रंगात तुझ्या रंगतांना भाग 3
©️®️शिल्पा सुतार
.........
.........
प्रदीप दिपू दोघं घरी आले. पॉश एरियात मस्त बंगला होता त्यांचा. घरात फक्त प्रदीप, दिपू, मालती काकू आणि एक बाग काम करणारे कुटुंब होतं.
सुमित, रेखाताई, अनघा घरी आले. तिचे आई-बाबा त्यांच्या घरी गेले. सुमित थकला होता. दुपारचा स्वयंपाक होता. त्यातच तिघांनी जेवण करून घेतलं.
"चला आता झोपा मला पण उद्या सकाळी लवकर जायचं आहे बँकेत. आजचे सगळे काम बाकी आहेत. "
"मम्मी माझा व्हिडीओ दाखव ना. "
" हा बघ नीट आला नाही. दिपूचे बाबा पाठवतील व्हिडीओ. "
सुमीत थकला होता तो झोपला.
.....
.....
दिपू झोपली होती. प्रदीप बाहेर बाल्कनीत बसून कॉफी घेत होते. दिपू आता हल्ली विचित्र वागते. त्या सुमितच्या आईला का बर मम्मी म्हणत होती. मला असं वाटतं की ती तिच्या मम्मीला मिस करते आहे. पण तिने तिच्या मम्मीला बघितल नाही. मनीषा वारली तेव्हा दिपू खूप लहान होती. काय करू शकतो मी? दिपूला सांभाळायला कोणी नाही घरात. मी माझ्या बिझी शेड्यूल मधुन वेळ काढू शकत नाही.
सकाळचा वेळ तरी निघून जायचा. प्रदीप दिपू सोबत असायचे . ती शाळेत गेली की ते हॉस्पिटल मधे जायचे. दिपू दुपारी घरी यायची. मालती काकू तिला सांभाळायच्या. त्यांचा खूप आधार होता. अभ्यास घ्यायला एक टीचर यायची. बर्याच वेळा दिपू रात्री झोपून जायची नंतर प्रदीप घरी यायचे ते बराच वेळ तिच्या जवळ बसुन रहायचे. प्रदीप स्वतःची काळजी घ्यायचे नाहीत. मालती काकू आग्रह करायच्या. त्या म्हटल्या म्हणून प्रदीप थोड तरी जेवायचे.
प्रदीप कप ठेवायला खाले. मालती काकू किचन मधे काही तरी काम करत होत्या. "झाल नाही का काम काकू? आराम करा ना."
"हो पाच मिनिट उद्या उपास आहे तर साबुदाणा भिजवते आहे . दिपूला खूप आवडतो."
प्रदीप तिथे उभे होते.
"दिपू झोपली का?"
हो.
मालती काकू डबा बघत होत्या.
"प्रदीप दुपारी जेवलास का?"
" जमल नाही काकू."
"काय हे अस? स्वतःची काळजी घेत जा. मला थोड बोलायच आहे तुझ्याशी."
"बोला काकू."
"तुला कोणी तरी सोबत असायची गरज आहे. दिपूचा तरी विचार कर. तीला आठवत नाही तिची आई. नुसते प्रश्न विचारत असते ती. दिवस भर माझ्या जवळ असते. माझ ही वय झाल. लग्न करून घे. मला तुझा सुखाचा संसार बघायचा आहे. "
" काकू मला दिपूची काळजी आहे. मी लग्न केल तर कस होईल तीच? नवीन व्यक्तिने तिला प्रेम दिल नाही तर काय उपयोग. उगीच काॅप्लीकेशन वाढतील. नंतर काही करता येणार नाही. "
" कश्या वरून अस होईल? चांगल होईल तुझ. तू चांगला आहेस. "
प्रदीप रूम मधे आले. ते त्यांच्या विचारात होते.
मधल्या काळात बऱ्याच घडामोडी घडून गेल्या होत्या. प्रदीपचे आई वडील आणि मनीषाच सुद्धा निधन झालं होतं. मनीषा दिपूची आई तिला कॅन्सर होता.
