मिस माय ओल्ड स्कूल" खालचा ओठ काढून काहीश्या नाराजगिने मनू बोलते अन् माधवीच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं टेन्शन दिसू लागत.

       "बट आय लव्ह माय न्यू स्कूल मोअर दॅन ओल्ड" असं म्हणून मनूने माधवीला आनंदाने मिठी मिठी मारली. तेंव्हा कुठे माधवीच टेन्शन कमी झालं अन् मनातच तिने हुश्श केलं.

     "आई, तुला सांगू आज मला एक नवीन फ्रेंड भेटला आहे. ही इज टू मच गूड. माझ्याच क्लास मध्ये आहे." मनू.

      "अच्छा, नावं काय त्याच?"
माधवी.

       "विनायक ॲज विनू " मनूने तिला त्याचं नाव सांगितलं अन् का कुणास ठाऊक तिच्या काळजाचा ठोकाच चुकला. एक अनामिक हुरहूर लागून राहिली. खूप वर्षांपूर्वी असच तिने अन् शंतनुनेही आपल्या बाळाचं नाव ठरवलं होतं...

         "काय ठेवायचं नावं?" शंतनु

      "ह्मम... मुलगा झाला की विनू" माधवी
     
       "आणि मुलगी झाली की मनू" शंतनु

          नकळत तो क्षण आठवून तिला खुदकन हसू आल. पण क्षणातच ते हास्य वेदनेत बदललं. असेल कुणीतरी म्हणून विनूचा विषय तिने तिथेच सोडुन दिला.

          "मावशी काय करताय? चला मी पण मदत करते थोडी." मधू किचन मध्ये येत विचारते.

        "नको ग बाळा, मी आहे ना. जा जाऊन आराम कर थोडा. थकली असशील ना. किती ती धावपळ करतेस. पण मी मात्र घरातच बसून असते बर का त्यामुळे घरातलं मी सगळं बघेन. आता का म्हणून विचारू नकोस. शेवटी मी तुझ्या आईसारखीच आहे. देवाने पोटाला लेकरू दिलं नाही म्हणून काय झालं? तू माझ्या लेकरा पेक्षा कमी नाहीस " बोलताना मावशीचा आवाज थोडा ओलसर झालेला पण लगेच त्यांनी सावरलं अन् त्यांचं बोलण ऐकून मात्र माधवीच्या डोळ्याच्या कडा किंचित ओल्या झाल्या. आजपर्यंत मावशीने तिला आईसारखी माया दिली होती. भलेही तिला आई काय असते हे माहित नव्हत पण मावशीने तिला शिकवलं अन् आज ती स्वतः आईपण जगत होती.
***


          "आई, आज टीचर पॅरेन्ट्स मीटिंग आहे स्कूल मद्ये. आणि तू येणार आहेस. बाकी मला माहीत नाही. आज तू सुट्टी घे." मनू.

        "हो रे बाळा, ऑलरेडी मी सुट्टी घेतली आहे. माझ्या पिल्लुसाठी" माधवी.

      "येह... लव्ह यू मम्मा." मनू तिच्या गालावर ओठ टेकवून पळतच तयार व्हायला निघून जाते.
***


              "मिसेस माधवी देशमुख तुम्हीच का?" स्कूल मधील एक लेडी टीचर माधवीकडे येत विचारते.

        "हो हो मीच " माधवी हसून उत्तर देते.

     "मनस्वी (मनू) खूपच हुशार आहे. थोडेच दिवस झाले तिला इथे जॉईन होऊन चांगलीच रुळली आहे. अन् क्लास मद्ये सेकंड आहे ती." टीचर बोलते अन् माधवीला हायस वाटतं पण लगेच मनात प्रश्न येवून ती विचारते.
      "मनू सेकंड आहे तर फर्स्ट कोण आहे?" अन् उगाच विचारलं म्हणून तिला स्वतःचाच राग येतो.

        "हा आहे फर्स्ट, माय फ्रेन्ड विनू" मनू त्या मुलाच्या हाताला धरून प्रिन्सिपल केबिन मध्ये येत बोलते तस माधवीने वळून पाहिेल अन् का कुणास ठाऊक त्या मुलावर तिची नजर आपोआप स्थिरावली. काहीतर कनेक्शन, एक प्रकारची ओढ, बॉण्ड असल्याचा फील त्याच्याकडे पाहून तिला येत होता.

        "मम्मा, ही इज माय फ्रेन्ड विनू. मीट हिम" मनूच्या आवाजाने ती भानावर आली. हलकेच डोळ्यातले अश्रू  तिने बोटावर टिपले अन् त्या मुलाला जवळ घेतलं.

        " बाळा, तुझे पॅरेंट्स नाहीत आले?" माधवी ने विनू ला जवळ घेत विचारलं.

         "हो, आलेत ना आणि दोघेही प्रिन्सिपल केबिन मध्ये आहेत. म्हणून तर मी मनू सोबत आलो इकडे." विनू.

           "ओके बेटा" तिला त्याच पुर्ण नावं विचारायचं होतं पण तिने ते टाळलं. पुन्हा एकदा तिने त्याच्या कपाळावर ओठ प्रेस करून एक दीर्घ श्वास घेतला अन् बाजूला झाली.

      
          "मम्मा ऑलरेडी मीटिंग संपली आहे तर चल ना आपणं गार्डन मध्ये जाऊ. व्हॉट से विनू?" मनू.

         "येस आंटी, आपणं जाऊ गार्डन मध्ये अन् तसही पप्पा आणि मम्मा येईपर्यंत आपणं थोडी मज्जा करू " विनू.

       
             गार्डन मद्ये तिघेही बसले होते. विनू आणि मनू दोघेही मस्ती करत होते अन् माधवी त्या दोघांना टक लावुन बघत होती. आज तिचा सर्वात स्पेशल दिवस होता. म्हणूनचं ती मनातून आनंदी होती. एक प्रकारचं समाधान तिच्या चेहऱ्यावर दिसत होत पण ते क्षणभंगुर होत अन् हे तिलाही माहित होत. तरीही हातात आलेल्या या अनमोल क्षणाला ती कधीच डावलनार नव्हती.

         "मनू, तुझे पप्पा नाही आले? कारण आज पी. टी. एम (पॅरेंट्स- टीचर मीटिंग) आहे अन् सगळ्यांचे मम्मी पप्पा आलेत मग तुझे पप्पा का नाही " विनू खेळता खेळता मनूला विचारतो.

       "माहित नाही, अन् मला हेही माहित नाही की माझे पप्पा आहेत तरी कोण? कारण मी आजपर्यंत त्यांना एकदाही पाहिलं नाही. " मनू गाल फुगवून बोलते.

       "हमम.. असुदे भेटतील एक दिवस. तोपर्यंत तू माझ्या पप्पांना पप्पा समज ओके. आता रुसू नको. पण तूझी मम्मा खूप चांगली आहे. आय लाईक हर " विनू तिचा गाल खेचत बोलतो.

      "येह.. मी तुझ्या पप्पांना पप्पा म्हणणार... पण " मनू.

       "पण काय?" विनू.

     "पण आई मला रागवेल. कारण ती बोलते कोणालाही पप्पा म्हणायचं नाही." मनू लटक्या रागाने बोलते.

          "ओके. पण अंकल तर म्हणू शकते ना " विनू.

      "हा ना, अंकल म्हणेन मी मग नाही रागवणार मम्मा " मनू.

            त्या दोघांचं संभाषण तिला नीट ऐकू येत नव्हत पण एकमेकांबद्दल असलेली आपुलकी मात्र तिच्या नजरेतून सुटत नव्हती.

          "येह पप्पा" असं म्हणून विनू धावतच जातो.

       त्याचवेळी एक कपल त्याच्याकडे येतं होत जे पाठीमागे असल्याने माधवीला दिसत नव्हत. विनूचे आई बाबा असतील म्हणून तिने अधिरतेने मागे वळून पाहिलं... अन् त्याची... तिची नजरानजर झाली... सार अवसान गळून पडल अन् ती डबडबलेल्या डोळ्यांनी त्याच्या तांबूस डोळ्यात हरवून गेली.....

क्रमशः....

(कोण आहे तो?... जाणून घेण्यासाठी वाचत रहा)