©️®️शिल्पा सुतार
.........
.........
अनघाने स्कुटी काढली. ती निघाली. बँकेच काम तिच्या आवडीचं होतं. एमबीए झालेली होती ती. हे काम अगदी सहज मॅनेज करत होती. अनघा मुळातच खूप हुशार होती .
ती बँकेत आली. आज बऱ्यापैकी गर्दी होती. उद्या सुट्टी होती त्यामुळे ही गर्दी असणार हे साहजिकच होतं. गेल्या गेल्या तिच्यासमोर बरेच भरलेले फॉर्म पिऊन काकांनी आणून ठेवले. "पाच मिनिट काका माझं जरा काम आहे मी आत मध्ये जाऊन येते."
ती पळतच केबिनमध्ये गेली. "गुड मॉर्निंग सर."
सावंत सर छान हसले, "बोला अनघा,"
" सर आज हाफ डे जायचं आहे सुमितच्या शाळेत कार्यक्रम आहे. तो उत्साही आहे सकाळपासून,"
"अरे वा छान जाऊन ये आम्हाला फोटो पाठव,"
"हो सर थँक्यू,"
"अनघा शक्य तितकं काम आज संपवून टाक," सावंत सर पूर्वी पासून अनघाला ओळखत होते.
हो सर.. अनघा तिच्या डेस्कवर आली. ती भराभर काम करत होती. दुपारी बरोबर दोन वाजता ती घरी आली. सुमीत वाट बघत होता.
" सुमीत जेवून थोड झोप एक तास, म्हणजे रात्री खूप झोप येणार नाही. "
त्याच झाल जेवण," चल मग पड थोड. मी उठवते तुला साडे तीनला." सुमीत झोपला.
"चला आई आपण जेवून घेवू," दोघी जेवायला बसल्या,
" तुझ्या आई कडे फोन केला का?" रेखा ताई.
" हो आई बाबा तिकडे शाळेत येणार आहेत डायरेक्ट. "
"बर झाल मला सोबत होते ग त्यांची. "
..........
..........
प्रदीप त्यांच काम संपवून घरी यायला निघाले. त्यांच्या साठी असा हाफ डे ऑफ घेण ही अवघड होत. पण एकुलत्या एक मुली साठी ते काहीही करायला तयार होते. कसतरी अॅडजेस्ट केल. दिपू रेडी होती. एकदम आनंदी आणि उत्साही." काकू तुम्ही चला ना. "
" धावपळ होत नाही माझ्याने. तुम्ही जावून या. दीपु छान डान्स कर लवकर या." मालती काकू सत्तर प्लस होत्या.
ते दोघ शाळेत जायला निघाले. दिपू खूप बोलत होती. प्रदीप विचार करत होते सुमीत भेटेल का तिकडे? त्यांना त्यांच्या विचाराच आश्चर्य वाटल.
......
......
रेखा ताई ,अनघा, सुमीत निघाले. सुमित खूप घाई करत होता.
" मम्मी माझा ड्रेस आय कार्ड घेतला का? "
" हो आहे."
एवढासा बालवाडीतला मुलगा पण किती हुशार. खूप काळजी आहे त्याला. रिक्षा आली रिक्षातून अनघाने तिच्या आई बाबा फोन केला," निघाले का तुम्ही? "
हो.
शाळे जवळ या.
सगळ्यांची भेट झाली अनघा आता निश्चित होती, सासुबाई आई सोबत रहातील. ती पटकन सुमितला आत घेवून गेली. टीचर हॉल बाहेर उभ्या होत्या. मुलांची तयारी बाकी होती.
"अनघा मॅडम तुम्ही सुमितला तयार करतात का?"
" हो.. सुमीत ड्रेस आण इकडे. "
ते दोघ आत आले बर्याच मुलांना त्यांची आई तयार करत होती. अनघाने पटकन सुमीतला डान्सचा ड्रेस घातला. मेकअपच्या रांगेत उभ केल.
"इतकी धावपळ होते डान्स असला की," हो ना. दोघी तिच्या बाजूला बोलत उभ्या होत्या.
"पण अश्या प्रोग्राम मुले मुल कॉन्फिडन्ट बनतात स्टेज डेरिंग येत."अनघा त्यांच्या सोबत उभी होती.
" हो ते ही बरोबर आहे."
" पण आपल्या कडून सगळं काम करून घेतात शाळेचे लोक. आता बघा ना मुलांना पण आपल्याला तयार करायला लावलं. "
अनघा नुसतीच हसली, मुल लहान आहेत. आईच ऐकतात म्हणून असेल. काय हरकत आहे. तिला त्या ग्रुपचे विचार पटले नाहीत. ती मोबाईल मध्ये बघत ती बाजूला उभी होती. सुमितचा मेकअप झाल्यानंतर ती टीचर उभी होती तिथे सुमितला देणार होती.
" डॅडी हे असं नाही लावायचं नीट कर. पिन नीट लाव ना " दिपू तिच्या डॅडीला रागवत होती. प्रदीप तिला घागरा ओढणी घालून देत होते. त्यांना काहीही करून ओढणी घेऊन देता येत नव्हती. त्यामुळे ती चिडलेली होती.
त्या दोघां जवळ अनघा गेली, "एक्सक्युज मी.. मी मदत करू का काही? बघू एक मिनिट, "अनघाने तिची ओढणी नीट लावून दिली. केस पण नीट करून दिले. वरती गोल वेणी घालून गजरा लावून दिला.
आता दिपू खूप खुश होती. "थँक्यू ऑन्टी."
पटकन ती पळत जाऊन मेकअपच्या रांगेत उभी राहिली.
पटकन ती पळत जाऊन मेकअपच्या रांगेत उभी राहिली.
"थँक्यू सो मच." तिला मागून आवाज आला. प्रदीप तिच्या कडे बघत होते.
" वेलकम." ती हसत म्हणाली.
प्रदीप छान उंच पुरा एकदम डॅशिंग पर्सनॅलिटी पस्तिशीच्या आसपास असेल. त्यात डॉक्टर. खूप तेज होत चेहर्यावर. कॉन्फिडन्ट. अगदी कोणीही भारावून जाईल अशी पर्सनॅलिटी.
"ते मला दिपूच्या ओढणीच वगैरे काही समजत नाही, गोंधळ होतो जरा."
अनघा फक्त हसली . दीपुची आई नाही आली का सोबत? असा विचार तिच्या मनात आला, ऑफिसमध्ये असेल. काही टार्गेट असतील. आपल्याला काय?
सुमितचा मेकअप झालेला होता. ती आणि सुमित टीचर कडे गेल्या. अनघा टीचरशी बोलत होती. प्रदीप बघत होता किती एक्टीव्ह आहेत या मॅडम. स्वतःच्या मुलाच आवरल. दिपूच आवरल. अजून एक दोघांना मदत केली. किती चांगला वाटतोय स्वभाव. सुंदर ही आहे बर्याच दिसायला. मी असा विचार नको करायला. त्याने दुसरीकडे बघितल. राहून राहून प्रदीपच लक्ष अनघाकडे जात होत. हसतांना गालावर खळी पडते वाटत तिच्या. त्यांच्या चेहर्यावर हसू आल. हिचा नवरा लकी आहे.
"डान्स झाल्यानंतर इथेच या घ्यायला. पूर्ण प्रोग्रॅम झाल्याशिवाय या बाजूचा हाॅलच दार उघडणार नाही," टीचर सांगत होती.
ठीक आहे. अनघा बाहेर गेली, "चला आपण जाऊन बसून कार्यक्रमाच्या ठिकाणी,"
सगळ्यात पुढे फक्त एकाच पेरेंट्सला परमिशन होती. मागच्या बाजूला सगळे बसू शकत होते. त्यातल्या त्यात व्यवस्थित मध्यभागी जागा बघून त्या तिघांना बसवलं. ती स्वतः पुढे बसायला गेली. सोबत सुमितच्या मित्राची आई होती.
कार्यक्रम सुरू झाला. अनघा मन लावून लहान मुलांचा कार्यक्रम बघत होती. आपल्या मुलांचा डान्स केव्हा आहे? तिने बाजूला बघितल प्रदीप होते. ते हसले.
"थोड्या वेळाने आहे आपल्या मुलांचा डान्स." ती हसली त्यांच्याशी.
सुमीत दीपुचा डान्स सुरू झाला. सगळे एक्साईटेड झाले होते. अनघाने मोबाईलने व्हीडिओ घ्यायचा प्रयत्न केला. नीट येत नव्हता. प्रदीप त्यांच्या महाग कॅमेरा तून मस्त व्हीडिओ शूट करत होते. मोठी लेन्स होती त्याला. डान्स झाला. त्यांचा व्हीडिओ खूप छान आला होता.
अनघा सारखं मोबाईल बघत होती. तिचा व्हीडिओ नीट आला नव्हता. ती नाराज होती.
"हे बघा किती छान आला यात." अनघा आता प्रदीपच्या कॅमेरात बघत होती.
