Login

रंग प्रेमाचे भाग 5(अंतिम)

Marathi love story

आदित्यचे आई-वडील निघून गेल्यानंतर मानसी काही न बोलता रागातच निघून जाते. आदित्यला तिच्या रागाचे कारण कळते आणि तो तिच्याकडे जातो.

तिला म्हणतो, "काय झाले?"
मानसी म्हणाली, "तू माझ्याशी खोटं बोललास. तू सांगितलं नाहीस की तू श्रीमंत बापाचा मुलगा आहेस म्हणून."
आदित्य म्हणाला, "तू तर कधी विचारलेस आणि मी येथे माझे नाव कमवण्यासाठी आलो आहे. मग कशाला सांगू की माझे बाबा कोण आहेत ते?"
मग मानसी म्हणाली, "माझा नवरा त्याच्या आई-बाबांना पासून दूर गेला आणि आता तू सुद्धा तुझ्या आई बाबांपासून दूर जावे असे मला वाटत नाही. त्यामुळे तू तुझ्या घरी जा."
आदित्य म्हणाला, "ते काही नाही मी तुला घेतल्याशिवाय घरी जाणार नाही."
मानसी म्हणाली, "ते कसं शक्य आहे. तुझे आई बाबा मला स्विकारणार नाहीत."
आदित्य म्हणाला, "मी माझ्या आई-बाबांना नक्कीच ओळखतो ते तुझा स्वीकार नक्कीच करतील."
इकडे आदित्यचे आईबाबा घरी आल्यानंतर आदित्यची मावशी घरी होती ती आदित्यच्या आईला म्हणाली, "काय झालं? आदित्य सापडला का?"
आदित्यची आई म्हणाली, "हो सापडला पण काय त्याचा उपयोग? तो एका विधवेशी प्रेम करत आहे आणि तिच्याशीच लग्न करणार असे तो म्हणत आहे. हे मलाही पटले नाही म्हणून आम्ही त्याला तेथेच सोडून आलो. त्याला घरी येण्याचा काहीएक अधिकार नाही.”
आदित्यची मावशी म्हणाली, "ताई, तुला आठवतय आपण लहान होतो तेव्हा आपले बाबा गेले. आपल्या आईने खूप कष्ट करून आपल्याला शिकवलं. तिच ते हाल आपण पाहिलेलेच आहोत आणि शाळेत असताना आपल्यालाही वाटायचे की इतरांच्या बाबांना बघून की, आपले पण बाबा असते तर आपल्याला आणायला आले असते. आपले सगळे हट्ट पूर्ण केले असते म्हणून. तसेच त्या मुलालाही वाटत असेल ना की, आपल्यालाही बाबा हवेत म्हणून आणि आदित्यचं काय चुकलं. प्रत्येक मुलांनी असाच विचार करायला हवा एखाद्या निराधार बाईला तो आधार देत आहे तर काय चुकलं त्याचं? लहानपणीची आपली परिस्थिती आणि वडील नसल्यावर मुलांचे काय हाल होत असतात? त्या बाईचे काय हाल होत असतील? आणि मग तू पुढचा विचार कर. नक्की विचार कर मी सांगितलेल्या गोष्टीचा. चल मी निघते आता." असे म्हणून मावशी निघून गेली.
आदित्यची आईही विचार करत बसली. तिला मावशींचे म्हणने पटले होते. मग विचार केल्यानंतर तिने निर्णय घेतला आणि त्याच्या बाबांना सर्व काही समजावून सांगितले. मग आदित्यचे बाबा तयार झाले आणि दोघे मिळून मानसीला आदराने आणि सन्मानाने आपल्या घरी आणले.

आवडल्यास कमेंट आणि लाईक करायला विसरू नका.


*** सदर कथेच्या प्रकाशनाचे व वितरणाचे सर्व हक्क फक्त लेखीकेकडे राखीव आहेत. आपल्याला ही पोस्ट शेअर करायची झाल्यास नावासह जरूर करावी. आपला अभिप्राय हा सर्वात महत्त्वाचा ! तेव्हा कृपया लाईक सोबतच खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले मत जरूर कळवावे.

©®प्रियांका पाटील. 

0

🎭 Series Post

View all