Login

रंग....

Love
सावळ्या कान्हा तुझी कांती
आज उजळ भासली
खरंच सांग राधेने का
अलवार मिठी मारली

तुझ्या डोळ्यात आज
गुलाबी इंद्रधनु थिजला
तुझ्या हातातल्या मुरलीचा देह
पहा कसा, प्रेमरंगात भिजला

डोळ्यात चमक कोवळ्या उन्हाची
तिन्हीसांजेचा क्षितिज सोहळा
देही मुरला, अन झळाळला
राधेचा हा रंग आगळा
~ऋचा निलिमा
0