Login

रंगात तुझ्या रंगतांना भाग 5

कथा सहवासाची कथा पुन्हा प्रेमात पडतांनाची


रंगात तुझ्या रंगतांना भाग 5


©️®️शिल्पा सुतार

.........


अनघा घरी आली. सुमीत वाट बघत होता. "मम्मी तुला उशीर का झाला?" 


"हे बघ सुमित तुझा व्हिडिओ मिळाला आहे. तेच घ्यायला गेली होती. दिपूच्या पप्पांनी दिला आहे." 


" चल व्हिडिओ बघू. "


" जेवण झाल्यावर बघायचं आता नाही. " तिघांनी जेवण केलं आणि नंतर टीव्हीवर तो व्हिडिओ बघितला. खूप छान वाटत होतं डान्स बघून. 


" मस्त घेतला आहे ग व्हिडिओ. एकूणएक मुलगा स्पष्ट दिसत होता. " रेखा ताई खुश होत्या. 


" हो आई त्यांच्या कॅमेरा खूप महाग होता. त्यात छान येणारच. आपल्या मोबाईलच्या व्हिडीओची आणि या व्हिडीओची कुठे बरोबरी होईल. मोठे डॉक्टर आहेत दिपूचे वडील. बिझी असतात." 


सुमीत झोपला. अनघा त्याच्या जवळ पुस्तक वाचत पडली होती. 


" अनघा एक मिनिट ये इकडे थोड बोलायच आहे. " रेखाताई आवाज देत होत्या. 


अनघा पुढे येवून बसली. "आई काय झाल." 


"तुझी आई म्हणते तस तू एकदा त्या मुलाला भेटून तरी ये," 


"आई माझ मन नाही यासाठी." 


"अग खुप चांगल स्थळ आहे अस ऐकल आहे," 


" आई जर त्यांना तुमचा सोबत रहाण मान्य नसेल तर, तुम्ही सुमीत पासून दूर राहू शकाल का? माझी आई आहे तशी. पण सांगा ना तुम्ही सुमीत पासून दूर राहू शकाल का?  


"नाही. सुमीत कडे बघत जगते मी." 


"मग कस करणार? 


"माझ्या साठी तू का एकटी रहातेस, तुझ एवढ आयुष्य पडल आहे, मी करेन एडजेस्ट. "


" आई मला काही फरक पडत नाही, लग्न नको वाटत. आपण तिघे खुश आहोत ना. हट्ट सोडा ना. "


" मला पडतो तू खुश रहायला हव. माझी इच्छा आहे. माझ्या साठी एकदा भेट त्यांना. माझ नाही ऐकणार का? " 


अनघाचा नाईलाज झाला, "ठीक आहे आई तुम्ही म्हणता तस करेन मी. पण माझा होकार नाही मी फक्त भेटणार आहे त्यांना. "


ठीक आहे, रेखा ताई खुश होत्या. 


अनघा बँकेत आली, जोरात काम सुरू होत. लंच ब्रेक पर्यंत थोडा ही वेळ मिळाला नाही. रमा आणि ती डब्बा खात होती. 


"काय झाल अनघा कसल टेंशन आहे?" 


ती सगळं सांगत होती. "मी काय करू रमा. मी एडजेस्ट होईल का नवीन घरी. सासुबाईंच काय? सुमीत मोठा होतो आहे. आई, बाबा, सासुबाई खूप हट्टी पणा करता आहेत." 


"अग पण मला विचारशील तर तू लग्न कर. बघ किती चांगल होईल, सुमीत लहान आहे काही प्रॉब्लेम येणार नाही. भेट तर खरी. काय सांगाव एखादा अति हॅन्डसम मुलगा असेल तर. "


दोघी हसत होत्या. "रमा माझ हे दुसर लग्न आहे. आता कसला हँडसम माणूस. मी तरी आहे का एवढी सुंदर. "


" तू आहेस गोड. "


" काहीही रमा. आता हल्ली कोणाच ऐकायची सवय राहिली नाही. मी माझ जग. कस काय होणार. लग्न झाल की अपेक्षा येतात. मला जमेल का? "


" जमेल काळजी करू नकोस. मला अस वाटत सुमीत साठी तरी हा निर्णय घे. बघ तू सुखी होशील. "


तिने आईला फोन केला. "आई मी भेटायला तयार आहे. पण हा माझा होकार नाही मी फक्त बघते कोण आहे ते. "


प्रतिभा ताई खुश होत्या. " ठीक आहे मी कळवते विवाह संस्थेत. "


शनिवारी भेटायच ठरलं. दुपारी. त्यांना संध्याकाळी वेळ नसतो अस समजल . अनघा शनिवारी ऑफिस मधून डायरेक्ट जाणार होती भेटायला. 


"अनघा अग घरी येवून छान तयार होवुन जा. साडी नेस. " रेखा ताई समजावत होत्या. 


" आई नाही मी अस काही करणार नाही, मी जशी आहे तशी जाणार." तिचा असहकार आंदोलन सुरू होत.


ठीक आहे. तीच रवी वर किती प्रेम होत हे रेखा ताईंना माहिती होत. लागतो वेळ लगेच मनातून जाणार नाही तिच्या. 


 बॅंकेत तिला काही सुचत नव्हत. कोण असेल तो मुलगा. त्यांच्या घरी त्याचे आई वडील असतिल त्यांनी मला त्रास दिला तर? त्या मुलाने मला हात लावला तर. नको. काय हे परत तेच तेच. मी स्पष्ट बोलायला हव होत. घरच्यांना राग आला असता. थोडे दिवस बोलले नसते. उगीच होकार दिला या मुलाला भेटायला. 


आई फोटो माहिती देत होती तिने ते बघायला नकार दिला. नाव प्रदीप आहे हे माहिती होत. 


ठरलेल्या ठिकाणी ती आली. स्कूटर पार्क केली. आत जावसं वाटतं नव्हत. काय करू? ती थोड्या वेळ बाहेर उभी होती. 


प्रदीपने त्यांची कार पार्क केली. समोर अनघा उभी होती, या मॅडम का दिसल्या आता? एक तर यांना बघून काही सुचत नाही. 


हॅलो.. तिला आवाज आला, 


ती बघत होती कोण आहे. अरे डॉक्टर प्रदीप. हे का दिसले आता? अनघा वैतागली. 


"व्हिडिओ आवडला का सुमीत ला? " 


"हो, त्याने थँक्स सांगितल आहे.  


" वेलकम, उद्या पॅरेंट्स टीचर मीटिंग आहे शाळेत. "


" हो का. मी अजून घरी गेली नाही म्हणून माहिती नाही, "


" ओके इथे पार्किंग मधे काय करता आहात? चला, "


"हो येते मी." 


"मी जरा घाईत आहे. सी यू ते निघून गेले." 


अनघा खूप नर्व्हस होती. निघून जाव का इथून. आई बाबांना खोट सांगू की ते भेटले. आवडल नाही स्थळ. नको पण ते सांगतील ना भेट झाली नाही ते. काय कटकट आहे. एकदाच काम संपवू हे. नकार कळवुन देवू. 


ती कशीतरी रेस्टॉरंट मध्ये आली. ओळखणार कस? मध्यस्थी बाई आलेल्या होत्या . त्या मॅडमने हात दिला. एका टेबल वर एक माणूस आणि त्या मॅडम बसलेल्या होत्या. ती हळू हळू पुढे गेली. डॉ प्रदीप त्या मॅडम सोबत बसलेले होते. ती दचकली. ते पण उठून उभे राहिले. त्यांना आश्चर्य वाटल होत. विवाह संस्था मधल्या मॅडम ओळख करून देत होत्या. 


हे आहेत डॉ प्रदीप. 

या आहेत अनघा. 


"तुमच्या दोघांच स्थळ माझ्या कडे आल होते. ठीक आहे माझ काम झाल मी निघते. नीट बोलून घ्या. काय ठरत ते मला कळवा." 


"मॅडम थांबा ना," अनघाला काही सुचत नव्हत. 


"काय झालं?" 


" माझ नाव कोणी नोंदवल?" 


" तुमच्या आईने." 


" ठीक आहे, 


त्या गेल्या. 


प्रदीप तिच्या कडे बघत होते. त्यांना खूप आनंद झाला होता. ओह माय गॉड खर आहे का हे? अनघाच स्थळ मला सांगून आल. पण हिच्या नवर्‍याच काय झाल? समजेल. ही संधी मी सोडणार नाही. आजही किती छान दिसते ही. पांढरा गुलाबी ड्रेस घातला होता तिने. केस मोकळे होते आज. घाबरलेली आहे ही . 


तिला खूप कसतरी झाल. काय हे. बर आहे पण प्रदीप ओळखीचे आहेत. यांना माझा प्रॉब्लेम सांगू. लग्न करू शकत नाही ते समजून घेतील. 


 बसा ना. 


ती समोर बसली. 


दोघ गप्प होते, काही तरी बोलायच म्हणून ते म्हटले. "आपण ओळखतो एकमेकांना. अस ऑकवर्ड फील करू नका." 


 हो.. ती म्हटली. 


पाणी.. तिला घाम आलेला बघून त्यांनी दिल. 


 थँक्स.. तिचा हात थरथरत होता. 


"आरामात अनघा मॅडम. घाबरण्या सारख काही नाही." 


 अनघाने पाणी पिल. वेटर जवळ येवून उभा राहिला. तुम्ही काय घेणार अनघा? 


"काही नको. मी निघते," ती उठून उभी राहिली. 


'एक मिनिट बसा, दोन कॉफी," वेटर निघून गेला, 


अनघा. 


" ते मी नाही माझ्या आईने माझ नाव नोंदवल होत. मला नाही करायच लग्न. तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. "ती एकदम बोलली. 


" ठीक आहे काळजी करू नका. मला नव्हत माहिती सुमीतला वडील नाहीत ते." 


अनघाच्या चेहर्‍यावर दुःख होत. ती काही म्हटली नाही. ती समोर त्यांच्या कडे बघत होती. दिपूच्या आईला काय झालं? तुम्ही सिंगल आहात का? 


" हो ती दोन वर्षा पुर्वी वारली कॅन्सर होता तिला. घरात कोणी नाही दिपूला बघायला. मी असा बिझी तस मालती काकू आहेत. पण त्यांच ही वय झाल. तुमच्या कडे कोण आहे." 


"मी, सासुबाई, सुमीत, सासरे वारले आहेत. माझे आई बाबा भाऊ जवळ रहातात." 


"तुमचे मिस्टर?" 


"रवी ते पायलट होते दोन वर्षा पुर्वी एक्सीडेंट मधे . "


" आय एम सॉरी. "


ती काही म्हटले नाही, कॉफी आली, घ्या. 


अनघा आता ठीक होती. 


" तुम्ही काय ठरवल आहे? "


कसल? 


" आपल्या या लग्ना बाबत? "


" मी अजून काहीच विचार केला नाही." अनघा बोलली. 


" मला ही इथे येण्या आधी वाटत होत कोण असेल भेटायला येणार. दुसर लग्न म्हणजे टेंशन वाटत होत. पण खर सांगु का तुम्हाला इथे बघून खूप बर वाटतय." 


अनघा एकदम घाबरली. काय बोलताय हे. ती आता खाली बघत होती.


" सॉरी म्हणजे मला माहिती आहात तुम्ही कश्या आहात ते. त्या दिवशीच तुमच वागण. सुमीतला ज्या पद्धतीने वाढवल आणि दिपूला तुम्ही आवडल्या होत्या तेव्हा, म्हणून मी अस म्हटलो. " प्रदीप खुश दिसत होते.


अनघाला अजून समजत नव्हत काय कराव?


"तुम्ही तुम्ही बोला ना काहीतरी, बँकेत आहात ना तुम्ही? "


हो. 


" कधी जॉईन झाल्या?" 


" एक दीड वर्ष झाल. "


शिक्षण? 


' ग्रॅज्युएट आहे एमबीए केल आहे. मी बॅंकेच्या परीक्षा दिल्या होत्या." 


"हुशार आहात." 


ती काही म्हटली नाही. किंचित हसली. तिच्या गालावरची खळी दिसली. प्रदीप बघत बसले. अनघाला सुचल नाही. मला निघाव लागेल. ती उठून उभी राहिली. 


" एक मिनिट अनघा तुम्हाला माहिती आहे आपण का भेटलो ते. तुमची हरकत नसेल तर मला थोड बोलायच आहे. "


ती परत खाली बसली. 


" माझा होकार आहे या लग्ना साठी." 


अनघाला खूप धडधड झाल. 


"तुमचा काय विचार आहे?" 


"मी इथे आई बाबांच्या आग्रह मुळे आले होते. मी अजून काहीही विचार केला नाही. नंतर सांगते. "


" ठीक आहे पण पाॅझिटीव विचार करा. हे बघा आपले मूल सोबत आहेत. बरोबरीने वाढतील. आपल्याला एकमेकांचा आधार होईल. इतका वेळ मला दीपुची काळजी होती. समोर तुम्ही आहात मी निश्चिंत झालो. काही हरकत नाही तुम्ही वेळ घ्या. पण एक लक्ष्यात ठेवा दीपुला आणि मला ही तुम्ही हव्या आहात. सुमीत मधे आणि दीपुत काही फरक होणार नाही. "


अनघाला माहिती होत डॉक्टर प्रदीप खूप चांगले आहेत. काय करू नंतर बोलते. आता काही सुचत नाही. 


" मी जावु का? "


 हो. 


" हे कॉफीचे पैसे. "


" मी देतो? "


" नाही नको. तुम्हाला का एकट्याला खर्च. " तिने पैसे समोर प्लेट मधे ठेवले. ती निघून गेली. 


प्रदीप पाच मिनिट तिथे बसले होते. खूप खुश होते ते. हे लग्न झाल तर फार बर होईल. दोघ मुल एका वर्गात आहेत सांभाळेल जातील सोबत. अनघा खूप सुंदर आणि छान समजूतदार आहे. मला आधी पासून आवडते. मला ही सोबत होईल. काहीही झाल तरी मी अनघा सोबत लग्न करणार. 


त्याने फोन लावला मध्यस्ती मॅडमने फोन उचलला. 

"मॅडम माझा होकार आहे या लग्नासाठी." 


"हो मी कळवते तस त्या लोकांना." 


"मॅडम काहीही झाल तरी हे स्थळ जुळवून आणा. रिक्वेस्ट होती." 


हो.... त्या हसत होत्या. "मी सांगते त्यांना. पण त्या ताई म्हणत होत्या अनघा मॅडम नाही म्हणता आहेत लग्नाला. तुम्ही ओळखतात का एकमेकांना?" 


"हो म्हणजे आमचे मुल एका वर्गात आहेत. " 


" अरे वाह हे तर खूप छान झाल."


" पूर्वी एक दोनदा भेटलो आम्ही. त्यांच्या घरच्यांना भेटायच असेल तर मी तयार आहे. "


" मी कळवते तस. "


थँक्स, त्यांनी फोन ठेवला. ते हॉस्पिटल मधे जायला निघाले. 


अनघा घरी आली. रेखा ताईंनी दार उघडल. ती आत येवून तिच्या खोलीत निघून गेली. 


भेटली की नाही ही त्या मुलाला? कस काय विचारणार? त्यांनी फोन हातात घेतला प्रतिभा ताई मेसेज केला." आली अनघा घरी. "


" फोन करू का?" 


"नको अजून. ती आत्ता आली चिडेल ती." 


" काही बोलली का?" 


"नाही रूम मधे निघून गेली. मी चहा करते. बघु चहा घेतांना काही बोलते का ती. मी फोन मग तुम्हाला." 


ठीक आहे. 



0

🎭 Series Post

View all