जवळून अजून छान दिसते ही. व्हीडिओ बघतांना तिच्या डोळ्यात वेगळीच चमक होती. अगदी निरागस. स्वतः च्या मुलाला डान्स करतांना बघून ती खुश होती. तिचे केस पुढे आले ते तिने मागे घेतले.
नको असा विचार करायला. कोणाची तरी आई बायको आहे ही. प्रदीप कॅमेरा पासून एकदम मागे सरकले.
" तुम्हाला हरकत नसेल तर मला मिळेल का हा व्हीडिओ? मुलांची डान्सची आठवण जपायला हवी " अनघा.
"हो देईन ना. तुमचा फोन नंबर द्या. नाहीतर तुमच्या मिस्टरांचा द्या." अनघाने तिचा नंबर दिला. प्रदीपने कॉल केला हा माझा नंबर.
"ठीक आहे मी सेव करते."
" लगेच नाही पाठवणार व्हीडिओ. जरा एक दोन दिवस लागतील. "
" काही हरकत नाही. थँक्स. "
कार्यक्रम झाला.
"आई बाबा तुम्ही गेट जवळ थांबा. मी सुमितला घेवून येते." ती हॉल कडे गेली. प्रदीप तिथे उभे होते.
सुमीत दिपू सोबत बाहेर आले. ते दोघ खाऊ वाटून घेत होते.
" चल सुमित. तुम्ही ते व्हीडिओच लक्ष्यात ठेवा." अनघा प्रदीपला म्हणाली.
हो नक्की.
दिपू अजूनही सुमितच्या बॅग मधे बघत होती.
" काय चाललय दिपू?"
" डॅडी मी माझी फ्रूटी याच्या कडे ठेवायला दिली होती."
" नाही दिपू डोन्ट टच माय थिंग्स." सुमीत.
"सुमित दे तिला मी तुला दुसरी देईन." अनघा.
" असू द्या दिपू चल आता." प्रदीप.
दिपू रडवेली झाली होती.
"एक मिनिट बेटा हे घे. सुमित तुझी पण फ्रूटी आहे. " अनघा त्याला बॅग दाखवत होती.
दिपू खूप होती, "थँक्यू अॅन्टी. "
" अरे ती अॅण्टी नाही ती मम्मी आहे." सुमीत तिला हसत होता.
" ओके थॅक्यु मम्मी," ती अनघा कडे खूप प्रेमाने बघत होती.
" सॉरी मॅडम .. दिपू काय बोलतेस तू? चल पटकन, " प्रदीप चिडले.
" असू द्या हो," अनघाने खाली वाकून दिपूला जवळ घेतल. तशी दिपू खूपच खुश झाली.
" अॅण्टी तुम्ही खूप छान आहात." ती अनघाच्या गालाला हात लावत होती.
दिपू प्रदीप निघाले, जवळ त्यांनी कार पार्क केली होती. "दिपू अस कोणाला मम्मी म्हणू नये. ऑन्टी म्हणावं,"
"पण मला सुमितच म्हणाला की ती ऑन्टी नाही मम्मी आहे. "
"हो पण ती त्याची मम्मी आहे ना. तुझी नाही,"
"माझी मम्मी कुठे आहे मग डॅडी ?" दिपू रडवेली झाली होती.
" मी तुला सांगितलं ना तुझी मम्मी तिकडे आहे वरती. ती तुला तिकडून बघते. "
दिपू आता कार मधून वाकून आकाशाकडे बघत होती, "त्या स्टारच्या इथे आहे ना? "
हो.
" तुला माहिती आहे डॅडी आमच्या डान्स मध्ये पण स्टार होता. तो स्टार खाली कसा आला?"
" तो खोटा स्टार होता. आकाशात खरं स्टार असतो. "
" डॅडी आपण एक नवीन मम्मी आणायची का माझ्यासाठी? सुमीतच्या मम्मी सारखी खूप सुंदर."
"असं नाही होत कधी बेटा. मम्मी एकच असते ना. "
आता दिपूला राग आला होता. ती तोंड फुगवून बसली होती. " मला मम्मी पाहिजे तिकडे प्रोग्राम मधे सगळ्यांची मम्मी होती. मला हवी म्हणजे हवी. "
" दिपू मालती काकू घेतात ना तुझी काळजी. मग त्या मम्मी सारख्याच आहेत. तुला आवडतात ना त्या. "
"हो खूप आवडतात. "
" मग त्यांच्यासोबतच नीट राहायचं."
" ठीक आहे डॅडी."
किती इनोसंट आहे ही. तिचीच काळजी वाटते मला.
