Login

रंग प्रितीचे... तुझे नी माझे... भाग 8

खूपच छान दिसते आहे ग तू श्रेया, मी सुद्धा तुझ्या आजीला कधीची म्हणतो आहे की अशी एखादी पॅन्ट पण तुला घेऊन टाक



रंग प्रितीचे... तुझे नी माझे... भाग 8

©️®️शिल्पा सुतार
........

दुसऱ्या दिवशी सकाळी श्रेया तयार होती,

"बर वाटतय का? पाय ठीक आहे का?",.. सचिन

"हो बर आहे",.. श्रेया

नाश्ता करून ते मंदिरात गेले, खूप सुंदर मंदिर होतं, आत प्रवचन सुरू होत, दोघ ते ऐकत बसले, जे हातात आहे ते जपायला हव, भलत्या गोष्टीची आशा सोडून द्यावी, थोडक्यात समाधान मानाव, अश्या बर्‍याच गोष्टी ते बाबा सांगत होते, दोघ एकमेकांकडे बघत होते, बऱ्याच वेळ तिथे थांबल्यानंतर दुपारी तिथलाच प्रसाद घेऊन ते हॉटेलवर आले, खूप शांत छान वाटल तिकडे, आज आता इथे आरामात राहायचं होत आणि उद्या सकाळी निघायचं काही घाई नव्हती, सचिन जवळ श्रेया येवून बसली, बोलू का हिच्या शी आमच्या बद्दल,... नको हिम्मत नाही.

"तू कोणत्या कॉलेजला होता सचिन? ",.. श्रेया

" इथे नव्हतो मी बाहेरगावी शिकायला होतो इंजीनियरिंगचा नंबर कुठेही लागतो ना ",.. सचिन

" अच्छा मग तिकडे होस्टेलला राहत होता का? ",.. श्रेया

हो..

"तिथे नेहा आणि तू कसे भेटले ते सांग ना? ",.. श्रेया

कशाला श्रेया?... सारख आपल नेहा.. नेहा..

" अरे सांग ना सचिन नेहा बद्दल?",.. श्रेया त्याच्या जवळ येवून बसली.

" मला थोडं काम आहे ऑफिसचं",.. सचिन उठून गेला

काय झाल आहे याला काय माहिती? नाराज आहे का हा? नसेल सांगायची त्याला मला त्याची माहिती, नको सारखं विचारायला, आपल्याला काय कुठे भेटले असतिल ते तर, उगीच मधे मधे नको करायला, श्रेया टीव्ही बघत होती. उद्या कॉलेजला जावू मस्त, सौरभ भेटेल, आपण आपल बघु आता,

बराच वेळ सचिन त्याचं काम करत होता,

श्रेया बघत होती... याला त्याच्या घरच्यांनी नाही सांगितलं होतं ना ऑफिसच काम करायला, मग काय झालं? जाऊ दे,

चहा आला श्रेया तिचा कप घेऊन गार्डनमध्ये गेली, सचिन तिच्या जवळ येऊन बसला,

"तुला राग आला आहे का सचिन?",.. श्रेया

"नाही श्रेया",.. सचिन

"मी उगीच तुझी माहिती विचारते ना",.. श्रेया

"तसं काही नाही, नो प्रॉब्लेम.. इथून गेल्यावर कॉलेजला जाणार का?",.. सचिन

हो

" तू पुढे काय करणार आहे? शिकणार आहे का पुढे? ",.. सचिन

" आता मी सेकंड इयरला आहे नंतर ग्रॅज्युएट होईल मग बघू काय करायचं ते ",.. श्रेया

"तुझ लग्न तुझ्या आई वडिलांनी खूप लग्न लवकर करून दिलं ", .. सचिन

" तेच तर म्हणत होती ना मग मी आई-बाबांना, अजून ग्रॅज्युएट ही झाली नाही मी, पण तुला बघून त्या दोघांना काय झालं काय माहिती? त्यांना असं झालं होतं की माझं लग्न कधी तुझ्याशी करू",.. श्रेया

सचिन हसत होता.

" तू अगदी स्वतःला हिरो वगैरे समजतो आहेस का?",.. श्रेया

"नाही ग बाई मी कशाला स्वतःला हिरो समजू",.. सचिन

" तू एमबीए केला आहेस का? ",.. श्रेया

हो

"एवढा अभ्यास तुला कसा काय करता येतो, मला तर आत्ताच कंटाळा आला आहे, असं वाटतं आहे कधी हे ग्रॅज्युएशन संपेल",.. श्रेया

" असा आळस करायचा नाही श्रेया, तुलाही एमबीए करावं लागेल, ते चांगलं असेल आपल्या बिजनेस साठी",.. सचिन

"अरे परत तेच मी एमबीए करून कुठे तुझ्याजवळ थांबणार आहे",.. श्रेया

" तुला हेच बोलता येत का फक्त श्रेया? मी जाणार आहे अस",.. सचिन

श्रेया त्याच्या कडे बघत होती,.." काय झाल सचिन?, पण हेच सत्य आहे ना, का चिडतोस? ",

" आपण सोबत आहोत तो पर्यंत अस नको ना बोलू श्रेया ",.. सचिन

" बर सॉरी मी अस बोलणार नाही, तु राग सोड, मला माहिती आहे तू चांगला आहे, मलाही थोडीफार माणसांची ओळख आहे ",.. श्रेया

"हो का मग सौरभची ओळख पटली नाही का अजून? तो एवढा भाव देत नाही तरी तुला त्याच्याकडे जायची घाई आहे",.. सचिन

"घाई असं नाही पण मी विचारणार आहे त्याला तो का बोलत नाही माझ्याशी? , तुला काही अडचण आहे का? ",... श्रेया

"नाही मला कसली अडचण असणार आहे",..सचिन

" मग तू सौरभचा विषय काढला की चीड चीड का करतोस? ",.. श्रेया

सचिन गप्प झाला,

चल चहा घे आता.

दुसऱ्या दिवशी ते सकाळी लवकर उठून घरी यायला निघाले, गाडीत सचिन श्रेया कडे बघत होता,.." ये श्रेया इकडे बस तुला झोप येत असेल तरी मला प्रॉब्लेम नाही, झोप माझ्या जवळ" ,

श्रेया हसुन त्याच्या कडे बघत होती, कस काय झाल हे आश्चर्य?

"तुझा स्वभाव चांगला आहे श्रेया, तू भांडकुदळ नाहीस" ,.. सचिन

"अरे वा कस काय एवढ चांगल बोलतोय माझ्या बद्दल, थँक्स, तू तर पाहिल्या पासून चांगला आहेस तुला कस जमत एवढ शांत रहायला",.. श्रेया

सचिन हसत होता,

" मला खूप काम आहे दुपारपर्यंत पोहोचलो की मी ऑफिसला जाईल",.. सचिन

"आज रविवारी ना मग सुट्टी नाही का?",.. श्रेया

" आपल ऑफिस आहे, असतात ऑफिस मध्ये लोक, खूप काम बाकी आहे ",.. सचिन

" माझं पण उद्यापासून कॉलेज सुरू होईल, मी थोडा वेळ आईकडे जाऊ का? माझे पुस्तकं सगळं सामान घेऊन येते, माझा ही खूप अभ्यास बाकी आहे ",.. श्रेया

"हो आधी घरी जाऊ, मग जा तिकडं",.. सचिन

दोघं घरी आले, सविता ताई, केदार साहेब, आजी आजोबा खुश होते, श्रेयाशी सविता ताई खूप बोलत होत्या, छान वाटत होत घरात, जेवण झालं,

"आई मी थोडा वेळ ऑफिसला जावून येतो",.. सचिन तयार व्हायला रूम मध्ये गेला.

" जा श्रेया त्याला काय हवं ते बघ ",.. सविता ताई.

श्रेया आत मध्ये गेली ती कॉटवर बसली होती

"काय ग काय झालं श्रेया? ",.. सचिन

"काही नाही तुला काय हवं नको ते बघायला मला आत मध्ये पाठवलं आहे",.. श्रेया

सचिन हसत होता, त्याच्याच विचारात होता, ...." विचार ना मग मला काय हव आहे ते ? अशी लांब थांबते ही श्रेया?, मला ही हवी आहे, हिच्या सोबत रहायच आहे ",..

"सचिन.... सचिन.. कुठे आहे लक्ष मी येवू का तुझ्या सोबत आई कडे जाते ",.. श्रेया

" चल सोडून देतो तुला तिकडे ",.. सचिन

"थांब मी आईंना विचारलं नाही येते पाच मिनिटात विचारून",.. श्रेया

" तू तयार हो मी सांगतो",.. सचिन

श्रेया तयार झाली, सचिनने तिला तिच्या आईकडे सोडल,.." मी येतो घ्यायला",

" ओके, लवकर ये सचिन",.. श्रेया

हो..

श्रेया आत आली, आता जरा शांत वाटत होती त्यामुळे मीना ताई खुश होत्या , श्रेया तिच्या रूममध्ये गेली तिने जे जे सामान घ्यायचं ते एका बॅगेत भरलं उगाच नंतर सचिन आला की धावपळ होईल, सगळं कॉलेजच सामान व्यवस्थित घेतला आहे का हे आई बघत होती, थोडे कपडे ही घेतले श्रेयाने,.. "आई मला थोडे पैसे दे",

मीना ताईंनी पैसे दिले,

"तिकडे कसे मागणार मी पैसे, तुझ्या कडून घेत जाईल",.. श्रेया

"ठीक आहे श्रेया",.. मीना ताई

"आई.. बाबा माझी कार ड्रायवर देतील का?",.. श्रेया

"हो का नाही देणार",.. मीना ताई

"उद्या सकाळी तिकडे यायला सांग त्या काकांना ",.. श्रेया

"ठीक आहे, चांगले आहेत का ग तुझ्या सासरचे लोक? ",.. मीना ताई

"हो आई चांगले आहेत ते लोक, पण त्यांच्याकडे ना ते काम खूप करत बसता जेवायला वाढण, चहा करणार वगैरे",... श्रेया

"सचिन राव कसे आहेत वागायला? ",.. मीना ताई

"चांगला आहे सचिन, आणि मी त्याला तू सांगितल्या प्रमाणे अहो म्हणते ह सगळ्यां समोर",.. श्रेया

" आईला बरं वाटलं, चला मुलगी जरा तरी खुश आहे तिच्या घरी, नाहीतर पहिल्यांदा आली होती तेव्हा ती वापस जायलाच नाही म्हणत होती, तेव्हा त्यांना खूप भीती वाटली होती कसं व्हायचं या मुलीचं, एक तर ती खूप हट्टी आहे, उद्यापासून कॉलेजला जाशील तर उगाच त्या मुलाला जाऊन भेटू नको",.. मीना ताई

" सौरभ नाव आहे त्याचं",.. श्रेया

" जे नाव असेल ते पण उगाच सासरी आवडणार नाही अशा गोष्टी करू नको. एक तर या लोकांचे नाव मोठे आहेत, कुठे गेलं की लगेच पेपरमध्ये फोटो येतात",.. मीना ताई

" नाही घेणार नाव बस आता मला काहीतरी खायला दे जरा आणि तुझ्या हातचं दे ",..श्रेया आई सोबती डायनिंग टेबलवर बसलेली होती,

श्रेया आली म्हणून बाबा लवकर आलेले होते, श्रेया कशी आहे हे खुणेने ते विचारत होते, चांगलं सुरू आहे आईने सांगितल, त्यांना जरा बरं वाटलं. श्रेया पटकन उठून भेटली त्यांना.

"काय म्हणत आहे श्रेया तुझं सासर? ",..अभिजीत राव

" चांगले लोक आहेत कोणीही भांडत नाही, साधे आहेत अजून तरी",..श्रेया

" अजून तरी म्हणजे काय? चांगलेच लोक आहेत ते",..अभिजीत राव हसत होते.

थोड्या वेळाने सचिन तिला घ्यायला आला, चहापाणी झालं, खूप गप्पा मारत होते ते, थांबून जा जेवायला तुम्ही दोघं,

" नाही आम्ही निघतो, आम्ही पण दोन-तीन दिवस घरी नव्हतो तर आई वाट बघत असेल",.. सचिन

दोघं घरी आले.

" चला जेवायला आता",.. सविता ताई

" आम्ही फ्रेश होऊन येतो",.. सचिन

श्रेया बाहेर येवून त्यांना मदत करत होती,

" मी उद्यापासून कॉलेजला जाणार आहे आई",.. श्रेया

"हो जाऊन ये किती वाजेपर्यंत येशील तू",.. सविता ताई

"मी रोज तीन चार वाजेपर्यंत येईल घरी ",.. श्रेया

"काही हरकत नाही तू डबा नेशील का? ",.. सविता ताई

"हो नेणार आहे, मला करावा लागेल का उठून स्वयंपाक? ",.. श्रेया

" नाही बाई आहे त्या करतील फक्त तुला काय खायचं ते सांगून देत जा",.. सविता ताई

" आई अजून एक.. मी जीन्स घालू शकते का कॉलेजला जातांना? मी आधीपासून जीन्स घातली आहे आता एकदम कपड्यांमध्ये बदल झाला तर मला सवय नाही ",.. श्रेया

"काही हरकत नाही बेटा, तुला आवडेल ते कपडे घाल तुला योग्य वाटेल तस कर ",.. सविता ताई

" आजी-आजोबा बाबा काही म्हणणार नाही ना? ",.. श्रेया

"आजी आजोबा एकदम नवीन विचाराचे आहेत, तुझ्या बाबांच काही म्हणणं नाही, घरी आल्यावर बदलशील ना तू कपडे",.. सविता ताई

" हो आई, नंतर ड्रेस घालेन ",.. श्रेया

जेवण झालं श्रेया रूम मध्ये आली, सचिनही ऑफिसचे काम करत होता, दुसऱ्या दिवशीची ती बॅग भरत होती गडबड चालली होती,

" मला काहीही सापडत नाहीये सचिन ",.. श्रेया

" तू बॅग मधल तुझ सामान नीट ठेव ना कपाटात म्हणजे सापडेल",... सचिन

श्रेयाने मैत्रिणींकडून नोट्स मागून घेतल्या , ती घाईघाईने नोट्स लिहीत होती, सचिन हसुन बघत होता.. काय सुरु आहे हीच ?

" काय चालली आहे एवढी गडबड? ",.. सचिन

" सचिन माझं खूप लिहायचं बाकी आहे, लग्नाच्या आणि फिरायच्या गडबडीत बरीच मागे राहिला आहे मी, बोलू नको माझ्याशी, डिस्टर्ब करू नको ",.. श्रेया

"अरे पण असं हे एका दिवसात होईल का लिहून ?",.. सचिन

"हे बघ माझे पन्नास पानं लिहायचे बाकी आहेत रोज दहा पानं लिहिले तर पाच दिवसात होईल, मला अभ्यासावर लक्ष देवू दे आता ",.. खूप टेन्शन होत श्रेयाच्या चेहऱ्यावर, सचिन हसत होता,

"तुझं चांगलं आहे तुझं शिक्षण होऊन गेलं माझं शिक्षण बाकी आहे म्हणून जास्त करतो आहेस तू",.. श्रेया

" मी लिहून देऊ का? ",.. सचिन

" नको अक्षरात बदल होईल परत सगळं समजून जाईल मॅडमला ",.. श्रेया

" सकाळी केव्हा जायचं आहे कॉलेजला? ",.. सचिन

"आठलाच क्लासेस सुरू होतात साडेसातला निघेल",.. श्रेया

"कशी जाणार आहेस? ",.. सचिन

" पप्पा माझी गाडी आणि ड्रायव्हर इकडे पाठवणार आहेत, त्याच्यातच जाणार आहे, आहेत माझ्या फ्रेंड्स सोबत ",.. श्रेया,

बरच लिहिल तिने, झोपते मी आता सचिन, श्रेया आत जात होती झोपायला,.. "इथे झोप श्रेया आता, तिकडे झोपत होतो ना आपण सोबत",

ठीक आहे.

