Login

रंग बदलत्या नात्यांचे भाग ६

खेळ हा नशिबाचा सारा
भाग ६

खेळ हा नशिबाचा सारा
            डाव मांडला उरी अधुरा
            अधुरी ती प्रीत आपुली
           पुन्हा नव्याने उमजेल का?
          प्रेम माझे तुला समजेल का?
             भेट पुन्हा, का घडावी?
             प्रीत पुन्हा ही, का जडावी?
               खेळ हे सारे नशिबाचे
               रंग बदलत्या नात्यांचे...
              रंग बदलत्या नात्यांचे...

           
               अजुनही त्या त्याच्यात हरवली होती. अन् तोही एका जागी स्तब्ध होऊन तिलाच बघत होता. जणू त्याच्यासाठी तर सार जग थांबल होत. असंख्य भावना मनात थैमान घालत होत्या. कधी राग, कधी दुःख, कधी अविश्वास तर कधी प्रेम त्याच्या नजरेत हळुहळू दाटत होत. माधवी मात्र त्याला मनातूनच आर्त साद घालत होती.. शंतनु.... पण कदाचित ती साद त्याच्यापर्यंत पोहचली नव्हती.

            "आंटी"... विनूच्या आवाजाने माधवी भानावर आली. अन् तिने हलकेच तोंड फिरवून अश्रू पुसून घेतले.

        "आंटी, हे माझे मम्मी पप्पा आणि पप्पा ही माझी बेस्ट फ्रेंड मनूची मम्मा " विनू बोलत होताच की शंतनु ने त्याच्या हाताला घट्ट पकडल अन् त्याला ओढतच घेवुन जाऊ लागला.

           "व्हॉट हॅप्पन पप्पा? तूम्ही असे का बिहेव्ह करताय? " खरंतर याचं उत्तर शंतनुला देखील माहित नव्हत. खरचं त्याला किती आनंद झालेला तिला समोर बघून पण ती मनस्वीची आई आहे म्हंटल्यावर त्याला का कुणास ठाऊक पण रागच आला होता अन् तोच राग बाहेर पडू नये म्हणून तो विनूला घेवुन तिथून बाहेर पडला.

        "कूल डाऊन पप्पा? प्ले म्युझिक अँड स्टे रिलॅक्स.." कारण त्याला माहित होत की जेव्हा जेव्हा त्याचा पप्पा टेन्शनमद्ये असायचा तेव्हा म्युसिक किंवा गाणं लावून ऐकायचा. पण शंतनुच मात्र त्याच्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं म्हणून विनूने स्वतःच म्युझिक प्ले केलं....

प्यार हमको भी हैं
प्यार तुमको भी हैं
तो ये क्या सिलसिले हो गये
बेवफा हम नहीं
बेवफा तुम नहीं
तो क्यूं इतने गीले हो गये
चलते चलते कैसे ये फासले हो गये
क्या पता कहा हम चले.......
( ...चलते चलते)

           जणू गान पण त्याच्या परिस्थितीला साजेसच लागलं होतं. त्याने रागानेच ते बंद केलं. अन् त्याच्या अशा वागण्यामुळे विनू आणि किर्ती जी आतापर्यंत त्याचं निरीक्षण करत होती तीही त्याच्याकडे विचीत्रपणे बघू लागली.
***


           इकडे मात्र माधवीच्या दुःखात आणखीच भर पडली. कारण इतक्या वर्षांनी भेटुन देखील सरळ सरळ त्याने तिला इग्नोर केलं होतं. अजुनही तोच ॲटीट्युड आहे. पण त्याला इतक्या वर्षांनी समोर अन् तेही आनंदी पाहून तिला बरच समाधान मिळालं होत.

उन गमों की औकात ही क्या
जो तुम्हे बिखरने पर मजबूर कर दे....
तेरी हसी युही बरकरार रहे
चाहे मौत भी हमारा इंतेझाम क्यू न कर दे...

        "मम्मा... " मनूच्या आवाजाने ती भानावर आली.

      "व्हाय आर यू क्राईंग?" मनू जी आतापर्यंत तिच्याकडे बघत होती तिने माधवीच्या जवळ येत विचारलं.

        "काही नाही बेटा, बस् तो तुझा फ्रेंड खूपच गोड आहे हा... आणि मला तर खूप आवडला." तिने मनूला छातीशी कवटाळल अन् डोळे समाधानाने मिटून घेतले. तिला समाधान होत त्या दोघांनाही भेटण्याचं... जे दोघेही तिचा जीव की प्राण होते.
***

             इकडे किर्ती झोपल्या झोपल्या विचारात पडली होती. कारण आज इतक्या वर्षांनी दोघे समोरासमोर असताना देखील एकमेकांशी बोलले नाहीत की साधं ओळखही दाखवली नाही म्हणजे त्यावेळचा आपला प्लॅन आजही व्यवस्थीत चालतो आहे. आय एम रिअली सॉरी शंतनु आणि माधवी. काय करणार माझ्या प्रेमाला मिळवण्यासाठी हाच एक पर्याय होता. पण.. पण फक्तं विनू साठी त्याने माझ्याशी लग्न केलं.इतकं प्रेम करूनही तो आजवर माझा कधीचं झाला नाही. ना कधी आमचं पती पत्नीचं नातं त्याने पुढं नेलं. आजही तो मला इग्नोर करतो. तुझ्यामुळेच का? अन् तस असेल तर नक्कीच मला आणखी काही प्लॅन करावा लागेल. आय एम सॉरी.. किर्ती इमोशनल झाली होती अन् तिच्याच नशिबाला दोष देत होती. कधीकाळी तिने अन् शंतनुने आयुष्यभर साथ देण्याच्या आणाभाका घेतल्या होत्या. त्याच पहिलं प्रेम ती अन् तिचं पहिलं प्रेम तो होता. पण फक्तं एक डाव मद्ये पडला अन् दोघांनाही दूर व्हावं लागलं...

             विचार करतच होती की बेडरूमचा दरवाजा उघडण्याचा आवाज झाला तसे तिने ओलावलेले डोळे मिटून घेतले. शंतनु बेड जवळ आला अन् त्याने झोपलेल्या विनूच्या कपाळावर ओठ टेकवले. तिच्याकडे एक कटाक्ष टाकून तो बाल्कनीत जाऊन बसला. आज त्याला फक्तं आणि फक्तं तिच्या आठवणीत जगायचं होत. तिला इतक्या वर्षांनी समोर पाहून त्याला कितीतरी आनंद झालेला पण त्याने महतप्रयासाने त्याला रोखल होत. कितीतरी भावना मनात उचमळून आलेल्या पण सराईतपणे त्याने त्या भावनांना आळा घातला होता. एक क्षणी तर तिला जाऊन पट्कन मीठी मारावी असच झालं होत पण... पण ती.. ती तर किती आनंदी होती. त्या अक्सीडेंट मधे ती गेली असं समजून त्याने किती स्वतःला त्रास करून घेतला होता... अन् आज तर ती इतक्या वर्षांनी भेटली ते ही इतकी आनंदी.. तिच्या मुलीसोबत... समोर टेबलवर पडलेली सिगारेट त्याने पट्कन शिलगवली अन् एक दीर्घ झुरका घेवुन खुर्चीला मागे डोके टेकवून कितीतरी वेळ  तसाच डोळे मिटून बसला.
***

फ्लॅशबॅक....

        "पण सर मी एका मुलीवर प्रेम करतो. मग मी माधवीशी लग्न कस करेन. अन् यासाठी ती सुध्दा तयार नाही. "शंतनु टेन्शन मद्ये समोर स्ट्रेचर वर मृत्यूशी झुंज देत असलेल्या किरण काकांना बोलत होता. माधवी देखील समोर सुन्न अवस्थेत बसली होती. तिच्या तर डोळ्याचं पाणी कधीच आटून गेलं होतं.

         " बाबा, मी हे लग्न नाही करणार. मला अजून माझं शिक्षण पुर्ण करायचं आहे. तुम्हाला मला डॉक्टर होताना बघायचं आहे ना... मग तुम्ही असे का बोलत आहे. मी कधीच लग्न करणार नाही अन् तुम्हाला सोडूनही कधी जाणार नाही." माधवी रडत रडत बोलत होती.

        " हे बघ बाळा, आता माझा भरवसा नाही. जितका माझ्यावर देखील माझा विश्वास नाही तितका शंतनु वर आहे. शंतनु... घेशील ना माधवीची जबाबदारी? माझ्यानंतर कुणीच नाही रे तिचं या जगात. आई तर लहानपणीच गेली अन् आता... " त्यांना मधेच हुंदका फुटला अन् माधवी देखील हुस्मुसून रडू लागली. शंतनु चे डोळे देखील ओलावले होते.

      " तुझ्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. तुला काहीच करायची गरज नाही फक्त तिच्याशी लग्न करून तिला आधार दे, तिचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत... तिच्यासाठी मी सगळ करून ठेवलं आहे... फक्त तिला आता आधाराची गरज आहे.  या शेवटच्या क्षणाला तुझ्याकडे भीक मागतोय मी प्लीज" त्यांचं दुःख शंतनुला बघवत नव्हत. त्या मिशनमद्ये आय. पी. एस. किरण चव्हाण गोळी लागून जखमी झाले होते पण ती गोळी त्यांच्या जीवावर बेतली होती. छातीत घुसल्याने परिस्थीती क्रिटिकल होती. म्हणून त्याने जास्त आढेवेढे न घेता लग्नाला होकार दिला अन् तिचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत तिचा आधार होण्याचं आश्वासन दिलं. दोघांचे हात एकमेकांच्या हातात देवून त्यांनी तिथेच शेवटचा श्वास घेतला...

           शंतनु देशमुख एक अंडरकवर ऑफिसर होता अन् हे सिक्रेट डिपार्टमेंट आणि किरण काका सोडुन कोणालाच माहित नव्हत. तो त्यांना ज्युनियर होता अन् म्हणूनचं त्यांचा प्रत्येक शब्द न शब्द त्याच्यासाठी ऑर्डरच असायची. एक खास नातं दोघांमध्ये होत. शंतनु नेहमीचं त्यांच्याकडे एक आदर्श म्हणून आदराने पहायचा. पहिल्यांदाच ते त्याच्याकडे काहीतरी मागत होते अन् त्याला इच्छा असूनही नकार देता येत नव्हता. त्याचं अन् माधवीच लग्न एक डील म्हणूनचं झालं कारण त्याला तिचं शिक्षण पूर्ण करून तिला स्वताच्या पायावर उभा करायची होती तर तिनेही वचन दिलं होतं की ती त्याच्या पर्सनल लाईफ मद्ये कधीच इंटरफेयर करणार नाही की त्याने कुणावरही प्रेम केलं तरी तिला काहीच फरक पडणार नाही. एकदा तिचं शिक्षण पूर्ण झालं की ती त्याला सोडून जाणार होती... पण घडलं होतं ते काही वेगळचं...

क्रमशः....

( कोण आहे ती मुलगी जिच्यावर शंतनु प्रेम करत होता?... भाग वाचून कल्पना आलीच असेल.. शंतनु, माधवी अन् किर्ती बद्द्ल तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल का?... वाचत रहा)