Login

रंग बदलत्या नात्यांचे भाग ८

समोर ती उभी होती.
भाग ८

समोर ती उभी होती. साधारण सहा फूट उंची, गोरा रंग,काळेभोर डोळे, दाटसर पापण्या, चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा तिचा आत्मविश्र्वास, एखाद्या पैलवानाला लाजवेल अशी मजबूत शरीरयष्टी पण तितक्याच हळव्या मनाची... नाजूक... अन् विशेष म्हणजे तिच्या राकट शरीरावर शोभून दिसणारी खाकी वर्दी , त्या वर्दीतला तिचा रुबाब.. त्याचीच तर भुरळ माधवीला पडलेली अन् म्हणूनच कितीतर वेळ ती तिच्याकडेच बघत होती.

        "काय मग डॉक्टर साहेब आवडलं का सरप्राइज?" ती

         "वर्षू..." माधवी उठून तिच्या जवळ गेली आणि डायरेक्ट तिला मीठीच मारली. दोघींचे ही डोळे भरून आले होते. दोघी मैत्रिणी अगदी जिवाभावाच्या. पण परिस्थितीने त्यांना वेगळं केलं होतं. आज कितीतरी वर्षातून भेटल्या होत्या.

        "अग ये रडू... बस, बस आधी खाली. आणि काय फायनली आमची मधू डॉक्टर झालीच."वर्षा.

       "ओ हॅलो मिस इन्स्पेक्टर वर्षा गायकवाड... या वर्दी मधे हे असल सरप्राइज? जाम घाबरले मी यार" माधवी डोळे वटारून म्हणाली.

      "तुला माहित आहे ना माझं सरप्राइज कस असत? आणि सकाळी तर किती घाबरली होतीस माय गॉड.." वर्षा हसत म्हणाली.

        "म्हणजे माझा पाठलाग तू करत होतीस सकाळी?" माधवी.

      "हो " वर्षा.

     "मी काय चोर आहे अशी पाळत ठेवायला? का तू गुंड आहेस?" माधवी

     "नाही ग, तू आल्याची खबर सरांकडून मिळाली आणि म्हंटल यावं भेटून. किती वर्ष झाली आपणं भेटलो नाही, ना ही तुझा काही कॉन्टॅक्ट, होतीस कूठे इतके दिवस आणि अशी अचानक का गेलीस मुंबई सोडुन?" वर्षा.

         "जेव्हा मनापासून निभावलेली नाती रंग बदलायला लागतात तेव्हा स्वतःहून त्यांच्यापासून दूर जायला हवं" माधवी कठोर आवाजात म्हणाली.

         "मधू, तू खूप काही सोसलं आहेस. आई वडिल या जगात नसताना एकट्या मुलीनं या समाजात जगताना काय काय सोसावं लागतं हे मला माहित आहे" बोलताना तिचा कातर आवाज मधूला हेलावून गेला अन् तिने पट्कन तिला मीठी मारली.

        "वर्षू, काका- काकी गेल्यापासून तूही खरचं खुप सोसलय ग. बाकी जाऊदे आता तो विषय नको. मला सांग काव्या (वर्षाची बहिण)कशी आहे?" माधवी.

     "ती या जगात नाही आता." वर्षा खाली मान घालून म्हणाली.

      "काय???? काय बोलतेय तू वर्षू?"  माधवी शॉक मधे येवून विचारते.

      " हो, हे खरं आहे" वर्षा.

    " अग पण..." माधवी.

        "मधू, पुन्हा कधीतरी सांगेन तुला. आता तुला इन्विटेशन द्यायला आले होते. हे घे " वर्षा तिच्या हातात लग्न पत्रिका ठेवते.

        "कोणाची पत्रिका आहे " माधवी ते कार्ड हातात घेवून उघडायला लागते.

        "बघ तर उघडून " वर्षा.

    "हे, नीलच लग्न आहे? पण?..." तिच्या प्रश्नावर वर्षा ने भुवया उंचावल्या.

     "अग पण इथे प्राचीच नावं आहे. तो तर आशू वर प्रेम करत होता ना? मग?" माधवी

    " ह्मम... बडी लंबी कहाणी हैं... कभी फुरसत मे बतायेंगे. बाय द वे .. तुला इनव्हाइट केलं आहे अलरेडी. तुझा नंबर दे त्याला सेंड करते. आणि हो देशमुख फॅमिली पण येणार आहे. शंतनुच्या खास मित्राचं लग्न आहे म्हणजे ते हमखास येणार." वर्षा तिच्या मनाचा अंदाज घ्यायचा प्रयत्न करते.

       " मग मी येणारच नाही" माधवी

      "अजिबात असं करायचं नाही. नाहीतर हातात बेड्या घालून घेवुन जाईन. आणि प्राची पण नाराज होईल ग. तुला पाहून सगळ्यांनाच आनंद होईल. " वर्षा.

       "बघू विचार करून सांगते." माधवी.

"ओके, मी निघते आता. पुन्हा भेटू." वर्षा जायला निघते.

       "वर्षू, उद्या संडे आहे. घरी येशील ना डिनरला. खूप बोलायचं आहे तुझ्याशी." माधवी.

        "हो डॉक्टर साहेब नक्की येते." पण आता जाऊदे डुटीवर आहे." वर्षा.

       "ओके, बाय" वर्षा निघून जाते अन् इकडे माधवी विचारात पडते, लग्नाला जावं की नको...
***

           
           आज संडे असल्याने माधवी घरीच होती. मनू अजुनही झोपली होती.पेपर हातात घेवून ती चहा घेत होती की डोअर बेल वाजली.

         "मधू जरा बघ कोण आलं आहे" मावशी किचन मधून आवाज देते. मधूने दरवाजा उघडला अन् समोर किर्तीला पाहून तिच्या कपाळावर आठ्याच जाळं पसरल.
  
       "आपणं?"  माधवीने दारातूनच विचारलं.

    "आत येवू का"? किर्तीने इकडे तिकडे पहात विचारलं अन् काही बोलायच्या आधीच ती आत देखील आली.

      "काय काम होत का?" माधवी.

"मला तुझ्याकडे काय काम असणार" किर्ती कुत्सितपणे म्हणाली. तिचा आवाज ऐकून आता मावशी ही बाहेर आली.

       "म्हणूनच विचारत आहे, येण्याचं कारण?" माधवी शांतपणे म्हणाली.

       "हे बघ माधवी, जास्त भोळेपणाचा आव आणू नको. तुला आताच वॉर्निंग देतेय, माझ्या मुलापासून लांब राहायचं. तुला काय वाटल मला कळत नाही की, त्याच्या माध्यमातून तुला पुन्हा शंतनुच्या लाईफ मधे यायचं आहे. पण त्याआधी गाठ माझ्याशी आहे आणि मी त्याची बायको आहे, समजल?" किर्ती तिच्यापुढे बोट नाचवत बोलत होती.

        "ओह! रिअली मिसेस देशमुख? घाबरता मला? नका घाबरु कारण मला तुमच्या लाईफ मधे परत येण्याचा काहीच इंटरेस्ट नाही. आणि राहिली गोष्ट तुमच्या मुलाची तर तो ॲडॉप्टेड आहे हे मला चांगल माहित आहे. उगाच मला डिवचू नका. नाहीतर जे काही घडलं होतं त्याला पुन्हा उकरायला मला वेळ लागणार नाही." माधवी तिच्यावर नजर रोखत म्हणाली आणि किर्ती क्षणात गार झाली. रागातच ती तिथून बाहेर पडली.
***

           कधी न्हवे तो शंतनु आज लवकर घरी आला होता. चार चार दिवस तो कामासाठी बाहेरच असायचा. त्याच कामच तस कॉमप्लीकेटेड होत. अन् त्यात त्याच्या जीवाची बरीच जोखीम होती. खर तर मुद्दामहून तो एक्सट्रा काम करायचा. घरी आलं की त्याला घर खायला उठायचं. एक विनू सोडलं तर तो कुणाशीच जास्त बोलायचा नाही. माधवी जेव्हा त्याच्या आयुष्यातून निघून गेली आणि जेव्हा त्या दोघांचं बाळ... त्यांचं बाळ जेव्हा या जगाला सोडुन गेलं तेव्हा तो खूप एकटा पडला होता. पण किर्ती ने त्याला सावरलं अन् एका अनाथ आश्रमातून विनूला दत्तक घेतलं. आणि त्याच्यासाठीच दोघांनी लग्न देखील केलं.  केवळ विनूसाठी.

           "आज लवकर आलास शान?" अनिता म्हणजे त्याची आई विचारते.

         "हो, पुढच्या आठवड्यात आपणं पुण्याला जातोय सगळे." शंतनु सोफ्यावर बसत सांगतो.

        "हो, नीलच लग्न आहे ना" अनिता.

     " हो. इंविटेशन कार्ड दिलं आहे आणि सकाळीच फोन आला होता त्याचा. आपणं सगळे जातोय." शंतनु.

        "पण, आजी साहेब?" अनिता विचारते.

      "मी नाही येणार, तुम्ही जा. मी आहेच घरी. तसही मला चालता कूठे येतं?" आजी साहेब हॉल मधे येतं बोलतात.

        "हो, चालेल." अनिता.

    "बरं विनू कुठं आहे आणि किर्ती?" शंतुन विचारतो.

       "तो झोपला आहे आणि किर्ती बाहेर गेली आहे" अनिता बोलते तोच बाहेर गाडी थांबल्याचा आवाज येतो आणि किर्ती आत येते.

        "कुठे गेला होता सुनबाई?" आजी साहेब.

     "मैत्रिणीला भेटायला गेले होते." किर्ती ची नजर शंतनु वर पडते. अन् ती तशीच आत निघून जाते. जरी पती पत्नी असले तरी सगळ्यांसमोर होते आणि पती पत्नी पेक्षा ते विनू चे आई बाबा होते.
***

           रात्रीचे आठ वाजले होते. आज वर्षा माधवीच्या घरी डिनरसाठी आली होती. जेवण करता करता गप्पा चांगल्या रंगल्या होत्या.

         "माऊ तू खूप क्यूट आहेस. आणि किती चांगली आहेस? इतके चॉकलेट्स मला घेवुन आली. उम्हा.." मनू वर्षाचा फ्लायिंग किस देते.

         "काय ग, आधी सांगितलं नाहीस. भेटलो तेव्हा तुला ही गोंडस परी पण आहे. पण मधू तू तर..." वर्षा.

"हो, हो सांगते सगळ... आधी जेवून तर घे." माधवी.

        सगळ्यांचं जेवण झालं आणि मावशी मनूला घेवुन झोपायला गेली. आज वर्षांचा मुक्काम माधवी कडेच होता म्हणून दोघी बाहेर गॅलरी मधे गप्पा मारत बसल्या.

      "आता सांग काय घडलं तूझ्या लाईफ मद्ये, प्लिज काही लपवू नकोस मधू. मला तुझ्यावर विश्वास आहे." वर्षा तिच्या खांद्यावर हात ठेवून डोळ्यांनीच सांगण्याचा इशारा केला. अन् माधवीने सांगायला सुरवात केली....

क्रमशः....
( काय घडलं असेल भूतकाळात, जाणून घ्यायला आवडेल का? वाचत रहा...)