रंगात तुझ्या रंगतांना भाग 10
©️®️शिल्पा सुतार
.........
.........
अनघा सुमीत आत येवून बसले. दिपू थकली होती.
"तुम्ही चहा घेता का अनघा?"
"हो मी करू का?"
"नाही बसा."
प्रदीप आत गेले. स्वयंपाकाला बाई होत्या, त्यांना चहा ठेवायला सांगितला.
दिपू, मालती ताई एका खोलीत रहात होत्या. रेखा ताई, सुमीत साठी एक खोली होती.
"दोघ मुल मोठे झाले की वेगळे राहू शकतात. सध्या तरी ते आजी सोबत ठीक आहे." प्रदीप सांगत होते.
" हो बरोबर आहे." अनघाने सगळ्या रूम बघितल्या.
आज अनघा, सुमीत.. रेखा ताईंच्या खोलीत रहाणार होते. ती खूप थकली होती. तिने कपडे बदलले. सुमीतच आवरलं . ती बाहेर आली. "दीपु कोणत्या रूम मधे असेल मालती काकू? तीच आवरायच आहे."
" ती प्रदीप सोबत असेल."
अनघा त्यांच्या रूम मधे गेली. प्रदीप लॅपटॉप वर काही तरी वाचत होते. "या अनघा."
"दिपू साठी आली होती. दिपू चल बेटा आवरून घे."
ती अनघा सोबत गेली.
"तुझे घरचे कपडे कुठे आहेत?"
" मी आणते. " ती फ्रेश झाली. दिपू सुमीत सोबत होते. अनघा थोडी पडली. तिला झोप लागली.
थोड्या वेळाने दिपू तिला उठवत होती. "अॅण्टी तुला खाली जेवायला बोलवलं आहे. चल ना."
ती उठली. बापरे किती वाजले? मी अशी कशी झोपली? बाकीचे काय म्हणतील? ती पटकन खाली गेली. सुमीत दिपू टीव्ही बघत होते. प्रदीप त्यांच्यावर लक्ष देत होते.
"सॉरी मी झोपली होती वाटत. लक्ष्यात नाही आल. काय स्वयंपाक करायचा आहे? मुलांनी त्रास तर नाही ना दिला. मी आत आहे थोड कामाच बघते."
"अनघा का एवढी काळजी करताय. ठीक आहे आराम झाला ना. मुल मजेत आहे माझ्या सोबत. हो ना सुमीत दिपू."
हो.
ती किचन मधे गेली. स्वयंपाक झाला होता. स्वयंपाकाच्या बाई काम करून गेल्या होत्या. टेबला वर जेवण ठेवल होत.
अनघाने सुमीत दिपूच ताट केल. चला बसा मुलांनो.
"मी इथे बसणार टीव्ही समोर." सुमीत ऐकत नव्हता.
ती उठून त्याच्या जवळ गेली. "सुमीत जेवताना टीव्ही बघायचा नाही. चल तू हुशार आहेस ना."
तो डायनिंग टेबल वर येवुन बसला.
"दिपू चल."
"मम्मी आजी कुठे आहे? " सुमीत विचारत होता.
"त्या मामा कडे आहेत. उद्या येतील इकडे. "
"आपण घरी जाणार की इथे रहाणार?"
"इथे राहणार."
" तुम्ही आमच्या कडे राहणार का?" दिपू ऐकत होती.
"हो दिपू ती तुझी मम्मी आहे." प्रदीप सांगत होते.
मुलांचे जेवण झाल. "मम्मी झोप येते."
" सोफ्यावर झोप जरा वेळ. "
दिपू तिच्या रूम मध्ये गेली. मालती काकूंच जेवण झाल होत. त्या सुमीतला घेवून गेल्या. "माझ्या जवळ झोपवते जरा वेळ."
अनघाने तिच आणि प्रदीपच ताट केल. तिला अगदी अवघडल्या सारख झाल होत. "चला प्रदीप जेवायला." ते येवून बसले.
" करमत ना इकडे? "
" होईल सवय. "
" तूम्ही बसा ना."
"हो तो सुमीत झोपतो आहे." अनघाला वाटल एकदा बघून याव सुमीत झोपला का ते.
" झोपेल तो नाहीतरी मी घेइन त्याला."
ती जेवत होती.
"आज घरात खूप छान वाटतय तुम्ही दोघ आले तर." प्रदीप खुश होते.
" पोळी देवू का?"
"मी घेईन अनघा."
तरी तिने पोळी दिली. मेहेंदीचे बांगड्या भरलेले तिचे हात खूप सुंदर दिसत होते.
"तुम्हाला हा साज शृंगार खूप छान दिसतो अनघा."
ति लाजली. खाली बघून जेवत होती.
जेवल्यावर तिने रेखा ताई फोन केला. त्या सुमीतची चौकशी करत होत्या. सुमीत रडत बाहेर आला. "आई मी त्याच्या कडे बघते ." तिने फोन ठेवला.
" तू कुठे होती मम्मी. आपल्या घरी जायच."
"अस करता का सुमीत ? तू हुशार आहेस ना. अस नाही बोलायच. " अनघा त्याला घेवून रूम मध्ये गेली. ती त्याच्या शेजारी झोपली होती. आता सुमीत झोपला. ती तिथे लोळून मोबाईल मधे बघत होती. प्रदीप आत आले. ती पटकन उठून बसली.... या ना.
" सुमीत झोपला का?"
" हो रडत होता. घरी चल म्हणत होता. लागेल वेळ. दिपू झोपली का? "
हो.. तो तिथे सोफ्यावर बसला. अनघाला सुचत नव्हत काही. "उद्या आई आल्या की रमेल तो."
"हो तो राहील इथे रेखा काकूं सोबत. उद्या पासून तुम्ही तिकडे या झोपायला. आपल्या खोलीत. "
हो... अनघाला धडधड होत होती.
" इकडे या पाच मिनिट जरा बोला माझ्याशी. "
अनघा सोफ्यावर जावून बसली.
"फिरायला जायच का आपण?"
कुठे?
"तूम्ही म्हणाल तिकडे."
"मुलांना कुठे आवडत तिकडे जावु. "
प्रदीप फक्त हसले.
" काय झालं? "
" मुल नाही आपण दोघ. "
" मुल कुठे राहतील? सुमीत अजून रहात नाही माझ्या शिवाय. दिपूच काय? "
"ती रहाते मालती काकूं कडे. करू काहीतरी एडजेस्ट. "
" मुल सोबत असते तर छान वाटल असत. "
"आपल्या नात्याला वेळ देण ही महत्वाच आहे."
तिला वाटत होतं सुमीत रडला तर कस समजवणार त्याला? नको वाटत हे फिरायला जाण. ती तिच्या विचारात होती. प्रदीपने तिचा हात हातात घेतला. ती दचकली.
"काय झाल?"
" काही नाही. "
" घाबरू नका अश्या अनघा. मुलां सोबत आपल सहजीवन तितक महत्वाच आहे ना. थोड सोबत राहील तर आपल्याला एकमेकांबद्दल समजेल."
"हो थोडी गडबड होते आहे आमची. सुचत नाही इकडे."
" काही हरकत नाही. आज पहिला दिवस आहे. ठरवु आपण. काही घाई नाही. "
त्याने पुढे होऊन तिला मिठी मारली. ती कशी बशी बाजूला झाली.
" मी झोपते. गुड नाइट प्रदीप. " तीच म्हणण होत जा तुम्ही इथून.
" आता झोपल्या होत्या ना तुम्ही संध्याकाळी अनघा?" प्रदीप हसत होते.
" उद्या पूजा आहे लवकर उठाव लागेल."
" ठीक आहे. जातो मी."
यांना राग आला असेल का. " सॉरी प्रदीप."
"काय झालं अनघा? तुम्ही लगेच सिरीयस होता. मला माहिती आहे तुम्हाला हे आॅकवर्ड होत आहे . पण थोडी तरी सवय हवी ना आपल्याला एकमेकांची. गुड नाइट." दार लोटून ते निघून गेले.
अनघा नुसती सोफ्यावर बसुन होती. तिचे हात पाय थरथरत होते. उगीच केल लग्न. सुचत नाही इथे काही. माझ्या कडून होणार नाही हे प्रदीप सोबत रहाण. तिने तिची रूम बंद करून घेतली. आता तिला बर वाटत होत. ती जागेवर येवून झोपली. सुमीत कडे बघून रडू येत होत. मला ही याच्या सारख घरी जायच. नको वाटत इथे. ती आता रडत होती. रडता रडता झोप लागली.
सकाळी बेल वाजली. अनघा उठली. आंघोळ करून साडी नेसली. तयार होवुन बाहेर आली.
सुमीत उठला. "मम्मी आजी येईल का आज?"
"हो येईल." तिने सुमीतला तयार केल. दोघ बाहेर आले. दिपू उठली का? ती तिच्या रूम मध्ये गेली. दिपू तयार होत होती. तिने तिची वेणी घालून दिली.
"चला सुमीत दिपू नाश्ता करा."
प्रदीप उठले असेतील का? नको जायला तिकडे. पूजेची तयारी करावी लागेल. ती किचन मधे आली. ती मुलांना दूध देत होती.
प्रदीप किचन मधे आले. "गुड मॉर्निंग. खूप सुंदर दिसते आहेस तू. सकाळी रूम मधे का आली नाहीस? मला तुझा आवाज आला होता. "
" मुलांना भूक लागली होती. म्हणून किचन मधे आली ."
सुमीत आला. "आजी केव्हा येईल मला घरी जायच आहे."
अनघा प्रदीप कडे बघत होती. मी समजावतो.
"सुमीत चल बेटा आपण डायनिंग टेबल वर बसू. माझा चहा आण अनघा. "
हो. ती चहा नाश्त्या घेवून समोर गेली. तिघांना खायला दिल.
प्रदीप सुमीत सोबत बोलत होता." बेटा तुझे फ्रेंड्स, क्लास मधले मुल त्यांच्या डॅडी कडे रहात असतिल ना."
हो.
"हे तुझ्या डॅडीच घर आहे. इथे रहायच आता."
"ते घर?"
"तिथे कोणी नाही .आजी पण इकडे येणार. तुला दोन तीन दिवस वाटेल नंतर इथे आवडेल. इथे मी आहे तुझी मम्मी आहे दिपू आहे दोन आजी आहेत. रडायच नाही."
हो.. अजूनही त्याच्या चेहरा रडका होता.
"चल तू पण बस अनघा. "
सुमीत बसलेला होता. अनघा त्याच्या कडे जात होती. एक तर त्याचा मूड नव्हता. खातो की नाही काय माहीती.
" नाही अनघा इथे बसा. सुमीत तुझ तुझ खा. हे बघ मिरची अशी काढायची पोह्यातुन."
त्याने मान हलवली.
"सुमीत किती हुशार आहे मोठा मुलगा आहे."
" डॅडी मी? "
" तू पण दिपू."
अनघाला कसतरी झाल. अस कोणाच ऐकायची सवय नव्हती तिला. सुमीतने थोड खाल्ल. तीच सगळ लक्ष त्याच्या कडे होत. ती उठू शकत नव्हती जागेवरून. प्रदीप समोर ती घाबरून जात होती. त्यात आज रात्री त्यांच्या खोलीत जाव लागेल का झोपायला? म्हणून तिला काही सुचत नव्हत.
आई कधी येतील अस झाल होत. या म्हणा सुमीतला सांभाळा. प्रतिभा ताई, प्रभाकर राव, रेखा ताई आल्या.
"सौरभ कुठे आहे?"
"त्याला सुट्टी नाही. तो वापस गेला."
सुमीत रेखा ताई सोबत होत्या. "आजी तू कुठे होतीस?"
"तुझ्या मामा कडे."
आजी आल्या मुळे सुमीत खुश होता तो खेळायला पळाला.
प्रतिभा ताई मालती काकू सोबत पूजेची तयारी करत होत्या.
"काही हव असल तर सांगा."
गुरुजी आले, प्रदीप अनघा चला पूजेला बसा.
दोघ पूजेला बसले, प्रदीप अनघा कडे बघत होते." काय झालं? "
"काही नाही. "
"हस थोडी एवढी शांत का आहेस?"
गुरुजी पूजा सांगत होते. हाताला हात लावा. अनघाने हात पुढे घेतला.
"तुझी मेहेंदी खूप छान रंगली. तुझ्या नवर्याच खूप प्रेम दिसत तुझ्या वर." प्रदीप हसत होते. अनघा ही थोडी हसली.
"अनघा एवढ टेंशन नका घेवू."
" सुमीत दिपू चला आरती साठी. "
पूजा झाली. जेवण झाल.
"आम्ही अनघाला घेवून जातो आज. उद्या येईल ती." प्रतिभा ताई.
अनघाला आता बर वाटत होत. ती प्रदीप जवळ आली. " दिपूला नेवू का सोबत ? तिची काळजी घेईन मी."
" जाते का दिपू मम्मी सोबत?"
कुठे?
आजी कडे.
नको.
चल ना.
नाही.. ती प्रदीपला बिलगली.
"ठीक आहे अनघा असू द्या तिला इथे. वेळ लागेल. "
अनघा तीच सामान घेत होती. तिने ते परत कपाटात ठेवल. ती बाहेर आली." आई मी नाही येत."
" काय झालं?" सगळे बघत होते.
"आता फक्त सुमीत नाही दिपू पण माझी जबाबदारी आहे. ती एकटी कशी राहील? ती तयार झाली की मी रहायला येईल. तो पर्यंत दिवसभरा साठी येईल मी. रहायला नाही."
" ठीक आहे. आम्ही निघतो. "
प्रदीप खुश होते. अनघा खूप चांगल्या समजूतदार आहेत.
प्रदीप मुलांसोबत बाहेर होते.
आई बाबा प्रदीप सोबत होते. रेखा ताई आत होत्या .
"आई सुमीतला सांगा हे त्याच घर आहे अस. काल रडत होता तो. तिकडे घरी चल अस करतो."
"हो बोलते मी त्याच्याशी. "
" आई तुम्ही पण लवकर या इकडे माझ्या सोबत रहायला." अनघा खूप रिक्वेस्ट करत होती.
" मी काय म्हणते अनघा मी थोडे दिवस थांबते प्रतिभा ताईं कडे ."
"नाही आई अस करु नका. मला सुमीतला तुमची गरज आहे. इथे या रहायला."
" अग पण तुझ नवीन लग्न झाल आहे. रहा तुम्ही छान. "
" आई प्लीज. मला खूप वाईट वाटत अस. हे तुमच ही घर आहे. तुम्ही आल्या नाही तर मी बोलणार नाही. सुमीत रडतो इथे. तुम्ही असल्या तर बर वाटेल. मला ही सुचत नाही काही. "
" हो येईल मी." रेखा ताई अनघा बाहेर आल्या.
" सुमीत इकडे ये. "
" आजी तु चाललीस का? "
हो.
" मम्मी आपण? "
" आपण इथे राहणार. "
" सुमीत बेटा आता छान रहायच डॅडी कडे. सगळे कसे डॅडीच्या घरी रहातात. तू पण रहायच. तुझ घर किती छान आहे रे. नवीन फ्रेंड्स मिळतील तुला. "
तो हो म्हटला.
" आजी तू कधी येते?"
"दोन तीन दिवसात येते मी. "
" आई माझी या आठवड्यात सुट्टी आहे. पुढचा सोमवार पासून बॅंकेत जाईन मी. आई तेव्हा तुम्ही प्लीज या ."
" हो येईल मी. "
ते घरी गेले.
अनघाच मन भरून आल होत. ती पटकन आत आली. रूम मधे निघून गेली. काय सुरू आहे हे माझ? अस अगदी वेड्या सारख नको वागायला. नुसत रडू येत आहे. प्रदीप काय विचार करतील? शांत रहायला हव. छान मुलांना सांभाळल पाहिजे.
"अनघा मी आत येवू का?" प्रदीप आले होते. तिने डोळे पुसले. ते आत येवून तिच्या जवळ बसले. "काय झालं?"
"काही नाही मला माफ करा."
कश्या बद्दल?
" मी हे अस वागते. या पुढे अस होणार नाही. मी इथे आपल समजून राहील."
"ठीक आहे अनघा. वाटत तस. हा मोठा बदल आहे तुमच्या साठी. सुमीत साठी. लागेल वेळ. अजिबात काळजी करायची नाही. रडायला आल तर रडायच. त्यात काय वाईट वाटून घ्यायच नाही. "
"तुम्हाला राग तर नाही ना आला माझ्या वागण्याचा? "
" मला असा सारखा राग येत नाही. तुम्ही माझी काळजी करू नका. स्वतः कडे मुलां कडे लक्ष द्या."
त्यांनी अनघाला जवळ घेतल. छान वाटत होत त्यांच्या मिठीत. एक आश्वासन होत. मी आहे तुझ्या साठी.
सुमीत दिपू आत पळत आले. प्रदीप अनघा बाजूला झाले.
" अनघा मी थोड्या वेळ हॉस्पिटल मधे जावुन येतो. "
" ठीक आहे. लवकर या संध्याकाळी."
हो.. प्रदीप निघाले.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा