रंग माळियेला...( भाग १८ वा)
©® आर्या पाटील
सदर कथा पूर्णपणे काल्पनिक आहे.
*******************************************
सुयशने गाडी प्रज्ञाच्या स्टॉपवर थांबवली.. प्रज्ञा मात्र स्वत:च्याच तंद्रीत होती..
" प्रज्ञा, घर आलं तुझ.. उतर.." सुयश म्हणाला.
त्याच्या बोलण्याने ती भानावर आली.. आपली पर्स घेऊन ती बाहेर आली..
" सुयश उद्या मला नाही जमणार रे.." काचेतून ती म्हणाली.
" मी सकाळी येतो.. बाय.." एवढच बोलून त्याने काच वर केली.. आणि निघून गेला.
पाच मिनिटे प्रज्ञा तिथेच स्टॉपवर थांबली.. उद्याचा विचार करत.. सुयशचा विचार करत.. सुयशला डोळ्यांदेखत दुसऱ्या कोण्याचातरी होतांना नव्हती बघू शकत ती.. डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या.. त्या टिपत तिने घरची वाट धरली.. घरी पोहचताच ती आजीच्या रूममध्ये शिरली.. आजी भगवतगीता वाचत बसली होती.. पुस्तक बाजूला करित ती आजीच्या मांडीवर विसावली..
" प्रज्ञा, काय झालं गं बेटा... कोणी काही बोललं का..? सुयश बरोबर भांडण झालं का..? बोल ना गं.." डोक्यावर हात फिरवित आजी म्हणाल्या.
सुयश या एका शब्दाने तिच्या अश्रुचा बांध पुन्हा फुटला.. ती रडू लागली...
" बोल ना गं... तु खूप खंबीर आहेस. सहजासहजी हळवी नाही होत.. काय कारण आहे सांग ना..? आजी म्हणाल्या..
आजीच्या मांडीवरून डोके उचलत तिने डोळे टिपले.. आजीला काय सांगणार होती ती.. कारण जे नातं तिला भावनिक करत होतं त्याचा स्विकार न करता आली होती ती.. सुयशला दुसऱ्या कोणाचं होण्याची गळ घालून..
" काही नाही गं आजी.. ऑफिसमध्ये ओरडले सर..." खोटं कारण सांगत तिने पुन्हा आपल्या भावना लपविल्या..
" ये वेडाबाई ऑफिसचं टेन्शन घरी नाही आणायचं.. आणि जास्त त्रास असेल तर सोडून दे तो जॉब.. भेटेल दुसरा चांगला.." समस्येवर उपाय सांगत आजी म्हणाल्या.
" सोडून देणं हा उपाय नाही ना आजी.." ती म्हणाली.
" मग जुळवून घे परिस्थितीशी..." आजी म्हणाली. होकारार्थी मान हलवित तिने आजीचे शब्द कानात साठवले आणि आपल्या रुममध्ये गेली ती जेवायलाच बाहेर पडली..
सुयशची परिस्थिती काही वेगळी नव्हती.. उद्या काय होईल हा विचार त्यालाही अगतिक करत होता.. आईच्या उत्साहात फक्त तिच्या समाधानासाठी सहभागी होत होता... रात्रीचं जेवण करून तो झोपायला रुममध्ये गेला.. तसा त्याचा मोबाईल वाजला.. नंबर सेव्ह नव्हता पण ट्र्यु कॉलरवर नाव वाचून तो उदास झाला.. तो फोन वैदेहीचा होता. एकदा दोनदा तीनदा फोन वाजला पण त्याने उचलायचे टाळले.. थोड्या वेळात फोन वाजणं बंद झालं.. तोच पाच मिनिटांत सरलाताई फोनवर बोलत रुममध्ये आल्या.. वैदेहीने त्यांना कॉल केला होता.
" सुयश, मोबाईल सायलेन्टवर आहे का..? वैदेही फोन करत आहे.. हा वैदेही तु कर त्याला कॉल.. आता उचलेल.." म्हणत सरलाताईंनी फोन ठेवला..
पुढच्या काही सेंकदात त्याचा फोन पुन्हा वाजला.. आई समोर असल्याने फोन उचलणं भाग होतं.. त्याने कॉल उचलला..
" तुम्ही बोला.. मी आले रे" म्हणत हसतच सरलाताई रुमबाहेर पडल्या..
टेन्शनमध्येच त्याने फोन उचलला.. तिच्याशी बोलण्यात त्याला काहीच स्वारस्य नव्हते.. पहिली दहा मिनिटे जीवावर घालून बोलणं चालू ठेवलं त्याने.. बोलणं कसलं तो फक्त ऐकत होता.. पण थोड्याच वेळात त्याच्या चेहर्यावरचे कंटाळवाणे भाव अचानक स्मितहास्यात परिवर्तित झाले.. मघापासून बुजून बोलणारा तो तिच्याशी मोकळेपणाने बोलू लागला.. बघता बघता पाऊण तास झाला ते अजूनही बोलतच होते.. बाहेर दबा धरून बसलेल्या सरलाताई मनोमन खुश होत होत्या...
" ओके.. चल ठेवतो.. उद्या भेटूया.. गुड नाईट.." तो म्हणाला आणि हसत फोन ठेवून दिला.. पाऊण तासाच्या संभाषणात 'तुम्ही' ची 'तु' झाली वैदेही... प्रज्ञाला मनातून काढून टाकायला सुरवात झाली होती का...?
शेवटी स्वप्नांच्या हिंदोळ्यावर झुलत सुयश झोपी गेला..
सकाळी उठून नेहमीप्रमाणे प्रज्ञाला रिसिव्ह करायला स्टॉपवर पोहचला.. पंधरा मिनिटे आधीच प्रज्ञा तिथे पोहचली होती.. गाडीत बसल्यावर सुयशने स्मितहास्य देत तिला गुड मॉर्निंग केले.. "कालचं सारं विसरून हा नॉर्मलही झाला.. आणि मी मात्र.." ती स्वगत झाली.
" प्रज्ञा चार वाजता निघूया.. मी घ्यायला येईन तुला.. तु सोबत असल्यावर वैदेहीलाही कर्म्फटेबल वाटेल.. काल रात्री बोलणं झालं आमचं... खूप खुशमिजास वाटली बोलण्यावरून...." तो तिच्याच विषयी बोलत होता..
" छान नाव आहे वैदेही... ती ही छानच असणार.." नाराजीच्या स्वरात प्रज्ञा म्हणाली.
" असणार नाही आहेच ती छान.. तुझ्याभाषेत सांगायचं तर मला शोभेल अशी.." तिच्याकडे पाहत तो म्हणाला.
चेहर्यावर उसने स्मितहास्य आणत तिने प्रतिउत्तर दिलं..
" ये प्रज्ञा, सांग ना भेटल्यावर काय बोलू ते..? खूप नर्व्हस व्हायला होतय गं.." तो म्हणाला.
" आताच म्हणालास ना की ती खूप खुशमिजास आहे.. मग तिचं बोलेल सगळं.. तुला ही आवडली ती फक्त फोनवर बोललास तरी.. मग आता का टेन्शन घेतोस..आणि तसाही तु खूप बोलका आहेस.. माझ्यासारखी मितभाषी तुला काय धडे देणार.." ती म्हणाली.
" मला तुही आवडली होतीस.. पण तुला कुठे जिंकता आलं मला.." तिच्याकडे पाहत तो म्हणाला.
" माझा धडा संपलाय आता.. आयुष्यात एक नवा प्रहर वैदेहीच्या रुपात उभा आहे तुझ्यासमोर.. सो विसर कालचं.." ती म्हणाली.
" ओ सॉरी प्रज्ञा.. नक्कीच मी प्रयत्न करिन.." म्हणत त्याने गाडी थांबवली.
" उतरा मॅडम स्टॉप आला.. चार वाजता तयार रहा.." तो म्हणाला.
" हम्म.." एवढंच काय ते म्हणत ती गाडीतून उतरली आणि ऑफिसच्या दिशेने निघूनही गेली..
पुन्हा त्याच फिल्मी स्टाईलने केसांवरून हात फिरवित सुयशने गाडी स्टार्ट केली आणि निघून गेला..
ऑफिसमध्ये पोहचल्यावरही प्रज्ञा उदासच होती. सारखी चिडचिड होत होती..
" खुश आहे सुयश.. तुलाही त्याला आनंदीच पाहायचं होतं ना मग आता का चिडचिड करतेस" मन सांगत होत..
" मी कुठे चिडते.. त्याने राहावे ना आनंदी मला का वाईट वाटेल.." बुद्धीने उत्तर दिले..
" तुला पण सुयश आवडू लागला आहे ना..? मग का लपवतेस.." मन म्हणायला लागलं.
" असं काही नाही.. तो फक्त चांगला मित्र आहे.. आणि मित्रच राहिल.." बुद्धीने डोकं वर काढलं.
मन आणि बुद्धीच्या द्वंद्वांत प्रज्ञा मात्र गोंधळून गेली होती... फाईल बंद करून थोडावेळ शांत बसून राहिली.. तोच सुयशचा पुन्हा कॉल आला.. तिला आठवण करून द्यायला.
" तु आली नाहीस तर मी घरी जाऊन आपल्या बद्दल सगळं सांगेन आईला.." म्हणत तिला भावनिक गळही घातली..
शेवटी तिचा नाइलाज झाला.. बॉस कडून परमिशन घेत चारच्या सुमारास तिने ऑफिस सोडले.. नेहमीच्या ठिकाणी सुयश वेळेआधीच पोहचला होता.. फ्रन्ट सीटचा दरवाजा उघडत ती आत बसली.. सकाळी घातलेले कपडे बदलून सुयश छान तयार झाला होता.. सी ग्रीन कलरच्या टी शर्ट मध्ये खूपच देखणा दिसत होता तो.. प्रज्ञाचा थोडावेळ त्याला न्हाहाळण्यातच गेला..
" छान दिसत आहेस. मस्त तयार झाला आहेस वैदेहीसाठी.. आवडशील तिला.." त्याला पाहत ती म्हणाली..
" छान असतो तर तु नकार नसता दिलास.." सुयश म्हणाला.
" सुयश, ठिक आहे ना आता.. एक नवी सुरवात करत आहेस पुन्हा त्याच जुन्या आठवणी नको.." प्रज्ञा म्हणाली..
होकारार्थी मान हलवित त्याने प्रतिउत्तर दिले.. रस्त्यात फुलमार्ट जवळ गाडी थांबवत फुलांचा बुके घेतला..
" आवडेल ना ..?" बुके प्रज्ञाच्या हातात देत तो म्हणाला..
क्षणभर तो बुके आपल्यालाच दिला आहे असे वाटले तिला पण पुढच्याच क्षणी त्याच्या बोलण्याने ती भानावर आली..
" तु एवढ्या प्रेमाने दिल्यावर आवडेलच ना.." फुलं प्रेमाने न्हाहाळत ती म्हणाली..
" अगं वैदेहीला आवडेल ना..? तिच्याविषयी विचारतो.." तो म्हणाला..
तशी ती चांगलीच भानावर आली..
" ओ आय अॅम सॉरी.. मला वाटलं..." बोलता बोलता ती थांबली..
" हो हो आवडेल ना.. तु प्रेमाने दिल्यावर तिला आवडणारच ना.." तिने वाक्य पुर्ण केलं..
सुयश क्षणभर तिच्याकडे पाहतच राहिला...
अगदीच तासाभरात ते एयरपोर्टला पोहचले.. गाडी पार्क करत त्याने बुके काढून घेत प्रज्ञाच्या हातात दिला..
" सुयश, मी थांबते गाडीतच तु ये तिला घेऊन.." बुके त्याच्या पुढ्यात धरत ती म्हणाली.
" प्रज्ञा असं नाही हा.. तु प्रॉमिस केलय मला.. नाहीतर मीच जात नाही." तो म्हणाला..
इथेही नाइलाज झाल्याने ती त्याच्यासोबत निघाली.. हृदयाची धडधड चांगलीच वाढली होती तिच्या.. सुयश एकदमच कुल होता.. प्रज्ञा मात्र नाराज होती.. शेवटी मनाने त्याच्यात गुंतलेली ती त्याला दुसऱ्या कोणासोबत नव्हती बघू शकत. मन रडत होतं आणि बुद्धी सांत्वन करित होती.. तोच ती आली...
" हे हाय... मी वैदेही पाटणकर... ओळखलस का..?" सुयशच्या पुढ्यात हात धरत ती म्हणाली.
सुयशने एकवार प्रज्ञाकडे पाहिले आणि दुसऱ्याच क्षणी तिचा हात हातात घेता झाला..
" हो.. हाय.. मी सुयश.. ओळखल ना.. फोटोपेक्षा प्रत्यक्षात खूप सुंदर आहेस.." तिला अभिवादन करत तो म्हणाला.
प्रज्ञाच्या काळजात चुर्र झालं.. मनाला वाटलं असच जावं आणि दोघांना वेगळं करावं.. तिने मनाला आवर घातला..
" खरच किती सुंदर आहे वैदेही... अगदी सुयशला शोभेल अशी.." वैदेहीला न्हाहाळत ती स्वगत झाली..
पिंक कलरच्या फ्लोरल वनपिस मध्ये गोरीगोमटी वैदेही खूप सुंदर दिसत होती.. खांद्यापर्यंत लोंबकळणारे हाफ कर्ली केस, जाडसर भुवया, बोलके डोळे, गुलाबी ओठ, लांबसडक बांधा.. खूपच सुंदर होती ती...
तोच सुयशचे लक्ष पुन्हा प्रज्ञाकडे गेले..
" वैदेही, मीट माय फ्रेन्ड... प्रज्ञा. अॅण्ड प्रज्ञा शी इज वैदेही.." दोघींची ओळख करून देत तो म्हणाला..
तसा वैदेहीने आपला हात प्रज्ञाच्या पुढ्यात धरला..
" हाय प्रज्ञा.. नाइस टु मीट यु.. सुयश फक्त फ्रेन्डच ना गर्लफ्रेन्ड वैगेरे.." हसत ती म्हणाली..
तसे दोघेही बावरले.. पण पुढच्याच क्षणी तिला अभिवादन करत प्रज्ञा म्हणाली,
" माझ्याकडे बघून मी त्याची गर्लफ्रेन्ड असेल असं वाटतं का..?"
" येस.. का नाही वाटणार..? यु आर डॅम ब्युटिफुल.. जस्ट इग्नोर दॅट ब्लडी कलर.. यु आर सो ब्युटिफुल.." वैदेही म्हणाली.
" सो स्विट ऑफ यु.. बट नो वी आर जस्ट फ्रेन्ड. व्हेरी गुड फ्रेन्ड्स." प्रज्ञा म्हणाली..
" मग छानच.. मला तुला रोजच भेटावं लागणार.. सुयश कसा आहे हे सगळ्यात चांगलं तुच सांगू शकतेस.. करणार ना मदत या मैत्रिणीला... फ्रेण्ड्स.." हात पुढे करत वैदेही म्हणाली..
"येस.. शुअर.." म्हणत तिनेही तिची मैत्री स्विकारली.
" प्रज्ञा, ते बुके दे तिला.." सुयश म्हणाला..
तसा तिने तो सुयशच्या हातात देण्याचा प्रयत्न केला..
" तु दे.. तुझ्या नविन फ्रेन्डला" हसत तो म्हणाला..
सुयश तिला कात्रीत पकडून सारच साधून घेत होता.. एकीकडे मनाला वेदना होत असतांनाही ती हसून वेळ मारून नेत होती..
बुके दिल्यानंतर तिने प्रज्ञाला आलिंगन दिले.. आणि मग सुयशला...
प्रज्ञाला मेल्याहून मेल्यासारखे झाले.. ती तिथून निघून जाऊ लागली.. पण सुयशने तिचा हात गच्च पकडला..
तिच्याकडे पाहत त्याने नकारार्थी मान हलविली.. वैदेहीच्या मिठीतुन बाहेर येत त्याने तिची बॅग घेतली..
" चला मग निघूया.. आई वाट पाहत असेल.." तो म्हणाला.
दोघींनी होकार दिला.. आणि गाडीकडे कूच केली.. वैदेही अगदिच बिनधास्त मुलगी होती.. स्वच्छंदी आणि आनंदी.. अगदी कमी वेळातच ती सुयशसोबत मोकळेपणाने वागू, बोलू लागली... त्यांना एकत्र बघून प्रज्ञा मात्र फार दुखावली जात होती.. त्यांना एकत्र राहता यावे म्हणून ती त्यांच्यापासून काही अंतर ठेवून चालत होती..
हसत खेळत बोलतांना वैदेहीने सुयशचा हात धरला आणि प्रज्ञा पार कोसळली..
सुयशने मागे वळून प्रज्ञाकडे पाहिले..
" चल ना गं.." तो म्हणाला..
चेहर्यावरची नाराजी स्पष्ट दिसत होती.. ती काही न बोलता तशीच मागे चालत राहिली..
गाडीजवळ पोहचल्यावर सुयशने तिचे सामान डिकीमध्ये टाकले.. तोच वैदेहीने बसण्यासाठी फ्रण्ट सीटचा दरवाजा उघडला.. सीटवर असलेली बॅग उचलून वर धरली..
" माझी आहे.." म्हणत प्रज्ञाने बॅग हातात घेतली..
तशी ती जाऊन सुयशच्या बाजूच्या सीटवर बसली.. प्रज्ञाला आताही खूप वाईट वाटले.. डोळ्यांतून पाणी येणं तेवढं बाकी होतं. तिला पाहून सुयशने दोन्ही हात वर केले..
" हेच हवं होतं ना तुला...?" म्हणत मागचा दरवाजा उघडला..
त्याच्याकडे अगतिकतेने पाहत ती आत शिरली.. सुयशने गाडी सुरु केली.. वैदेही अगदीच मनमोकळेपणाने बोलत होती.. सुयशही हसून तिला प्रतिउत्तर देत होता.. जणू खूप वर्षांपासून एकमेकांना ओळखतात असेच वाटत होते.. त्यांच्या बोलण्याचा, हसण्याचा आवाज प्रज्ञाला मात्र छळत होता... तिने बॅगेतून मोबाईल काढला आणि डोळे मिटून हेडफोनवर गाणी ऐकू लागली..
" प्रज्ञा, ये प्रज्ञा... स्टॉप आला तुझा.." सुयश म्हणाला. पण डोळे आणि कान दोन्ही बंद असल्यामुळे तिला काहीच ऐकू येत नव्हतं.. शेवटी तो उठला आणि मागचा दरवाजा उघडून प्रज्ञाला स्पर्श करता झाला.. तशी ती पटकन भानावर आली..
" उतरतेस ना..? स्टॉप आला तुझा.." तो म्हणाला.
" सो सॉरी.. गाण्याच्या नादात आवाजच आला नाही.." म्हणत ती गाडीतून बाहेर आली.
" ओके बाय वैदेही..." वैदेहीकडे वळत ती म्हणाली.
" थँक यु प्रज्ञा.. यु आर रिअली अ गुड फ्रेन्ड.. आम्हांला एकांत मिळावा म्हणून हेडफोनवर गाणं ऐकत होतीस ना. सो स्विट ऑफ यु... ओके चल बाय.. भेटू उद्या.." वैदेही म्हणाली.. आणि गाडीची काच बंद केली.
" काय मॅडम खुश ना..? हेच हवं होतं ना तुला... बघ मी बनतोय दुसऱ्या कोणाचा तरी.." सुयश म्हणाला..
मघापासून दाबून धरलेल्या भावना अश्रू बनून वाहू लागल्या..
" ये वेडाबाई रडतेस का..? बोल ना..?" तिचे डोळे पुसत तो म्हणाला.
" काही नाही.. तुझ्या बोलण्याचा त्रास होतो फक्त.. चल बाय..." म्हणत ती निघून गेली..
सुयशही गाडीत बसला आणि घराकडे निघाला..
सुयशच्या घरी आनंदी आनंदच झाला होता.. सरलाताई तर कमालीच्या खुश होत्या. वैदेहीच्या येण्याने घराला घरपण आले होते जणू.. एखाद्या नव्या नवरीचं स्वागत करावं तसं त्यांनी वैदेहीचं स्वागत केलं.. जेवणातही तिच्या आवडीचे पदार्थ बनवत पंचपक्वानाचा घाट घातला.. वैदेही ही अगदिच कमी वेळात त्यांच्यात रमली..
गप्पा करत चौघांनी रात्रीची जेवणं उरकली आणि शतपावलीसाठी म्हणून बंगल्याबाहेरच्या छोटेखानी गार्डनकडे मोर्चा वळवला.. थोडा वेळ गप्पा मारल्यानंतर हळूच सरलाताईंना रामरावांना इशारा केला आणि दोघांना मोकळा वेळ मिळावा म्हणून त्यांनी काढता पाय घेतला..
वैदेही आणि सुयश अगदिच हसतखेळत बोलत होते.. बेडरुमच्या खिडकीतुन चोरनजरेने त्यांच्या बोलण्याचा मागोवा घेत सरलाताई भलत्याच सुखावल्या.. आणि झोपायला निघून गेला..
थोडा वेळ गप्पा मारल्यानंतर वैदेहीने प्रज्ञाला फोन करायची आठवण दिली.. सुयशनेही लागलिच कॉल केला..
एव्हाना प्रज्ञाही झोपायला रुममध्ये आली होती.. सुयशचा नंबर पाहून तिने लगेच फोन उचलला.
" हा बोल सुयश.. जेवलास का..?" फोन उचलत प्रज्ञा म्हणाली.
" एक मिनिट.. वैदेही बोलते बघ.." एवढेच बोलत त्याने वैदेहीजवळ फोन दिला.
" हा.. हैलो प्रज्ञा.. उद्या प्लिज ऑफिसला सुट्टी घे.. मला तुमच्यासोबत वेळ घालवायचा आहे.." वैदेही म्हणाली.
" तुम्ही दोघं एकमेकांना वेळ द्या.. मी भेटेन गं नंतर.." विषय टाळत प्रज्ञा म्हणाली.
" सुयश तर तुझ्या मैत्रीविषयी खूप काही सांगत होता.. आणि तु आपल्या मित्रासाठी.. त्याला जाऊ दे पण या मैत्रिणीसाठी एक दिवसही देणार नाहीस.." पेचात पकडत ती म्हणाली.
" ओके ठिक आहे.. सकाळी आजीला मंदिरात घेऊन जाणार आहे त्यानंतर भेटू या स्टॉपवर.." प्रज्ञा म्हणाली.
" दॅट्स माय गुड गर्ल.. सो स्विट ऑफ यु.. भेटूया मग उद्या.. बाय गुड नाईट.." म्हणत तिने फोन ठेवला..
इकडे प्रज्ञामात्र चांगलीच बिथरली..
" सुयश माझ्याशी बोललाही नाही.. आणि अजूनही दोघे जागेच.. काय बोलत असतील..?" नानाविध विचारांनी तिला अगदीच सळो की पळो करून सोडले होते..
शेवटी भावनांचा अंगरखा बाजूला काढत तिने वास्तवाची चादर आपल्या मनावर पांघरली आणि झोपी गेली..
क्रमश:
******************************************* लिखाणात चुका आढळल्यास क्षमस्व.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा