Login

रंग बदलत्या नात्यांचे भाग ९

माधवीचा भुतकाळ...
भाग ९


माधवी सांगू लागली....
आमच्या फॅमिली डॉक्टरांनी सांगितलं होतं की मी कधीच आई होऊ शकणार नाही. त्यावेळी मी खरचं एक चूक केली. पुन्हा कुठल्या दुसऱ्या डॉक्टरांकडे चेक केलं नाही. वाटलं डॉक्टर जोशी जवळच्या फॅमिली डॉक्टर आहेत मग त्या खोट का सांगतील. मग शेवटी नाईलाजाने आम्हीं सरोगसी करायचं ठरवलं. मी आणि शंतनु ने सगळया टेस्ट दिल्या. दोघांचे एग्ज फर्टीलायझ करून मी ज्या बाईला म्हणजे मिसेस मेहताला सरोगसी साठी निवडली होती तिच्या गर्भात प्रत्यारोपण करायचं ठरल. पण जेव्हा हे सगळ झालं तेव्हां मी आणि शंतनु तिला पाहायला गेलो तर आमच्या पायाखालची जमीनच सरकली. मिसेस मेहता तर तिथे नव्हतीच. तिथे.. तिथे तर तिच्या जागी किर्ती झोपली होती आणि तिच्या शेजारी आजी साहेब बसल्या होत्या. " माधवी.

      "म्हणजे?" वर्षा.

      "म्हणजे आमचं बाळ किर्तीच्या पोटात वाढणार होतं." माधवी.

        "काय? पण यासाठी तर मिसेस मेहतांना चुज केलं होतं ना मग?" वर्षा.

        "आम्ही पोहचायच्या आधीच हे सगळ झालं.. झालं नव्हे आजीसाहेबांनी जाणून बुजून केलं. " माधवी.

        "मग तू त्यांना जाब विचारायला हवा होता ना? कारण होणाऱ्या बाळाच्या आई वडिलांच्या विरोधात जाऊन त्यांच्या इच्छेने सरोगसी करण्याचा प्रयत्न केला गेला होता मग तू तर केस देखील करू शकत होतीस. पण तू असं काहीच केलं नाहीस. का?" वर्षा.

         "मी जाब विचारला त्यांना आणि केस करेन म्हणून देखील सांगितलं पण शंतनु ने मला अडवल. मला वाटलं शंतनु याला विरोध करेल पण तस काहीच झालं नाही. किर्ती काय आणि मिसेस मेहता काय मला दोघीही सारख्याच होत्या पण या सरोगसी च्या माध्यमातून ती शंतनुशी जवळीक साधायचा प्रयत्न करत आहे हे तेव्हाच माझ्या लक्षात आलं, मी पुरती तुटुन गेले होते. खरंतर शंतनु वर माझा विश्वास होता पण." माधवी.

       "पण काय?" वर्षा.

     "आजीसाहेब म्हणाल्या, बाहेरची बाई कशी असते माहित नाही. त्यापेक्षा घरातीलच असेल तर बरं होईल. म्हणजे किर्ती खानदानी आहे, सुसंस्कारी आहे शिवाय त्यांच्या नात्यातील आहे. एकदा तुमचं बाळ तुम्हाला तुमचं बाळ देवून ती जाईल निघून. ती फक्त सरोगेट मदर आहे हे लक्षात असूद्या. आणि शंतनु देखील मला हेचं पटवून देत होता." माधवी.

        "काय? सुसंस्कारी आणि किर्ती? माय फूट" वर्षा तोंड वाकड करत म्हणाली.

        "तुला तर माहीतच आहे ना की ती शंतनुच्या आत्याची मुलगी आहे आणि शंतनुच प्रेम देखील होत तिच्यावर." माधवी.

      "पण ती गोष्ट लग्नाआधीची झाली, लग्नानंतर तो तुझ्यावर किती प्रेम करत होता. मला माहित आहे आणि तुला आताही सांगतेय तो आजही तुझ्यावर खूप प्रेम करतो. मी पाहिलं आहे त्याला. खूप डिस्टर्ब असतो तो. ड्यूटी वर असताना कोणाशी बोलत नाही. बडबड करणारा शंतनु हल्ली खूप शांत झाला आहे ग. तो चार चार दिवस घरी देखील जात नाही. तूझ्या जाण्याचा त्याच्यावर खूप परिणाम झाला आहे. पण तू त्याला सोडून का गेलीस?" वर्षा.

          "शेवटी माझी ईच्छा नसताना मी मनाविरुद्ध हे सगळ स्वीकारलं. तिची काळजी घेतं राहिली आणि ती सतत मला ब्लेम करत राहिली. तिची मनमानी, होऊ लागली. अर्थात मला काहीच प्रॉब्लेम नव्हता कारण ती आमच्या होणाऱ्या बाळाची सरोगेट आई होती. तिला काय हव नको ते बघायचो. तिच्या सगळया इच्छा पूर्ण करायचो. पण हळूहळू शंतनु माझ्यापासून दूर होत गेला हे मला कळलंच नाही. मला आणि शंतनुला देखील तिची काळजी वाटायची. आम्ही तिला जपत होतो आमच्या बाळासाठी. पण एक दिवस नको ते घडलं, अचानक तिचं मिसकॅरिज झालं." माधवी.

       "व्हॉट, काही प्रॉब्लेम झाला होता का?" वर्षा.

      "माहित नाही पण या सगळया साठी तिने मला जबाबदार धरलं की मी तिला डीमोटिव्ह केलं, मी माझ्या... माझ्या बाळाला मारल" आता माधवी तिच्या खांद्यावर डोकं ठेवून रडू लागली. वर्षाला देखील खूप वाईट वाटल. तिला माहित होत माधवी कशी आहे. ती असं काहीच करणार नाही.

         "वर्षू... मी नाही ग हे केलं. मीच माझ्या बाळाला का मारेन. सांग ना तू " माधवी अजूनच जास्त रडू लागली.

          "शू श्.... शांत हो मधू.  मला माहित आहे तू असं काहीचं करणार नाही. पण मनू? तिचं काय?" वर्षा

         "किर्तीचं मिसकॅरिज झालं आणि तिची तब्येत पार खालावली. आजी साहेब मला खूप बोलल्या. 'एका आईला तिचं बाळ गमावण्याच दुःख काय असत तुला काय कळणार' हे शब्द आजही माझ्या कानात घुमत आहेत. वाटल शंतनु तरी साथ देईल पण तोच मला बोलला ' अनाथ लोकांना नात्यांची आणि माणसांची किंमत कळेल तरी कशी ?' तेंव्हा मात्र माझे डोळे उघडले की आपली किंमत काहीच नाही. म्हणून मी त्या घरातून बाहेर पडले. कुठं जायचं माहित नव्हत पण स्वाभिमान दुखावला होता. नात्यांचे रंग बदलताना मी स्वतः डोळ्यांनी बघितल म्हणूनच मी निघाले आणि वाटेत माझा ॲक्सीडेंट झाला" वर्षा.

"काय, मधू इतकी मोठी गोष्ट तू माझ्या पासून लपवलीस?" वर्षा.

"पुढे काय झालं माहित नाही पण मी एका हॉस्पिटल मध्ये होते. त्या नर्सने मला बाळ सुखरूप असल्याचं सांगितलं आणि मी शॉक झाले. मी विचारलं कोणाचं बाळ? तेंव्हा ती नर्स म्हणाली, 'तुमच्या पोटातलं बाळ चांगल आहे. काळजी घ्या. ह्या मेडिसीन घ्या. अन् आता बाहेर फिरू नका.' काय करावं काय बोलावं कळत नव्हतं. इतका आनंद झालेला पण एका विचाराने त्या आनंदावर विर्जन पडलं... मी जास्त काळ प्रेगनन्सी कॅरी करु शकत नाही. त्यासाठी मी एबल नाही. असं तर डॉक्टर जोशींनी सांगितलं होतं. मी तेंव्हा दिल्लीला मावशीकडे आले आणि नव्या डॉ. ट्रीटमेंट सुरू केली. नव्याने सगळ चेकिंग झालं आणि त्या डॉ सगळ नॉर्मल सांगितलं. ' काहीचं प्रॉब्लेम नाही, तुम्ही नॉर्मली आई होऊ शकता.' आधीचे रिपोर्ट्स जे मोबाईल मधे ते पूर्ण चुकीचे होते. तेंव्हा मला संशय आला की डॉ जोशीनी खोटं तर नाही सांगितलं,? की त्यांच्याकडून वदवून घेतलं." माधवी.

"माय गॉड ही किर्ती बरीच चालू आहे वाटतं." वर्षा.

"किती अन् काय काय सोसलं माझ मला माहित. नऊ महिने कुणाच्या तरी आधाराची गरज असते पण ज्याच्यावर जीवापाड प्रेम केलं त्याचा देखील आधार नव्हता. मावशीने खूप साथ दिली. माझी डिलिव्हरी झाली आणि मला दोन गोंडस जुळी झाली" माधवी.

"काय दोन जुळी? पण मनू तर एकटीच आहे " वर्षा.

"मी जन्मतःच माझ्या दुसऱ्या बाळाला अनाथ आश्रमाला दिलं." माधवी.

"कुठल्या आश्रमात?" वर्षा.

"इथेच मुंबई मध्ये " माधवी.

"तू भेटलीस तुझ्या बाळाला आता?" वर्षा.

"हो " माधवी.

"त्याला अडॉपट केलं आहे " माधवी

"कुणी? " वर्षा

"मि.... " वर्षा पुढें काही बोलणार तोच तिच्या फोन ची रिंग वाजते त्यामुळे ती बोलायचं थांबते.

"इतक्या रात्री कोण कॉल करत आहे?" वर्षा विचारते.

"माहित नाही , अन नोन नंबर आहे." माधवी.

"उचल " वर्षा तिला कॉल उचलायला सांगते. अन् माधवी स्पीकर वर टाकते.

"हॅलो... कोण?" माधवी

"मनू कोणाची मुलगी आहे?" पलिकडून एक नशीला आवाज येतो.

"हॅलो आपण कोण?" माहित होत तरीही विचारते.

"मनू कोणाची मुलगी आहे? बाप कोण आहे तिचा" आता पलीकडचा आवाज थोडा रागीट आणि चढलेला वाटतं होता. ...

क्रमशः...

( कोण असेल कॉल वर? कल्पना आलीच असेल ना.. वाचत रहा)