रंग प्रेमाचे भाग 1

Marathi love story

“तुझी हिम्मत कशी झाली, मला रंग लावायला”

“आज रंगपंचमी आहे ना म्हणून.” “अरे, पण विधवा बाईला कलर लावू नये एवढी पण तुला अक्कल नाही का?” ती रागाने.

“त्यात काय झालं?”
“जिच्या आयुष्यातून सगळे रंग गेलेले आहेत अशी ती बेरंग तिला काय रंग लावणार?”
“त्याच बेरंगात रंग लावायला मी आलेलो आहे”
“म्हणजे?”
“म्हणजे तुमच्याशी लग्नाची मागणी घालायला मी आलेलो आहे.”
“तू काय बोलतोस तुला कळतंय का?”
“हो नक्कीच कळतंय.”
“काय वाट्टेल ते बोलू नको आणि जा तिथून.” असे म्हणून मानसी तिच्या घरी जाते.
मानसी एक सुंदर, सुशील आणि संस्कारी मुलगी होती. तिचे लग्न एका मुलाशी झाले होते. तिचा संसार सुखात चालला असताना सहा महिन्यातच तिचा नवरा एक्सीडेंट मध्ये मरण पावला. त्यावेळी ती दोन महिन्यांची गरोदर होती. तिच्यावर जणू दुःखाचा डोंगरच कोसळला होता. आता ती पुढचे आयुष्य नकोसे वाटू लागले होते. पण बाळासाठी का होईना तिला जगावे लागणार होते. तीचे कसे बसे नऊ महिने पूर्ण झाले.
नऊ महिन्यानंतर तिला एक गोड असा मुलगा झाला. त्याचे नाव अथर्व. अथर्वला वाढवण्यात आणि नोकरी करण्यात तिच्या आयुष्यातील 3 वर्षे कशी गेली तिला कळालेच नाही. तिच्या घरांमध्ये ती अथर्व आणि तिचे सासू-सासरे असे चौघेजण राहत असतात. सासू-सासरे तिला दुसरे लग्न करण्यासाठी सुचवत असतात. परंतु ती काही केल्या तयार होत नाही. तिला अथर्व ची काळजी असते.
ती एका लहानशा कंपनीमध्ये जॉब करत असते. जॉब करून आलेल्या पगारामध्ये त्यांचं कुटुंब चाललेलं असतं. सासू-सासरे पूर्णपणे हिच्यावर अवलंबून असतात. त्यांचं हे असंच चौकोनी कुटुंब अगदी सुखात राहत असते. त्यांच्या घराच्या बाजूला त्यांचीच एक खोली असते.
सासू-सासरे मानसीला म्हणतात, “त्या खोलीमध्ये आपण एक भाडेकरू ठेवू या म्हणजे जे पैसे येतील ते आपल्याला घरखर्चासाठी होतील.” म्हणून त्यांनी एक भाडेकरू ठेवण्याचे ठरवले. तशी पेपर मध्ये सूचना देखील दिली होती.
एके दिवशी आदित्य नावाचा एक मुलगा भाड्याचे घर शोधण्याकरिता तेथे आला. त्याने पूर्ण चौकशी केली. त्याच्या एकट्या पुरते ते घर पुरेसे होते. तो तेथे राहू लागला. महिन्याला तो भाडेही व्यवस्थित देत होता. त्याचे जेवण मानसीच्या घरातच होऊ लागले. त्याचे पैसेही तो देऊ लागला. त्यामुळे मानसीला घरखर्चाला तेवढाच हातभार लागला.
हळूहळू त्याचे घरी जाणे येणे होऊ लागले. अथर्वची आणि त्याची तर चांगली मैत्री जमली. मानसीचे सासू-सासरे तर त्याला अगदी आपला मुलगाच मानू लागले. मानसीबद्दल आदित्यला सुद्धा खूप वाईट वाटत असे.
एके दिवशी त्याने तिला मैत्रीसाठी विचारले. पण मानसीचा स्वभाव कडक असल्यामुळे ती त्याच्याशी मैत्री करायला तयार नव्हती. ती आपले काम भले आणि आपण भले असा विचार करत होती. हळूहळू आदित्यचे जाणे येणे वाढले आणि तो त्यांच्या घरातीलच एक सदस्य बनून गेला. घरच्यांना त्याची ओढ लागली होती आणि दिसून पण येत होते. ते त्याच्याशी आपुलकीने वागत असत. आदित्य सुद्धा त्यांची छोटी मोठी कामे करून देत असे. रोजचे रुटीन चालु होते.

आता यापुढील भाग पुढच्या लेखात पाहू.

आवडल्यास कमेंट आणि लाईक करायला विसरू नका.



*** सदर कथेच्या प्रकाशनाचे व वितरणाचे सर्व हक्क फक्त लेखीकेकडे राखीव आहेत. आपल्याला ही पोस्ट शेअर करायची झाल्यास नावासह जरूर करावी. आपला अभिप्राय हा सर्वात महत्त्वाचा ! तेव्हा कृपया लाईक सोबतच खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले मत जरूर कळवावे.

©®प्रियांका पाटील. 

🎭 Series Post

View all