प्रदीप मनीषा दोघे डॉक्टर होते. कॉलेजमध्ये भेटले. एमडी झाल्यानंतर दोघांनी लग्न केलं. त्यानंतर प्रदीप परदेशात शिकायला गेले. मनीषा इकडे प्रॅक्टिस करत होती. दिपूचा जन्म झाल्यानंतर कॅन्सर आहे असं समजलं. वर्ष भरात मनीषा वारली. खूप प्रयत्न केले प्रदीपने तिला वाचवण्याचे. पण शेवटची स्टेज होती. दिपूला सांभाळताना खूप त्रास झाला. कसेतरी इतके दिवस काढले. त्यानंतर लगेचच सहा महिन्यात एकामागे एक आई-बाबा वारले. आधी बाबा वारले आणि त्यांचा धक्का घेऊन आईने पण अंथरूण धरलं.
प्रदीपची खूप धावपळ होत होती. एक तर दिपू लहान आणि असा एक ऐक आधार निघून जात होता. पण या काळात मालती काकूंनी खूप साथ दिली. आता त्याच पूर्ण घर सांभाळायच्या. त्यांचंही बरच वय झालं होतं.
घरात सगळ्या कामाला बाया होत्या. दुसर लग्न करायचं म्हटलं म्हणजे काही खरं नाही. मी तर दिवसभर घरी नसतो. आणि त्या नवीन मुलीने जर दिपूचा छळ केला तर ते मला चालणार नाही. माझ्या मनीषाची तेवढीच एक निशाणी आहे माझ्याकडे. माझं दिपू वर खूप खूप प्रेम आहे. नंतर समजून सांगू आपण दिपूला आणि मालती काकूंना.
दिपू सकाळी उठली. तिला थोडा ताप होता. हॉस्पिटल मधे ऑपरेशन होत. प्रदीप तिकडे जाणार होते. मालती काकूंची धावपळ होत होती. दिपू खूप रडत होती. अजिबात ऐकत नव्हती. डॅडी मला मम्मी पाहिजे अस सुरू होत.
"हा काय हट्ट दिपू. अस करता का? मी थोड्या वेळ जावून येतो हॉस्पिटल मधे."
" मला मम्मी हवी. सगळ्यांकडे मम्मी आहे. माझी मम्मी कुठे आहे ." ती अजून रडत होती.
"बर आणु आपण मम्मी. आता रडू नकोस मला उशीर होतो आहे."
नक्की?
हो.
"डॅडी तू जा हॉस्पिटल मधे . मी झोपते." दुपारी तिला जास्त ताप चढला.
मालती काकूंनी हॉस्पिटल मधे फोन करत होत्या. प्रदीप बिझी होते. तीन तासाने ते घरी आले. डॉक्टर सोबत होते त्यांनी दिपूला तपासल. औषध दिल. ते गेले.
काकू खूप चिडल्या होत्या. "प्रदीप तुला लग्न करायच नसेल तर तू दीपुला तुझ्या सोबत हॉस्पिटल मधे नेत जा. या म्हातारीने किती काय काय करायच. ही पोरगी घाबरवुन सोडते. मला होत नाही आता हल्ली."
प्रदीपला माहिती होत मालती काकू उगीच चिडल्या आहेत. वेळ पडली की त्या खूप करतात. पण किती दिवस? त्यांच ही वय झाल. "काकू तुम्ही म्हणता तस होईल. मी लग्नाचा विचार करतो आहे. मला काही सुचत नाही. दिपूला सांभाळायला काळजी घ्यायला कोणी तरी हव. मला सारख हॉस्पिटल सोडून येता येत नाही."
.........
.........
अनघा सकाळी उठली, तिने चहा केला, लगेच भाजी चिरायला घेतली. रेखा ताई उठून आल्या, "काय करते ग?"
भेंडीची भाजी.
"तू भाजी टाक आणि आवर मी करेन पोळ्या. सुमीतला उठव. त्याला नाश्त्याला काय द्यायच?"
"सँडविच सांगतील होत त्याने."
"ते आहे का तयार?"
"नाही.. करते तयारी." तिने सुमीतला उठवल. तो उठत नव्हता. सुट्टीच्या दिवशी बरा लवकर उठून बसतो. शाळा असली की उठत नाही. "आटोप रिक्षा येईल, काका ओरडतात मग. "
सुमितची आंघोळ घालून दिली. त्याने आरामात दूध पील. अर्ध सँडविच खाल्ल.
" हे अस आहे आई. एवढ्या साठी किती करा. हा नुसत तोंड लावून पळतो. " अनघा रेखा ताई बोलत होत्या.
"मम्मी डब्यात काय आहे? " सुमीत.
"भेंडीची भाजी पोळी. "
" सँडविच दे ना. "
"नाही पोळी भाजीच देणार, रोज रोज तेच बोलायच नाही सांगून ठेवते. "
सुमीत शाळेत गेला. अनघा आत आली. किती धावपळ होते माझी हा शाळेत जाई पर्यंत. ती किचन मधे आली. तिने कुकर बाहेर काढला.
" काय करतेस अनघा ? "
" दुपार साठी कुकर लावते आई. "
"नको मी लावेन अकरा वाजता. "
" आई तुम्ही किती करता. "
" आपण आधार आहोत एकमेकींना. "
अनघा एकदम आत निघून गेली आवरायला. तिला माहिती होत सासुबाईं रवी बद्दल बोलतील. त्यांच्या डोळ्यात पाणी असेल. नंतर त्या मला बोलतील किती दिवस एकटीने काढशील. लग्न करून घे तुला रवीची शप्पथ.
ती आवरून बाहेर आली, "आई चला नाश्ता करू, गोळ्या घ्या. आज संध्याकाळी तयार रहा. आपण आई कडे जावू."
"हो. मी काय म्हणते अनघा."
"आई आता नको ना."
"मला काळजी वाटते तुझी."
"आई आपण नको बोलूया या विषयावर."
ती बँकत गेली, रमा आलेली होती, "सुमीतचा डान्स कसा झाला?"
"चांगला झाला. "
" बघू व्हिडिओ. "
"अरे हा बघ नीट आला नाही. त्याच्या क्लास मधली दिपू तिच्या वडलांनी घेतला व्हिडीओ. ते देणार आहेत मला."
" छान दिसतोय ग सुमित."
" हो अग खूप छान नाचला तो. "अनघा त्याच खूप कौतुक करत होती. तिच्या आयुष्यात तोच एकटा आधार होता. त्याच्या साठी ती जगत होती.
संध्याकाळी अनघा घरी आली." चला आजी कडे जायचं ना, याची ट्यूशन टीचर आली होती का आई? "
" हो झाला आहे अभ्यास."
तिघे रिक्षाने प्रतिभा ताईं कडे आले, रेखा ताईंना माहिती होत तस काही तरी कारण असेल म्हणून यांनी जेवायला बोलवलं आहे.
सुमीत आग्रह करत होता. "गार्डन मधे चल."
" हो आधी आजी, बाबांना, मामाला भेट." तिघा आत मध्ये आले .
सुमित सौरभ मामाला ओढत होता. "चल गार्डनमध्ये."
त्यांच्या घरासमोर छान छोटसं गार्डन होत.
"अरे मामाला चहा तर घेऊ दे."
"नको आहे मला चहा. जातो मी सुमितला घेऊन."
"चल मी पण येते." अनघा.
"अनघा तू थांब जरा." तिला समजल नक्कीच यांना काहीतरी बोलायचं आहे म्हणून मला आणि सासूबाईंना बोलवून घेतलं.
अनघा, रेखाताई, प्रतिभाताई आणि प्रभाकरराव हॉलमध्ये बसले होते. "तू पुढे काय करायचं ठरवलं आहे अनघा? "
" काय म्हणजे? कशाबद्दल?"
"तुझ्या आयुष्याबद्दल? किती दिवस तू अस एकटी राहणार आहेस?" प्रतिभा ताई रेखा ताईं कडे बघून बोलत होत्या.
"मी पण तेच म्हणते हिला. पण ही माझ ऐकत नाही ." रेखा ताई.
"कुठे एकटी आहे मी? तुम्ही दोघ आहात, आई आहेत, सुमित आहे सोबत, सौरभ आहे. " अनघा.
