रंगात तुझ्या रंगतांना भाग 11
©️®️शिल्पा सुतार
.........
.........
अनघा, दिपू, सुमीत आता मालती काकू सोबत होते. "चला थोडा वेळ झोपा मग स्टडी करू. मग खेळायच." दोघ मुल खुश होते. जरा वेळाने दोघ झोपले .
मालती काकू अनघा कडे बघत होत्या. "तू खूप चांगली आहेस अनघा. दिपू साठी माहेरी गेली नाहीस ना. छान सांभाळतेस तू मुलांना."
"काकू अजून एक दिवस झाला. ही जबाबदारी मोठी आहे."
"करशील तू बरोबर. झोप जरा वेळ. पाच वाजता ट्यूशन टीचर येईल मुलांची."
संध्याकाळी टीचर आली. मुल अभ्यासाला बसली. नंतर दोघ बाहेर खेळत होते. स्वयंपाक करणार्या ताई आल्या. त्यांनी बाकीचा स्वयंपाक केला. अनघाने भाजी केली. दोघ मुलांना जेवायला वाढल.
" मम्मी तू खाऊ घाल. " सुमीत हट्ट करत होता.
" नाही बेटा तुझ तू जेव दिपू सारख छान स्वतः च्या हाताने. रोज जेवतो ना तू हाताने. मग आता का अस करतोस? सगळे तुला लहान समजतील चालेल का?"
" नाही चालणार."
दोघे मुलांचं जेवण झालं.
"मम्मी आम्ही थोडा वेळ टीव्ही बघू का? "
दिपू नाही म्हणत होती.
"काय झालं दिपू? "
" डॅडी रागवतो टीव्ही बघितलं की. "
"मग काय करूया? मी तुम्हाला दोघांना गोष्टीचे पुस्तक वाचून दाखवू का?"
"हो चालेल." अनघा पुस्तक वाचत होती. दोघ मुल ऐकत होते. दिपू तिच्या मांडीवर डोकं ठेवून झोपली होती. प्रदीप आले.
"अरे तुम्ही केव्हा आले. चहा हवा आहे का? " अनघा उठत होती.
" नाही जेवण करू. बसा तुम्ही मी आवरून येतो. "
मुल मालती ताईं जवळ झोपले.
दोघांच जेवण झाल. अनघा झाक पाक करत होती. मालती काकू बाहेर आल्या. "उद्या मंदिरात जावून या सकाळच्या वेळेत. "
"हो ठीक आहे. मुल झोपले का ?"
"हो. मी पण पडते जरा. "
"अनघा पुरे झाल काम. चला आराम करा आता. "
दोघ रूम मध्ये आले. मोठी बेड रूम होती. त्याला लागून बाल्कनी होती. छान रंग होता. "अनघा उद्या तुमच सामान या कपाटात लावा."
"माझ सामान आणाव लागेल तिकडून."
"हो जावू रविवारी."
"तुम्ही कोणत ठिकाण ठरवल फिरायला जाण्यासाठी." प्रदीप परत त्याच विषयावर बोलत होते.
"मुल खूप लहान आहेत त्यांना सोडून जाता येणार नाही. सुमीत अजून एडजेस्ट झाला नाही. रडतो तो खूप. प्लीज समजून घ्या. "
"काही हरकत नाही. खर तर मी पण तोच विचार करत होतो. जायच तर मुलांना घेवून जावू. "
आता अनघाला बर वाटत होत.
झोपा आता. प्रदीप त्यांची उशी घेवून सोफ्यावर झोपायला गेले. घाई नको करायला अनघा एडजेस्ट होते आहे अजून घरात.
" प्रदीप तुम्हाला दिवस भर काम असत. सोफ्यावर अंग दुखेल. या इकडे काॅटवर झोपा. "
ते काॅटच्या दुसर्या बाजूला झोपले. अनघा झोपली. रात्री सुमीत रडत आत आला.
शु... शांत हो. ती बघत होती प्रदीप उठले का ते.
" तू इकडे का झोपली मम्मी?"
"बेटा आता मी इथे राहील. रडू नकोस शांत हो. चल मी तुला झोपवते."
" अनघा इथे झोपा. ये सुमीत इकडे रडू नकोस. " सुमीत प्रदीप जवळ झोपला.
सकाळी अनघा किचन मधे होती. सुमीत उठलेला होता. आज दोघ मुल शाळेत जाणार होते. धावपळ सुरू होती. दिपू आवरून रेडी होती. सुमीत तुझी बॅग भर.
तो बुक्स बघत होता.
दोघांना नाश्ता दिला. अनघाने गुपचूप मुलांची बॅग बघितली. बरोबर घेतले होते बुक्स. दिपूचे बुक्स कमी दिसत होते. तिने हळूच प्रदीपला सांगितल.
"दिपू तुझे बुक्स रूम मधे राहिले का ते बघ."
"हो डॅडी दोन बुक्स राहिले होते. "
डब्यात पोळी भाजी होती.
"सुमीत जाताना येतांना दिपू सोबत रहा.. नेहमीच्या रिक्षात बसू नको."
"येईल तो व्यवस्थित अनघा काळजी करू नका. तुम्हाला वाटतं त्यापेक्षा सुमित खूप हुशार आहे."
दोघांना डबे दिले. मुल शाळेत गेले.
अनघा, प्रदीप, मालती काकू चहा घेत होते.
"आम्ही देवळात जाऊन येतो. "
अनघा आत आली. छान साडी नेसली. केसांची सैल वेणी घातली. थोडीशी लिपस्टिक लावली. खूप छान दिसत होती ती. प्रदीप आत आले .ते अनघा कडे बघत होते." वाह खूप सुंदर दिसताय तुम्ही."
यावेळी तर घरात त्रास द्यायला ही कोणी नव्हतं. मुलं शाळेत गेलेले होते. अनघा घाबरली होती हे तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं. प्रदीपही गोंधळले होते. दोघांमध्ये एक वेगळाच अवघडलेला पणा आलेला होता. ते तिच्या जवळ येत होते.
"तुम्ही तयार व्हा मी खाली आहे." ती खाली निघून गेली. प्रदीपला तिला थांबवायचं होतं. पण त्यांची बोलायची हिम्मत झाली नाही.
प्रदीप तयार होऊन खाली आले. मालती काकू अनघाला पूजेसाठी काय काय सामान घ्यायचं होते देत होत्या.
"साडी चोळीने ओटी भर देवीची."
सगळं सामान घेऊन अनघा कार मध्ये येऊन बसली.
रस्त्याने ते फारसे बोलले नाहीत. प्रदीपला दोन-तीन फोन आले होते. ते बिझी होते.
रस्त्याने ते फारसे बोलले नाहीत. प्रदीपला दोन-तीन फोन आले होते. ते बिझी होते.
मंदिरात पोहोचले. छान पूजा झाली. दोघांच्या चेहऱ्यावर समाधान होतं. बराच वेळ ते मंदिरात बसलेले होते.
"अनघा आपण लंच साठी जावू रस्त्यात एक छान हॉटेल आहे."
"मुल येतील ना. उशीर होईल."
"येवू दे. मालती काकू आहेत घरी."
अनघाला माहिती होत सुमीत राहणार नाही. काय करणार पण. ते हॉटेल मधे गेले. खूप छान वाटत होत. तीच मन तरी मुलांमधे अडकलं. तिचे आवडते पदार्थ ऑर्डर केले होते.
" अनघा काय झाल? आवडत नाही का इथे? "
"नाही अस नाही."
"बोला मग काही तरी. आपण असे गप्प राहिलो तर आपली कधी ओळख होईल? अनघा तुमच्या काय अपेक्षा आहेत माझ्या कडून?"
काय सांगणार आता मुलांना सोबत घेवून पुढे जाव अस मला वाटत. पण हे खूप उत्साही आहेत माझ्या सोबत रहाण्यासाठी.
" नाही अस नाही काही अपेक्षा नाही. "
" अस बोलून कस चालेल अनघा?"
"तुम्ही सुमीत दिपू ला खूप प्रेम द्या ."
"ते तर आहेच .तुझ काय?"
"मला वाटत आपण मैत्री करावी. आपली ओळख नाही ."
"ठीक आहे. "
"तुमच्या माझ्या कडून काय अपेक्षा आहेत." अनघाने विचारल.
" तुम्ही एक खूप छान आई आहात. एक पत्नी म्हणून तुम्ही अशाच चांगल्या असाल. आपण आपल्या दृष्टीने विचार करायला हवा आता. फिरायला जायला तुम्ही नाही म्हणतात. निदान एकमेकांना आपण नावाने हाक मारू या. तू मला प्रदीप बोल मी तुला अनघा ."
"हो चालेल. "
जेवण झालं. रस्त्याने दोघ खूप बोलत होते. प्रदीप त्याच्या कामाबद्दल सांगत होते अनघा तिच्या. दोघ खुश होते. ते घरी आले. मुल आलेले होते.
सुमीत येवून भेटला. "कुठे गेली होती तु मम्मी?" तो नाराज होता.
"तु कपडे का नाही बदलले सुमीत? चल आवर आता." आत गेल्यावर तो चिडलेला होता. दूध पिल नाही. तसच रडत झोपला.
प्रदीप आत आले." काय झालं याला? "
" चिडला आहे थोडा. आधी अस करत नव्हता. काय झाल आहे ते समजत नाही."
" होईल ठीक काळजी करू नकोस." ते हॉस्पिटल मधे गेले.
ट्यूशन टीचर येवून गेली. सुमीत झोपला होता . जरा वेळाने उठल्यावर त्याला अभ्यासाला बसवल तरी तो ऐकत नव्हता. काय कराव अनघा टेंशन मधे होती.
थोड्या वेळाने प्रदीप घरी आले. दिपू मालती ताईंच जेवण झाल होत. सुमीत अनघाच्या हातून जेवला होता. तो अजूनही अनघा जवळ होता.
" काय झाल? काय म्हणतो आहे मूड?" प्रदीप विचारत होते.
"एवढाही ठीक नाही."
"काय करू या आता? सुमीत इकडे ये आपण आईस्क्रीम घेवून येवू."
" मला कुठे यायच नाही. मला आजी हवी. माझ्या घरी जायच. "
" अरे बापरे. होईल ठीक. थोडा वेळ लागेल याला. पण अस केल तर तब्येत खराब होईल ना सुमीत रडू नकोस. चल अनघा जेवून घेवू." प्रदीप बोलले.
सुमीत तिला उठू देत नव्हता. अजून चिडचिड करत होता.
" काय चाललय हे सुमीत?" प्रदीपने सुमीतला अनघाच्या मांडीवरून उठवल. रागाने धरून ठेवल. सुमीत घाबरला. अनघा पुढे येत होती. "अनघा खाली जा. ताट कर. "
हो.. ती कसबसं बोलली.
"सुमीत हट्टीपणा चालणार नाही. अभ्यास करत बस. रडला तर बघ. एवढा त्रास द्यायचा नाही. कधीच बघतो आहे ऐकत नाही तो. समजल ना."
तो घाबरला. हो म्हटला. प्रदीप रूम बाहेर आले. अनघा उभी होती. "तू काय करते आहेस इथे? खाली जायला सांगितल ना."
ती पण घाबरली. " नका चिडू प्रदीप मी समजावते सुमीतला. "
प्रदीप गेल्यावर सुमीत रडत होता. अनघाला ही कसतरी झाल. ती आत गेली. त्याला जवळ घेतल." चल बेटा खाली येतोस का? तिथे सोफ्यावर बसून अभ्यास कर." दोघ खाली आले. सुमीतने बघितल प्रदीप नव्हते आजूबाजूला. त्याला बर वाटल.
अनघा बघत होती काय आहे होम वर्क. सुमीत लिहीत बसला.
"मी जेवते बेटा."
तो हो म्हटला.
अनघाने ताट केल. ती दुःखी होती. तीच लक्ष नव्हत. आई पण का येत नाही इकडे काय माहिती? मी काय काय करू. सुमीत ऐकत नाही. प्रदीप चिडले आज. प्रदीप जेवायला आले तीच लक्ष नव्हत.
" काय झालं अनघा?"
"काही नाही."
"मुल त्रास देतात ना. "
" दिपू नाही सुमीत त्रास देतो. मी कंटाळली आहे. कशी समजूत काढू त्याची. आई इकडे येत नाहीत. सुमीत चीड चीड करतो. दिपूला वेळ देता येत नाही. आपल्याला वेळ नाही एकमेकांसाठी. "
" होईल ठीक. "
"एक रिक्वेस्ट होती. थोडे दिवस तुम्ही सुमीतच्या हट्टा कडे दुर्लक्ष करा ना. मी करते हळू हळू ठीक. त्याची आजी पण इथे नाही. लहान आहे तो. फक्त थोडा वेळ द्या."
"ठीक आहे. मला काय वाटत अनघा तु उद्या आईकडे जा सुमीत दिपूला घेवून. त्याला थोडा बदल होईल. रेखा काकू इकडे येतील तर बर होईल."
" हो मी उद्या मुल शाळेतून आल्यावर जाते तिकडे."
प्रदीपच जेवण झाल. ते सुमीत जवळ सोफ्यावर येवून बसले. तो छान लिहित होता. प्रदीप आल्या मुळे तो घाबरला. मम्मी... मम्मी... हाक मारत होता. प्रदीप गप्प होते पेपर वाचत होते. ते काही बोलले नाही म्हणून सुमीत शांत झाला. परत त्याच त्याच लिहीत होता.
अनघा आतून आली. सुमीत तिच्या जवळ सरकला.
दिपू प्रदीप सोबत बोलत होती." डॅडी आज सुमीत नाही म्हणत होता या घरी यायला. शाळेत तो त्याच्या रिक्षात जात होता."
अनघा घाबरली तिने एकदम सुमीतला जवळ घेतल. "सुमीत बेटा अस करतात का?"
"या पुढे नाही करणार तो अस. हो ना सुमीत."
तो प्रदीप सोबत बोलला नाही.
" दिपू फ्रीज मध्ये चॉकलेट्स आहेत ते आण."
ती घेवून आली.
" हे घे तुला. सुमीत हे घे बेटा."प्रदीप देत होते.
तो मानेने नाही म्हटला.
" घे सुमीत खूप छान आहे." दिपू सांगत होती.
"जावू दे उद्या तो त्याच्या आजी कडे जाईल तेव्हा घेवून जाईल. " प्रदीप दिपू सोबत बोलत होते.
" आजी कडे जायच का? " सुमीत अनघा कडे बघत होता.
" हो उद्या तू शाळेतून आला की जावू. पण दोन दिवसा साठी फक्त. परत इकडे यायच."
हो. आता सुमीत खुश होता. तो चॉकलेट खात होता.
"दिपू तू पण जायच मम्मी सोबत. "
" ठीक आहे डॅडी."
"चला झोपा आता."
" अनघा तुम्ही कुठे झोपता आहात?"
" मी सुमीत दिपू सोबत आहे. आम्ही धमाल करणार आहोत. स्टोरी सांगणार. मग गाण म्हणणार. मग झोपणार."
" अरे वाह मी पण येवू का तुमच्यात?"
"हो या ना."
मुल अनघा सोबत खुश होते .दोघ तिच्या मांडीवर डोक ठेवून झोपले होते. अनघा स्टोरी बुक वाचत होती. दोघ झोपले. प्रदीप आत आले. अनघा इकडे ये. ते सोफ्यावर बसले.
तिच्या पोटात गोळा आला. मुलांच झाल की यांच आहेच. अजून काय काय करू मी . नकार द्यायला काही कारण नाही. मुलांना नीट झोपवुन ती प्रदीपच्या जवळ जावून बसली.
"अनघा काळजी करू नकोस. मुल एडजेस्ट होई पर्यंत तू रहा इथे."
अनघा हो म्हणाली. तिला बर वाटत होत. ती तिच्या विचारात होती. प्रदीपने तिला मिठीत घेतल. ती उठत होती. तिला जावू दिल नाही. रिलॅक्स अनघा. मोकळ रहा.
प्रदीप अजून जवळ येत होते. त्यांची ती नजर. बापरे ती घाबरली. उठून उभी राहिली. मागे सरकता सरकता ती भिंतीला टेकली. ते मागे आले. समोर उभा राहिले . तिने अंग चोरून घेतल. त्यांनी दोघी हाताने तिचा चेहरा हातात घेतला. ओठांवर ओठ टेकवणार ती परत बाजूला झाली. त्यांनी तिला हाताला धरून जवळ ओढल. "प्रदीप तुम्ही प्लीज तुमच्या खोलीत जा ना."
" काय झालं अनघा?" ते हसत होते.
"काही नाही," तिने मान हलवली.
"अस कस चालेल अनघा, ही गोष्ट काही नवीन नाही आपल्या साठी, बी प्रक्टीकल. सुरुवातीला वाटेल दोघांना आॅकवर्डे. पण माझ्या सोबत रहाव लागेल ना तुला. उलट तू जेवढ्या लवकर कंफर्टेबल होशील तेवढ आपल्या साठी चांगल आहे. विचार कर यावर. गुड नाइट. " प्रदीप निघून गेले त्यांच्या बेडरूम मधे.
अनघा नुसती बसली होती. मी चुकीच वागले. आता आम्ही पती पत्नी आहोत. हा त्यांचा हक्क आहे. प्रदीपच्या अपेक्षा आहेत आम्ही दोघांनी सोबत रहाव. काय करू? तिने बघितल मुल झोपले होते. ती प्रदीपच्या रूम मधे आली.
" काय झालं अनघा? "
" सॉरी ते मी नीट नाही वागली. मी रहाते इथे. म्हणजे तुमच्या जवळ येते."
"नको जा जावून झोप. काही प्रॉब्लेम नाही. मी पण उगीच घाई करतो."
"प्रदीप रागवले का तुम्ही?"
"नाही अनघा तुम्ही सगळे डिस्टर्ब आहात. आई कडे जावून या तुम्ही मग ये इकडे रूम मध्ये झोपायला. रेखा काकू असतिल ना सुमीत राहील तेव्हा. आता तो रात्री उठला की घाबरेल. सॉरी. मी संध्याकाळी सुमीतला थोड ओरडलो. "
" तुमचा हक्काने ओरडला. काही हरकत नाही. सुमीतला धाक हवा. गुड नाइट मी जाते. "
गुड नाइट.
