रंगात तुझ्या रंगतांना भाग 7
©️®️शिल्पा सुतार
.........
प्रदीप तिच्या जवळ सरकून बसले. ती जरा दचकली. बाजूला सरकून बसू का? ती विचार करत होती. नको कस वाटत. ती तिथेच बसली.
"अनघा मला छान वाटत आहे अस तुम्ही मी मुल सोबत आहोत ते. तुम्ही काही विचार केला का आपल्या बद्दल?"
अनघा काही म्हटली नाही.
"तुमचा होकार असेल तर आम्हाला आधार होईल. आमच्या कडे पण आम्ही दोघ खूप एकटे पडलो आहोत . दिपूला खरच गरज आहे आईची आणि आता हल्ली मला ही खूप एकट वाटत वाटत. घरात कोणी तरी असाव सगळ सांभाळणार. दिपूला त्यांच्यावर सोडून मी निश्चिंत काम करू शकेल अस. पूर्वी मी घाबरायचो दुसर लग्न म्हणजे कस होईल? दिपूला त्रास होईल का? पण आता तुमची भेट झाल्या पासून माझी काळजी मिटली. अनघा प्लीज आमचा विचार करा. मला माहिती आहे हे सोप नाही, पण यात आपल चांगल आहे. तुम्ही म्हणाल तस करू आपण. "
अनघा तरी गप्प होती.
" तुमची हरकत नसेल तर तुमच्या मनात काय आहे ते सांगा. मी एवढ आश्वासन देतो की या पुढे तुम्हाला, सुमीतला आयुष्यात काही त्रास होणार नाही. माझ्या वर सोडा मी बघून घेईल. तुम्ही फक्त होकार द्या. "
अनघा अजून घाबरली. तिला अंदाज होताच इकडे आलो तर बोलण होईल. प्रदीप अगदी डायरेक्ट बोलतात.
"मुल कुठे आहेत? बघायला हव." काही तरी बोलायच म्हणून ती बोलली.
प्रदीप अजून तिच्या कडे बघत होते. "अनघा मी काय म्हणतो आहे? तुम्ही ऐकल का? "
अनघा खाली बघत होती. "मला वेळ हवा आहे. मी अजून लग्ना बाबत विचार केला नाही." खर तर तिला नकार द्यायचा होता. पण तिला काही बोलता आल नाही.
" काय झाल काही प्रोब्लेम असेल तर मला सांगा. आपण मिळून सोडवू."
" माझ्या वर सासुबाईंची जबाबदारी आहे. त्यांना माझ्या शिवाय कोणी नाही."
"मी आधीच सांगितल ना तुम्ही तिघ या आमच्या कडे. "
" तुमच्या घरच्यांना काही अडचण नाही ना?"
"माझे आई बाबा नाहीत. काकू आहेत. त्या खूप समजूतदार चांगल्या आहेत. तुम्हाला आधार वाटेल त्यांचा."
वेटर सूप घेवून आला. अनघाला बर वाटल. आता मुल येतील. प्रदीप सोबत बोलतांना टेंशन येत.
सुमीत यायला तयार नव्हता.
" चल सुमीत जेवून घे. घरी जायच आहे. दिपू बेटा चल. "
दोघ आले. मुल खूप बोलत होते. ती लक्ष देत होती मुलांकडे. खरच खूप लहान आहे दिपू. त्यात आई नाही. किती वेगळीच समजूतदार झाली आहे ती. सुमीत किती त्रास देतो अल्लड आहे. जेवला नाही तर मी खावू घालते. इकडे प्रदीपला वेळ नसेल. ही कशी शांत बसुन तिची तिची खाते आहे.
तिला जेवता येत नव्हत. नूडल्स मोठ्या होत्या. चमच्यातुन पडत होत्या. प्रदीप उठत होते. अनघाने हाताने सांगितल मी बघते. "दिपू मी मदत करू का?"
तिच्या गालावर छोटस हसू आल. हो.
अनघाने थोड्या नूडल्स चमच्याने तोडून दिल्या. "बघ खाता येतं ना?"
"थँक्स अॅण्टी."
"मम्मी बस झाल. मी जावू का?"
"नाही सुमीत पूर्ण खा आणि आता खेळायच नाही,"
तो नुसता बसुन होता.
"ये इकडे मी खावु घालते." अनघाने त्याला बोलवलं.
" नको मी खातो पाच मिनिट."
सगळ्यांच जेवण झाल.
"आपण निघू या का? आई वाट बघत असतिल." अनघाला जायची घाई झाली होती.
"मम्मी थांबू ना. थोड खेळतो मी. "
" नाही सुमीत चल आजी वाट बघत असेल."
तरी सुमीत खेळायला गेला. पाच मिनिट मम्मी.
प्रदीप अनघा कडे बघत होते. "येईल तो. खेळू द्या त्याला थोड. मी विचारल त्याच उत्तर तुम्ही दिल नाही अजून. काय झाल. काही बोलत नाही तुम्ही. ठीक आहे मी वाट बघेन. आज तुमच्या सोबत, सुमीत सोबत छान वाटल. "
दिपू ऐकत होती." हो ना दिपू. अनघा सुमीत चांगले आहेत ना. "
" येस डॅडी. अॅण्टी तू छान आहेस." दिपू तिच्या जवळ येवून उभी होती. अनघाने तिला मांडीवर घेतल. ती खुश होती.
" थॅन्क्स अनघा. दिपू कंफर्टेबल आहे तुमच्या सोबत. "
" अॅण्टी तू खूप ब्युटीफुल आहेस. " दिपू तिच्या बांगड्या बघत होती. अनघा लाजली.
" सुमीत चल बेटा काय अस? " अनघा.
" सुमीत आपण परत येवू. पूर्ण दिवस." प्रदीपने त्याला जवळ घेतल
"चालेल क्रिकेट खेळु स्विमिंग पूल मधे जावू."
प्रॉमीस.
"मम्मी मला यांच्या सोबत आवडत. "
ते निघाले.
रस्त्यात मुल झोपले होते.
" अनघा तुम्ही या आमच्या कडे. एकदा बघून घ्या सगळ."
"मला सुमीतशी बोलाव लागेल. कारण त्याच्या साठी हा मोठा चेंज होईल. स्वतःच घर सोडून दुसरीकडे रहायला जायच म्हणजे तो तयार होईल का? " अनघा बोलली.
"करू आपण त्याला तयार. आधी तुम्ही तुमच काय म्हणणं आहे ते सांगा. कसलीच काळजी करू नका. "
ठीक आहे.
ते घरी आले. सुमीत चल.
दिपू झोपलेली होती.
" आत येता का? "
" नको आता मला हॉस्पिटल मधे जायच आहे. मी करतो तुम्हाला फोन. चालेल ना? "
हो... ती हळूच म्हटली.
प्रदीप थोडे हसले. सुमीतला घेवून ती आत आली. रेखा ताई खिडकीतून बघत होत्या." आत बोलव ना त्यांना."
"नको त्यांना उशीर होतो आहे. हॉस्पिटल मधे जायच आहे."
" सुमीत थकला का? "
" हो किती खेळला तो तिकडे. " अनघा खुश वाटत होती.
" चहा करू का?" रेखा ताई किचन मधे जात होत्या.
"करते मी थोड्या वेळाने आई,"
थोड्या वेळाने रेखा ताई फिरायला गेल्या. त्यांनी तिथून प्रतिभा ताई फोन करून काय काय झालं ते सांगितल. दोघी खुश होत्या.
" काही बोलली का ती?"
" नाही पण शांत झाली आता. चिडली नाही. "
" मी करते फोन विवाह संस्थेत, त्यांना आपल्या घरी बोलवून घेवू. अनघाचा विचार बदलण्या आधी हे लग्न व्हायला हव. आता घाई करायला हवी."
"हो बरोबर आहे."
प्रदीप हॉस्पिटल मध्ये होते. विवाह संस्थेतुन फोन आला." हा अनघा मॅडमच्या बाबांचा फोन नंबर. त्यांना बोलायच आहे तुमच्याशी."