सकाळी सातलाच श्रेया रेडी होती, खूप धडाम धूम आवाज करून ती सामान घेत होती,

सचिन दचकून उठला,..." काय चाललं आहे श्रेया? जरा सावकाश आवर मला जरा झोपू दे ",

तरीसुद्धा श्रेयाने रूम मधले सगळे लाईट ऑन केले होते, आणि ती काहीतरी शोधत होती,

सचिन उठून बसला आणि समोर बघतच बसला, जीन्स आणि टॉप मध्ये श्रेया खूप सुंदर दिसत होती, केसांची छान पोनी टेल घातली होती तिने, पायात शूज हातात घड्याळ, लाइट लिपस्टिक लावलेली ,.." काय शोधते आहेस एवढ्या आवाज करून श्रेया? ",

"अरे माझे कानातले काल मी इथेच ठेवले होते ते दिसत नाही",.. श्रेया

"घालणं गरजेचं आहे कानात? एवढी सुंदर दिसते आहे पुरे नाही का? आणि हे काय घातलं आहेस जीन्स डायरेक्ट , सासरी ते ही ",.. सचिन मुद्दाम चिडत होता.

श्रेयाला राग आला,.." तिकडे फिरायला जातांना घातली होती जीन्स मी तेव्हा काही नाही म्हंटलास तू? ",

" तिथे आपण दोघ होतो, इथे आई बाबा आजी आजोबा आहेत, तुझं लग्न झालं ना आता ",.. सचिन

" तुझं पण लग्न झालं आहे ना सचिन, तू कशी पॅन्ट घालतो",.. श्रेया

" मग मी काय घालू? मुलं पॅन्ट घालतात ना, तू ही जीन्स घातलेली चालणार नाही, आधी कपडे बदल आणि चुडीदार घाल",.. सचिन

" सिरियसली.. मी हे असं मुळीच करणार नाही, मी विचारलं आहे का आईंना, त्यांनी मला सांगितलं की मला जसं आवडेल तसं मी राहील, तू खूपच जुन्या विचारांचा आहेस, मला असं वाटतं आहे सचिन की मी छान तयार होऊन कॉलेजला जाते आहे, म्हणून तुला जीवावर आल आहे",.. श्रेया

" मला कशाला येईल जीवावर जसं जायचं तसं जा ",.. सचिन

हिला आज तो सौरभ भेटला तर कॉलेज मधे? , काही तरी करायला हव,.. सचिन विचार करत होता, तो चिडला होता, एवढ तयार व्हायला हव होत का हिने, एक तर मी पण सोबत नाही,

" आटोप आणि ऑफिसला जा सचिन ",.. श्रेया

"लवकर ये घरी श्रेया आल्यावर मला फोन कर ",.. सचिन

श्रेया घरातनं निघाली, सासुबाई सासरे समोर बसलेले होते त्यांच्यासोबत ती बोलत होती, किचनमधनं तिने तिच्यासाठी चहा नाष्टा घेतला, डबा भरून घेतला, मी येते आई-बाबा, ती आजी आजोबांच्या रूममध्ये गेली, तिला बघून आजी आजोबा खुश होते,

" खूपच छान दिसते आहे ग तू श्रेया, मी सुद्धा तुझ्या आजीला कधीची म्हणतो आहे की अशी एखादी पॅन्ट पण तुला घेऊन टाक" ,.. आजी आजोबा श्रेया तिघे हसत होते,

"जास्त वाटते आहे का तयारी आजी? ",.. श्रेया

"नाही बेटा छान दिसते आहे",.. आजी

ती कॉलेजला पोहचली माही सुरभी राधिका आलेल्या होत्या, सगळ्यांमध्येच श्रेया कॉलेजला आली ही चर्चा होती,

"तुझ्याकडे तर बघून वाटतच नाही तुझं लग्न झालं आहे",... माही

" काय होतं मग लग्न झाले तर? काय दोन शिंग फुटतात का? रोज प्रमाणे मी असंच कॉलेजला येणार आहे",.. श्रेया

सगळे लेक्चरला गेले, बरच शिकवून झालं, मधल्या वेळेत वेळ होता तेव्हा श्रेयाने खूप नोट्स कम्प्लीट केल्या, आजच्या गडबडीत तिला सौरभ आहे की नाही हे सुद्धा लक्षात आलं नाही, लंच लंच ब्रेक मध्ये समोरून सौरभ आणि त्याचे मित्र कुठेतरी जाताना दिसले, मैत्रिणी एकमेकींकडे बघत होते श्रयाचे लक्ष नव्हतं.

0

🎭 Series Post

View all