Login

रंगात तुझ्या रंगतांना भाग 9

कथा सहवासाची कथा पुन्हा प्रेमात पडतांनाची

रंगात तुझ्या रंगतांना भाग 9

©️®️शिल्पा सुतार

......... 

लग्ना साठी विशेष खरेदी करायची नव्हती. रविवारी दुपारी प्रदीप घ्यायला आले होते. अनघा, सुमीत, दीपू, खुश होते. मुलांना काय करू काय नको अस झाल होत. 

 अनघाने प्रदीपच्या पसंतीची साड्या घेतल्या. सुमीत दिपूला कपडे घेतले. दिपू प्रचंड खुश होती त्यात एक दोनदा अनघाने तिला साडी घेतांना विचारल. "ही साडी हा कलर छान आहे का दीपू?" 

त्यामुळे तिला खूप महत्व आल्या सारख झाल होत. ती तिचा एवढासा हात साडी वरून फिरवत होती. जी साडी हाताला छान वाटली ती घे अस सांगितल. 

अनघा आधी पासून खूप समजूतदार आणि छान होती. दुसर्‍याच मन कस जिंकायच बरोबर माहिती होत. दिपू बरोबर तीच पटत होत. 

प्रदीपने कपडे घेतले. घरच्यां साठी कपडे घेतले. "अनघा इकडे या, किती छान ड्रेस आहेत." 

"आता नको खूप खरेदी झाली आहे ." 

"बापरे किती चांगली बायको मिळाली आहे मला. तूम्ही तर काहीच मागत नाही." 

अनघा छान हसत होती. 

"तूम्ही अश्या आहात का? की नंतर त्रास देणार मला?" 

"नंतर त्रास देईन." 

"यु आर वेलकम." 

दोघ हसत होते. 

"डॅडी पिझ्झा." दिपू पळत आली. सुमीत तिच्या सोबत होता. "हो डॅडी.. सॉरी अंकल." 

" सुमीत तू बोल मला डॅडी. "

त्याने अनघा कडे बघितल. तिने हो सांगितल. 

चार पाच ड्रेस घेवून. ते फूड कोर्ट मधे गेले. मुलांना पिझ्झा घेतला. 

" अनघा आपण काय खावू या?" 

समोर चाटच दुकान होत. अनघाच्या तोंडाला पाणी सुटलं. " शेव पुरी आणि भेळ घेवू या का?" 

हो. 

"तुम्ही बसा मुलांजवळ मी आणते." अनघा गेली. थोड्या वेळाने मुलांचा पिझ्झा आला. अनघा ही आली. "छान आहे इथली भेळ मी नेहमी घेते." 

"हो खरच छान आहे. "

" मम्मी आपण का करतोय खरेदी?" 

"सुमीत बेटा लग्न आहे ना." 

"तुझ का मम्मी? "

अनघा लाजली. 

हो. 

" दिपूच्या डॅडी सोबत ना? म्हणजे आता आपण दिपू कडे रहायला जावू?" 

हो. दिपू ऐकत होती. 

"कोण कोण तू मी आणि आजी? "

" सुमीत पुरे झाले प्रश्न. आटोप आता. "

"सुमीत मला विचार काय माहिती हवी आहे ती. किती गोड बोलतो हा." प्रदीप हसत होते.

सुमीत गप्प बसला. 

नंतर ते दागिने खरेदीला गेले. अतिशय सुंदर साध मंगळसुत्र अनघाला आवडल. त्या सोबत नेकलेस सेट बांगड्या घेतल्या. 

सगळ्या डिझाईन सुंदर नाजूक घेतल्या होत्या. तिला खूप शोभत होत्या. 

ते घरी यायला निघाले. "अनघा अजून काय तयारी बाकी आहे आपली?" 

"काही नाही." 

"तुम्ही तुमच सामान कधी शिफ्ट करणार आमच्या कडे?" 

" लग्नानंतर. "

ठीक आहे. 

घर आल. "या ना आत." 

 ते थोड्या वेळ आत आले. अतिशय स्वच्छ टापटीप घर होत. दिपू रेखा ताईंच्या मागे होती. त्यांनी केलेले शंकरपाळे तिला खूप आवडले. अनघा थोडा चिवडा शंकरपाळे दे हीला डब्यात. 

रेखा ताई प्रदीप सोबत बोलत होत्या. त्यांना खरेदी आवडली. 

" चला मी निघतो." 

"जेवून जा ना. दीपू पण रमली आहे सुमीत सोबत. झाल आहे दहा मिनिटात वाढते." 

"ठीक आहे." 

अनघा पोळ्या करत होती. रेखा ताईंनी ताट केले. सगळे बरोबर जेवायला बसले. 

"खूप छान झाला आहे स्वयंपाक. वाह. खूप थॅक्यु काकू." 

रेखा ताई खुश होत्या. 

दिपू झोपून आली होती. "चला आम्ही निघतो. उद्या शाळा आहे मुलांना . "

अनघा बाहेर पर्यंत गेली होती. 

" अनघा आजचा दिवस छान गेला. खूप मजा आली." 

"हो ना." ती दिपू जवळ होती. "अ‍ॅण्टी तू पण चल ना घरी. मला तुझ्या जवळ आवडत. "

" हो येईल मी बेटा. "

"अनघा दीपू काय म्हणते आहे. आता लवकर लग्न करून घरी या. "

ती लाजली. 

" निघतो आम्ही." 

ती दिपू जवळ गेली. "बाय बेटा. काळजी घे."

 येस आॅन्टी. 

अनघा आत आली. ती खरेदी नीट ठेवत होती. सुमित झोपला होता. 

दुसर्‍या दिवशी ती बॅंकेत गेली. 

"झाली का तयारी लग्नाची. " रमा आणि बाकीच्या मैत्रिणी विचारत होत्या. 

" हो काल आम्ही खरेदीला गेलो होतो."

" डॉक्टरांच पाकीट हलक केल की नाही."

" हो थोड." 

दुपार नंतर तिने जवळच्या लोकांना आमंत्रण दिल. सावंत साहेब खुश होते. अनघा ने एक आठवड्याची सुट्टी घेतली होती. 

" हा निर्णय तू खूप छान घेतलास अनघा. तुम्हा दोघांना माझ्या शुभेच्छा आहेत. "

" सर तुम्ही यायच आहे लग्नाला. "

" हो नक्की. लग्ना नंतर याच ब्रँच मधे असणार आहेस ना तू?" 

"हो सर आम्ही याच एरियात रहातो." 

अनघा भाजी घेवून घरी आली. रेखा ताई बागेत फिरायला गेल्या. 

" सुमीत टीव्ही बंद कर. अभ्यास कर थोडा. "

प्रदीप थोड्या वेळ फ्री होते. त्यांनी अनघाला फोन लावला. " काय सुरू आहे?"

" मी आत्ताच आले घरी. आज बॅंकेत जवळच्या लोकांना आमंत्रण दिल. "

" कसल?" प्रदीप मुद्दामून चिडवत होते. 

"आपल्या लग्नाच." अनघा बोलतांना लाजली होती.

 अच्छा छान. 

" तुमच्या कडून कोण कोण येणार आहे ?" 

"कोणी विशेष नाही. एक दोन ओळखीचे. माझा सुमीत काय करतो आहे?"

" सुमीत अजिबात ऐकत नाही. आत्ताच अभ्यासाला बसवल. नुसती गम्मत मज्जा सुरू आहे त्याची. "

" हो दिपूचाही अभ्यास घेतला मी सकाळी. "

" आता काय करते आहे ती? "

" ट्यूशन टीचर आलेली आहे. "

"आमची आठवण कशी काय आली? आज बिझी नाहीत का तुम्ही?"

" तुमची आठवण यायला तुमचा विचार मनातून जायला हवा ना . दीपु पण तुमच्या बद्दल बोलत असते. तिला तूम्ही खूप आवडतात." 

 हो का. 

" हो आहात तूम्ही एवढ्या छान सुंदर, प्रेमळ." 

अनघा लाजली होती. 

" खर बोलतो आहे मी. मला आधी पासून तूम्ही खूप आवडत होता. शाळेत बघायचो तुम्हाला. तेव्हा वाटल नव्हत माझी बायको आहे ही. "

" प्रदीप." आता अनघा हसत होती. 

"गालावर छान खळी असेल ना आता." 

तिने आरश्यात बघितल... हो. 

" मला खूप आवडते ती." 

अनघा घाबरली. तिला वाटल नव्हत प्रदीपच तिच्या कडे एवढ लक्ष असेल. "मी थोडी कामात आहे नंतर बोलते." 

"काय झालं अनघा? तुम्ही खूप लाजता." 

"नाही... तस नाही. "

"मग एवढ छान बोलत होतो आपण. आता नवरा बायको होवू. मोकळ रहा. तुम्ही खूप सुंदर आहात. मला खूप आवडतात. " 

अनघा ऐकत होती. स्वतःच अस कौतुक ती बर्‍याच दिवसांनी ऐकत होती. आता तिच्या कडे तिच्या हक्काचा माणूस होता. 

" प्रदीप तुमचा माझ्या सोबत रहायला आल्यावर भ्रम निरास होईल. " ती हसत होती. 

" का काय झालं? "

" तुम्हाला वाटत मी खूप छान आहे, साधी आहे, पण मी स्ट्रीक्ट ही आहे, मला शिस्त आवडते. "

" तसच हव. "

दोघ मस्त गप्पा मारत होते, तुमच आवडत पुस्तक कोणत? जुने गाणे आवडतात की नवे? प्रदीप अनघाला खूप सांभाळून घेत होते. तिला आवडेल ते बोलत होते. ती मोकळ वागेल बोलेल ते बघत होते. 

अनघा आता निश्चिंत झाली होती. 

लग्नाला आता दोन दिवस बाकी होते. रेखा ताई प्रतिभा ताई कामात होत्या. अनघा आत मधे बॅग भरत होती. बाकीच सामान नंतर ने. आता लागेल तेच घे. ते आता प्रतिभा ताईं कडे रहायला आले होते. सुमीतचे खूप लाड होत होते. 

आज सकाळ पासून घरात उत्साह होता. बाकी कार्यक्रम करायला प्रदीप नाही म्हटले होते. डायरेक्ट लग्न होत. पण प्रतिभा ताई रेखा ताईंना वाटत होत मेहेंदी लावायला हवी. 

अनघाने प्रदीपला फोन केला. 

"बोला अनघा काय सुरू आहे?"

"दीपुला मालती काकूंना पाठवा ना आज इकडे मेहेंदी काढणार आहे. दीपुला हौस आहे. ती हवी मला. "

"अरे वाह छान सुरु आहे तुमच .मी हॉस्पिटल मधे जातांना सोडतो दीपुला तिकडे. मालती काकूंच सांगता येत नाही. 

एक काम करा अनघा तुमची मेहंदी काढून झाली की मला फोटो पाठवा." 

हो. 

थोड्या वेळाने दीपु आली. प्रदीप आत आले नाही. 

अनघाच्या हातावर खूप छान मेहेंदी काढली होती. सौरभने तिचे खूप फोटो घेतले. दीपूच्या छोट्या हातांवर पण अनघा इतकी मेहेंदी काढली होती. सुमीत या सगळ्या पासून लांब होता. त्याला मेहेंदीचा वास आवडत नव्हता.

 दिपू अर्धा तासाने कंटाळली. "मला मेहेंदी धुवायची आहे." 

" अरे अस करतात का? मग माझी मेहेंदी छान रंगेल तुझी नाही चालेल का. नाही एक काम कर थोडा वेळ झोप मग उठली की मेहंदी धुवून टाक." अनघाने तिची समजूत काढली. 

 चालेल. दिपू झोपली. संध्याकाळी तिची मेहेंदी सुंदर रंगली होती. ती खुश होती. नंतर ती कंटाळली." मला डॅडी कडे जायच. घरी जायच."

" हो येतील ते थोड्या वेळाने."

पण ती ऐकत नव्हती. 

 सौरभने प्रदीपला फोन केला. ते आज लवकर घरी आले. अनघा बसलेली होती. प्रदीप आत आले. "अरे वाह मेहेंदी सुंदर काढली." 

दिपू तिचे हात दाखवत होती. "डॅडी हे बघ." 

"अरे वाह किती छान. सुमीत कुठे आहे? "

" तो काय आत आहे. आज मी काही करू शकत नाही. दोघ मुल कंटाळले." 

"चला दिपू सुमीत फिरून येवू." सौरभ, सुमीत, दिपू, प्रदीप फिरून आले. 

"चला मला निघायला हव घरी काकू एकट्या आहेत. ते अनघा कडे बघत होते उद्या भेटू मग."

 हो. 

प्रदीप दीपुला घेवून घरी गेले. 

आज सकाळपासून धावपळ सुरू होती. लग्नाच्या हॉलवर ते सगळे आलेले होते आत मध्ये या अनघाची तयारी सुरू होती. सुमित तयार होऊन बाहेर खेळत होता. प्रदीप तर केव्हाचे तयार झालेली होते. ते मुलांकडे लक्ष देत होते. 

अनघाने सुंदर लाल रंगाचा शालू तिने नेसला होता. गळ्यात हार, कानात झुमके होते , सुंदर रंगलेल्या मेहंदीच्या हातात हिरव्या बांगड्या त्यात पाटल्या सोन्याच्या बांगड्या होत्या, नाकात नथ, केसाचा आंबाडा, त्यावर गजरा माळलेला, पायात साखळ्या, हातात अंगठी, डोळ्यात काजळ, कपाळावर लाल टिकली, अतिशय सुंदर दिसत होती ती. 

प्रदीप तिची वाट बघत होते, अनघा मांडवात आली, सगळे बघत बसले तिच्या रुपा कडे. प्रदीप भान हरपुन गेले होते. आज खूप सुंदर दिसते आहे अनघा. ते ही विसरून गेले की मांडवात बाकीचे लोकही आहेत. 

अनघा त्यांच्या जवळ आली. "प्रदीप चला मी तुमची ओळख करून देते. माझे बॉस आलेले आहेत." 

दोघ पाहुण्यांना भेटायला गेले. 

 अनघाच्या ऑफिसमधल्या लोकांना पुढे जाऊन भेटली. प्रदीप सगळ्यांशी बोलत होते. जोडी खूप छान आहे. प्रदीप अनघा छान दिसतात सोबत. सगळे बोलत होते. 

ती मालती काकूंना भेटली." खूप छान तयारी झाली आहे आज अनघा. "

" काकू अति वाटत नाही ना." 

"नाही ग आज तुमचा दिवस आहे एन्जॉय कर." 

सुमीत दिपू तिच्या सोबत होते. ते स्टेज वर गेले. लगेच मंगलाष्टक सुरू झाले. दोघ भारावून गेले होते. अनघा शांत पणे तो क्षण एन्जॉय करत होती. प्रदीप तिच्या कडे बघत होते. दोघांनी एकमेकांना हार घातले. रेखा ताई प्रतिभा ताई सोबत होत्या. 

अगदी शांत पणे कार्यक्रम सुरू होते. पुढचे विधी झाले. दोघ खुर्चीवर बसले होते. मुल आजुबाजुला खेळत होते. 

सुमीत तिच्या जवळ आला. "मम्मी तू आज का एवढी तयारी केली आहेस." अनघा लाजली. 

"अ‍ॅण्टी नवरी आहे." दिपूने सांगितल. 

"सुमीत छान दिसते ना मम्मी." प्रदीप मुलांशी बोलत होते. 

"हो खूप छान." दोघ म्हंटले. 

 जेवण झाले. बाकीचे पाहुणे गेले. आता घरचे लोक होते. 

नीघायची वेळ झाली. सामान ते नंतर नेणार होते. आज फक्त प्रदीपच्या घरी जाणार होते.

 आज रेखा ताई येणार नव्हत्या. त्या प्रतिभा ताईं सोबत रहाणार होत्या. 

अनघाला खूप भरून आल होत. ती सगळ्यांना भेटत होती. आई बाबा खूप खुश होते. सौरभ खुश होता. 

"येते आई उद्या या तिकडे पूजा आहे घरी. " 

हो, 

ती वेगळीच गप्प झाली होती. 

प्रदीप तिच्या जवळ आले. "मला माहिती आहे अनघा तुम्हाला रडावंस वाटत आहे. मोकळ रहा. जा भेटून या. तुमच्या आई, बाबांशी, काकूंशी बोला . मनात सगळ साठवून ठेवू नका." 

अनघा भेटून आली. चौघे निघाले. कार मधे अनघा शांत होती. मनात बर्‍याच गोष्टी होत्या. आनंद ही होता थोडी धडधड होत होती. मी या नात्याला पूर्ण न्याय देईल. प्रदीप आशा बाळगून आहेत. त्यांच्या सोबत सहजीवन कस असेल. जमेल का मला बँक ही मुल ही. ते शाळेत जातील. दोघांचा अभ्यास घ्यावा लागेल. दिपूला ओरडता येईल का? प्रदीपला राग तर येणार नाही ना. एक नाही अनेक प्रश्न होते मनात. ती दिपूला जवळ घेवून बसली होती. घरी आल सुमीत पळत आत गेला. "हळू सुमीत स्विमिंग पूल कडे जावू नकोस." 

" तिथे लॉक असत काळजी करू नकोस अनघा. चला आत." 

मालती ताई दोघांना ओवाळून आत घेतल. देवाला नमस्कार करून ते मालती काकूंच्या आशिर्वाद साठी वाकले. खूप सुखी रहा, एकमेकाना जपा. 

0

🎭 Series Post

View all