रंगात तुझ्या रंगतांना भाग 12
©️®️शिल्पा सुतार
.........
.........
सकाळी सुमीत बर्या पैकी ठीक होता. त्याच त्याच आवरत होता. अनघा त्याच्याशी जास्त बोलली नाही. ती पण खुश होती. प्रदीप समजूतदार आहेत. करतात जरा माझ्या मागे मागे पण ठीक आहे. मी पण कंफर्टेबल रहायचा प्रयत्न करेल.
प्रदीप उठून आले. अनघा चहा नाश्ता देत होती. सुमीत त्याच त्याच खात होता. चेहर्यावर थोडे घाबरलेले भाव होते. प्रदीपला कसतरी झाल. अस मला घाबरून नको रहायला याने. उगीच ओरडलो.
अनघा किचन मधे गेली. दिपू आत गेली बॅग आणायला. सुमीत, प्रदीप दोघ डायनिंग टेबल जवळ होते. प्रदीप त्याच्याशी हसले. गुड मॉर्निंग सुमीत. तो पटकन आत पळाला.
" काय झालं सुमीत? शाळेत जायच की नाही? चल बेटा. " अनघा त्याला घेवून बाहेर आली. "डबा घेतला का दीपु?"
"हो मम्मी."
"चल बॅग घे सुमीत . उशीर होतो आहे."
नाश्ता झाला. प्रदीप त्यांच्या मागे आले.
"आज संध्याकाळी आपण आजी कडे जावू. उद्या सुट्टी आहे शाळेला." अनघा सांगत होती.
दोघ मुल खुश होते. सुमीत कार मधे बसला .
"दिपू इकडे ये बेटा. येतांना सुमीत सोबत आहे की नाही ते बघ ."
"हो मम्मी ."
"तो शाळेत ठीक असतो ना? "
"हो खेळतो, स्टडी करतो ."
"काय चाललय दोघींच ?" प्रदीप खुश होते. दिपू छान रहाते अनघा सोबत. मी मात्र सुमितला कंफर्टेबल करू शकलो नाही. जरा शांततेत घ्यायला हव होत मी.
"प्रदीप बघा ना. सुमीत दिपू एका वयाचे आहेत पण दिपू किती समजूतदार आहे. मला सुमीतची काळजी वाटते. तो कुठे गेला तर? काल दिपू बोलत होती सुमीत दुसर्या रिक्षात बसत होता. " अनघा काळजीत होती.
" काही होणार नाही अस अनघा. सुमीत नीट येईल घरी. मी आहे ना. चल आपण त्याच्याशी बोलू. " दोघ कार जवळ गेले.
दिपू कार मधे बसली. प्रदीपने तिला पापी दिली. गुड डे बेटा . ते सुमीत कडे बघत होते. तो प्रदीपला बघून तिकडे सरकला. प्रदीपने दुसर्या बाजूने जावून त्याला जवळ घेतल. पापी दिली. तो गप्प होता. सुमीत परत दिपू जवळ सरकून बसला. त्याने प्रदीप कडे बघितल नाही.
" तुम्ही आजी कडे जावून या मग आपण पिकनिकला जाणार आहोत. कशी वाटली आयडिया सुमीत, दिपू? वॉटर पार्क. क्रिकेट. कार आहेत तिथे छोट्या छोट्या. स्विमिंग. आपली मजा येणार आहे. "
सुमीत ऐकत होता. तो थोडासा हसला.
दिपू खुश होती. "ये.... डॅडी पिझ्झा. मेरी गो राऊंड. मस्त. "
"येस पिझ्झा ही. अजून काय हव? टाॅइज? कोण कोण येणार?"
दिपू बोलली मी.
अनघा पण म्हटली मी.
" सुमीत काय म्हणतोय? येणार का? " प्रदीप त्याला विचारत होते.
तो मानेने हो म्हटला.
फ्रेंड्स. प्रदीप हात पुढे करत म्हणाले.
तो नाही म्हटला.
"अरे मग फ्रेंड्स असल तर क्रिकेट खेळता येईल ना. मी तुला छोटी कार कशी चालवायची ते सांगेन. आणि अजून आपण तुला क्रिकेट किट घेवू म्हणजे तुला घरी पण खेळता येईल. संध्याकाळी ट्यूशन झाली की खेळायच मस्त. म्हणजे छान भूक लागते. "
"अरे वाह किती मजा सुमीत. आपण खेळू. " दिपू खुश होती.
"फ्रेंड्स.. प्लिज." प्रदीपने हात पुढे केला. सुमीतने त्याचा छोटा हात त्यांच्या हातात दिला." सॉरी बेटा." त्यांनी त्याला जवळ घेतल. अनघाला आता बर वाटल.
" छान स्टडी करायची आणि दोघांनी नीट घरी यायच. " प्रदीप मुद्दाम दोघांना बोलत होते.
ओके डॅडी.
मुल शाळेत गेली. अनघा प्रदीप आत आले. "थँक्यु प्रदीप ."
"का आता?"
असच.
" मला चहा दे थोडा."
अनघा किचन मधे आली. प्रदीप तिच्या मागे होते. त्यांनी मागून तिला मिठी मारली. ती परत दचकली." हे बघा अस नका करू प्रदीप. सोडा मला. काकू येतील."
"नाही येणार. काकूने बघितल मला किचन मधे येतांना. सुमीतला मनवल पिकनिकच सांगून. तुला कस मनवायच? कधी होकार देणार? काय हव तुला?"
अनघा हसत होती. " मी तर काल हो म्हणत होती." ती हळूच म्हटली.
आता प्रदीप थोडे हसले. "अस आहे का. चल मग आता बेडरूम मधे."
अनघा घाबरली.
" आता का? मला अस टेंशन नाही आवडत. मनापासून हो हव. माझ्या जवळ येण्यासाठी तू पण तेवढी उत्सुक हवी. उगीच बळजबरी नको. आपला विचार करणार ना अनघा. आपण पण आनंदात मुल पण आनंदात. "
हो.
" मला मनापासून होकार हवा आहे."
हो.
"आपले विचार जुळतात. आपण खुश आहोत एकमेकांसोबत. सुमीत ही खुश आहे. आता आपण आपल्या आयुष्याला सुरुवात करायला हवी. "
"चला चहा घ्यायला. "
" तू मला अजून अहो म्हणते आहेस. आपल ठरलं होत ना नावाने हाक मारायची." प्रदीप तिच्या मागे येत होते.
" मला नाही जमणार. "
" अस चालणार नाही. बोलून तर बघ. "
नाही.
" तुला एवढ बोलता येत का? नाही नको. तुम्ही जा तुमच्या रूम मधे."
आता अनघा खूप हसत होती."हॉस्पिटल मधे जायला उशीर नाही होत का आता तुम्हाला ? "
काकू आल्या. त्या येवून बसल्या. अनघा त्यांना चहा देत होती.
" काकू प्रदीप मी मुलांना घेवून आई कडे जाते संध्याकाळी . "
" ठीक आहे उद्या ये लवकर."
" उद्या आई येतील इकडे आपल्या सोबत रहायला. " अनघा मालती काकूंना सांगत होती.
" हो. आम्ही वाट बघतो. "
" काकू तुम्ही चला ना माझ्या सोबत तिकडे आई कडे . "
" येईन मी नंतर. "
प्रदीप तयार होवुन हॉस्पिटल मधे निघून गेले. अनघा मागच आवरत होती. तिने बॅग भरली. सुमीत दिपूची पण छोटी बॅग भरली.
मुल शाळेतून आले.
" मम्मी आजी कडे चल. "
" हो आधी खावून घ्या. ट्यूशन टीचरला सुट्टी आहे. पण उद्या संध्याकाळी टीचर येईल. "
"हो चालेल. "
अनघा आई कडे आली. मुल आत गेले ते बाबांसोबत खेळत होते. रेखा ताई येवून भेटल्या.
"आई काय हे? तुमची किती आठवण आली. अस चालणार नाही. तुमची बॅग भरा उद्या तुम्ही माझ्या सोबत येणार आहात. तुम्हाला माहिती का सुमीतने किती त्रास दिला या दोन दिवसात. " अनघा सांगत होती.
प्रतिभा ताई पाणी घेवून आल्या. "आई कश्याला पाणी वगैरे देते. मी घेईन ना."
"ये इकडे बस. अनघा तू सुमीत नव्हते तर करमत नव्हत. "
सुमीत खूप मोकळ खेळत होत. तो दिपूला त्याच्या वस्तु दाखवत होता.
इकडे आईकडे बर वाटत. मी नाही जाणार तिकडे. अनघाला तिच्या विचारच हसू आलं. आपण अगदी लहान मुली सारख करतो का? तिने आरामात बसुन घेतल.
" ठीक आहे का तिकडे? मालती ताई प्रदीप राव? "
" हो ठीक आहेत. चांगले आहेत स्वभावाने. मोठ घर आहे. घरात भरपुर काम करणारे आहेत. काही काम नाही."
संध्याकाळी सुमीत खेळायला गेला होता. दिपू सोबत होती.
"बाबा दिपू कडे बघा ह. तिला एक मिनिट सोडू नका इकडे तिकडे. तिला सवय नाही बागेत खेळायची. नाही तर मी येवू का? " अनघा काळजीत होती.
" नको मी आहे. काळजी करू नकोस. "
अनघाने प्रतिभा ताईंना स्वयंपाकात मदत केली. तिने थोड्या वेळाने प्रदीपला फोन केला. "बोल अनघा काय चालल आहे?
"बिझी आहात का? "
"नाही तुझ्या साठी कधीच नाही. काय करता आहेत मुल? "
" बाबां सोबत खेळता आहेत. "
" तू पण खुश आहेस वाटत? " प्रदीपला तिच्या आवाजावरून समजल.
"हो. खूप छान वाटत इकडे आईकडे . म्हणजे सॉरी."
" अस का? आमच्या पासून दूर छान वाटत का? राहू दे मुलांना तिकडे. मी येतो तुला घ्यायला. काय सांगाव तू होकार दिला तर. लेट्स स्पेन्ड सम टाइम टुगेदर. "
" नाही मी इथे रहाते. " अनघा पटकन म्हणाली.
दोघ हसत होते.
" अनघा तू अगदी सुमीत सारख करतेस."
" एन्जॉय करा उद्या ये घरी. "
" हो तुम्ही लवकर घरी जा. "
" हो. अजुन काही? "
नाही.
" मी ठेवतो फोन पेशंट आहेत. "
तिने फोन ठेवला. सुमीत दिपू खेळून आले होते. रेखा ताई देवाला दिवा लावत होत्या. दोघ मुल त्यांच्या सोबत बसले आरती केली. दिपू आजीच्या जवळ होती. खडी साखर वाट सगळ्यांना दिपू. तिला छान वाटत होत.
सुमीत दिपू जेवत होते. अनघा आता दिपू कडे लक्ष देवून होती. सुमीत कडे बघायची गरज नव्हती.
"इथे आवडल ना दिपू?" अनघा विचारत होती. तिला भीती होती रात्री रडते की काय ही.
"हो. उद्या जाणार ना आपण डॅडी कडे? " दिपूने विचारल.
" हो जावू. तो पर्यंत माझ्या जवळ झोपायच. "
हो.
" बघितल का सुमीत डॅडी सोबत नाही तरी ही रडते का? किती शहाण्या सारखी वागते. "
दिपूला छान वाटत होत.
" मम्मी मी पण आता रडणार नाही. " सुमीतने सांगितल.
" आजी सोबत रहायच तिकडे."
"तू कुठे राहणार मम्मी ? "
"अरे मम्मी डॅडी सोबत राहणार. माझ्या फ्रेंडचे मम्मी डॅडी सोबत राहतात." दीपुने माहिती दिली.
"समजल का सुमीत तू आजी सोबत दिपू पण तुमच्यात मी नाही. "
"ठीक आहे मम्मी. "
रात्री प्रदीपचा फोन आला. " दिपू झोपली ना ?
"हो काही प्रॉब्लेम नाही. रडली नाही ती ."
" तू काय करते आहेस अनघा ?"
"मी पुस्तक वाचत होती."
" बघितल किती हुशार आहे दिपू .नाही तर अनघा तू आणि सुमीत किती घाबरतात इकडे . "
अनघा हसत होती .तिला प्रदीप काय म्हणता आहेत ते समजल. "प्रदीप पुरे किती चिडवणार. "
" मग नीट राहून दाखव माझ्या सोबत. "
हो... अनघा लाजली.
चॅलेंज?
हो.
" माझ्या जवळ यायला घाबरायचं नाही. "
" प्रदीप पुरे ना. "
"बोर होत घरात. मला तू सुमीत दिपू इथे हवे आहात."
"उद्या येतो. आमचा घर आवराव लागेल. "
" खूप दमु नको. कोणाला तरी सांग काम."
हो.
दुसर्या दिवशी ते त्यांच्या घरी गेले. रेखा ताई, अनघा आवरत होत्या. "आई काय करू या घराच? "
" कॉलेजच्या मुली राहणार आहेत. त्या आता येतील रविवारी इकडे. एक खोलीत आपल एक्स्ट्रा सामान ठेवू." रेखा ताईंनी सगळं ठरवल होत.
त्या दोघींची आवरा आवर सुरू होती. दिपू सुमीतला बसायला जागा नव्हती. "तुम्ही दोघ घरी जा. आजीकडे जाता का?"
" नाही डॅडी कडे जायच." दिपू आता कंटाळली होती.
काल पासुन ती इकडे होती. "ठीक आहे सुमीत जा बेटा घरी. ऐकणार ना. "
तो हो म्हटला.
" तिकडे छान जेवून झोपा. मी येते संध्याकाळी."
ठीक आहे.
अनघाने प्रदीपला फोन केला. "या दोघांना घेवून जा. इथे सुचत नाही काही. "
" सुमीत राहील ना? "
"हो तुम्ही आहात ना थोड्या वेळ घरी?"
हो.
"राहील तो दुपारी झोपेल. "
प्रदीप आले. बाई होती कामाला ती आवरत होती. रेखा ताई, अनघा बिझी होत्या. सुमीत दिपू बसले होते.
"जा बेटा सुमीत. दिपू डॅडी सोबत. सुमीत दुपारी झोप त्या आजी जवळ. काही हव तर त्यांना सांग. दिपूला सांग. "
" आपली आजी तिकडे येणार ना?" सुमीत विचारत होता.
" हो आम्ही येतो संध्याकाळी. ट्यूशन टीचर येईल तीच ऐकायच सुमीत. छान स्टडी करून घे."
हो मम्मी.
प्रदीप कार चालवत होते. दिपू सुमीत मागे बसले होते. सुमीत अगदी दिपू जवळ होता. काही हव तर तिला हळूच सांगत होता. समोरच्या काचेतून तो प्रदीप कडे बघत होता. प्रदीप काही म्हणत नाही मग तो ही मोकळ बसला.
"आइस्क्रीम हव का मुलांनो?"
दिपू ओरडली हो. सुमीतने हळूच दिपूला हो सांगितल.
ते तिघ आइस्क्रीम पार्लेरला गेले. "कोणता फ्लेवर हवा?"
स्ट्रॉबेरी दिपूने सांगितल.
"तुला सुमीत बेटा? "
चॉकलेट तो हळूच म्हटला. प्रदीप आइस्क्रीम घेवून आले.
दिपू खूप बोलत होती. प्रदीप दोघ मुलांशी बोलत होते. आता सुमीत थोड बोलत होता.
ते खेळण्यांच्या दुकानात आले. दोघ मुल खुश होते. "काय घ्यायच? "
" डॅडी मला पझल गेम हवा." दिपू बघत होती काय काय आहे तिथे .
" तुला सुमीत?"
"तो दिपू कडे गेला. मी काय घेवू दिपू?"
"तू पण छान असा बोर्ड गेम घे. आपण दोघ खेळू शकतो."
"मला पण पझल हवा."त्याने प्रदीपला सांगितल.
"कार हवी का रिमोटची?" प्रदीप दाखवत होते.
"नाही मम्मी रागवते.
" नाही रागावणार. "
"मी छोटा मुलगा नाही."
" मग क्रिकेट किट?"
तो हो तो म्हटला. त्याच्या मापाचा किट ते शोधत होते. सुमीत अगदी खुश होता. दोन तीन स्पंज बॉल घेतले.
" सुमीत तुला सायकल येते का?"
नाही.
" मी शिकवेन. तुला दिपूला सायकल घेवू नंतर तुझ्या मम्मीला घेवून येवू. "
ते घरी गेले. जरा वेळाने दोघ मुलांच जेवण झाल. प्रदीप जेवण करून हॉस्पिटल मधे गेले. आता सुमीत मालती काकू जवळ ठीक होता.
अनघा रेखा ताईंच काम झाल होत. बरच सामान घेतल तिथून. घर आवरल. बाकीचे सामान एका खोलीत ठेवल. जे ब्रोकर होते त्यांना चावी दिली.
त्या दोघी घरी आल्या. मालती काकू खुश होत्या. अनघा रेखा ताईंना त्यांची रूम दाखव. त्या रूम मधे गेल्या. छान आहे रूम. दिपू, सुमीत त्यांच्या आजुबाजुला होते. त्यांनी रूम मध्ये देव नीट लावले.
स्वयंपाक झाला का ते अनघा बघत होती.
" मी करू शकते का ग इथे स्वयंपाक?" रेखा ताई किचन मधे आल्या.
" हो आई आपल्या घरा सारख सगळ करू शकता तुम्ही."
दिपू त्यांच्या जवळ येवून बसली. "आजी आरती करायची का?"
"हो चल सुमीत."
अनघाने प्रदीपला फोन लावला. "केव्हा येणार?"
"थोडा उशीर होईल. जेवायला थांबू नको. "
ठीक आहे.
मुल, मालती काकू, रेखा ताईंच जेवण झाल. मुल गेम खेळत होते.
" चला आता झोपा. "
दीपु थांबून होती. "मी सुमीत सोबत राहू का? "
हो सुमीत खुश होता. "मम्मी आज आणलेले नवीन स्टोरी बुक्स वाच ना." अनघा मुल रमले होते. रेखा ताई बसुन होत्या.
" आई हा झोपे पर्यंत थांबते मी."
"नको तू जा तुझ्या खोलीत मी आहे."
प्रदीप आले अनघा हॉल मधे होती. "अरे तू झोपली नाही का तू अजून?
"नाही आता मुल झोपले. "
" आलोच मी फ्रेश होवुन."
अनघाने ताट केले. "मी सांगितल होत ना जेवायला थांबू नकोस."
" मी थांबणार."
"बर ठीक आहे. झाल का घर आवरून. "
"हो चावी ब्रोकरला दिली. "
बर झाल. प्रदीप खूप बोलत होता तिच्याशी. दिवस भर काय झाल ते सांगत होते. अनघा पण खूप खुश होती.
.......
रंगात तुझ्या रंगतांना ही कथा स्पर्धेसाठी लिहिली होती. ती एक दोन भागात संपेल. मग ओढ तुझी लागली चे भाग रेग्युलर येतील.
रंगात तुझ्या रंगतांना ही कथा स्पर्धेसाठी लिहिली होती. ती एक दोन भागात संपेल. मग ओढ तुझी लागली चे भाग रेग्युलर येतील.
खुप धन्यवाद.
......
......