" हे बघ दरवेळी तू हेच प्रश्नाचे उत्तर देते. अस चालणार नाही. अजून तुझं काहीच वय नाही. सुमितही अजून चार वर्षाचा आहे. पुढचा विचार कर. लग्न करून घे. " प्रतिभा ताई.
"आई सुमित गार्डन मध्ये असेल मी जाते. "
" नाही. थांब आज माझ बोलण झाल्या शिवाय मी तुला जाऊ देणार नाही. " प्रतिभाताई रेखाताईंकडे बघत होत्या.
"बरोबर बोलते आहे तुझी आई अनघा. अजून तू तिशीतच आहेस. आम्ही किती दिवस पुरणार. लग्नाचं बघायला पाहिजे तुझ्या."
" माझं लग्न झाल्यानंतर तुम्ही कुठे राहणार आहात आई? कशावरून माझा होणारा नवरा तुम्हाला सोबत घेऊन जायची परमिशन देईल?" अनघा काळजीत होती. पुढे कस होईल हा विचार का नाही करत बाकीचे. माझ्या मागे सासुबाई आहेत. माझा मुलगा आहे.
" आम्ही कशासाठी आहोत. आम्ही ठरवलं आहे की आम्ही सोबत राहणार आहोत. हो ना रेखा ताई? "
हो.
" सौरभ च काय? त्याचा अजून लग्नही झालं नाही. त्याच्या बायकोवर का सगळ्यांची जबाबदारी?" अनघा.
"नाहीतरी सौरभ दुसऱ्या गावात रहातो. तर त्याची बायको त्याच्या सोबतच तिकडे जाईल ना? "
" माझ्या सासूबाई माझ्यासोबत राहतील. मी लग्न करणार नाही आणि तुम्ही जर सारखं सारखं तेच बोलणार असाल तर मी यापुढे येथे येणार नाही. " अनघा चिडली.
"हे असं टोकाचं का बोलतेस तू नेहमी. " प्रतिभा ताई.
" टोकाचं नाही तर काय. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ना मला हे आवडत नाही. तरी तुम्ही दरवेळी तोच विषय घेतात. "
प्रभाकर राव उठून आले. ते आता अनघा जवळ बसले होते. "हे बघा नका बेटा तुझी आई सांगते आहे ते बरोबर आहे. आता तुझा मुलगा छोटा आहे तोपर्यंत तुला काही वाटणार नाही. अजून दहा-पंधरा वर्ष तो तुझ्या सोबत राहील. नंतर तो बाहेर पडेल तुझ्या कक्षेतून. त्याला शिक्षणासाठी नोकरीसाठी बाहेर रहाव लागेल. मग तेव्हा तू एकटीच राहशील. आमच्या तिघांचे आता वय झाले. आम्ही किती दिवस टिकू."
" मी विचार करेन बाबा."
प्रतिभाताई प्रभाकर रावांकडे बघत होत्या.
" हे बघ बेटा आमच्या ओळखीतल एक स्थळ आहे. त्यांची पत्नी वारली आहे. त्यांना एक मुलगी आहे. तू भेटणार का त्या त्यांना? "
अनघा आश्चर्याने तिघांकडे बघत होती.
"आई तुम्हाला माहिती होतं का हे? बाबा मी आत्ताशी हो म्हटले म्हणून लगेचच स्थळ बघणार नाही. अजून वर्ष सहा महिने तरी मला वेळ द्या. "
" सौरभच्या लग्ना आधी हे लग्न झाल पाहिजे. "
अनघा चहा ठेवायला आत मध्ये निघून गेली. ती चहा घेऊन आली तेव्हा हे तिघेजण बोलत होते. "आपण लवकरात लवकर त्या दोघांची भेट घालून द्यायला पाहिजे. एकदा ते दोघे एकमेकाला भेटले ना तर मग अनघाला पसंत पडतील. "
"हो ना तिने तिच्या मनाच दार बंदच करून घेतले आहे. बर होईल पण तिची खूप काळजी वाटते मला. " रेखा ताई.
"करू आपण बरोबर." प्रतिभा ताई.
अनघाला खूप रडावसं वाटत होत. रवी मला कोणाशी लग्न नाही करायच . ती एकटी किचन मधे उभी होती. डोळ्यात पाणी होत. तिला खूप एकट वाटत होत .
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा