रंगात तुझ्या रंगतांना भाग 6
©️®️शिल्पा सुतार
.........
अनघा घरी आली. रेखा ताईंनी दार उघडल. ती आत गेली. सुमीत झोपला होता त्याच्या जवळ पडली जरा वेळ. तिला काही सुचत नव्हत. एक ठीक होत कोणी अनोळखी पेक्षा प्रदीप बरे . पण तरी त्यांच्या सोबत लग्न त्यांच्या घरी रहायला जाण त्यांच्या सोबत सहजीवन. नको नाही जमणार मला. आता हल्ली कोणी माझ्या कडे बघितल तरी अंगावर काटा येतो.
काय करू मी आई बाबा आणि आता तर सासुबाई पण अजिबात ऐकत नाही. उगीच गेली मी तिथे त्यांना भेटायला. कसतरी वाटत होत.
पण पर्सनॅलिटी खूप छान आहे डॉक्टरांची. बिझी असतात ते. उच्च विचार समजूतदार वाटत आहेत. आजही किती माझ्या कलाने घेतल त्यांनी. मला मात्र तिथे काय कराव ते सुचत नव्हत. वेंधळ्या सारखी करत होते का मी? काय माहिती काय बोलले. नाही नको मला जमणार नाही हे लग्न वगैरे. मी नकार देते. ठीक आहे मी सुमीत सासुबाईं सोबत. निघून जाईल आयुष्य.
आता तिला बर वाटत होत. ती उठून बाथरूम मधे निघून गेली. बाहेर आली रेखा ताई चहा गळत होत्या. ती समोर येवुन बसली. त्या बघत होत्या तिच्या कडे. "सांगणार का काही? भेटले का ते?"
हो आई.
" कोण होते? कसे होते?"
"डॉक्टर प्रदीप त्यांची मुलगी सुमीतच्या वर्गात आहे."
"तू ओळखते का त्यांना?"
"एकदा दोनदा बघितल शाळेत. तो डान्स व्हिडिओ त्यांनी दिला."
" मग आता काय ठरवल? ओळखीचे आहेत लोक. "
"काही नाही. अजून मन तयार होत नाही माझ. हे घर, तुम्ही, सगळ्या गोष्टीची सवय झाली आई, आता बदल नको वाटतो. "
"एवढ काय? करायच एडजेस्ट सुमितचा विचार कर जरा."
" त्याच दिपू सोबत पटेल का? शाळेत काय म्हणतील मुल त्यांना."
"बालवाडीत आहे तो अजून काहीही काय? मुल मोठे होई पर्यंत सगळ्यांना समजेल ते भाऊ बहीण आहेत. अग तु तिकडे गेली की तिकडे आवडेल तुला. खरच चांगल असेल तर नकार देण्यात काही अर्थ नाही. विचार कर जरा."
सुमीत उठून आला.अनघा त्याच्यात बिझी झाली. "चल दूध पिऊन झाल असेल तर बुक्स काढ. स्टडी करून घेवू मग जा खेळायला."
रेखा ताई फिरायला निघाल्या. त्यांनी बागेतून प्रतिभा ताईंना फोन लावला.
"मी तुमच्या फोनची वाट बघत होते. आनंदाची बातमी आहे समोरून होकार आला आहे. विवाह संस्थेतून आता फोन आला होता . डॉक्टर प्रदीप यांना अनघा पसंत आहे. "
" वाटल मला अनघा ओळखते त्या लोकांना. आता बोलली मी तिच्याशी. जरा हो नाही करते पण होईल चांगल. मला खात्री आहे. त्या डॉक्टरांची मुलगी आणि सुमीत एका वर्गात आहेत म्हणे. त्या दिवशी आपण गेलो होतो प्रोग्राम साठी तिथे आले होते ते. आपण बघितल तरी असत तेव्हा त्यांना. " रेखा ताई उत्साही होत्या.
" हो ना आपल्याला काय माहिती अस होईल पुढे, आता काय? अनघा कधी होकार देते. "
"हो ना. आता अनघाला तयार करायच. "
"तुम्ही काळजी करू नका, तुम्ही आमच्या कडे रहायला या आपल ठरलं तस," प्रतिभा ताई खुश होत्या.
हो,
" आम्ही तुम्हाला कधीच अंतर देणार नाही,"
"माहिती आहे ते मला प्रतिभा ताई, मला माझी काळजी नाही. मला अनघाच चांगल व्हायला हव, तुम्ही नंतर बोलून बघा तिच्याशी. "
हो.
दोघी खुश होत्या.
.....
डॉक्टर प्रदीप हॉस्पिटल मध्ये आले. ते आज वेगळेच खुश होते. कोण कोण पेशंट आहेत किती अपॉइंटमेंट आहे हे सिस्टर येऊन दाखवत होती. एकेक पेशंट आत येत होते. ते त्यांना तपासत होते. पण आज वेगळाच उत्साह वाटत होता. कोणी तरी आपल भेटल आता काही प्रॉब्लेम नाही. अनघा म्हणजे एक स्वप्नं होत. इतकी छान हुशार मुलगी आयुष्यात येणार. मी खुश ठेवेल तिला.
मध्येच त्यांनी फोन हातात घेऊन अनघाचा नंबर व्हाट्सअप वर दिसतो आहे का ते बघितलं. तिचा नंबर होता पण तिचा डीपी दिसत नव्हता. याचा अर्थ तिने माझा नंबर सेव केलेला नाही. मेसेज करून बघू का? नको घाई करायला. होईल सगळं ठीक. मी करेन अनघाला तयार.
त्यांच्या घरचे म्हणत आहेत कि ती लग्नाला तयार नाही म्हणजे हे स्थळ काय आजच जाणार नाही. आज नाहीतर उद्या मी तिला लग्नाला तयार करेल. अनघा छान आहे.
रात्री ते काम संपवून घरी आले. दिपु मालती काकूं सोबत सोफ्यावर बसून टीव्ही बघत होती.
"दिपू मी किती वेळा सांगितला आहे की टीव्ही बघायचं नाही म्हणून. "
"मी आत्ताच आले डॅडी इकडे. इतक्या वेळ मी आत मध्ये होते."
" हो प्रदीप ती आत मध्ये होती." मालती काकू टीव्ही बंद करत होत्या.
" काकू तुम्ही बघा टीव्ही. दिपूला झोपवतो मी. "
" चल दिपू आत. अभ्यास झाला आहे का? "
" हो झाला आहे. "
" झोपून घे बर आता. "
" डॅडी उद्या शाळेत मिटींग आहे. जायचं आहे ना? "
" हो जाऊया. " प्रदीप यांच्या चेहऱ्यावर हास्य आलं. अनघा सुमित येतील तिथे. उद्या आपण त्यांना लंचला घेऊन जाऊ. म्हणजे थोडं बोलता येईल अनघा सोबत. मूल कंफर्टेबल असतिल अस हॉटेल शोधू.
दिपू झोपली. प्रदीप खाली आले. ते काकूं जवळ बसले होते. त्यांनी काकूंना अनघा बद्दल सांगितलं.
काकू खूप आनंद होत्या. "तुला पसंत आहे ना मुलगी?"
"हो काकू."
"आता उशीर करू नको. लवकरात लवकर लग्न करून घे. आजचा दिवस छान असा म्हणायचा. मी खूप खुश आहे तुझ्यासाठी. प्रदीप चल आता जेवून घे."
प्रदीप आनंदाने जेवायला बसले.
.......
आज शाळेत पेरेंट्स टीचर मीटिंग होती. अनघाला तर सकाळपासूनच टेन्शन आलं होतं. शाळेत जायलाच नको वाटत होतं. कारण तिला माहिती आहे तिथे डॉक्टर प्रदीप आणि दिपू भेटतीलच.
सुमित वेगळाच खुश होता." मम्मी मला कॅन्टीन मधला खाऊ घेणार ना तू?"
अनघाच लक्ष नव्हत.
"मम्मी.. मी काय म्हणतो आहे. " सुमीत रेडी होवुन पुढे बसला होता. तो चिडला होता.
"अनघा अग काय विचार सुरू आहे? सुमीत हाक मारतो आहे."
"हो सुमीत तू म्हणतो तस करू. चिडू नकोस."
अनघाने छान लाल ड्रेस घातला होता. कानातले बदलले. सैलसर वेणी घातली. तीने दोनदा आरश्यात बघीतल.
रेखा ताई आल्या मागून. "सुंदर दिसते आहेस."
"आई जास्त वाटते का तयारी?"
" नाही.. तुला छान दिसण्याच आनंदी रहायचा हक्क आहे. मनातून काढून टाक. मोकळी रहा जरा. "
" आई आज शाळेत डॉक्टर प्रदीप येतील. ते बोलले तर माझ्याशी?"
"तू मोकळ बोल बेटा. हो नाही पुढचा भाग आहे."
" हो आई."
ते दोघ शाळेत आले. अपेक्षे प्रमाणे प्रदीप दिपू भेटले. ते दोघ बाहेर उभे होते. तुम्ही भेटून या टीचरला. मी वाट बघतो.
अनघा सुमीत आत गेले. छान मार्क मिळाले होते सुमीतला. अनघा खुश होती.
" हुशार आहे तुमचा मुलगा." टीचर कौतुक करत होती.
तिला एकदम त्याचा अभिमान वाटला. दोघ बाहेर आले.
प्रदीप फोन मधे बघत होते. दिपू कंटाळून उभी होती. "चल ना डॅडी."
"हो पाच मिनिट."
अनघा सुमीत पुढे आले. प्रदीप बघत होते आज ही अनघा खूप सुंदर दिसते आहे. ड्रेस साडी दोघ शोभतात हिला. कानातले सुंदर आहे. त्यांच्या अश्या बघण्या मुळे अनघा लाजली होती.
"मम्मी गार्डन मधे चल. मग कॅन्टीन मधे जावू." सुमीतच पूर्ण ठरल होत काय काय करायच.
"हो जावू पाच मिनिट. "
" हॅलो अनघा.. सुमीत."
"हाय बोल सुमीत."
"हॅलो अंकल."
"त्याला खेळायची घाई झाली आहे."
चला.
ते चौघे गार्डन मधे आले. सुमीत, दिपू खूप एक्साईटेड होते.
" हळू जरा सुमीत पळू नकोस."
"मी बघतो. " प्रदीप त्याच्या मागे गेले.
दिपू शांत पणे झोक्यावर खेळत होती. किती गोड आहे ही. मी होकार दिला तर माझी मुलगी होईल का ही? बापरे तिच्या छातीत धस्स झाल. ती दीपू कडे गेली. ती छान हसली अनघाशी.
"मी झोका देवू का?"
" ओके अॅण्टी थँक्स. "
काय बोलू हिच्याशी? " दिपू तुला काय काय आवडत?"
" मला झोक्यावर आवडत."
"तस नाही हॉबी काय आहे?"
"डान्स, ड्राइंग, पेंटींग आवडत."
किती क्यूट आहे ही. मला अशी मुलगी हवी होती.
"तुझे केस छान आहेत."
"थॅक्यु अॅण्टी. "
ती तिच्या तालात खेळत होती छान पोएम गुणगुणत.
सुमीत प्रदीप समोरून आले.
" मम्मी मी अंकलला हरवल. रेस मध्ये."
"अस बोलू नये बेटा . सॉरी बोल. तुला माहिती का हे अंकल मोठे डॉक्टर आहेत."
"असू द्या .त्याला काय माहिती. सुमीत खूप हुशार आहे. खरच हरलो मी रेस मधे. तुझ्यात खूप ताकद आहे सुमीत."
" हो मी मोठा आहे. मी फायटींग करू शकतो. "
" सुमीत पुरे आता. आम्हाला निघावं लागेल." अनघा निघत होती.
" लंच साठी जायच का? मुल थकले आहेत खेळून." प्रदीप.
" नाही नको .मला थोडे काम आहेत."
" प्लीज आपल्याला ही थोड बोलता येईल. सुमीत जायच का बाहेर?येणार का माझ्या सोबत?" त्यांनी डायरेक्ट सुमीतला विचारल.
अनघाच्या पोटात गोळा आला. काय म्हणण आहे यांच काय माहिती?
" सुमीत यांच्या सोबत जायच का आपण?"
"पण मम्मी आपण कॅन्टीन मधे जाणार होतो ना. मला आइस्क्रीम हव. "
" आपण छान जेवण करू. आइस्क्रीम खावू कशी वाटली आयडिया?" प्रदीप दिपू सुमीतला विचारत होते.
" ठीक आहे मम्मी आपण जावू ."
प्रदीप खुश होते.
"दिपू चल."
सुमीत पुढे पळत होता. दिपू पळून कार जवळ जावून उभी राहिली. सुमीत इकडे ये . प्रदीप ड्रायविंग सीट वर बसले. दिपू पुढे बसत होती.
" दिपू मागे बस. "
" मम्मी मी पुढे बसतो. " सुमीत.
" नाही सुमीत लहान मुल मागे बसतात. अनघा या तुम्ही पुढे."
अनघाला सुचत नव्हत. सुमीत, दिपू मागे आनंदात होते. दिपू त्याला बूक दाखवत होती.
अनघा पुढे बसली. प्रदीप तिच्याशी हसले. तिला कसातरी वाटत होत.
तिने रेखा ताईंना फोन लावला. "आई यायला थोडा उशीर होईल. "
"ठीक आहे, "
" दिपू आणि डॉक्टर यांच्या सोबत आहोत आम्ही. तुम्ही जेवला का?"
" हो झाल जेवण. आरामात ये. सुमीतला चांगले मार्क मिळाले ना?"
हो.
सुमीत आता पुढे सरकून प्रदीप कसे कार चालवतात ते बघत होता.
"सुमीत तुला इंट्रेस्ट आहे का कार मधे? "
"हो अंकल. मी पण खुप स्टडी करून नंतर मम्मी सारख ऑफिस मध्ये जाणार, मोठी कार घेणार आहे."
" कोणती कार आवडते तुला? "
त्याच्या कडे उत्तर नव्हत. आता तो अनघा कडे बघत होता. "कोणती मम्मी? "
" त्याला स्पोर्ट कार, एस यु व्ही आवडतात. "
" अरे वाह छान चॉईस सुमीत."
ते एका रिसॉर्ट मधे आले. खेळायला छान जागा होती. सुमीत खूप खुश होता. तो पुढे पळाला
" थांब सुमीत. "
दिपू मागून आली.
"मम्मी इथे खूप जागा आहे. क्रिकेट खेळता येईल."
" हो आधी इकडे या मुलांनो. चला जरा बसा, "
" अनघा मुलांना काय हव ते सांगा. जेवण ऑर्डर करू. मग जा खेळायला."
"सुमीत सगळ खातो, दिपू तू."
"हो मी पण, फक्त कमी तिखट. "
"मला नूडल्स हव्या. " सुमीतला खेळायची घाई झाली होती.
"मला पण." दिपू पण म्हणाली.
" ठीक आहे, तुम्हाला काय आवडत अनघा? "
" इंडियन फूड आवडत. "
" तुम्हाला काय आवडत प्रदीप ? " पहिल्यांदा ती त्यांच्या बद्दल विचारल होती.
" मला पण साध जेवण आवडत, "
सगळ्यांना सूप. मुलांना नूडल्स. त्यांच्या साठी भाजी पोळी, भात अस जेवण ऑर्डर केल. वेळ होता जेवण यायला.
" आम्ही खेळु का?"
हो.
दोन तीन मुलां सोबत सुमीत क्रिकेट खेळायला पळाला. दिपू तिथे बसुन होती. डॅडी मी खेळते. ती पण झोक्यावर जात होती.
आता आम्ही दोघ. म्हणजे प्रदीप काहीतरी बोलतील माझ्याशी. बापरे... अनघा उठली. "मी बघते दिपूला."
"अनघा थांबा खेळेल ती तीच तीच. "
अनघा बसली. ती बघत होती सुमित कुठे आहे?
"खेळतो आहे तो." प्रदीप तिच्या जवळ सरकून बसले.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा