©️®️शिल्पा सुतार
.........
.........
प्रशस्त अश्या मोठ्या हॉस्पिटल मधे डॉक्टर प्रदीप इनामदार त्यांच्या केबिन मधे बसलेले होते. प्रदीप नेहमी बिझी असायचे . शहरातील नामांकित सर्जन म्हणून त्यांची ओळख होती. ओटी नेहमी फूल असायचा.
नर्स एक एक पेशन्टला नंबर प्रमाणे आत सोडत होती. ऑफिस अॅडमिनीस्ट्रेशन मधला स्टाफ त्यांची पेपर वर सही घ्यायला उभे होते. एक दोन ऑपरेशन झालेले पेशंट वाट बघत होते. प्रदीप घड्याळात बघत होते. अजिबात वेळ नव्हता. कधी आवरेल हे काम.
त्यांच रोज बिझी शेड्यूल असायच. सकाळी दहा नंतर ऑपरेशन असायचे. दुपारी पेशंट यायचे. संध्याकाळी रीक्वेस्ट प्रमाणे ते दुसर्या हॉस्पिटल मधे ही जायचे.
आता हल्ली त्यांनी काम कमी केल होत. रात्री वेळेवर घरी जाव लागायच. कोणी तरी त्यांची वाट बघत असायच. दिपू... त्यांची चार वर्षाची मुलगी जी बालवाडीत होती. आज ती सुद्धा हॉस्पिटल मध्ये आलेली होती.
"डॅडी चल ना पटकन. उशीर होतो आहे." दिपू हट्ट करत होती. तिला हॉस्पिटल मधे बसुन बसुन खूप बोर झाल होत. ड्रॉइंग करून झाल. कॅन्टीन मध्ये जावुन झाल. केक खाल्ला तरी डॅडीच काम होत नाही. आता ती कंटाळली होती. नर्स लाड करत होत्या.
"थांब थोड. काय हे दिपू. दोन पेशंट राहिले. तू का आलीस इकडे. जा आत बस." नर्स हिला घ्या.
"डॅडी आता जायच ना शॉपिंगला."
"हो म्हटलो ना मी. असा हट्ट करायचा नाही. म्हणून मी तुला इकडे आणत नाही. तसा ही तुझा डान्स उद्या आहे. किती घाई करतेस दीपु."
थोड्या वेळाने दोघ निघाले. दिपू खूप खुश होती. "डॅडी टीचरने दिलेल्या पत्त्यावरून ड्रेस घ्यायचा आहे. घागरा ड्रेस संपेन ना तिकडे. " दीपु खूप काळजीत होती.
प्रदीप हसत होते. " नाही संपणार. खूप ड्रेस असतात तिकडे. झाली का तुझी डान्स प्रॅक्टिस? "
" हो डॅडी तू येणार ना माझ्या सोबत?" तिच्या नाजूक चेहर्यावर टेंशन होत.
"हो. अजून काय काय घ्यायचं तुला ?"
आता दिपू खुश होती. "मॅचिंग थिंग्स क्लीप्स सॅन्डल."
"कुठे मिळेल ते? मालती काकूंना सोबत घ्यायला हव होत. " प्रदीप टेंशन मधे होते.
दोघ शॉप मधे गेले बरीच गर्दी होती. ते रांगेत उभे होते. चिठ्ठी प्रमाणे ड्रेस मिळत होते. ते ट्राय करायचे होते लगेच. दोघ आत गेले. आत बरेच पॅरेंट्स आपल्या मुलांना ड्रेस ट्राय करून बघत होते. प्रदीप बघत होते एक छोटासा मुलगा खूप बडबड करत होता. त्याची आई त्याला ड्रेस घालून बघत होती.
"सुमीत नीट उभ रहा. हे बघ मी ओरडेन ह तुला."
गुलाबी रंगाच्या कॉटनच्या साध्या ड्रेस वर ती खूप काॅन्फिडन्ट छान दिसत होती. साधी तरी छान. लांब केस. बोलके डोळे. तिचा मुलगा ही गोड होता. त्यांच्याकडे उगीच प्रदीपच मन आकर्षित झाल. त्याने विचार झटकले.
त्यांच झाल होत. ते निघाले . सुमीत दिपू सोबत हसला. ती पण हसली. सुमीतच्या आईने... अनघाने दिपूच्या गालाला हात लावला. तिला बाय केल.
"कोण आहे ग हा?" प्रदीप विचारत होते.
"डॅडी तो सुमीत आहे. माझ्या क्लास मध्ये आहे. त्याची मम्मी मला आवडते. ती अॅण्टी मला नेहमी खाऊ देते. " दिपू अजूनही त्या दोघां कडे बघत होती.
सगळ सामान घेवून ते दोघ घरी आले. दिपू मालती काकूंना शॉपिंग दाखवत होती. एवढीशी ही किती लगेच उत्साह येतो. तिने तीच सामान नीट ठेवल. इतर वेळी किती सांगाव लागत आवर अस. त्यांच जेवण झाल. प्रदीप कामात होते. दिपू झोपली.
.........
.........
रस्त्याने सुमीत त्रास देत होता. मम्मी आइस्क्रीम प्लीज. आइस्क्रीम भाजी घेवून तो आणि अनघा घरी आले. त्याच एरियात त्यांचा छोटा बंगला होता .
अनघा, रेखा ताई... तिच्या सासुबाई, सुमीत तिघेच होते तिथे रहायला . अनघाचे आई वडील जवळ रहात होते. तो एक मोठा आधार होता.
आजी... आजी.
"आले. काय गोंधळ आहे याचा?" रेखा ताई.
" डान्स साठी ड्रेस घेतला ." सुमीत खुश होता .
"चला आवरुन या. भूक लागली आहे." जेवताना सुमीत खूप बोलत होता. रेखा ताई, अनघा कौतुकाने ऐकत होत्या. त्याच जेवण झाल.
"सुमीत आता टीव्ही बघायचा नाही झोपून घे. चल." अनघाने त्याला आत पाठवल.
रेखा ताई मागच आवरत होत्या.
"आई तुम्ही सुमीतला सांभाळा मी आवरते."
"असू दे ग. घरात इनमिन तीन लोक. काही काम नाही. जा तू पड जरा. तू पण थकते दिवस भर. त्यात सुमीत पण त्रास देतो." रेखा ताई.
अनघा आत आली.
" मम्मी स्टोरी सांग प्लीज सांग. "
"सुमीत तुझा होम वर्क झाला ना?" रोजच्या सवयी नुसार अनघाने विचारल.
" हो उद्या सुट्टी आहे ना. विसरली का मम्मी. उद्या डान्स. " सुमीत तिला हसत होता.
" अरे हो किती हुशार माझ बाळ. " दोघ दंगा मस्ती करत होते. रेखा ताई ही येवून बसल्या. त्यांनी सुमीतला जवळ घेतल. त्या स्टोरी सांगत होत्या. सुमीत लगेच झोपला.
अनघाने आई कडे फोन केला होता." उद्याच लक्ष्यात आहे ना आई तू आणि बाबा वेळेवर या शाळेत."
हो.
ती बराच वेळ बोलत होती. आज तिला झोपच येत नव्हती. एकटीने कुठे कुठे बघणार. सगळ्या जबाबदार्या घेवून कंटाळा आला होता. तिला ही वाटत होत रिलॅक्स व्हाव. कोणावर तरी सोपवून आरामात रहाव. पण तिला अस करता येत नव्हत. मन शांत नव्हत. खोल कुठे तरी खूप दुःख होत. थोड्या वेळाने तिला झोप लागली.
सुंदर अश्या समुद्र किनारी छान वातावरण होत. तो आणि ती हातात हात घालून पूर्ण जगाला विसरून एकमेकांशी बोलत मऊ वाळूतून फिरत होते. मध्येच एक लाट येत होती दोघांचे पाय ओले करून जात होती. भरती नुकतीच सुरू झाली होती. आता पाण्यात चालण मुश्किल झाल होत.
"नको इथे रवी पाणी वाढत आहे चल किनार्यावर," अनघा घाबरून त्याला बिलगली.
रवी हसत होता. "काय अस थांब अनघा. एवढी घाबरते का तू," इतक्यात एक मोठी लाट आली ती सरकली, घाबरून तिने रवीला मिठी मारली, तो खूप खुश होता, त्याने तिला अजून जवळ घेतल. "डोळे उघड अनघा बघ किती छान वाटत. "
" रवी प्लीज चल इथून. "
त्याने तिला घट्ट धरून ठेवल होत, तो हसून तिच्या कडे बघत होता, ते दोघ किनार्याला येत होते, मागून एक मोठी अक्राळ विक्राळ लाट आली. काही समजण्याच्या आत रवीला सोबत घेवून गेली.
रवी... अनघा किंचाळत झोपेतून उठुन बसली. खूप रडत होती ती. कुठे आहे तू रवी? ये ना. माझ्या एकटी कडून नाही होत आता. तुझी गरज आहे मला.
काय उपयोग होता पण हे बोलून आणि रडून ही. रवी दूर निघून गेला होता कायमचा.
"नको इथे रवी पाणी वाढत आहे चल किनार्यावर," अनघा घाबरून त्याला बिलगली.
रवी हसत होता. "काय अस थांब अनघा. एवढी घाबरते का तू," इतक्यात एक मोठी लाट आली ती सरकली, घाबरून तिने रवीला मिठी मारली, तो खूप खुश होता, त्याने तिला अजून जवळ घेतल. "डोळे उघड अनघा बघ किती छान वाटत. "
" रवी प्लीज चल इथून. "
त्याने तिला घट्ट धरून ठेवल होत, तो हसून तिच्या कडे बघत होता, ते दोघ किनार्याला येत होते, मागून एक मोठी अक्राळ विक्राळ लाट आली. काही समजण्याच्या आत रवीला सोबत घेवून गेली.
रवी... अनघा किंचाळत झोपेतून उठुन बसली. खूप रडत होती ती. कुठे आहे तू रवी? ये ना. माझ्या एकटी कडून नाही होत आता. तुझी गरज आहे मला.
काय उपयोग होता पण हे बोलून आणि रडून ही. रवी दूर निघून गेला होता कायमचा.
सकाळ झाली होती. रेखा ताई एकदम आत आल्या. "काय झाल अनघा? केवढ्याने ओरडली तू, स्वप्नं पडल का?"
"हो आई," तिने बघितल सहा वाजले होते. रेखा ताईंनी तिला जवळ घेतल. "आई का अस होत. काही गोष्टी मनातून जात नाही माझ्या."
"एवढ्या वर्षाचा सहवास होता ना तुमचा म्हणून. खूप प्रेम आहे ना तुझ रवी वर."
"हो आई. "
" मग असा त्रास करून घ्यायचा नाही. तू रडली की त्याला वरती वाईट वाटेल ना. उठ बर आवर आता."
ती उठली. सुमीत झोपलेला होता. तिने त्याला पांघरुन दिल. एकदम निरागस सुमीतला गोड पापी दिली."आई मी थोड फिरून येते."
हो.
ती मॉर्निंग वॉकला आली. बागेत दोन तीन फेर्या मारल्या. चला आटपायला हव बॅंकेत जायच.
साधारण तिशीतली अनघा एकदम कॉन्फिडन्ट. बोल्ड बिनधास्त होती. रवी गेल्या नंतर तिने एकटीने सगळ सांभाळल होत. अधून मधून ती इमोशनल होत होती. काय करणार पण? तसच आयुष्य काढत होती.
रवी पायलट होता. दुर्गम भागात विमान उतरवतांना एक्सीडेंट झाला. त्यात त्याचा मृत्यू झाला होता. हे दुःख अनघा आणि रेखा ताईंनी कस पचवल होत त्यांच त्यांना माहिती. थोड्या दिवसांनी बाबा पण वारले. आता घरात आता ते तिघे होते, छोटासा सुमित, अनघा, रवीची आई रेखा ताई. ते तिघ खुश होते त्यांच्या दुनियेत. एकमेकांना सांभाळत होते. करणार तरी काय एक दुःखी झाल की बाकीचे त्रास करून घेत होते.
घरी येवून अनघाने आपटायला घेतल. सुमीत उठून तिच्या गळ्यात पडला, "आज कसा काय लवकर उठलास तू?"
" सुट्टी आहे म्हणून. "
"बरोबर आहे आई शाळा असली की उठत नाही हा," अनघा रेखा ताईंना सांगत होती.
आज त्यांना सुमितच्या शाळेत अॅनुअल डेचा प्रोग्राम साठी जायच होत. ती तयारी बाकी होती. सुमीत उत्साही होता . कधी शाळेत जावू अस झाल होत. पंधरा दिवसापासुन प्रॅक्टिस सुरू होती. त्याची ही घरच्यांची ही. त्या दोघींची ही खूप प्रॅक्टिस करून घेतली होती सुमितने.
"अनघा अग याचा कार्यक्रम कधी होईल अस झाल आहे मला. नाचून नाचून पाय दुखता आहेत. "रेखा ताई.
अनघा हसत होती, "सुमीत अरे आजीला त्रास नको देवू. "
"नाही ग कसला आला त्याचा त्रास, तो तर माझा जीव की प्राण, माझ्या रवीचा अंश, तो कुठे जड आहे मला. " नेहमी प्रमाणे त्या इमोशनल झाल्या.
अनघा उठून लगेच किचनमध्ये निघून गेली. रेखाताई तरी बोलून त्यांचं दुःख कमी करून घ्यायचा. पण अनघाला तर तोही चान्स नव्हता. सारख रडल तर त्या ही त्रास करून घ्यायच्या. सुमित आणि रेखाताईंना तिला सांभाळायचं होतं. सुमित लहान रेखाताई ज्येष्ठ, आता हल्ली दोघेही अगदी हट्टी झाले होते. त्यात बँकेच काम. तारेवरची कसरतच होती. सगळंच एका वेळी सांभाळायला लागायचं.
"आई मी ऑफिसला जाऊन येते तुम्ही तयार रहा,"
"मम्मी आपल्याला शार्प पाच वाजता टीचरने यायला सांगितलं आहे," सुमितच्या डोळ्यात भीती होती की अनघाला उशीर तर नाही होणार ना.
" मी आज हाफ डे येणार आहे, दुपारी दोन पर्यंत येते, मग आपण जेवण करून सगळे जाऊ शाळेत, तोपर्यंत आजीला त्रास द्यायचा नाही, तुला जर डान्सची प्रॅक्टिस करायची असेल तर तुझं एकटीच करायची, आजीला आता झेपत नाही एवढी धावपळ परत, संध्याकाळी कार्यक्रमाला जायचं आहे. " अनघा सुमीतला जवळ घेवुन सांगत होती.
"ठीक आहे मम्मी. "सुमीतने तिला गोड पापी दिली.