" ठीक आहे मी बोलून घेतो." त्यांनी फोन केला, प्रभाकर राव चौकशी करत होते. "तुम्ही या आमच्या कडे रविवारी, आपण बसुन बोलू. "
" अनघा मॅडमने होकार दिला नाही अजून." प्रदीप सांगत होते.
" हो मी बोलतो तिच्याशी."
" काका तुम्ही नका मी बोलतो अनघाशी. त्यांच्या होकार महत्वाचा आहे माझ्या साठी."
ठीक आहे.
......
अनघा बँकेत आली. रोजच काम सुरू होत.
"काय झालं काय विचारात आहेस. "रमा भेटायला आली.
ती रमाला सांगत होती काल प्रदीप भेटले ते.
" होकार दे चांगले लोक आहेत. पाच मिनिट विचार करू नकोस.
लंच टाइम मधे प्रतिभा ताईंचा फोन आला. "संध्याकाळी ये घरी. "
" हो सुमीतला घेवून येते," रेखा ताई आल्या नाही. त्या बागेत गेल्या होत्या फिरायला.
सुमीत अनघा आई कडे गेले. सुमीत खेळत होता. प्रतिभा ताईंनी विषय काढला.
"तू ओळखते ना डॉ प्रदीप यांना."
"हो आई."
"मग काय ठरवल तू? "
"अजून काही नाही."
"अस करु नकोस. चांगल स्थळ आहे."
"आई किती घाई करतेस तू."
"बरोबर आहे तीच. तुझ काय ठरलं ते सांग." प्रभाकर राव.
"बाबा मला नाही समजत काय करू माझ्या साठी मोठा बदल आहे हा. सुमीत एडजेस्ट होईल का? सासुबाईंच काय? तस ते म्हटले आई राहतील आमच्या सोबत. पण त्यांना करमेल ना तिकडे? "
" एवढा विचार करण्यात काही अर्थ नाही. लवकर निर्णय घे. प्रदीप चांगले आहेत. व्यवस्थित बोलतात."
" हो खूप चांगले आहेत ते. "
" मग आता मागे वळून बघू नकोस, होकार दे, पुढे जा आयुष्यात. "
ते बोलत होते तेवढ्यात फोन वाजला. रेखा ताई बागेत चक्कर येऊन पडल्या होत्या.
खुप धावपळ झाली सौरभ होता म्हणून ठीक झाल. त्याने पटकन कार काढली. अनघा प्रभाकर राव ती निघाले." "सुमीत आजी जवळ थांब. आई काळजी करू नकोस."
रेखा ताई बाकावर बसल्या होत्या. आजूबाजूला लोक होते. आई चला. त्या बर्या पैकी त्रासात होत्या. खूप घाम आला होता त्यांना. अनघा घाबरून गेली होती. तिने डॉ प्रदीप यांना फोन केला.
" बोला अनघा व्हाॅट प्लेझंट सरप्राईज. "
" प्रदीप आई चक्कर येऊन पडल्या आहेत. त्यांना घाम येतो आहे. मला काही सुचत नाही."
"कुठे आहात तुम्ही?"
"आम्ही हॉस्पिटल मधे येत आहोत."
"या पटकन अजिबात काळजी करू नका."
त्यांना हॉस्पिटल मध्ये आणल. आत नेल. इमर्जन्सी आहे.
डॉक्टर प्रदीप आले. पटकन आत निघून गेले. थोड्या वेळाने त्यांना आत बोलवलं. अनघा प्रभाकर राव आत गेले.
" कश्या आहेत आई? "
" ठीक आहे तब्येत. ब्लड प्रेशर वाढल आहे. बाकी टेस्ट करून घेवू. तुम्ही काळजी करू नका."
"त्यांना भेटू शकतो का?"
"हो जा आत पहिली रूम."
"काही टेंशन सारख नाही ना डॉक्टर."
"अजिबात नाही ठीक आहेत काकू."
अनघा आत गेली.
रेखा ताई आत झोपलेल्या होत्या. अनघा ला बघून त्या उठून बसल्या. आई झोपा.
" अग बर वाटतय आता. हेच ना ते डॉक्टर प्रदीप. छान आहेत."
" आई तब्येत सांभाळा. किती घाबरवल होत तुम्ही. सकाळी गोळी घेतली नव्हती का? "
"घेतली होती काय माहिती काय झाल. आता ठीक आहे मी."
नर्स होती. ती पण हसत होती. काकू बर्या झाल्या वाटत.
प्रभाकर राव आत आले." कश्या आहात रेखा ताई. कसल टेंशन घेतल? "
" नाही हो काय झालं ते समजल नाही. डॉक्टर छान आहेत ना. "
" हो अगदी इप्रेसिव पर्सनॅलिटी आहे. "
" अनघा आता होकार दे पटकन. "
" तुम्हाला खरच बर नव्हत रेखा ताई? की डॉक्टरांना बघायच होत." प्रभाकर राव जोक करत होते.
दोघ होत. त्या हसत होत्या.
बापरे हे बाबा आणि सासुबाई काही ऐकत नाही. ती बाहेर येवून फोन वर बोलत होती. प्रतिभा ताई घरी काळजी करत होत्या. त्यांना सगळं सांगितल." बहुतेक आज सोडणार नाही. मी थांबते तिथे. बाबा सौरभ वापस येतील."
" ठीक आहे मी तुमच्या दोघींचा डबा पाठवते."
"सुमीत ठीक आहे ना?"
"हो ठीक आहे त्याचा काही प्रॉब्लेम नाही. गुणी मुलगा आहे तो."
ती आत येत होती. प्रदीप तिची वाट बघत होते. अनघा या आत. ती केबिन मधे गेली.
" आई खरच ठीक आहेत ना? "
" हो काळजी सारख काही नाही."
" थॅन्क्स. खाण्याचे काही पथ्य? "
" साध जेवण चालेल. "
" मी घाबरून गेले होते. "
" होत अस काकूंच वय तस आहे. त्यांना टेंशन नाही ना कसल?"
" त्या नेहमी जुन्या आठवणी काढून रडतात."
"अजून काही?"
"थोड्या हट्टी आहेत. "
ठीक आहे.
सौरभ आत आला. अनघाने त्याची ओळख प्रदीप बरोबर करून दिली. ते दोघ बोलत होते. थोड्या वेळाने दोघ रूम मध्ये आले.
"ताई काय भारी आहेत डॉक्टर. पटकन हो बोल. कसली वाट बघते आहे. "
सगळ्यांची पसंती झाली होती. अनघाने होकार द्यायचा बाकी होता. ती लाजली.
सौरभ प्रभाकर राव घरी गेले. थोड्या वेळाने सौरभ डबा घेऊन आला. अनघाने रेखा ताईंना जेवायला दिल.
"तू पण बस."
"हो तुमच होवू द्या. "
" सुमीत कसा आहे? "
" ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही. आई तुम्हाला टेंशन आहे का कसल?"
"नाही ग फक्त तुझी काळजी वाटते."
"अस नका करू मी ठीक आहे."
"अनघा होकार दे ना डॉक्टर किती चांगले आहेत."
"आई जेवा तुम्ही काळजी करू नका. तुम्ही म्हणाल तस होईल. "
त्या आता खूप खुश होत्या. जेवण झाल्यावर त्यांनी हळूच प्रतिभा ताईंना मेसेज केला. अनघा तयार आहे लग्नाला आता होकार दिला.
त्यांचा मेसेज आला तुम्ही लवकर घरी या. खूप काम आहेत आता.
रेखा ताई झोपल्या. अनघाच जेवण बाकी होत. ती नुसती बसली होती. डॉक्टर आले. ती उठून उभी राहिली.
" ठीक आहेत का काकू?"
हो.
"चला जेवायच ना?"
जावू की नको ती विचारात होती. तिने डबा घेतला. ती रेखा ताईं कडे बघत होती.
"झोपल्या आहेत त्या. सिस्टर लक्ष द्या. मेडिसिन मुळे उठणार नाहीत त्या."
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा