Login

रंगात तुझ्या रंगतांना भाग 8

कथा पुन्हा प्रेमात पडतांनाची

रंगात तुझ्या रंगतांना भाग 8

©️®️शिल्पा सुतार
.........

अनघा प्रदीप त्यांच्या केबिन मधे आले. "तुम्हाला घरी नाही जायच का? दिपू वाट बघत असेल. "

"घरी फोन केला होता. ती झोपली आहे. जेवण झाल की जातो."

अनघाने प्लेट घेतल्या. प्रदीपच्या घरून डबा आलेला होता. तिने जेवण वाढल.  दोघ जेवत होते. प्रदीप खूप खुश होते. "अनघा तुमच्या सोबत अस जेवतांना खूप बर वाटत आहे."

अनघा थोडी लाजली. तिला जेवण जात नव्हत.

"भाजी छान आहे ही. "

" माझा डबा आई कडून आला आहे." काय करू बोलू का यांच्याशी? सगळ्यांना आवडतात ते आणि मला.... हो छान आहेत ते.

आज त्यांनी अनघाला काही विचारल नाही. सारख तेच तेच बोलल तर बर वाटत नाही. मी प्रपोज केल आहे. देईल ती होकार. तशी माझ्या सोबत खुश असते ही .

" प्रदीप अजून काही देवू का? " अनघाने अशी काळजी करण त्यांना खूप छान वाटत होत.

" घेईन मी. थँक्स. तुमच्या कडच जेवण छान आहे."

"हो आई खूप छान स्वयंपाक करते."

"आमच्या कडे कुक आहे. पण मला घरच जेवण आवडत."

"आता मी आली का छान स्वयंपाक करेन . तुमच्या साठी दिपू सुमीत साठी." अनघा एकदम बोलून गेली.  तिला समजल ती काय म्हटली. आता ती गप्प झाली होती.  खाली बघत होती.

प्रदीप तिच्या कडे बघत होते. ते थोडे हसले.

" अनघा थँक्स. आपल्या लग्नाच ठरवायचं ना मग? तुमच्या घरचे छान आहेत. मला आवडेल तुमच्या घरचा भाग व्हायला. "

एक तर रात्र झाली होती. केबिन मधे कोणी नव्हत. अनघाला काही सुचत नव्हत. ती पटकन उठली. मी जाते.

"जेवून घ्या अनघा. एवढ काही झाल नाही. मोकळ रहा."
प्रदीप प्लेट ठेवायला आत गेले.

अनघा जेवत होती. काय मूर्खासारख बोलली मी. त्यांना काय वाटल असेल. मी खूप उत्सुक आहे लग्नासाठी. तिला तीच हसू येत होत.

प्रदीप येवून बसले. अनघाच जेवण झाल. "तुम्ही राहू द्या. जा हात धुवा मी बघतो. "

" नाही मी करते. "

तिने दोघी डबे बंद केले. आवरल. "मी जाते."

"अनघा थांबा ना. इकडे या."

आता ते सोफ्यावर बसले होते . "अनघा आपण लग्न करून घेवू. आता जास्त विचार करू नका. सुमीतला मी समजावतो. मुल लहान आहेत होतील एडजेस्ट. "

" मला थोड बोलायच होत. "

" हो बोला ना. "

" ते.. मला.. म्हणजे.."

"काय झालं?"

"हे आपल दुसर लग्न आहे. आधीच्या आठवणी इतक्या सहज विसरण्या सारख्या नाहीत. तुम्हाला ही माहिती आहे.  मला थोडा वेळ हवा आहे. म्हणजे आपण कंफर्टेबल झाल्या वर सोबत राहिलो असतो." तिने कसतरी वाक्य पूर्ण केल.

प्रदीपला समजल ती काय म्हणते ते.

" बरोबर आहे अनघा .मी समजू शकतो. पण नवीन नात्याला तेवढाच न्याय द्यायला हवा. जून झाल ते झाल.  तुमच्या साठी मोठा बदल आहे हा. आपण लग्न करू. तुम्ही घरी या रहायला. मग बघू पुढच पुढे. माझ्या कडून तुम्हाला काही त्रास होणार नाही.  काळजी करू नका. तुम्ही तुमचा वेळ घ्या. पण लवकर कंफर्टेबल होता येईल या साठी तुम्ही ही प्रयत्न करायला हवा. "

" हो नक्की. मला ही हे लग्न करायच आहे. सुमीत साठी दिपू साठी. "

" आपल्या साठी सुद्धा. आपण आपल्या गरजा नाकारू शकत नाही. मानसिक शाररिक. मला तुम्हाला आनंदात बघायच आहे. मला स्वतःला खुश रहायच आहे. "

" तुम्ही खूप छान बोलतात. "

" असच छान असेल आपल आयुष्य. "

" नक्की... मला खात्री आहे. तुमचा स्वभाव चांगला आहे. मी जाते. तुमचा आधार वाटला आज खूप धन्यवाद. "

प्रदीप छान हसले. काळजी करू नका. काकू ठीक आहेत.

अनघा रात्री हॉस्पिटल मधे होती. प्रदीप जरा वेळाने घरी गेले.

सकाळी ती घरी जावून फ्रेश होवुन आली. रेखा ताईं साठी कपडे आणले. सुमीत अजून तिच्या आई कडे होता. आज तिने सुट्टी घेतली होती. सकाळी चहा नाश्ता आणला होता तिने. सुमीत शाळेत गेला नव्हता. दुपारी सुमीत, प्रतिभा ताई हॉस्पिटल मध्ये आले.

"आई याला का आणल? हॉस्पिटल मधे इन्फेक्शन होण्याची भीती असते सुमीत."

"अग रहात नाही हा तुझ्या शिवाय. रात्री पण नीट झोपला नाही."

"मम्मी मी तुझ्याकडे रहातो." सुमीत परत रडवेला झाला होता.

"अस करता का सुमीत? तू तर किती हुशार मुलगा आहे . रडायच नाही."

"कोण रडत होत? " डॉक्टर प्रदीप आत आले. सुमीत अनघा उठून उभे राहिले. प्रतिभा ताई त्यांच्या कडे बघत होत्या. त्यांनी रेखा ताईं कडे बघितल. दोघी खुश होत्या.

" मला तर कोणी तरी सांगितल होत की सुमीत खूप हुशार स्ट्रॉग आणि मोठा मुलगा आहे. तो अस घरी रडत होता का?" प्रदीप अस म्हटले. सुमीत अनघा कडे बघत होता काय सांगते ते.

"नाही तो रडत नव्हता. " अनघाने त्याला जवळ घेतल.

आता सुमीतला बर वाटल. उगीच त्या अंकल समोर नाचक्की नको.

" कस वाटतय काकू? "

ठीक आहे.

प्रदीप ही आई आहे,
आई डॉक्टर प्रदीप.. दोघ हसले.

प्रदीप रेखा ताईंना तपासत होते. "आता घरी सोडतो. तीन दिवसांनी या. मी प्रिस्क्रीप्शन लिहून देतो. अनघा तुम्ही चला माझ्या सोबत."

"मम्मी मी पण येतो."

हो चल... अनघा, सुमीत, प्रदीप सोबत गेले. मम्मी या अंकलच हॉस्पिटल  छान आहे.  मला डॉक्टर व्हायच आहे. मला बिग कार हवी यांच्या सारखी. सुमीत सगळीकडे बघत होता.

हो.

" अंकल दिपू कुठे आहे? "

"दिपू स्कूल मधे गेली. तू नाही गेला का?"

"नाही माझी मम्मी घरी नव्हती."

"तुझ तुझ आवरून जायचं. मोठी मुल अस करतात."

"अंकल आपण जाणार आहेत ना पीकनीकला? क्रिकेट खेळायला."

"चालेल जावू. सुमीत मला एक सांग आमच्या घरी क्रिकेट खेळायला जागा आहे. स्विमिंग पूल आहे. तर आमच्या कडे येणार का तू रहायला?"

"नाही मी मम्मी सोबत राहीन. "

" तुझी मम्मी आली तर तिकडे रहायला? "

सुमीत अनघा कडे बघत होता. "जायच का त्यांच्या कडे?"

" हो जावू."

आजी?

" तिला पण घेवून जावु. "

" मम्मी माझी स्कूल? "

"तिथून जायच स्कूल मधे. दिपू सोबत कार ने. " प्रदीपला माहिती होत त्याला कार आवडतात.

"चालेल येवू आम्ही."

प्रदीप अनघा कडे बघत होते. "अजून काही बाकी आहे का? कोणाशी बोलायच आहे का?"

ती मानेने नाही म्हटली. थोडी हसली.

"मग मी येतो रविवारी तुमच्या कडे. तारीख काढून घेवू ."

हो .

अनघा रेखा ताई सुमीत घरी आले. त्यांच्या मैत्रीणी भेटायला आल्या होत्या. सगळ्या तिच्या बद्दल बोलत होत्या. चांगल होईल लग्न झाल तर. आता तुम्ही थोडे दिवस इथे आहात. नंतर नवीन घरी शिफ्ट होणार.

अनघाला कसतरी होत होतं. ती तीच काम करत होती मन भरून आल होत. या घराच्या किती आठवणी होत्या सोबत. इथे मी लग्न करून आले. सुमीत झाला. रवी सोबत इथे सहजीवन सुरु केल. आता एकदम सगळ बदलणार. जमेल का मला.

जेवण झाल. रेखा ताई  टीव्ही बघत होत्या. सुमीत झोपला होता. समोर रवीचा फोटो होता. अनघा आत बसुन रडत होती. रेखा ताई आल्या. रूमची लाइट बंद होती त्यांनी लाइट लावला . "बापरे काय सुरू आहे हे अनघा?"

त्या तिच्या जवळ येवून बसल्या. ती एकदम त्यांना बिलगली. त्यांच्या डोळ्यात पाणी होत. अनघा धीर धर जरा. अस काय करतेस.

"आई मी होकार तर दिला. पण माझ्या कडून नाही होणार हे. काय करू मी?"

"तुला कराव लागेल बेटा. अजून सुमीत लहान आहे. त्याला  वडलांच प्रेम आधार हवा, बरोबर होत आहे हे. मी आहे ना तुझ्या सोबत."

" आई रवी काय विचार करतील? ते माझ्या वर खूप प्रेम करायचे."

"रवी खुश होईल बेटा. त्याला तू अशी रडत बसलेली आवडणार नाही. जास्त विचार करू नकोस. पुढे जा. झोप आता आरामात. "
......

आज अनघाच्या आई कडे प्रदीप येणार होते सगळ्यांना भेटायला. घरात तयारी सुरू होती. अनघा, सुमीत, रेखा ताई सकाळी तिकडे आल्या होत्या. सौरभ सकाळी आला होता.

"ताई हस जरा एवढ काय टेंशन घेतल?"

अनघा छान साडी नेसली होती. केस क्लिप लावून मोकळे सोडले होते. मॅचिंग बांगड्या. कानातले छान तयारी झाली होती. चेहर्‍यावर गोडवा होता तिच्या.

"प्रतिभा ताई नंतर अनघाची दृष्ट काढून टाका. खूप गोड दिसते ही." रेखा ताई आवाज देत होत्या.

" आई काहीही. " ती हसत पुढे जावून बसली.

थोड्या वेळाने प्रदीप, दिपू आले. अनघा पटकन किचन मधे जावुन उभी राहिली. सगळे पुढे बसले होते. दीपु सुमीत सोबत खेळायला आत आली. "वॉव अ‍ॅण्टी तु खूप छान दिसते आहेस." ती अनघाने कशी साडी नेसली काय घातल ते बघत होती.

"आवडल का तुला? "

हो.

"मी  तुला तयार  करू का?"

हो.. ती खुश होती,

अनघाने तिची छान वेणी घालून दिली. अनघा तीला घेवून बाहेर आली. प्रदीप बसलेले होते. "डॅडी  अॅण्टीने मला तयार केल. "

हॅलो अनघा.

ती छान हसली. खर तर लाजली. प्रदीप तिच्या कडे बघत होते. किती छान दिसते ही.

सौरभ प्रदीप बोलत होते,  अनघाने त्यांना चहा दिला. दिपू सौरभ खाऊ खात होते. दिपू अनघाच्या आजुबाजुला होती.

इकड तिकडच बोलून झाल.

"आता पुढे काय ठरवल तुम्ही दोघांनी?" प्रभाकर राव बोलले.

प्रदीप खूप खुश होते.  ते अनघा कडे बघत होते.

"दोघी बाजूने होकार आहे ना. पुढच ठरवून टाकू." प्रभाकर राव.

"ठीक आहे तुम्ही म्हणाल तस काका ."

प्रतिभा ताई, रेखा ताई पुढे येवून बसल्या. "आता चांगल्या कामात उशीर नको. "

हो ना.

" तुमच्या काही अपेक्षा प्रदीप?" प्रभाकर राव विचारत होते.

"लग्न साध्या पद्धतीने करू. लगेच तिथे रजिस्टर करून घेवू. जास्त वाजागाजा नको. "

चालेल.

प्रतिभा ताईंनी गुरुजींना फोन केला. त्यांनी जवळच्या दोघांना सूट होतील अश्या तारखा दिल्या.  अनघा हे बघ ह्या तारीखा आहेत.

" चालेल मला तुम्ही ठरवा."

"मला लवकर लग्न करायच आहे. पहिला मुहूर्त घेवू आपण. "

ठीक आहे.

अनघा प्रदीप दोघ खुश होते.

प्रदीप उठून सुमीत दिपू जवळ गेले. दोघ खेळत होते. ते प्रेमाने त्यांच्याशी बोलत होते, अनघाला बर वाटल अस असू दे पुढे सगळं.

"प्रदीप तुम्ही दिपू बरोबर बोलले का? "

" नाही अजून. "

" तिच्याशी बोलून घ्या. सुमीतला छान समजवल तुम्ही."

चला.

कुठे?

"दिपू सोबत बोलू."

दिपू सुमीत छान शेजारी बसलेले होते. "काय गप्पा सुरू आहेत मुलांनो?"

"डॅडी आम्ही आता पेंटिंग करणार आहोत. मामा ने सगळ सामान आणल आहे. " दिपू खुश होती.

" दिपू तुला सुमीत सोबत आवडत का? "

हो डॅडी.

" तुला माहिती का दिपू.... सुमीत आणि अनघा आपल्या कडे रहायला येणार आहेत. तुला चालेल ना."

ती अनघा कडे बघत होती. अनघाने मानेने हो म्हटल.

" हो डॅडी चालेल. मग सुमीत माझ्या सोबत स्कूल मध्ये येईल का?"

"हो सुमीत तुझा भाऊ आहे. आणि तू त्याची बहीण ."

सुमीत दिपू एकमेकांकडे बघत होते. "कस काय डॅडी ?"

"बेटा मी आणि अनघा लग्न करत आहोत ."

म्हणजे ?

"अनघा तुझी मम्मी होईल. तुला मम्मी हवी होती ना?"

"हो.. पण ती सुमीतची मम्मी आहे. "

" हो तुझी पण मम्मी. "

" मी तुझा पण डॅडी सुमीतचा पण डॅडी. "

सुमीत अनघा कडे आला. "हे डॅडी आहेत का?"

हो.

तो लाजला.

" चालेल ना सुमीत, दिपू? "

दोघ मुल हो म्हटले.

"काढायची ना मग लग्नाची तारीख अनघा?"

हो.

"तुम्ही एवढ्या शांत आहात का? की मला लग्ना नंतर तुमचा आवाज समजेल?"

तिने त्याला मारल." मी अशी आहे. "

सुमीतला विचारायला हव. "आई अशी शांत आहे का सुमीत ?"

"नाही घरी जोरात बोलते ती ."

आता प्रदीप हसत होते. अनघा आत निघून गेली.

एका महिन्याने लग्नाची तारीख ठरली.

एक दोन दिवसांनी हॉटेल मध्ये एक हॉल बूक केला होता प्रदीपने. तिथे लग्न होणार होत.

पुढच्या आठवड्यात सगळे प्रदीपच्या घरी गेले. मालती काकु छान होत्या. त्यांना अनघा आवडली. सुमीत खुश होता. मोठा बंगला होता. पुढे लॉन  मागे स्विमिंग पूल. दोन कार पुढे पार्क केल्या होत्या. नोकर बागकाम करणारे, सिक्युरिटी कसलीच कमी नव्हती. सगळे फिरून घर बघत होते.

अनघा सुमीतच्या मागे फिरत होती. प्रदीप त्यांच्या जवळ गेले. "आवडल का घर सुमीतला?"

हो, तो रेखा ताई कडे निघून गेला.

"अनघा तुला आवडल का घर?"

"हो छान आहे."

"आता सांभाळ सगळ." ती लाजली. प्रदीप तिच्या कडे बघत होते. काही बदल करायचे आहेत का? तू सांगशील ते होईल.

"नाही ठीक आहे हे ."

त्यांनी पुढे होवुन तिचा हात हातात घेतला. अनघा खूप घाबरली. "रिलॅक्स आज छान दिसते आहेस."

थँक्स.

" तुला काय वाटत माझ्या बद्दल अनघा?"

"अस नको मी जाते. "

" नाही चालणार. तू सांगितल नाही तर आज इथून तुला जावू देणार नाही. बोल ना माझ्या बद्दल तुझ काय मत आहे."

"तुम्ही खूप हुशार डॉक्टर आहात. चांगले आहात."

"ते जनरल झाल."

" मग अजून?"

" मला नाही सांगता येणार काही. "

" ठीक आहे होईल आपल्याला एकमेकांची सवय. खरेदी वगैरे करून घ्या. "

" मी काय म्हणते  तुम्ही येणार का शॉपिंगला सोबत? "

"चालेल ना पण मला रविवारी वेळ असतो."

" दिपूला कपडे घेवू. मुलींना आवड असते."

" चालेल एका दिवसात होईल ना पण तुमच्या दोघींची खरेदी. "

"हो होईल. "

" माझ्या साठी सुमीत साठी ही काही घ्यायचा विचार करा."

हो.

0

🎭 Series Post

View all