Login

रंग बदलत्या नात्यांचे भाग ७

हॅलो...
   भाग ७

 "हॅलो...  "

         "हॅलो कोण?"... विनू.

      बराच वेळ पलीकडून काहीच आवज येतं नाही. म्हणून विनू फोन ठेवून जायला वळतो तोच पुन्हा एकदा रिंग वाजते.

          "हॅलो... कोण आहे? आणि बोलत का नाही?" विनू.

         इकडे मात्र तिला काय बोलावं सुचत नव्हतं. शब्द घशातच अडकले होते. डोळ्यातुन मात्र गंगा जमुना वहात होत्या.

            "हे बघा, कोण आहे तुम्ही निदान बोला तरी?" विनू वैतागून बोलतो.

         "हॅलो मी..." पलिकडून तिचा कातर आवाज कानावर पडतो.

        "हॅलो, तुम्ही अँटी का?" विनू

        "हो बेटा... मी तूझी.... " पुढें बोलणार पण मधेच तिने सावरलं.

      " बोला ना इतकं घाबरत का आहे.?" आर यू ओके? " विनू.

   " हो हो ठिक आहे मी, तू कसा आहेस बाळ? जेवण केलंस? आणि आज मी तुला भेटायला येणार आहे स्कूल मद्ये. तुला खायला काय आणू? कोथिंबीर वडी आणू ना? आवडते ना तुला?..." माधवी आनंदाच्या भरात बोलत होती आणि आता मात्र डोळ्यातुन वाहणाऱ्या अश्रूंच रुपांतर आनंदाश्रूमध्ये  झालं होतं अन् त्याच ओघात ती बोलत होती.

         "हो... मला आवडते कोथिंबीर वडी, पण तुम्हाला कुणी सांगितलं की मला कोथिंबीर वडी आवडते म्हणून?" विनू ने विचारलं

       "अरे बाळा मी तूझी.... अम्म ते.. ते मला मनू ने सांगितलं की तुला कोथिंबीर वडी आवडते." कसबस तिने र ला ट जोडलं.

        "अँटी पण मी तिला सांगितलच नाही." विनू

       आता काय बोलावं तिलाच सुचेना.

      "सांगितलं असशील, पण तुझ्या लक्षात नसेल." माधवी.

      "पण..."

"अरे बाळा आवडते ना मग मी आणत आहे ओके.. बाकी मला माहित नाही. बर आता ठेवते फोन." माधवी कॉल कट करते आणि इकडे विनू मात्र विचारत पडतो..

      "आज काल अँटी इतक्या पॅनिक का होत आहेत?"...

  
            "मनूला आवडतात कोथिंबीर वड्या, मग तुला पण आवडणारच ना आणि स्पेशली तुझ्या बाबांना..." माधवी भूतकाळात हरवत मनातच बोलते.
***
  

              आज दुपारी ती मनूच्या स्कूल मद्ये जाणार होती. लंच ब्रेक झाला तस ती पायीच चालत निघाली. तसही स्कूल तिच्या ऑफिस पासून थोड्याच अंतरावर होत. दहा वर्षे जरी तिने दिल्लीला एकांतात घालवली असली तरी मुंबई मधल्या त्या रहदारीत कस वावरायचं हे ती बालपणापासून शिकली होती आणि आजही ती बिनधास्त होती. चौपदरी रस्त्याच्या फुटपाथ वरून ती चालत होती अन् अचानक चालता चालता ती मधेच थांबली आणि झरकन मान वळवून तिने मागे पाहिलं... पण तिथे तर कोणीच नव्हतं. आजुबाजुला वळून पाहिलं पण कामाच्या लगबगीत असणारी तुरळक माणसच तिला दिसली.

               कधीपासून तिला शंका येतं होती की, कोणीतरी आपला पाठलाग करत म्हणून तिने मागे वळून, कानोसा घेऊनही पाहिलं पण तिथे तर कोणीच नव्हतं. आता ती झपाट्याने पावले टाकू लागली आणि मागूनही कुणीतरी तितक्याच वेगात येत असल्याचा भास तिला झाला. एव्हाना ती मनूच्या स्कूलमध्ये जाऊन पोहोचली होती. गेटमधून आता ती आत शिरली आणि तिच्या पाठी येणारं कुणीतरी तिथेच नजरेआड झालं...
***

                "हे, हॅलो चॅम्प.. चला मी आज टिफीन आणला आहे. म्हणूनच मुद्दामहून सकाळी मनू जवळ दिला नाही" माधवी.

       "हे मम्मा... आय नो... पण आज काय स्पेशल आहे का टिफीनला?" मनू बोलली आणि माधवीने मनातच डोक्यावर हात मारून घेतला तर विनू तिच्याच तोंडाकडे बघत होता. ती मात्र कसणुस हसली.

        "अँटी, तुम्ही तर बोलला की तुम्हाला मनू ने सांगितलं." विनू.

       "मी कधी सांगितलं?" मनू.

    "अरे बाळा मनूला आवडतात ना कोथिंबीर वडी मग मी गेज केलं की तुलाही आवडतं असतील. बर ते जाऊदे आधी खाऊन सांग कश्या झाल्या आहेत वड्या. एक मिनिट " असं म्हणत तिने एक वडी उचलून विनूला भरवली.

       "कशी आहे?" माधवी

    "उम्म... वाव.. खूप खूप मस्त. मी सगळया खाऊ?" विनू ने विचारलं

     "अरे खा ना बाळा तुझ्यासाठीच आणल्या आहेत." त्याला वड्या आवडलेल्या पाहून माधवीला कितीतरी आनंद झाला होता.

       "आणि मला?" इकडे तोंड फुगवून बसलेली मनू मधेच म्हणाली.

       "ह्ममम, एक मिनिट" माधवी तिला बॅग मधून दुसरा टिफीन काढून देते.

        "हे काय?" मनू

"जे त्या टिफीन मधे आहे तेच"... माधवी.

     "त्याला कस भरवल तो काय तुझा बेबी आहे. मी तूझी बेबी असून मला भरवत नाही" मनू थोड्याशा नाराजीने आणि रागाच्या भरात बोलून गेली. अन् माधवी ला थोड वाईटच वाटलं.

      "कूल डाऊन मनू... आय एम लाईक युअर बिग ब्रो." विनू तिचे गाल खेचत म्हणाला अन् इकडे माधवीच्या हृदयाला त्याचे शब्द भिडले.
***

           "विनू... विनू.. " किर्ती किचनमधून आवाज देत बाहेर आली.

           "काय झालं मम्मा? " विनू जो हॉल मधे टीव्ही बघत बसला होता.

          "काय झालं सूनबाई? इतक्या का ओरडत आहात? व्हीलचेअर वर बसलेल्या सुनंदा बाई (आजीसाहेब) म्हणाल्या. वय बरच झालं होत पण रुबाब आणि आवाजाची धार मात्र अजुनही तीच होती.

           "काय नाही आजीसाहेब, आज विनू ने दिलेला टिफीन खाल्ला नाही ना म्हणून त्याला विचारते आहे." किर्ती

         "विनायक... काय म्हणत आहेत तुमच्या आई? तुम्ही आज जेवण केलं नाहीत, मग उपाशीच आहे का? तब्येत ठीक नाही का?" आजीसाहेब त्याच्याकडे येत विचारतात.

      "काय आहे आजीसाहेब? माझी तब्येत ठीक आहे आणि मी दुपारी जेवलो पण होतो." विनू तुटकपणे उत्तर देतो आणि पुन्हा त्यांच्याकडे दुर्लक्ष करून टीव्ही बघायला लागतो. का कुणास ठाऊक पण त्याला आजीसाहेब आवडायची नाही. त्यांची हुकूमत त्याला पटायची नाही.

            "विनू, आजी साहेब विचारत आहेत ना नीट आणि जेवलास म्हणजे कूठे जेवलास याआधी तर कधी नाही टिफीन परत आणलास?" किर्ती.

        "मम्मा... किती ते प्रश्न? अग आज अँटी कोथींबीर वड्या घेवुन आली होती. मी मनू जेवलो सोबत. खूप मस्त होत्या वड्या आणि अँटी पण खूप चांगल्या आहेत. मनू इतकंच प्रेम करतात माझ्यावर." विनू आनंदाने सांगत होता आणि इकडे मात्र किर्तीच्या तळपायाची आग मस्तकात गेली होती.

            "कितीवेळा सांगितलं तुला विनू,  अश्या बाहेरच्या लोकांशी जास्त बोलायचं नाही." किर्ती रागाने म्हणाली आणि इकडे आजीसाहेबांच्या डोळ्यात पण आग उतरली होती. अँटी म्हणजे कोण हे कधीच तिला किर्ती कडून कळलं होत.

          "किर्ती लक्ष ठेव त्या पोरावर आणि त्या बाईवर पण. आज तुझा पोरगा तुझ्याकडुन हिसकावून घेत आहे, उद्या तुझा नवरा.." पुढे काही बोलणार तोच दारातून शंतनु येताना दिसला तशी ती गप्प बसली. विनू मात्र दोघींकडे प्रश्नार्थक नजरेने बघत होता. त्या काय बोलत आहेत हे त्याच्या डोक्यावरून जात होत.
***


         सायंकाळचे सात वाजत आलेले. माधवी अजून हॉस्पीटल मधेच होती. एकदा राऊंडला जाऊन ती फ्रेश झाली आणि पुन्हा तिच्या केबिन मध्ये येवून बसली. तेवढ्यात केबिन मधली लाईट गेली... गेली नव्हे घालवली हे तिच्या लक्षात आलं कारण लाईटच स्विच ऑफ केल्याचा आवाज तिला आला होता. तिने अप्रोन च्या खिशातील कात्री हातात घेतली आणि मोबाईल ची टॉर्च ऑन केली. तोच तिला एक सावली तिच्याकडे सरकताना दिसली. आधीच सकाळी कुणीतरी पाठलाग करत होत म्हणून आता ती घाबरली होती. काही कळायच्या आतच तिच्या डोळ्यावर कुणाचे तरी दोन हात विसावले तोच लाईट पण ऑन झाली.

         "हॅलो डॉक्टर साहेब" एक बराच ओळखीचा आवाज तिच्या कानावर पडला. अलगद डोळ्यावरचे हात बाजूला झाले अन् ती व्यक्ती तिच्या समोर येवून उभा राहिली. माधवी मात्र आ वासून त्या व्यक्तीकडे कितीतरी वेळ तशीच बघत होती...

क्रमशः.....

(कोण असेल? वाचत रहा...)